Maharashtra Politics Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चर्चेत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरून राज्यभरात आवाज उठवला आहे. भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत विरोधक करत आहेत. तसेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत असून यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांनी आपल उपोषण मागे घेतलं आहे. तसेच ठाकरे गटाचे काही नेते आणि कॉग्रेसचे काही नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Marathi News Live Update Today : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

20:07 (IST) 31 Jan 2025

वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर

पश्चिम रेल्वेवरील वसई, नालासोपारा, मिरा रोड ही रेल्वे सर्वात गर्दीची स्थानके बनत चालली असून येथे अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. २०२४ या वर्षात वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २२७ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर...

19:30 (IST) 31 Jan 2025

अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत

डहाणू : तलासरी तालुक्यातील वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार शुक्रवार ३१ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे.

वाचा सविस्तर...

18:49 (IST) 31 Jan 2025

अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

‘जसा आहे तसे स्वीकारा आणि जसे पाहिजे तसे घडवा ’असा संघ मंत्र माहीत असणाऱ्या भाजपच्या बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये आलेल्या अर्चना पाटील चाकुरकरांना पूर्णत: स्वीकारले नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

18:18 (IST) 31 Jan 2025

सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण

मोर्चामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान करण्यात आला असून, त्यामुळे कार्यकर्ते व समर्थक यांच्या भावना दुखावल्या, अशा आरोपाची तक्रार अर्जुन गाढे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 31 Jan 2025

वसंत कानेटकरांचा जन्मगावी अर्धपुतळा, ‘मसाप’चा पुढाकार; रहिमतपूर येथे रविवारी अनावरण

परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये साताऱ्यातील शाहुपुरी शाखेच्या पुढाकाराने ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी अर्धपुतळा उभारून त्यांचे यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:42 (IST) 31 Jan 2025

करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला

काही दिवसांपूर्वीच कापसाचा हंगाम संपुष्टात आला आहे. शेवटच्या टप्प्यात बारा रुपये किलो याप्रमाणे अनेक ठिकाणी वेचणीसाठी पैसे द्यावे लागले.

सविस्तर वाचा...

17:30 (IST) 31 Jan 2025

पालघर : मध्यरात्रीनंतर जिल्हा परिषदेचा सांस्कृतिक कार्यक्रम थांबविणाऱ्या पोलिसांसोबत पदाधिकाऱ्यांचा वादंग

जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ १७ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने अखेरच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक सदस्य व पदाधिकारी नृत्य व मनोरंजन करण्यात गुंग होते.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 31 Jan 2025

नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी

नागपूर : विकृत समुपदेशक विजय घायवटविरुद्ध अनेक तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या तक्रारी देण्यासाठी समोर येत आहेत. आतापर्यंत तीन अल्पवयीन मुली आणि एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा....

17:10 (IST) 31 Jan 2025

भंडारा : धक्कादायक! ‘दावत’साठी मंडपामागेच गोवंशाची कत्तल

भंडारा : लग्न आटोपले आणि दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांना ‘दावत’साठी चक्क गोवंशाचे मास वाढण्याची तयारी सुरू होती. मांडवाच्या मागच्या बाजूला काही लोक गोवंशाची कत्तल करत होते. त्याचवेळी या मार्गाने महाविद्यालयात जाणाऱ्या एका तरुणाने हा धक्कादायक प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ चित्रित केला.

सविस्तर वाचा...

17:09 (IST) 31 Jan 2025

राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप

नागपूर : के‌वळ मंत्री धनंजय मुंडे किंवा संजय राठोड यांच्यावरच आरोप नाहीत, तर राज्य सरकारमधील ६५ टक्के मंत्री कलंकित आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून वेगवेगळ्या न्यायालयात खटले सुरू आहेत. महाराष्ट्रातील सरकार गुन्हेगारांचे सरकार आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

सविस्तर वाचा....

16:47 (IST) 31 Jan 2025

मेजर डॉ. संजय चौधरी यांची राज्य पातळीवर निवड

कर्जत : रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व एनसीसी विभागाचे प्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी यांची निवड निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यावर झाली आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन एनसीसी मार्फत वृक्ष लागवड, जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता प्लास्टिक निर्मूलन, स्वच्छ भारत अभियान विविध जनजागृती कार्यक्रम, पुनीत सागर अभियान यासारखे राष्ट्रीय कार्यक्रम राबवून राष्ट्रहित व सामाजहित जोपासण्याचे व पर्यावरण पूरक कार्य करिता केलेल्या प्रयत्नामुळे त्यांची राज्य संघटक म्हणून २०२६ पर्यंत राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे.

