Maharashtra Top Marathi News Updates, 19 August 2026 : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण चांगलंच तापलेलं आहे. यातच शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं? यावरून ठाकरे आणि शिंदे सेनेत सुरू असलेल्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया सुरू आहेत. दरम्यान, यासह राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Today’s Top Marathi News Live Updates, 19 August 2026 : राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
"गरजू मराठ्यांना आरक्षण द्यावे मात्र सरसकट नको", परभणीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली भूमिका
"…तर वर्षभरात पदाचा राजीनामा देईन", कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड असे का म्हणाले?
पनवेल: पांडवकडा धबधब्याचा आणखी एक बळी
रामदास आठवलेंच्या ऑफरवर CJP च्या अभिजीत दिपकेंचा सवाल, म्हणाले, ‘महिन्यापूर्वीच मी देशद्रोही होतो ना?’
VIDEO: 'बोअरवेल'मध्ये अडकून पडलेल्या तीन वर्षाच्या अदनानला बाहेर काढण्याची झुंज यशस्वी !
सोलापूर : वैराग तालुका निर्मितीच्या मुद्द्यावर निरंजन भूमकरांसह १५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप; करवाढीवरून महायुतीत वाद चव्हाट्यावर, ठाण्यात नेमकं काय झालं?
'वारणा'ची दूध खरेदी, विक्री दरात वाढ; विक्रीही वधारली
'उधना–सुभेदारगंज' विशेष एक्स्प्रेसला पुन्हा 'इतकी' मुदतवाढ… खान्देशातील प्रवाशांना लाभ
नाशिक खड्डेमुक्त अन् गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचे आदेश; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा
गुन्हेगारी मोडण्यासाठी दोन-चार एन्काउंटर व्हायला हवेत - पडळकर
दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या जागेची मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पाहणी; स्थानिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी
नाशिकमध्ये मंगळागौरीचा 'स्मार्ट' ट्रेंड! पारंपरिक खेळ ते नऊवारी साड्यांचा बाजारात मोठा थाट
“आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली आहे कारण…”, अरविंद सावंत सुनावणीनंतर काय म्हणाले?
शिवसेना कुणाची? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा सामना आहे. कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. तसंच धनुष्यबाण आम्हाला मिळणार नसेल तर ते चिन्ह गोठवा असंही कपिल सिब्बल म्हणाले आहेत. कपिल सिब्बल यांनी इतरही सगळ्या बाजू न्यायालयाला सांगितल्या. उद्या कपिल सिब्बल यांच्यासह ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरु होईल. दरम्यान आज करण्यात आलेल्या चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मालेगावजवळ भीषण अपघात: बस-ट्रकच्या धडकेत २ महिला ठार, २३ प्रवासी गंभीर जखमी
'शिंदेंना आता अपात्र घोषित करू शकतो का?' न्यायमूर्तींचा सवाल
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने आज आधी कपिल सिब्बल युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. युक्तिवादाच्या शेवटी ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी देवदत्त कामत यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले. देवदत्त कामत यांच्या युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक मोठा सवाल केला.
‘आज आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा देऊ शकतो का?, असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला.
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
‘उद्धव ठाकरेंनी शिंदेंची हकालपट्टी केली होती, मग नार्वेकरांनी त्यांना पक्षाचा नेता कसं मानलं?’ सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत २०२२ मध्ये बंड केलं. एकनाथ शिंदे यांना भाजपाने पाठिंबा दिला. त्यांच्यासह ४० आमदार होते. भाजपाच्या पाठिंब्यावर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर उद्धव ठाकरेंचं सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला त्यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडलं होतं. यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलं. याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केला. एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्यात आली होती तर मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांना पक्षाचा नेता कसं ठरवलं असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने आज आधी कपिल सिब्बल युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. युक्तिवादाच्या शेवटी 'धनुष्यबाण चिन्ह गोठवा', अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी देवदत्त कामत यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले.
देवदत्त कामत यांच्या युक्तिवादा दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक मोठा सवाल केला. 'आज आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा देऊ शकतो का?, असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला. दरम्यान, यानंतर आजची सुनावणी संपली आहे. आता उद्या (२० ऑगस्ट) पुन्हा सुनावणी होणार आहे.
धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. यानंतर आजची सुनावणी संपलेली आहे.
'शिंदेंनी उचललेली सर्व पावलं चुकीची', देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर आता देवदत्त कामत हे न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांनी उचललेली सर्व पावले चुकीची आहेत. बंडखोर निर्णय घेऊ शकतो. पण त्यासाठी कायदेशीर पद्धत असते. सगळीकडे २०१८ च्या घटनेचा अवलंब केला गेला, असाही युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला आहे.
'आज शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?', न्यायमूर्ती बागची यांचा सवाल
देवदत्त कामत यांच्या युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक मोठा सवाल केला आहे. 'आज आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?', असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बागची यांनी केला. आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा देऊ शकतो का?, असाही सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला.
परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश
'आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा देऊ शकतो का?', न्यायमूर्ती बागची यांचा सवाल
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर आता देवदत्त कामत हे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. आमदारांची टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं आहे. जर शिंदे पक्षात राहिले नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे दावे कसे राहतील? बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता, हे महत्वाचं आहे. पक्षाचे प्रमुख, पक्षाचे सचिव या पक्षाच्या संघटनेच्या रचनेची एकनाथ शिंदेंनी पायमल्ली केली, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.
देवदत्त कामत यांच्या युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक मोठा सवाल केला आहे. 'आज आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?', असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बागची यांनी केला. आम्ही शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा देऊ शकतो का?, असाही सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला.
'आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?', सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर आता देवदत्त कामत हे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. आमदारांची टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं आहे. जर शिंदे पक्षात राहिले नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे दावे कसे राहतील? बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता, हे महत्वाचं आहे. पक्षाचे प्रमुख, पक्षाचे सचिव या पक्षाच्या संघटनेच्या रचनेची एकनाथ शिंदेंनी पायमल्ली केली, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.
देवदत्त कामत यांच्या युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी एक मोठा सवाल केला आहे. 'आज आम्ही एकनाथ शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?', असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बागची यांनी केला आहे.
नांदेड: सव्वा चारशे शाळांना स्वयंपाक घरच नाही! जिल्ह्यात चार लाख विद्यार्थ्यांना दिला जातो पौष्टिक आहार
'पक्षाच्या संघटनेच्या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली', देवदत्त कामत यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर आता देवदत्त कामत हे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.
'विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा' असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. आमदारांची टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं आहे. जर शिंदे पक्षात राहिले नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे दावे कसे राहतील? असं देवदत्त कामत यांनी म्हटलं. तसेच बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता, हे महत्वाचं आहे. पक्षाचे प्रमुख, पक्षाचे सचिव या पक्षाच्या संघटनेच्या रचनेची एकनाथ शिंदेंनी पायमल्ली केली, असाही दावा देवदत्त कामत यांनी केला.
Video: CJP च्या अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना सवाल; 'एकीकडे शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असताना PM CARES फंडमध्ये तब्बल ८,४५२ कोटींचा निधी पडून का?'
'आमदारांची टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं', देवदत्त कामत यांचा युक्तिवाद
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर आता देवदत्त कामत हे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. 'विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा' असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. आमदारांची टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं आहे. जर शिंदे पक्षात राहिले नाही, तर त्यांच्याकडून केले जाणारे दावे कसे राहतील? असं देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे.
Ramesh Mhatre News Update: रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ; ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर, (फोटो-लोकसत्ता टीम)
