Maharashtra Breaking News Updates, 07 August 2026: “आम्ही निवडणूक आयोगाची ‘ती’ चूक समोर आणली,” शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “आज कोर्टासमोर कपिल सिब्बल आणि कामत यांनी आमची बाजू मांडली.” तसेच निवडणूक आयोगाकडून खूप मोठी चूक झाली होती आणि ती तेव्हाच सुधारण्याची गरज होती, असेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले आहेत त्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच मोठी मागणी केली आहे.
मनोज जरांगेंच्या बाबतीत निषेधाचा ठराव कॅबिनेटमध्ये आला पाहिजे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतीच प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रसाद लाड यांना समज द्यावी, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. प्रसाद लाड कुठेही दिसले तरी त्यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे कोल्हापूर येथे मिलिंद नार्वेकर यांनी उदय सामंत यांची भेट घेतली, तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. या बातम्यांसहच राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया या ‘लाईव्ह’ ब्लॉगच्या माध्यमातून…

Live Updates

Today’s Breaking News Live Updates, 07 August 2026 | महाराष्ट्रतील बातम्या लाईव्ह वाचा

19:08 (IST) 7 Aug 2026

VIDEO : ‘झेन-झी’सोबत संवादानंतर सरसंघचालक मोहन भागवत बुलढाणा दौऱ्यावर, शेगावच्या गजानन महाराज समाधीस्थळी झाले नतमस्तक…

'झेन-झी'शी संवादानंतर RSS प्रमुख मोहन भागवत बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेगावच्या गजानन महाराज समाधीचे दर्शन घेऊन खामगावात विविध बैठकांना हजेरी लावली. ...सविस्तर बातमी
18:38 (IST) 7 Aug 2026

गुजरातमधील चांदीपुरा विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कता; किशोरी पेडणेकर यांची उपाययोजनेसाठी कृती आराखड्याची सूचना

गुजरातमधील चांदीपुरा विषाणूच्या धोक्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा; किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेला तात्काळ विशेष कृती आराखडा लागू करण्याची सूचना केली. ...अधिक वाचा
18:37 (IST) 7 Aug 2026

वरळी, प्रभादेवी परिसरात कचऱ्याचे ढीग; कचरा संकलनाच्या नव्या कंत्राटामुळे घनकचरा सेवेवर परिणाम

वरळी आणि प्रभादेवी परिसरात नव्या कंत्राटामुळे कचरा संकलनात तात्पुरता विस्कळीतपणा आला असून पुढील ३-४ दिवसांत सेवा पूर्वपदावर येईल, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे. ...अधिक वाचा
18:27 (IST) 7 Aug 2026

जन्म मृत्यूशी संबंधित अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली

मुंबई महापालिकेने जन्म-मृत्यू दाखले, दुरुस्ती आणि नाव समाविष्ट करण्यासाठी सीएफसी केंद्रांवर स्वतंत्र खिडकी आणि नवीन संगणक प्रणाली सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
18:19 (IST) 7 Aug 2026

ईटी-आयव्हीएफ तंत्रज्ञानाला मोठे यश; एका भ्रूण संकलनातून चार उच्च आनुवंशिक मुऱ्हा रेडकांचा जन्म

ताथवडे येथील प्रयोगशाळेत ईटी-आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकाच संकलनातून मुऱ्हा जातीच्या ४ उच्च आनुवंशिक रेडकांचा यशस्वी जन्म झाला असून, दुग्ध व्यवसायासाठी हा मोठा टप्पा ठरला आहे. ...सविस्तर वाचा
17:46 (IST) 7 Aug 2026

अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या आराखड्यात बदलाची शक्यता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महामेट्रो प्राधिकरणाला निर्देश

ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या लोकमान्यनगर व उपवन भागातील प्रस्तावित मार्गात बदल होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रोला निर्देश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 7 Aug 2026

डोंबिवली सागावमध्ये कौशल रेसिडेन्सीच्या सदनिकेतील स्लॅब महिनाभरात दुसऱ्यांदा कोसळला

डोंबिवली सागाव येथील कौशल रेसिडेन्सी इमारतीत महिनाभरात दुसऱ्यांदा स्लॅब कोसळला. निकृष्ट बांधकाम आणि बिल्डरच्या बनावट कागदपत्रांमुळे शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ...अधिक वाचा
16:53 (IST) 7 Aug 2026

