Top Marathi News Updates : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यातच भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची एक घटना समोर आली आहे. एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याने थेट माजी खासदारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची कथित ध्वनिफित (ऑडीओ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून संबंधित पदाधिकाऱ्याने पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आमदार रोहित पवार यांनी यावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे.
दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. तसेच कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून सरकार अलर्ट झालं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai Breaking News Live, 30 July 2026 : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
कोल्हापुरात निवृत्त शल्य चिकित्सकाकडून गर्भपाताचे रॅकेट; पोलिसांनी २५० गर्भपात करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात पकडले
‘एअर इंडिया’ इमारतीतील २३ व्या मजल्यावरून चालणार राज्याचा कारभार! २०० कोटींची बचत होणार
जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना १०५ कोटी रुपयांची कर्जमाफी ; शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना
महालक्ष्मी मंदिराच्या संवर्धनप्रश्नी देवस्थान समिती,पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
मिरज पंचायत समितीच्या इमारतीला डॉ. आंबेडकर यांचे नाव ; तणावाच्या शक्यतेने पोलीस तैनात
सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांसमोरच अधिसभा सदस्यांचा जमिनीवर ठिय्या
कंगना राणावत ‘त्या’ वक्तव्यावरून अडचणीत? नागपुरात एनएसयूआयचा आक्रमक मोर्चा
समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रातील मासेमारी परवानगीला स्थानिक मच्छीमारांचा विरोध
शिवसेना पक्ष, चिन्ह नेमकं कोणाचं? मोठी अपडेट समोर, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? वाचा!
शिवसेना पक्ष, चिन्ह नेमकं कोणाचं? हा वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी शिवेसना (ठाकरे) पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांची बाजू सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेत सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
-शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली.
-कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरू केला.
-सिब्बल : १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन झाली.
-उद्धव ठाकरे यांना २०१३ मध्ये पक्षप्रमुख म्हणून नेमले.
-संघटनेत निवडणूक झाल्याचे पुरावे आहेत. ते कोर्टाला दिले आहेत.
-सिब्बल : विधान परिषद निवडणूक होती. तिथे क्रॅास वोटींग झाली. तिथे आम्हाला संशय आला की एकनाथ शिंदे काहीतरी करत आहेत. ३१ आमदार सूरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला गेले. गोगावले यांना व्हीप केले. व्हीप हटवले. पक्ष त्यांचा नाही, नंतर ते राज्यपालांकडे सरकार स्थापन करतात.
-कपिल सिब्बल : मी सध्या अपात्रतेबाबत युक्तीवाद करतोय. हा पक्षातील लीडरशीपचा मुद्दा आहे.
-शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली. पुढील सुनावणी मंगळवारी ४ ॲागस्ट रोजी होईल.
“बघून घेतो म्हणजे काय? लोकांचे संसार जळायला लागलेत”, तानाजी सावंत तहसीलदारांवर संतापले, व्हिडीओ व्हायरल
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आता तानाजी सावंत हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २०२५ च्या पीक विमा भरपाईतील झालेल्या तफावतीवरून तानाजी सावंत हे वाशी तालुक्यातील तहसीलदारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहेत. तानाजी सावंत आणि संबंधित तहसीलदार यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
E20 Petrol : ई-२० अन् इंजिनचे नुकसान यांच्यात कोणताही संबंध नाही; १.९८ लाख कोटींचे परकीय चलन वाचवल्याचा सरकारचा दावा
पेपरफुटी फक्त आजचा मुद्दा नाही, २०१८ पासून ७ मोठ्या परीक्षांचे पेपर फुटले; वाचा कसा झाला गोंधळ!
शिवसेना पक्ष, चिन्ह नेमकं कोणाचं? हा वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी शिवेसना (ठाकरे) पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांची बाजू सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेत सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे.
नालासोपाऱ्यात सांडपाणी प्रकल्पाच्या कामामुळे रस्ते चिखलात; पालिकेच्या दुर्लक्षाविरोधात भाजपचे आंदोलन
रक्षा खडसेंविषयी वादग्रस्त वक्तव्य… 'ती' कथित क्लिप थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे; एकनाथ खडसे आक्रमक!
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौथा बळी, प्रशासनाच्या उदासिनतेविरुध्द नाशिककरांची नाराजी
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांविषयी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या नगरसेविकांची तक्रार; आयुक्तांना समज देणार
अण्णा भाऊ साठे स्मारक प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन
"...तर मुंबई अन् महाराष्ट्र ड्रग्ज फ्री होईल", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
"एकीकडे ड्रग्जचं वाटप रोखण्यासाठी पोलीस काम करतीलच. पण विद्यार्थ्यांनी, युवकांनी ठरवलं की आम्हाला ड्रग्जच्या आहारी जायचं नाही तर ड्रग्जचं वाटप करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. पोलीस आपलं काम करत आहेत. तसंच कॉलेज आणि शाळांच्या बाजूला अशी काही विक्री होत नाही ना याकडे लक्ष दिलं जातं आहे. एखाद्या विभागाने काही गोष्टी साध्य होणार नाही. आपल्याला प्रत्येकाला सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. ज्या युद्धात ड्रग्ज संदर्भातली इको सिस्टिम उधळून टाकावी लागेल. विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांनाच एकत्र येऊन काम करावं लागेल. जिथून ड्रग्ज येतात, तयार होतात अशा सगळ्या ठिकाणी कारवाईही केली जाईल. शाळा, कॉलेजच्या बाजूला जे ड्रग्ज विक्री करतात त्यांना जेरबंद करुन त्यांच्या आकांपर्यंत पोहचणं अशा पद्धतीने आपण काम केलं तर ड्रग फ्री मुंबई आणि महाराष्ट्र तयार होईल", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
टँकर मधून अवैधरित्या गॅस चोरी, मुंबईच्या पथकाची बुलढाण्यात कारवाई
मला भाजपची ऑफर…, पण मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही, अभिजित दिपके याचा गौप्यस्फोट
दोन झुरळं सापडली म्हणून पंचतारांकित हॉटेल बंद करणे कितपत योग्य ? एफडीएच्या कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कल्याण-डोंबिवली आयुक्तांना दुसरे स्मरणपत्र
गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषणाची आणखी एक क्लिप व्हायरल..? एकनाथ खडसे कायदेशीर कारवाईच्या तयारीत
सावनेरमध्ये १० हजार कोटींचा खत प्रकल्प! हजारो रोजगार, गॅल-आरसीएफ करारामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना
मंत्र्यांच्या कान उघाडणीने शिवसेना शिंदे पक्षात खळबळ
मिरजेत होणार म्युझिक हेरिटेज पार्क
'देशाला आतून पोकळ करून संपवण्याचं षडयंत्र सुरू', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
"देशाला आतून पोकळ करून संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. ड्रग्जच्या विरोधात आपल्याला ताकदीने उभं राहण्याची गरज आहे. ड्रग्जच्या विरोधात सर्वांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
डहाणूत रुग्णाचा १ किलोमीटर डोलीतून ; पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एरणीवर
तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा; “पंचतारांकित हॉटेल असो वा खाद्यपदार्थ विक्रेता…”
Tukaram Munde FDA News: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवायांचा धडाका सुरू आहे. अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेला आहे. तुकाराम मुंढे यांच्या विभागाने सुरू केलेल्या कारवायानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स|
