Mumbai Pune News Updates, 02 April 2026: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सध्या गोंधळाची परिस्थिती दिसत आहे. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्राने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर आज सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार का? अशी चर्चा आहे.
दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणावर रोज नवनवीन माहिती तपासातून समोर येत आहे. आता भोंदू खरात प्रकरणी एसआयटीकडून काही डॉक्टरांचीही चौकशी होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Marathi News Live Updates, 02 April 2026 | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स | अशोक करात प्रकरण लाईव्ह
संतापलेल्या तरुणाने मुंबई गोवा महामार्गच रोखला…
संतापलेल्या तरुणाने मुंबई गोवा महामार्गच रोखला…
कर थकबाकीदारांना महापालिकेचा दणका; तीनशेहून अधिक नळजोडण्या खंडित
ईश्वरपुरमध्ये जोरदार पाऊस, विट्याजवळ गारपीट, आंब्याचे नुकसान
महिलांनी हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा संगमनेरमध्ये आजही कायम!
सुरक्षा जवानांची अशीही माणुसकी! स्वत: स्वयंपाक करत भुकेने व्याकुळ नक्षलवाद्यांना खाऊ घातले जेवण..
इंधन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवा; पुरवठा अधिकाऱ्याच्या पंप चालकांना सूचना
तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे दिव्यांग संतापले… जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बदली रद्द करण्याची मागणी...
ठाणे जिल्ह्यात आपत्ती निवारणाचे धडे ; १ ते १५ एप्रिल दरम्यान NDRF आणि SDRF कडून विशेष प्रशिक्षण मोहीम
भोंदु अशोक खरातचं पाप उघड ! महिलांच्या लैंगिक शोषणात नाशिक मधील नामांकित डॉक्टरांचा हात?
डोंबिवलीत मेजवानीत २२ वर्षीय तरुणीवर तीन रिक्षा चालकांचा सामूहिक लैंगिक अत्याचार, तिन्ही रिक्षा चालकांना अटक
नवी मुंबईतील ३३८ एकरावरील पुनर्विकास प्रकल्पावरून वाद; एसआरए-२ रद्द करण्याची वनमंत्री गणेश नाईक यांची मागणी
एअर इंडियाची १५ मेपासून दिल्ली-हलवारा विमान सेवा
Marathi News Live Updates: प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्याबाबत पार्थ पवार यांची मोठी प्रतिक्रया; म्हणाले...
प्रफुल पटेल आणि सुनील तटरके यांच्या पदाचा उल्लेख निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबाबत विविध चर्चांना पेव फुटले होते. यावर आता पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोन्ही नेत्यांबाबतच्या चर्चा बिनबुडाच्या असून अशा नेत्यांभोवती वाद निर्माण करणे दुर्दैवी असल्याचे पार्थ पवार म्हणाले आहेत.
https://twitter.com/parthajitpawar/status/2039641488699859269
Pune Crime: फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने ज्येष्ठाची एक कोटींची फसवणूक
Weather Update : पावसाने पुण्याला झोडपले… शहर, उपनगरांमध्ये मुसळधार!
गारगाईला हिरवा कंदील ,स्थायी समितीत प्रस्ताव बहुमताने मंजूर; प्रकल्पाला विरोधकांचा विरोध कायम
वक्तव्याचा विपर्यास ; ओमच्या उच्चारामुळे घसा बरा झाला- ओमचा उल्लेख करण्यास विसरले - महापौर रितू तावडे यांचे स्पष्टीकरण
अनिल अंबानींविरुद्ध आक्रमक भाषा वापरू नका; ''रिपब्लिक टीव्ही''सह अर्णब गोस्वामींना उच्च न्यायालयाची सूचना
घर खरेदीदारांना अनिश्चित काळापर्यंत ताटकळत ठेवणे अयोग्य; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
तपोवनातील वृक्षतोडीचे प्रकरण :एनजीटीच्या स्थगितीच्या निर्णयाला आव्हान का दिले नाही ?
चार लाखाची बॅग मनसैनिकांमुळे मिळाली...;नरगिस फ्रुटवालाने मानले राज ठाकरेंचे आभार
कर्करोगावरील किमोथेरपीत वापरल्या जाणाऱ्या स्कॅल्प कुलिंगचा तुटवडा; इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे जहाजे हॉर्मुझच्या आखातात अडकली
डीजीसीएत घडली महत्त्वाची घडामोड, रोहित पवार यांनी घेतला जोरदार आक्षेप
अपात्र ठरलेल्या लाडक्या बहीणींसाठी सरकारचे २१ हजार कोटी पाण्यात !
मुलांचा वाढता स्क्रीन टाइम पालकांची चिंता वाढविणार ; निम्हान्स चा अभ्यास…
जुहू-डी एन नगरमधील ४०० हून अधिक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा! नव्या परिपत्रकामुळे इमारत उंचीचा अडथळा दूर
मुस्लिम आरक्षण का रद्द केले ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा, प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करा
पीएनबी बँक घोटाळा प्रकरण :पीएनबीला आरोपी करण्याची मागणी फेटाळली
राज्यातील या ५४ प्रदूषित नदी पट्ट्यांचे पुनरूज्जीवन होणार

सुनेत्रा पवारांचा लेटर बॉम्ब : प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह (छायाचित्र सौजन्य - लोकसत्ता ग्राफिक्स)