मेजर डॉ. संजय चौधरी यांना या अगोदर ग्रीन आर्मी प्रोजेक्ट व स्वच्छ भारत अभियान मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय नगरकर कर्नल प्रसाद मिजार तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, अंबादास पिसाळ बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, वनश्री ताई मोरे, छायाताई राजपूत, लतिका ताई पवार, प्रतापराव काळे ,तुकाराम अडसूळ, प्रकाश केदारी, प्रा. डॉ. शरद दुधाळ, रामेश्वर चेमटे , प्रा. अमोल चंदनशिवे, श्रीमती आशाताई कांबळे, बाळासाहेब गाडेकर, श्री राजेंद्र अहिर, चंद्रकांत भोजणे यांनी अभिनंदन केले आहे. निवडीचे पत्र प्रमोद मोरे अध्यक्ष निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी मेजर डॉ. संजय चौधरी यांना देऊन जबाबदारी सोपवून सन्मान केला आहे.

16:15 (IST) 31 Jan 2025

पुणे : गुन्हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; मेफेड्रोन, गांजा विक्री प्रकरणात तिघे अटकेत

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 31 Jan 2025

पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद

पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर...

15:56 (IST) 31 Jan 2025

महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "कोणाला पाठिंबा..."

मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याचं म्हटलं. त्यांच्या या भूमिकेबाबत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "महंत नामदेव महाराज शास्त्रींनी काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी हा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यासंदर्भात काही टीका करण्यापेक्षा मुंडे कुटुंबीयांला भगवान गडाचा पाठिंबा आहे हे वारंवार महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवान गडाने कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे त्यावर मी काय बोलणार?", असं खासदार बजरंग सोनावणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

15:53 (IST) 31 Jan 2025

पुणे : चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा, सराफाची फसवणूक करणारी टोळी गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाचे वडगाव शेरी भागात सराफी पेढी आहे. काही दिवसांपुर्वी रिक्षांमधून दोघे जण त्यांच्याकडे आले.

सविस्तर वाचा...

15:49 (IST) 31 Jan 2025

राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात लवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. शिवसेना पक्षाच्या फुटी नंतर शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

वाचा सविस्तर...

15:39 (IST) 31 Jan 2025

दाऊदच्या साथीदाराला २९ वर्षांनी अटक, आर्थररोड कारागृहात केली होती दंगल

मुंबईमधील अर्थर रोड कारागृहात १९९६ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 31 Jan 2025

मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांचा हिंदू योद्धा उल्लेख असलेला बॅनर हटविला ; रत्नागिरीतील शांततेला गालबोट

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथील मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांचा हिंदू योद्धा असा उल्लेख असलेला बॅनर हटविण्यात आल्याने भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात राडा घातला. हा बॅनर काढणा-या समाजविरोधी लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

15:29 (IST) 31 Jan 2025

पदपथावर झोपलेल्या कचरा वेचकाच्या शरिरावरून मोटार गेल्याने मृत्यू

ठाणे : पदपथावर झोपलेल्या एका कचरा वेचकाच्या शरिरावरून बेदरकार मोटार गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अजय (२८) असे मृताचे नाव असून याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हा एका कचरा वेचकाकडे काही दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. परिसरातील कचरा वेचून तो उदरनिर्वाह करत होता. तसेच तो दररोज सिडको बसथांब्या लगत असलेल्या महाविद्यालयाच्या पदपथावर झोपायचा.

सविस्तर वाचा...

15:20 (IST) 31 Jan 2025

इंदूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला नर्मदापुरम येथेही थांबा

नागपूर : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाल विभागातील नर्मदापुरम येथे प्रायोगिक थांबा मंजूर केला आहे. आता ही गाडी शुक्रवारपासून (३१ जानेवारी २०२५) नर्मदापुरम स्थानकावर थांबायला सुरुवात झाली आहे.

