Maharashtra Political News Today: नागपूरमध्ये जो पूर आला त्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. तसंच चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्रकारांना ढाब्यावर न्या असं जे वक्तव्य केलं आहे त्याचाही समाचार घेतला जातो आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जी नोटीस बजावण्यात आली आहे त्यावरुनही त्यांची नाराजी समोर आली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे भाजपाची लेक नाही का? असा सवाल केला आहे. तर अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडेंनी आता योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला दिला आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. या सगळ्या घडामोडींवर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे.
Marathi News Today |पंकजा मुंडेंनी योग्य निर्णय घ्यावा, या नेत्याने दिला सल्ला आणि महत्त्वाच्या घडामोडी
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना किंवा जाहीर सभांमधून अशी वक्तव्ये केली ज्यावरून त्या पक्षाला इशारा देत असल्याचीही चर्चा झाली. याबाबत आता पंकजा मुंडेंनाच विचारण्यात आल्यावर त्यांनी हात जोडून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या मंगळवारी (२६ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं धनगर समाजाचं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (२६ सप्टेंबर) अहमदनगरमध्ये बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातील क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्व कपाची पुण्यात थाटामाटात मिरवणूक निघणार आहे. इतकंच नाही, तर या वर्ल्ड कपबरोबर फोटो काढण्याचीही संधी मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली. तसेच नागरिकांना हा विश्व कप अभिमानाने मिरवण्याचं आवाहन केलं.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. नार्वेकरांनी मध्यंतरी कुणाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची माहिती घेतली पाहिजे, असं दानवेंनी म्हटलं. तसेच त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा प्रश्ना उपस्थित केला. ते मंगळवारी (२६ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीनी नागपूरमधील पुराची पाहणी करताना एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे त्याचाच व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. यात त्यांनी देवेंद्रजी फडणवीसांवर आरोप करणारे विरोधक तोंडावर आपटले, असं म्हटलं. तसेच त्या व्यक्तीने जे घडले तेच सांगितले आणि त्या व्हायरल व्हिडीओचे हे आहे सत्य, असंही नमूद केलं.
वर्धा: आदिवासी आश्रमशाळेत मुलींचा वारंवार विनयभंग होत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. देवळी तालुक्यातील नवजीवन आदिवासी आश्रमशाळेतला हा प्रकार शाळेतीलच अधीक्षीकेने चव्हाट्यावर आणला.
ठाणे: यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद- ए- मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले असले तरी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ईदच्या मिरवणूका निघणार आहेत.
पनवेल: महापालिका परिसरातील उपनगरांमधील ६५ टक्के मालमत्ताधारकांनी अजूनही थकीत कर भरलेला नाही. ही रक्कम १६०० कोटी रुपयांच्यावर आहे. भारतीय जनता पक्षाने पालिकेच्या सभागृहात एकहाती सत्ता असताना मालमत्ता करात ३० टक्क्यांची कपात केली होती.
पुणे: जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी स्थानक परिसरात प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुणे: लोणावळ्यातील हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांकडून ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आला आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षा चालकाला वाचविताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दुभाजकाला धडकली.
पिंपरी: भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांसह औद्योगिक पट्ट्यातील वीज समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महावितरण प्रशासनाकडून आकुर्डी आणि भोसरी उपविभागाचे विभाजन भोसरी एक आणि भोसरी दोन असे करण्यात येणार आहे.
एक दिवसीय दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांचे सर्व कार्यक्रम केवळ नाशिक लोकसभा मतदार संघात होते. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या दिंडोरी मतदार संघात एकही कार्यक्रम नव्हता.
वैद्यकीय शिक्षण घेताना मानसिक तणावामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे.
मिळकतकर भरण्यासंदर्भात वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.
गोंदिया: गणेशोत्सवादरम्यान नव-नवीन देखावे साकारून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भाविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात.
नाफेड व एनसीसीएफकडील राखीव (बफर) साठा क्विंटलचे दर सहा हजारावर गेल्यानंतर बाजारात आणावा, अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली.
गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ठेवलेल्या आरोपात तथ्य नाही. समाजमाध्यम आणि संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने न्यायालयात केला.
नदीच्या वहन क्षमतेवर विपरीत परिणाम होणार असून भविष्यात हजारो घरे पाण्याखाली जाणार आहेत.
दोन महिन्यात महाराष्ट्रातील दुकानं आणि आस्थापनं यांवर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट करत राज ठाकरेंनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यांसाठी मनसेने केलेल्या संघर्षाला मान्यता मिळाली असंही त्यांनी म्हटलं आहे.
चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमत ५३ लाख रुपये असल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
निरोप घेण्याच्या मार्गावर असलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरणांमधील जलसाठा ५४ हजार ७९१ दशलक्ष घनफूट म्हणजे ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अमरावती: अल्प मजुरी, स्थानिक पातळीवर कामांची वाणवा, अशा अनेक अडचणी असूनही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून गेल्या काही वर्षांत या योजनेत महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक विधानं केली आहेत.याच्या मते, स्त्रियांना…!”
राऊत म्हणतात, “आत्तापर्यंत तुम्हाला सनातन धर्माची चिंता नव्हती. आता अचानक चिंता वाटायला लागली आहे. २०२४ साठी भाजपा व मोदींकडे…!”
एका तेरा वर्षीय मुलाने तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात पावसाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्याने साठा केवळ दोन ते आठ दिवसांचा राहिला आहे.
पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जी नोटीस बजावण्यात आली आहे त्यावरुनही त्यांची नाराजी समोर आली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे भाजपाची लेक नाही का? असा सवाल केला आहे. तर अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडेंनी आता योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला दिला आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. या सगळ्या घडामोडींवर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे.