Latest Maharashtra News : महापौरपदाच्या निवडीची सोडत येत्या गुरुवारी मुंबईत काढली जाईल. याबाबत उत्सुकता असतानाच राज्यातील २९ महापालिकांपैकी जेथे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही तेथे नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील विविध शहरांमध्ये नवे राजकीय समीकरणे पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. महापौर पदाच्या शर्यतीत सर्वजण व्यस्त असताना राज्यातील इतर घडामोडीही जाणून घेऊयात.

Live Updates

Marathi News Live Updates : राज्यातील सर्व घडामोडी जाणून घ्या

20:32 (IST) 20 Jan 2026

Prashant Jagtap : "… तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, अन्.." का म्हणाले प्रशांत जगताप?

विचारधारेशी तडजोड झाली तर राजकारणातून निवृत्ती घेईन, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केले. ...वाचा सविस्तर
20:21 (IST) 20 Jan 2026

Vasai Virar Election Update : नालासोपारा मतदारसंघ ठरला भाजपासाठी तारणहार

वसई-विरार महापालिका निवडणुकीत नालासोपाऱ्यातील उत्तरभारतीय मतदारांनी भाजपला भरभरून साथ दिल्यामुळे ३६ जागांसह हा मतदारसंघ पक्षासाठी खऱ्या अर्थाने तारणहार ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर बातमी
20:10 (IST) 20 Jan 2026

पुणे ग्रँड सायकल टूर दरम्यान अपघात; ५० पेक्षा जास्त सायकलस्वार एकमेकांवर आदळले, व्हिडीओ व्हायरल

Pune Grand Cycle Tour Accident : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ पार पडत आहे. पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी या दरम्यान पार पडत आहे. ही स्पर्धा पार पडत असताना आज काही सायकलस्वारांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा

18:51 (IST) 20 Jan 2026

‘अशोक वैती हरला नाही…’ पराभवानंतर ठाण्याच्या माजी महापौराची पोस्ट व्हायरल…

ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांचा ठाकरे गटाचे उमेदवार शहाजी खुस्पे यांनी पराभव केल्यानंतर "अशोक वैती हरला नाही, तर मतपेटीत आकडे बदलले" अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
18:50 (IST) 20 Jan 2026

ब्राह्मण समाजाचा राजकीय दबाव गट निर्माण करणार, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, ‘‘१० टक्के…’’

सर्वपक्षातील ब्राह्मण नेत्यांना एकत्रित करून राजकीय दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने लवकरच पुण्यात एक मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुळकर्णी यांनी दिली. ...सविस्तर बातमी
17:56 (IST) 20 Jan 2026
राष्ट्रवादी सोडल्यानंतर ४८ तास टेन्शन होतं - प्रशांत जगताप

काँग्रेसमध्ये मला घेऊ नये म्हणून अनेकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पण काँग्रेसने मला घेतलं, त्यामुळे मी त्यांना सॅल्युट देतो. कारण काँग्रेस पक्ष हा काँग्रेसवालेच चालवतात इतर कोणीही चालवत नाही - प्रशांत जगताप

17:42 (IST) 20 Jan 2026

मोठी बातमी : ‘PhonePe’ला आयपीओसाठी सेबीची मंजुरी, लवकरच अद्ययावत मसुदा प्रस्ताव दाखल करणार

‘फोनपे’ आयपीओच्या माध्यमातून विद्यमान भागधारकांकडील समभाग विक्री करणार आहे. म्हणजेच आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून शेअर बाजारात उपलब्ध केले जातील. ...सविस्तर बातमी
17:27 (IST) 20 Jan 2026

कोकणातील लक्ष्मी ऑरगॅनिकच्या नव्या प्रकल्पावरून वाद का निर्माण झाला? इटलीत बंद पाडलेल्या प्रदूषक कंपनीचा शिरकाव?

Laxmi Organics Industry : इटलीतून ही कंपनी बंद झाल्यानंतर भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजने २०१९ मध्ये लिलावाद्वारे ‘मिटेनी’ची संपूर्ण यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ...सविस्तर वाचा
16:55 (IST) 20 Jan 2026

VIDEO : ठाण्यात नव्या महापौर, पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी... कार्यालयांची साफसफाई सुरू

ठाणे महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता नव्या महापौरांच्या स्वागतासाठी पालिका मुख्यालयातील कार्यालयांची साफसफाई आणि रंगरंगोटी प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
16:54 (IST) 20 Jan 2026

नवी मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; राज्य शासनाच्या निर्णयामुळे हजारो रहिवाशांना दिलासा...