नागपूर ते इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस भोपाळ आणि उज्जैन मार्ग धावते. ही गाडी नर्मदापुरम स्थानकावर थांबावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्याला प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाने तेथे प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. हा प्रायोगिक थांबा पाच महिने निरीक्षणाखाली ठेवला जाईल.त्यानंतर तो पुढे सुरू ठेवायचा की नाही. याचा निर्णय प्रवाशांची संख्या, वाहतूक आकडेवारी आणि अभिप्राय यांचे मुल्यमापनानंतर घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

15:17 (IST) 31 Jan 2025

शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया

अगोदरच कोंडीने बेजार शिळफाटा रस्ता पाच दिवस बंंद राहिला तर प्रवासी या कोंडीत तासन तास अडकून पडतील. त्यापेक्षा सुट्टी टाकून घरी बसू, कोण तडफडेल या वाहतूक कोंडीत, असे उद्विग्न प्रश्न या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

वाचा सविस्तर...

15:13 (IST) 31 Jan 2025

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजमाध्यमे महत्त्वाची, सोलापूरच्या विद्यापीठात तृतीयपंथीयांची परिषद

सोलापूर : तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून सकारात्मक प्रयत्न होत असताना दुसरीकडे समाजात अजूनही तृतीयपंथीयांना चांगली वागणूक मिळत नाही. त्यांच्याबद्दल तिटकारा दिसून येतो. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत अमेरिकेच्या तोसवान विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. पल्लवी गुहा यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

15:02 (IST) 31 Jan 2025

रणजितसिंह मोहिते यांच्यावर कारवाईऐवजी अभिनंदनाचे पत्र, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्राने चर्चा

सोलापूर : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना अभिनंदनाचे पत्र आले आहे. पक्षाचे एक हजार सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल आमदार मोहिते-पाटील यांचे बावनकुळे यांनी हे अभिनंदन केले असून हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सविस्तर वाचा...

15:01 (IST) 31 Jan 2025

मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर

पुणे :रविंद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.यामुळे रविंद्र धंगेकर हे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार,अशी चर्चा सुरू झाली. त्या भेटी बाबत रविंद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 31 Jan 2025

पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार

पिंपरी : आठ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी ४० वर्षीय बांधकाम मजुराला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी घडली. नागनाथ श्रीहरी कासले (वय ४०, रा. काळेवाडी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 31 Jan 2025

शाळाबाह्य आदिवासी मुलींनी गाजवले क्रिकेटचे मैदान

आदिवासी मुली शिक्षणाच्या मूळ प्रवाहात नसल्या तरी क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी खूप मोठी आहे. आदिवासी मुलींचा देशातील सर्वात पहिला क्रिकेट संघ मैदान गाजवत आहे.

वाचा सविस्तर...

14:59 (IST) 31 Jan 2025

ठाणे ते कल्याण रेल्वे मार्गाजवळ ६०० मीटर परिसरात वाळू उत्खननाला बंदी

कल्याण : ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान खाडी किनारी भागात असलेल्या रेल्वे रुळांपासून ६०० मीटर परिसरात (दोन हजार फूट) २४ तास १४ मार्चपर्यंत अवैध वाळू उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त मीना मकवाणा यांनी काढला आहे.

सविस्तर वाचा...

14:58 (IST) 31 Jan 2025

भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत

सोलापूर : भिशी चालविण्याच्या आर्थिक व्यवहारात झालेल्या वादातून एका वृद्धाला लोखंडी सळईने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील मालेगाव (आर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्य एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

14:57 (IST) 31 Jan 2025

पिंपरी : 'जीबीएस'मुळे युवकाचा मृत्यू

पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे पिंपळेगुरव परिसरातील एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. 'जीबीएस'नंतर या रुग्णाला न्यूमोनियाचीही लागण झाली होती.पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती.

सविस्तर वाचा...

14:56 (IST) 31 Jan 2025

भायखळा प्राणीसंग्रहालयातील मत्स्यालयाची निविदा वादात, एक्वा गॅलरीची निविदा रद्द करण्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिकेने भायखळ्याच्या प्राणीसंग्राहलयात एक छोटे मस्त्यालय उभारण्याचे ठरवले असून हा प्रकल्प सुरू होण्याआधी वादात सापडला आहे. बोगदा (टनेल) स्वरूपाचे हे मस्त्यालय अतिशय कमी जागेत बांधले जाणार असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, तसेच या प्रकल्पाचा ६५ कोटी रुपये खर्च जास्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

'भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी', नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका (फोटो-संग्रहित छायाचित्र)