Maharashtra Breaking News Live Updates in Marathi, 22 May 2026: भारतीय निवडणूक आयोगाने १८ जून रोजी २४ जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठीच्या जागावाटपावरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून विदर्भाला उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. गुन्हेगारीच्या एका धक्कादायक घटनेत, उल्हासनगरमधील कॅम्प ५ परिसरात जुन्या वादातून भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत सात राऊंड फायर झाले असून दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. वरील बातम्यांसहच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…

Live Updates

Today's Marathi News Live Updates, 22 May 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या...

19:25 (IST) 22 May 2026

शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांना पाणी टंचाईपासून दिलासा

यावर तातडीने उपाययोजना करत शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी फुगाळे व दहिगाव येथील आदिवासी पाड्यांवर ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ...सविस्तर वाचा
19:17 (IST) 22 May 2026

ठाण्यात वाढत्या महागाई विरोधात ‘थाळी नाद मोर्चा’

मनिषा भगत आणि ऋता आव्हाड यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. ...सविस्तर बातमी
19:04 (IST) 22 May 2026

उद्या अर्थसंकल्प तयार करायलाही सल्लागार नेमाल - स्थायी समितीचा आक्षेप; सल्लागार नेण्याचे सगळे प्रस्ताव अध्यक्षांनी बाजूला ठेवले

भांडूप, गुंदवली आणि मनोरी येथील पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्याचे चारही प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्वपक्षीय आक्षेपानंतर मागे ठेवले. ...सविस्तर वाचा
18:46 (IST) 22 May 2026

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ...सविस्तर वाचा
18:34 (IST) 22 May 2026

Video: फक्त 'इमर्जन्सी स्टॉक' उरल्याचे सांगताच काढले हत्यार! कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे पंपावर तलवार-कोयत्याने राडा, कर्मचारी गंभीर

कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही, या कारणावरून चार जणांनी खामगाव तालुक्यातील पिंप्राळा फाट्यावरील के. के. पेट्रोलियमवर हातात तलवार, कोयता घेऊन दहशत माजवली. ...सविस्तर वाचा
18:25 (IST) 22 May 2026

महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य करू नका - एकनाथ शिंदे

शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एका पत्रकार परिषदे मध्ये राष्ट्रवादी नेते संपर्कात असून राष्ट्रवादी पक्षात कुणाच्या नेतृत्वाखाली काम करावे, हे कळत नसल्याचे म्हटले होते.

महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य करू नका शिरसाट यांची कानउघडणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली आहे.

18:23 (IST) 22 May 2026

वाघिणीच्या कुटुंबाचा हल्ला अन् तेंदूपत्ता हंगाम रक्तरंजित

मिळालेल्या माहितीनुसार तेंदूपत्ता जोडण्यासाठी दोन स्वतंत्र समूह जंगलात गेले होते. त्यातील एका समूहात सात महिला तर दुसऱ्या समूहात १३ महिला होत्या. ...सविस्तर बातमी
18:14 (IST) 22 May 2026

अपेक्षित १,२८८ ई-बस पुरवण्यात कंत्राटदार अपयशी; १५ कोटींचा दंड आणि १६१ कोटींच्या नुकसानीचा दावा...

एसटी महामंडळाच्या ५,१५० विद्युत बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा १३ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...सविस्तर बातमी
18:02 (IST) 22 May 2026

पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पाऊस! भोसरीत वीज कोसळली, ११ ठिकाणी झाडे पडली

भोसरीतील गव्हाणे वस्तीत नारळाच्या झाडावर वीज कोसळून आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. ...वाचा सविस्तर
17:59 (IST) 22 May 2026

PM Narendra Modi: मेलोडी चॉकलेट तर फक्त नावालाच! पीएम मोदींनी जॉर्जिया मेलोनींना दिल्या भारताच्या 'या' २ मौल्यवान भेटवस्तू

अलीकडे मोदी यांच्या इटली दौऱ्यादरम्यान या चर्चेला पुन्हा उधाण आले. या दौऱ्यात मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी ’ चॉकलेटची भेट दिल्याची माहिती समोर आली. ...अधिक वाचा
17:57 (IST) 22 May 2026

'तसबीर वही लगायेंगे'च्या नाट्याने इचलकरंजीत महायुतीतील बेबनाव चव्हाट्यावर; भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादीचा सामना रंगला

स्थायी समिती कार्यालयातील शिंदे, पवार आणि माने या तिघांच्या प्रतिमा काढल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज इचलकरंजी महापालिकेवर धडक मारली.  ...अधिक वाचा
17:56 (IST) 22 May 2026

खुशखबर! आता मेट्रो तिकिटांसाठी रांगेत थांबू नका अन् सूटही मिळवा

'ONDC'च्या माध्यमातून सेवा उपलब्ध; महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची माहिती. ...वाचा सविस्तर
17:46 (IST) 22 May 2026

Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी पावसाचा प्रभाव; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ कुठे ?

राज्यात एकीकडे विदर्भात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती नोंदली जात असतानाच उर्वरित राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...अधिक वाचा
17:34 (IST) 22 May 2026

मंत्र्यांचे दावे फोल, बुलढाण्यात इंधनाचा हाहाकार! ४२° तापमानात डिझेलसाठी रांगा; संतप्त शेतकऱ्यांचा परडा फाट्यावर उत्स्फूर्त रास्ता रोको

मोताळा तालुक्यातील जनता जनार्दनाचे, लहान मोठ्या वाहन धारकांचे असेच बेहाल होत आहे. कडक उन्हात व बेचाळीस डिग्री सेलसियस तापमानात पेट्रोल, डिझेल साठी दीर्घ रांगामध्ये उभे राहण्याची पाळी आली. ...वाचा सविस्तर
17:29 (IST) 22 May 2026

मालेगावात हायटेक अ‍ॅक्शन! अवैध कत्तलींवर 'ड्रोन कॅमेऱ्यां'ची २४ तास नजर राहणार; रामदास बोरसे यांचे उपोषण अखेर स्थगित

रस्त्यावर बेकायदेशीर जनावरांच्या कत्तली करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; संयुक्त पथके तैनात. ...सविस्तर वाचा
17:23 (IST) 22 May 2026

माजी वन मंत्री मुनगंटीवार म्हणतात, "चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव - वन्यजीव संघर्ष चिंताजनक"

सिंदेवाही परिक्षेत्रातील गुंजेवाही वनक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीच्या उपाययोजनांवर भर दिला. ...सविस्तर बातमी
17:12 (IST) 22 May 2026

"मी एकट्याने भेट घेतली म्हणून पक्षांतर होणार का?" 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांवर खासदार नागेश पाटील यांचे सडेतोड उत्तर

ठाकरेंचे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची व काही दिवसांत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी संजय दीना पाटील यांनीही शिंदे यांच्यासोबत एकाच कारने प्रवास केला होता. ...सविस्तर वाचा
17:00 (IST) 22 May 2026

पुण्यात पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट

विदर्भात सूर्य ओकतोय आग! अकोला, अमरावती, वर्ध्यात तीव्र उष्णतेची लाट; काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट ...सविस्तर बातमी
16:59 (IST) 22 May 2026

जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांवर आता एमपीएससी परीक्षेच्या अतिरिक्त कामाचा बोजा!