नवी मुंबईतील वाशी आणि घणसोली येथील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील तांत्रिक अडथळे दूर करून राज्य शासनाने हजारो रहिवाशांना हक्काच्या आणि प्रशस्त घरांचा दिलासा दिला आहे. ...अधिक वाचा
16:17 (IST) 20 Jan 2026

नीलेश घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र - घायवळ टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार

कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ टोळीतील नऊ सराईतांविरुद्ध गुन्हे शाखेने तब्बल सहा हजार ४५५ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून टोळीची दहशत निर्माण करण्याचा कट उघडकीस आला आहे. ...अधिक वाचा
16:08 (IST) 20 Jan 2026

ठाणे महापालिकेत ३८ जागा लढून २८ जागा जिंकल्या; निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट ७४ टक्के…

आमदार संजय केळकर यांच्या नियोजनामुळे आणि 'आमदार आपल्या दारी' सारख्या उपक्रमांमुळे ठाण्यात भाजपचे संख्याबळ दुपटीने वाढले असून अनेक नवीन चेहऱ्यांना विजयाची संधी मिळाली आहे. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 20 Jan 2026

PCMC Election 2026 : अपक्ष नगरसेवकांचा आलेख घसरला; वाचा आजपर्यंतची अपक्षांची आकडेवारी….

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत २०२६ मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात घटला आहे. १६५ अपक्षांपैकी केवळ एकच विजयी ठरल्याने अपक्ष नगरसेवकांचा आलेख ऐतिहासिकरीत्या घसरल्याचे चित्र दिसत आहे. ...सविस्तर वाचा
15:58 (IST) 20 Jan 2026

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूरसाहेब नांदेड विशेष गाडी…नाशिकरोड, मनमाडच्या प्रवाशांना लाभ

मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूरसाहेब नांदेड विशेष गाडी २३ जानेवारीपासून चालविणार आहे. ...सविस्तर बातमी
15:30 (IST) 20 Jan 2026

Nashik Kumbh Tree Ban: ​कुंभमेळा वृक्षतोड प्रकरणात एनजीटीचा मोठा निर्णय, नाशिकमध्ये 'या' तारखेपर्यंत बंदी कायम!

तपोवनातील वृक्षतोडीचा विषय गाजत असताना समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटीशकालीन जुन्या वडाच्या झाडांची तोड झाल्याचे उघड झाले होते. ...सविस्तर बातमी
15:13 (IST) 20 Jan 2026

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'उमेद' व बँक प्रशासनाचा समन्वय, पालघरमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 'उमेद' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बँक व्यवस्थापक कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत बँका आणि उमेद यंत्रणेमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. ...अधिक वाचा
15:04 (IST) 20 Jan 2026

Vasai Virar News: महापालिकेच्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन, शहरातील स्वच्छतेवर परिणाम

मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम दैनंदिन स्वच्छतेवर झाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या भागात कचऱ्याचे ढीग जैसे थे पडून आहेत. ...वाचा सविस्तर
14:56 (IST) 20 Jan 2026

आता कॉपी शक्य नाही ….. परीक्षा वर्गात सीसीटीव्ही लावले जाणार ! राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा संबंधित कर्मचारी अदलाबदली बाबत कार्यवाही होणार आहे. ...सविस्तर वाचा
14:52 (IST) 20 Jan 2026

शिंदे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आगरी समाजावर पुन्हा आक्षेपार्ह बोलण्याचा प्रयत्न केला तर…, संजय भोईरांचा मीनाक्षी शिंदेंना इशारा

आगरी समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिंदे सेनेतील अंतर्गत वाद उफाळला आहे. ठाणे महापालिकेचे नगरसेवक संजय भोईर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना जाहीर इशारा दिला आहे. ...सविस्तर वाचा
14:52 (IST) 20 Jan 2026

शिंदे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आगरी समाजावर पुन्हा आक्षेपार्ह बोलण्याचा प्रयत्न केला तर…, संजय भोईरांचा मीनाक्षी शिंदेंना इशारा

आगरी समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिंदे सेनेतील अंतर्गत वाद उफाळला आहे. ठाणे महापालिकेचे नगरसेवक संजय भोईर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना जाहीर इशारा दिला आहे. ...सविस्तर वाचा
14:51 (IST) 20 Jan 2026

डोंबिवलीत कांदळवन नष्ट करून ६० बेकायदा चाळींची भूमाफियांकडून उभारणी - आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेश दुर्लक्षित

डोंबिवली पश्चिमेत कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी ६० हून अधिक बेकायदा चाळी उभारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून पालिका आयुक्तांनी तातडीच्या कारवाईचे आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेश दुर्लक्षित. ...अधिक वाचा
14:51 (IST) 20 Jan 2026

डोंबिवली देसलेपाड्यातील भंगार विक्रेत्यांना देसाई गावातील तीन जणांची बेदम मारहाण

डोंबिवलीच्या देसलेपाडा परिसरात भंगार व्यवसाय करणाऱ्या तरुण आणि त्याच्या वडिलांना देसाई गावातील तीन जणांनी लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
14:51 (IST) 20 Jan 2026

धक्कादायक : सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ उद्योजकाची तब्बल २२ कोटींची फसवणूक

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ८८ वर्षीय ज्येष्ठ उद्योजकाची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सायबर पोलीस तपास करत आहेत. ...सविस्तर वाचा
14:50 (IST) 20 Jan 2026

लाडक्या बहिणींची डोकेदुखी…. दोन महिन्यांचे हप्ते मिळालेच नाहीत…. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बहिणींची उपेक्षा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील अनेक महिलांना गेल्या दोन महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे लाभार्थी महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारीसाठी धाव घ्यावी लागत आहे. ...सविस्तर वाचा
14:49 (IST) 20 Jan 2026

Jalgaon Crime : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेतून पुन्हा २.५ लाखांचा ऐवज लंपास…

एका नामांकित सुवर्ण पेढीतून सुमारे २.५ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ...सविस्तर बातमी
14:43 (IST) 20 Jan 2026

पहाटे दूध घेऊन जाणाऱ्या महिलेस मृतदेह दिसला अन खुनाचे, प्रेमप्रकरणाचे धागेदोरे उलगडले, आरोपीला जन्मपेठेची शिक्षा

सुनावणीअंती न्यायालयाने भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजारांचा दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ...वाचा सविस्तर
14:42 (IST) 20 Jan 2026

मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक बंद, अधिसूचना गुजराती भाषेत; विजय वडेट्टीवार संतप्त

मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजराती भाषेत अधिसूचना काढल्यावर वडेट्टीवारांनी संताप व्यक्त करत भाजपवर टीका केली. ...अधिक वाचा
14:31 (IST) 20 Jan 2026

बीडमध्ये पुन्हा मुंडे भावंडे विरोधात? दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेवरून संभाव्य चित्र

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्या तर मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांचे राजकारण पुन्हा एकदा नवे वळण घेऊन एकमेकांच्या विरोधात उभे राहील, असे सध्याचे तरी चित्र आहे. ...सविस्तर बातमी
14:31 (IST) 20 Jan 2026

Video : चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर; वडेट्टीवार म्हणतात, 'भाजप नेत्यांची वक्तव्य म्हणजे हवेतली पतंगबाजी…'

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार आहे. त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचा दावा काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ...वाचा सविस्तर
14:22 (IST) 20 Jan 2026

SSC HSC State Board : राज्य मंडळ आता समाज माध्यमात… आता काय होणार?

दहावी-बारावी परीक्षांबाबत अफवा टाळण्यासाठी राज्य मंडळ आता युट्यूब, एक्स, फेसबुकसह संकेतस्थळ व ॲपवर अधिकृत माहिती देणार आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळांपर्यंत अचूक सूचना थेट पोहोचणार आहेत. ...अधिक वाचा

Deolali-Bhusaval MEMU train timings inconvenient

<strong>Marathi News Live Updates : राज्यातील सर्व घडामोडी जाणून घ्या</strong>

Marathi News Live Updates : राज्यातील सर्व घडामोडी जाणून घ्या