“भाजपची उमेदवारी तुमच्या सांगण्यावरून दिली जाते, या थापा मारणे बंद करा”, आमदार राजेश वानखडेंची रवी राणांवर टीका

तिवसा मतदारसंघात बदल निश्चित असल्याचे वक्तव्य करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्यावर भाजप आमदार राजेश वानखडे यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे ...सविस्तर बातमी
16:45 (IST) 7 Aug 2026

पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

कांदळवन आणि जलस्रोत नष्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी; पालिका अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची विनंती ...अधिक वाचा
16:19 (IST) 7 Aug 2026

वयोवृद्धाची सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला जालन्यातून अटक

सीसीटीव्ही फुटेज अन् तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी गणेश नरवाडेला जालन्यातून घेतलं ताब्यात. ...अधिक वाचा
16:06 (IST) 7 Aug 2026

ढोल वाजवून पाठदुखी, मणक्यात दुखापत? हा वेटलॉस प्रोग्राम पण…; डॉक्टरांनी दिला गंभीर आरोग्याच्या समस्यांवर महत्त्वाचा सल्ला!

गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांचा सराव वेगाने सुरू असताना वादकांमध्ये पाठदुखी, हातदुखी आणि मणक्यांच्या दुखापतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...सविस्तर बातमी
15:59 (IST) 7 Aug 2026

भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलावर गुरांचा मुक्त संचार ; वाहतुकीला अडथळे; अपघाताचा धोका वाढला

शेणामुळे अस्वच्छता अन् अपघाताचा धोका; समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईचे आदेश ...वाचा सविस्तर
15:05 (IST) 7 Aug 2026

कल्याणकारी मंडळात ओला-उबर चालकांनाही संधी; नोंदणीचे आरटीओचे आवाहन

राज्य शासनाने प्रवासी वाहतूक चालकांसाठी कल्याणकारी मंडळाचा विस्तार केला असून, आता ओला-उबर व इतर टॅक्सी चालकांनाही विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आरटीओने नोंदणीचे आवाहन केले आहे. ...अधिक वाचा
15:05 (IST) 7 Aug 2026

‘एमएच ०१ एफएल’ दुचाकी मालिकेला १० ऑगस्टपासून प्रारंभ; पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई मध्य आरटीओमध्ये दुचाकींसाठी 'एमएच ०१ एफएल' ही नवीन नोंदणी मालिका सुरू होत असून, पसंतीच्या क्रमांकासाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
14:54 (IST) 7 Aug 2026

पार्किंग शुल्कात फसवणूक झालेल्या वाहनधारकांना शुल्क परत मिळणार; अंबरनाथ नगर परिषदेची जाहीर नोटीस, नागरिकांना आवाहन

अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेल्वे स्थानकालगतच्या वाहनतळावर दुचाकी चालकांकडून अतिरिक्त पार्किंग शुल्क वसुलीप्रकरणी नगर परिषदेने कठोर कारवाई केली आहे. ...वाचा सविस्तर
14:53 (IST) 7 Aug 2026

वसई रोड-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसमध्ये बँक कर्मचाऱ्याच्या लॅपटाॅपची चोरी

या मार्गावर रेल्वेतून चोऱ्या करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 7 Aug 2026

माथेरान पॉड हॉटेलची योजना तीन वर्षांनंतरही कागदावरच

माथेरानमध्ये स्वस्त आणि अत्याधुनिक निवासासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेली पॉड हॉटेल योजना तीन वर्षांनंतरही कागदावरच राहिल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. ...सविस्तर बातमी
14:47 (IST) 7 Aug 2026

मराठी बोलीभाषांच्या अध्ययन, संशोधनाला चालना; मुंबई विद्यापीठाचा कृत्रिम प्रज्ञेसह भाषा संशोधनासाठी पुढाकार

मुंबई विद्यापीठ आणि मराठी भाषा विद्यापीठात ऐतिहासिक करार झाला असून, AI तंत्रज्ञान, बोलीभाषा संवर्धन व संयुक्त संशोधनाद्वारे मराठी भाषेच्या शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ...सविस्तर बातमी
14:22 (IST) 7 Aug 2026

सीएसएमटीच्या फलाट १६ वरील ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; २१ ऑगस्टपर्यंत काही एक्स्प्रेस दादर-ठाण्यापर्यंतच

सीएसएमटी पुनर्विकास कामांमुळे फलाट १६ वरील ब्लॉक २१ ऑगस्टपर्यंत वाढवला. यामुळे हावडा, अमरावती, तेजस एक्स्प्रेस दादरला, तर मंगळुरू एक्स्प्रेस ठाण्यापर्यंतच धावेल. ...सविस्तर बातमी
14:18 (IST) 7 Aug 2026

पवित्र पोर्टलवरून शिक्षकभरतीला सुरुवात; राज्यामध्ये ३२ हजार पदांसाठी १.७० लाख उमेदवार

पवित्र पोर्टलद्वारे ३०,२०९ शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून १.७० लाख पात्र उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवणे बंधनकारक आहे. ...अधिक वाचा
14:18 (IST) 7 Aug 2026

पवित्र पोर्टलवरून शिक्षकभरतीला सुरुवात; राज्यामध्ये ३२ हजार पदांसाठी १.७० लाख उमेदवार

पवित्र पोर्टलद्वारे ३०,२०९ शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून १.७० लाख पात्र उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवणे बंधनकारक आहे. ...अधिक वाचा
14:06 (IST) 7 Aug 2026

राज्यातील साडेचार हजार होमिओपॅथी डॉक्टरांचे एमएमसीकडे अर्ज; ९ हजार ९७२ डॉक्टरांनी पूर्ण केला सीसीएमपी अभ्यासक्रम

राज्यातील सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या साडेचार हजार होमिओपॅथी डॉक्टरांनी एमएमसीकडे नोंदणीसाठी अर्ज केले असून, डॉ. नेहा पवार यांच्या नोंदणीनंतर या प्रक्रियेला गती मिळाली आहे. ...अधिक वाचा
13:56 (IST) 7 Aug 2026

VIDEO: CJP च्या अभिजीत दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढले, कोणत्या पदावर आहात? यांचं नाव लिहून घ्या" नेमकं काय घडलं?

आपल्या घरी येणाऱ्या नागरिकांशी पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके यांनी संबंधित पीएसआय अधिकाऱ्याला जाब विचारला आणि थेट घराबाहेर जाण्यास सांगितले. ...सविस्तर बातमी
13:48 (IST) 7 Aug 2026

डॉक्टरांना मारहाण :रमेश म्हात्रेची २० दिवस तुरूंगातील मुक्कामानंतर सुटका होणार, राज्याबाहेर राहण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाचा दिलासा

डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने २० दिवसांच्या कोठडीनंतर जामीन मंजूर केला आहे. ...वाचा सविस्तर
13:33 (IST) 7 Aug 2026

वैद्यकीय, दंत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात;अर्ज नोंदणी १२ ऑगस्टपर्यंत, तर पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्टला

राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
13:06 (IST) 7 Aug 2026

‘कडोंमपा’ नगररचना विभागाच्या बांधकाम मंजुरीच्या फाईल्स मंजुरीसाठी बाहेर

या सर्व प्रकाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विकासक, वास्तुविशारद आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...सविस्तर बातमी
13:06 (IST) 7 Aug 2026

राज्यात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

या मेळाव्यांपूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य आणि पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या निवडीचे प्रमाण वाढेल. ...वाचा सविस्तर
12:49 (IST) 7 Aug 2026

"आरोप करायला अक्कल लागत नाही…", मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, "रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणे आणि सिस्टीममध्ये राहून काम करणे, यात खूप मोठा फरक असतो." ...अधिक वाचा
12:46 (IST) 7 Aug 2026

ठाणे- बोरीवली भुयारी प्रकल्पासाठी मुल्लाबाग भागात दोन महिन्यांसाठी वाहतूक बदल

ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मुल्लाबाग परिसरातील वाहतुकीत ५ ऑक्टोबरपर्यंत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. ...सविस्तर बातमी
12:28 (IST) 7 Aug 2026

धारावी पुनर्विकासात ५० टक्के झोपडीवासीय पात्र होण्यात अडचण; अदानी समुहाचे दहा लाख घरांचे लक्ष्य!

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १० लाख रहिवाशांना घरे देण्याचे लक्ष्य अदानी समुहाने ठेवले असले तरी, ५० टक्के मूळ झोपडीवासीय अपात्र ठरण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे ...अधिक वाचा

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स | महाराष्ट्र मान्सून अपडेट्स