नांदेड जिल्ह्यात जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात व्यस्त असलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आता ३१ मे रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेचीही जबाबदारी सोपवली आहे. ...सविस्तर बातमी
16:57 (IST) 22 May 2026

उन्हाळ्यात वीजबिलाचा झटका ? ‘या’ छोट्या सवयी बिल कमी करण्यासाठी फायदेशीर; घरही राहील थंड

सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. नागपुरात तापमान ४६ अंशावर आले असून घराघरांमध्ये एसी, कुलर, पंखे, फ्रिज आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 22 May 2026

कल्याणच्या अंमली पदार्था विरोधी पथकाकडून ३४ कोटीच्या हेराॅईनसह ५ सराईत तस्कर अटकेत

मुख्य पुरवठादार अमजद पठाणसह कासिम वसईकर, सद्दाम शेख पोलिसांच्या जाळ्यात ...सविस्तर वाचा
16:34 (IST) 22 May 2026

‘कॉकरोच’ उल्लेखानंतर नवा वाद; जेन झी पिढीचा डिजिटल आवाज दडपण्याचा वडेट्टीवारांचा आरोप

वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. आजच्या तरुणांसमोर रोजगार, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य ही मोठी आव्हाने उभी असताना सरकार मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
16:30 (IST) 22 May 2026

कारवाईची भीती दाखवून संगणक अभियंता महिलेची फसवणूक

नऱ्हे भागात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली ३२ वर्षीय महिलेला २५ लाखांचा टॅक्स आणि परताव्याचे आमिष. ...अधिक वाचा
16:22 (IST) 22 May 2026

एकाच मुलाला दोन जात प्रमाणपत्रे? अंबरनाथच्या तहसिलदारांना घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

विभक्त पत्नीने मुलासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र काढल्याचा पती हनुमान कडू यांचा आरोप. ...वाचा सविस्तर
16:17 (IST) 22 May 2026

नागपुरात लश्करीबागेत ज्येष्ठ महिलेचा गळा चिरून खून; पाचपावलीच्या नव्या ठाणेदारांना खुनाच्या घटनेने सलामी

पाचपावली पोलीस हद्दीतील लष्करीबागेत ज्येष्ठ महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याचे चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली. ...सविस्तर वाचा
16:07 (IST) 22 May 2026

नितीन गडकरींसमोर मकरंद अनासपुरे बेधडक बोलले, ‘‘आमदारांचे खिसे झटकले तर पैसेच पैसे पडतील’’, वृक्षतोडीवर भाष्य करत…

नुकताच पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जलक्रांती परिषद’ नागपूरमध्ये घेण्यात आली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ...वाचा सविस्तर
15:52 (IST) 22 May 2026

ठाण्यातील सर्वात उंच ७२ मजली इमारतीचे काम ठप्प; घरखरेदीदार अजूनही प्रतीक्षेत, सध्या नेमकी काय स्थिती?

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (NCLT) दिवाळखोरी प्रक्रिया सुरू; नवा विकासक येण्याने एसआरए (SRA) मधील ४०० हक्काच्या घरांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे. ...अधिक वाचा
15:44 (IST) 22 May 2026

सरकार अजून किती दिवस कुंभकर्णी झोपेत राहणार ? वाघाच्या हल्ल्यातील बळीनंतर संतप्त प्रतिक्रिया

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांना जीव गमवावा लागणे ही केवळ दुर्देवी घटना नसून वनविभाग आणि सरकारच्या निष्क्रियतेचे भयावह उदाहरण असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ...सविस्तर वाचा
15:43 (IST) 22 May 2026

पूर्णा शहरात खाजगी सावकाराचा निर्घृण खून; भररस्त्यात चाकूने सपासप वार; दोन हल्लेखोर फरार

दिवसाची सुरुवात होत असतानाच झालेल्या या खुनामुळे शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 22 May 2026

नितीन गडकरी म्हणाले, मुलगी अडखळत होती, आम्ही हसत होतो… मुख्याध्यापकांच्या एका वाक्याने बदलले आयुष्य

सुमंत सदाशिव इंगळे फाऊंडेशनतर्फे आयोजित वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...सविस्तर वाचा

Maharashtra Breaking News Live Updates| Petrol Diesel Price Hike | Ulhasnagar Firing News Update

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स