Maharashtra Breaking News Live Updates, 03 June 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला काल झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरीही या योजनेतील त्रुटींवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचीही तयारी सुरू आहे. तसंच, आज मुंबईतील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या पाहुयात.

Live Updates

Live News Updates from Maharashtra, 03 June 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

19:55 (IST) 3 Jun 2026

नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरीने शिवसेनेची कोंडी; आता 'संकटमोचक' गिरीश महाजनच तारणहार?

गणेश गिते यांच्या प्रतिक्रियांमधूनही ते मंत्री महाजन यांनी सांगितल्यावर उमेदवारी नक्की मागे घेतील असे दिसून आले, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. ...वाचा सविस्तर
19:52 (IST) 3 Jun 2026

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात हातभट्ट्यांवर मोठी कारवाई, २१३ जणांना अटक, उपायुक्तांचे खाडीतून प्रवास करत धाडसत्र

विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी स्वतः खाडीतून बोटीने प्रवास करत अवैध हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या. ...सविस्तर वाचा
19:51 (IST) 3 Jun 2026

गुटखा, पानमसाला विक्री करणाऱ्यांना तुकाराम मुंढेचा चाप सहा दिवसांत २०३ संस्थांवर कारवाई करत १०२ जणांना अटक

मुंबई आणि कोकण विभागात सर्वाधिक कारवाई; तब्बल ८६ आस्थापनांना ठोकले टाळे ...वाचा सविस्तर
19:38 (IST) 3 Jun 2026

कर्जमुक्ती योजनेत राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक ; राजू शेट्टी यांची टीका

२०१९ मधील लाभार्थ्यांना ५० हजारांची मर्यादा, जाचक अटींमुळे लाखो शेतकरी योजनेतून थेट बाद होणार ...अधिक वाचा
19:27 (IST) 3 Jun 2026

परभणीत नियमबाह्य अन्नसाठा जप्त ; ३.४७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम; किसान फूड्स आणि मनियार ट्रेडर्सवर छापा ...वाचा सविस्तर
19:25 (IST) 3 Jun 2026

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ठाण्याचा डंका; टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांचा गौरवपूर्ण सहभाग

या परिषदेत त्यांनी भारतीय सहकारी चळवळीचे कार्य आणि आर्थिक विकासातील भूमिका प्रभावीपणे मांडत जागतिक स्तरावर भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राचा ठसा उमटवला. ...सविस्तर वाचा
19:25 (IST) 3 Jun 2026

सिडकोतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कर्मचारी, अधिका-यांच्या मानसिकतेवर संस्कार

यासाठी बेलापूर सिडको भवनात 'चेंजिंग माईंडस' या नूतनीकरण केलेल्या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...वाचा सविस्तर
19:20 (IST) 3 Jun 2026

तासाभराच्या पावसात अंधेरी सब वे बंद , मुंबईत बुधवारी सकाळी पावसाची हजेरी

केवळ तासाभराच्या पावसाने अंधेरी सबवेमध्ये साचले पाणी; खबरदारी म्हणून पाऊण तास वाहतूक पूर्णपणे ठप्प ...सविस्तर बातमी
19:14 (IST) 3 Jun 2026

पोलिसांची गोदामावर मोठी कारवाई; महाळुंगे एमआयडीसी ८१ गॅस सिलिंडर जप्त

पिंपरी-चिंचवड आणि खेड तालुका परिसरात गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
19:14 (IST) 3 Jun 2026

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ७ जुलैला

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पायी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...सविस्तर वाचा
19:14 (IST) 3 Jun 2026

पूर नियोजन हस्तांतरणाची योजना बारगळली, जबाबदारी सांगलीवरच

अलमट्टी आणि कोयना धरणातील पाणी विसर्गाच्या समन्वयाचे केंद्र सांगलीच राहणर ...वाचा सविस्तर
19:02 (IST) 3 Jun 2026

कर्जमाफी आदेशाची किसान सभेकडून अकोल्यात होळी

"दोन लाखांचे नाव सांगून केवळ ५० हजारांवर बोळवणूक", डॉ. अजित नवले यांचा गंभीर आरोप ...सविस्तर वाचा
18:57 (IST) 3 Jun 2026

गडचिरोली: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात आंदोलन; प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत निलंबनाची मागणी

लांजेडा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ...सविस्तर बातमी
18:56 (IST) 3 Jun 2026

विधान परिषद निवडणूक : नांदेडमध्ये महायुतीतील बंडखोरी टळणार! अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणार

प्रवीण पाटील चिखलीकर अपक्ष अर्ज मागे घेण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने वाद मिटला ...वाचा सविस्तर
18:56 (IST) 3 Jun 2026

तुकाराम मुंढेंचा दणका… जळगावात सुट्या खाद्यतेलासह शीतपेयांचा दीड लाख रुपये किमतीचा साठा जप्त!

जळगाव जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. ...वाचा सविस्तर
18:45 (IST) 3 Jun 2026

शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र फाटक भाजपचे आमदार केळकर यांच्या भेटीला; उमेदवारी अर्ज दाखल करताना केळकर होते अनुपस्थित

शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना भाजप आमदारांनी अनुपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. ...अधिक वाचा
18:42 (IST) 3 Jun 2026

RBI कडे किती टन सोने आहे? विकल्यास प्रत्येक भारतीयाच्या वाट्याला किती रुपये येतील?

पश्चिम आशियातील तणावादरम्यान रुपया स्थिर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने १२ अब्ज डॉलरच्या सोन्याची विक्री केल्याच्या अफवा बाजारात पसरल्या होत्या. ...सविस्तर बातमी
18:38 (IST) 3 Jun 2026

कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता; शेतकऱ्यांची फसवणूक; कृषी विभागाने थेट परवाने….

कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता करून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणात तपासणी व सुनावणीदरम्यान समाधानकारक खुलासा देण्यात आला. ...सविस्तर वाचा
18:38 (IST) 3 Jun 2026

गडचिरोलीत पाण्यासाठी हाहाकार; नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा पोरखेळ नागरिकांच्या मुळावर…

गडचिरोलीत वैनगंगा नदी कोरडी पडल्याने गेल्या १० दिवसांपासून नळ कोरडे; भर उन्हात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना कारभारी मात्र निवडणुकीत व्यस्त. ...सविस्तर वाचा
18:35 (IST) 3 Jun 2026

रेल्वे फलाटावर तुकाराम मुंडेंना 'नो एन्ट्री'! '५ मीटर'च्या त्या रेषेमुळे रेल्वे कॅन्टीनवाल्यांचे फावले?

रेल्वेच्या हद्दीत मुंढेंची 'सिंघम' स्टाईल कारवाई का चालत नाही आणि रेल्वेतील भेसळ रोखणारा खरा 'बॉस' याबद्दल जाणून घेऊया. ...अधिक वाचा
18:32 (IST) 3 Jun 2026

पश्चिम रेल्वेची धडक कारवाई: मदार-म्हैसूर ट्रेनमधून ३ लाखांचा गुटखा जप्त

या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेसह रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
18:32 (IST) 3 Jun 2026

क्लस्टर पूनर्वसनासाठी लघु उद्योजकांवर संकट; लघु उद्योजकांना ४८ तासांत जागा रिकामी करण्याच्या नोटीसा

या नोटीसमुळे ३५० हून अधिक कामगारांच्या रोजगारावर संकट आले असून, उद्योजकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे. ...सविस्तर वाचा
18:32 (IST) 3 Jun 2026

तीन गुन्ह्यांनी पनवेल हादरले…

एका खाजगी रुग्णालयाच्या शौचालयात मृत अर्भक लपवल्याची घटना समोर आली आहे, तर दुसऱ्या घटनेत खारघरमध्ये एका शारीरिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...सविस्तर बातमी
18:27 (IST) 3 Jun 2026

फुगेवाडी विषारी दारूकांडातील आरोपीच्या घरावर पडणार हातोडा! महापालिकेकडून नोटीस

२४ तासाच्या आत अनधिकृत बांधकाम रितसर परवानगी घेऊन केल्याचा लेखी पुरावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
17:49 (IST) 3 Jun 2026

मुंबईकरांनो एसीचा वापर कमी करा, तुमच्या विजेच्या अतिवापरामुळे होत आहे हे नुकसान..

या पार्श्वभूमीवर, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी एसी २४ अंशांवर चालवावा आणि विजेचा वापर संयमाने करावा, असे आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीने मुंबई, भाईंदर, ठाणे आणि पालघरमधील ग्राहकांना केले आहे. ...सविस्तर बातमी
17:41 (IST) 3 Jun 2026

फेरिवाल्यांची मुजोरी, थेट कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की ; अंरनाथ शहरातील प्रकार, फेरिवाल्यांवर अदखलपात्र गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कारवाई दरम्यान हा प्रकार घडला असून, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या सूचनेनंतर शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात फेरिवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
17:36 (IST) 3 Jun 2026

इचलकरंजीत प्रोसेसर्स बंद सुरू करण्याच्या मागणीसाठी कामगार, प्रोसेसधारकांचा मोर्चा

रोजीरोटी आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न; तोडगा न निघाल्यास प्रांत कार्यालयात ठिय्या मांडण्याचा इशारा ...सविस्तर बातमी
17:30 (IST) 3 Jun 2026

ब्रिटिश एअरवेजच्या मुंबई-लंडन विमानात तांत्रिक बिघाड

मुंबई विमानतळावर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता लंडनसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात ऐनवेळी बिघाड ...अधिक वाचा
17:29 (IST) 3 Jun 2026

जिल्ह्यात वीज पडून २७ जणांचा मृत्यू; वीज पडताना दक्षता घेण्यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन

जव्हार, मोखाडा व विक्रमगड हे तालुके सर्वाधिक वीज जोखीम प्रवण क्षेत्रात येत असून, नागरिकांनी वादळी परिस्थितीत 'दामिनी ॲप'चा वापर करावा आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे ...सविस्तर वाचा
17:29 (IST) 3 Jun 2026

बुलढाणा पोलिसांचा अजब कारभार! निष्पाप आदिवासी बाप-लेकाला हत्येच्या गुन्ह्यात अडकवले; चौकशी अहवाल येताच मोठी कारवाई

पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. ...सविस्तर वाचा

Live News Updates from Maharashtra, 03 June 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा