Maharashtra Political Live New Updates, 25 November 2025 : राज्यात आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.

तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याच्या पत्नीच्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याप्रकरणी अनंत गर्जे याला डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर, अतिरिक्त महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता गर्जे याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे (२८) यांनी शनिवारी रात्री वरळी येथील निवासस्थानी आत्महत्या केली होती. या प्रकरणात देखील नवीन माहिती समोर येताना दिसत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली असून, १५ जिल्ह्यांत सरपंच आरक्षणातही ५० टक्क्यांचा निकष पाळला गेला नसल्याची बाब समोर आली आहे. तेलंगणातही ५० टक्क्यांची मर्यादा पार केल्याने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राबाबत कोणता निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Live Updates

Maharashtra News  : महाराष्ट्रातील आजच्या दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

19:49 (IST) 25 Nov 2025

बीडमध्ये ५१९ पैकी ४३९ परवानाधारकांकडून शस्त्र जमा!

बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे. या अंतर्गत नऊ पोलीस ठाणी असून, त्या अंतर्गत ५१९ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यातील ४१९ जणांनी शस्त्रे जमा केली आहेत. ...सविस्तर बातमी
19:34 (IST) 25 Nov 2025

Video: वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १३ जणांना वायूची बाधा

संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास दिवाणमान येथील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून ही गळती झाली आहे. ...अधिक वाचा
19:22 (IST) 25 Nov 2025

धुळ्यात राडा: मतदार यादीतील घोळ यंत्रणेच्या गळ्याशी ? माजी सभापती किरण कुलेवारांच्या आक्षेपानंतर शिवसेनाच्या आक्रमकतेने खळबळ

स्थायी समितीच्या माजी सभापती किरण कुलेवार यांनी आज दुपारीच प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेतला. आयुक्तांची भेट घेऊन यादीतील मतदारांच्या नावांबाबत आक्षेप काय, यासंदर्भात वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ...सविस्तर वाचा
18:58 (IST) 25 Nov 2025

न्यायालयाच्या निकालामुळे कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० उमेदवारांना दिलासा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले होते. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध कोल्हे गटाने म्हणजेच भाजपच्या ३० उमेदवारांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आक्षेप दाखल केला होता. ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 25 Nov 2025

अजित पवारांच्या तोंडी ‘ रामकृष्ण हरी’ मग… पुढे ?

नगर परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी "राम कृष्ण हरी" हा शब्द उच्चारला. ...सविस्तर बातमी
18:26 (IST) 25 Nov 2025

BEST Bus : बेस्टच्या ज्येष्ठ वाहकांचे हाल

उतारवयाकडे झुकणाऱ्या बेस्टच्या वाहकांना चालत्या बसमध्ये उभे राहून तिकीट देण्याचे, लांब पल्ल्यांच्या मार्गावर काम करण्याचे, उन्हातान्हात उभे राहण्याचे काम दिले जात आहे. ...अधिक वाचा
18:19 (IST) 25 Nov 2025

Dhule Police : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांच्या तपासणीमागचे कारण काय?

धुळे शहरातील विविध भागात असलेल्या वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संबंधित शाळेतच गाठून आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीसांनी चालकांची तपासणी केली. ...सविस्तर बातमी
17:58 (IST) 25 Nov 2025

डोंबिवली : अनेक महिने शांत असलेल्या शिवसेनेने बॅनरच्या माध्यमातून रवींद्र चव्हाणांना डिवचले

डोंबिवलीत विकास कामांच्या माध्यमातून शिवसेनेने रवींद्र चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ...सविस्तर वाचा
17:49 (IST) 25 Nov 2025

परभणीत सत्ताधारी पक्षही कुबड्यांच्या आधारेच रिंगणात; स्वबळावर लढण्याच्या वल्गना हवेतच

जिल्ह्यात सात ठिकाणच्या नगराध्यक्षपदांसाठी जवळपास ५० उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ६०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...अधिक वाचा
17:36 (IST) 25 Nov 2025

दोनच दिवसात भाजपच्या महिला शहराध्यक्षा शिवसेनेतून पुन्हा भाजपात....वाईट वाटल्याने पक्ष सोडल्याची कबुली

तर भाजपची हीच खरी संस्कृती असून आपल्या लोकांना सामावून घेण्याची संस्कृती इतर कुठेही नाही, असे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
17:35 (IST) 25 Nov 2025

"आई शप्पथ, कमळाला मतदान नको", कोण म्हणाले ?

जतमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत महादेव जानकर बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी आमदार विकम सावंत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजयनाना शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. ...अधिक वाचा
17:27 (IST) 25 Nov 2025

कर्जाच्या नावे रत्नागिरीतील महिलेची डोंबिवलीतील भामट्यांकडून फसवणूक

तीन भामट्यांनी आपली कर्जाच्या माध्यमातून सात लाख ७९ हजार रूपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार सुपर्णा ढेपे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. ...वाचा सविस्तर
17:16 (IST) 25 Nov 2025

अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाच्या अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीवरील एका कुटुंबाला जोरदार धडक दिल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी तेलगाव-धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे घडली होती. ...वाचा सविस्तर
17:03 (IST) 25 Nov 2025

Palghar BJP Internal Rift : भाजपामध्ये जुना नव्याचा वादा चिघळला; प्रचारात जुने सक्रिय नसल्याचे निदर्शनास

तिकीट वाटपामध्ये नवीन सदस्याला झुकते माप दिले गेल्याने पक्षाच्या प्रचारामध्ये जुन्या मंडळींनी विशेष सहभाग घेत नसल्याचे दिसून आले आहेत. ...सविस्तर वाचा
16:51 (IST) 25 Nov 2025

Mira Bhayandar Drainage Issue: मिरा रोडच्या कांनुगो भागात नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक त्रस्त

मिरारोड पूर्वेत कांनुगो इस्टेट परिसर आहे. या परिसरात मोठी गृहसंकुले असून येथे नागरी वस्ती आहे. दरम्यान, येथील युवराज महाराजा आणि आसपासच्या इमारतींच्या परिसरात मागील तीन महिन्यांपासून दिवसातून दोन वेळा नाल्याचे पाणी साचत आहे. ...सविस्तर वाचा
16:50 (IST) 25 Nov 2025

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा जाहीर सभांमध्ये मिले सूर मेरा तुम्हारा…लाडक्या बहिणींवर एकमत

महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहिणींना देण्यात येणाऱ्या पैशांमुळे इतर योजनांसाठी पैसा देण्याकरिता सरकारची ओढाताण होऊ लागली. ...अधिक वाचा
16:31 (IST) 25 Nov 2025
संजय राऊत पुन्हा हातात तलवार घेऊन मैदानात दिसतील - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आज संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत लवकरच बरे होऊन परततील असेही सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही तसं रोज संपर्कात असतोच, पण हल्ली मी त्यांना रोज फोन करत नाही, त्यांच्या तब्येतीबद्दल सुनील यांना छळत असतो. खूप दिवसांपासून भेटायचं होतं, आज भेट झाली, भेटून चांगलं वाटलं. ते आज खूप फ्रेश दिसले.

तसेच संजय राऊत पुन्हा एकदा मैदानात दिसतील, इतकेच नाही तर ते हातात तलवार घेऊन दिसतील, असेही उद्धव ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलाताना सांगितले.

16:25 (IST) 25 Nov 2025

सत्तेचे होणारे केंद्रीकरण लोकशाहीसाठी हानिकारक; खासदार सुप्रिया सुळे यांची खंत

माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हे स्वप्न होतं, पण दुर्दैवाने आज सत्ता एकाच ठिकाणी एकवटली जात असून, हे लोकशाहीसाठी हानिकारक असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. ...अधिक वाचा
16:19 (IST) 25 Nov 2025

"शहरी जीवनमान उंचावले", देवेंद्र फडणवीस यांचा दावा

भाजपकडेच विकासाची रुपरेषा असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले. ...अधिक वाचा
16:14 (IST) 25 Nov 2025

मतदानाआधीच शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे निधन....निवडणूक अधिकारी काय निर्णय घेणार?

सोमवारी दिवसभर प्रचार करुन आल्यानंतर ते रात्री झोपले. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
16:06 (IST) 25 Nov 2025

'गुगल मॅप'चा वापर करून चोऱ्या करणारी मध्यप्रदेशातील टोळी जेरबंद

'गुगल मॅप'चा वापर करत महावितरणच्या वीज उपकेंद्रात चोरी करणारी मध्यप्रदेशातील टोळी अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. ...सविस्तर वाचा
15:56 (IST) 25 Nov 2025

भारतामध्ये प्रत्येक तीनपैकी एक महिला आयुष्यात जोडीदाराच्या हिंसेची बळी!

 Violence Against Women : हा अहवाल तयार करताना १६८ देशांतील २००० ते २०२३ दरम्यानच्या सर्वेक्षणांचा विचार करण्यात आला.त्यातूनच महिलांवरील हिंसक अत्याचाराचे वास्तव चित्र उभे राहिले. ...अधिक वाचा
15:47 (IST) 25 Nov 2025

''ठाणे महापालिका अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी येताच…" -अतिरिक्त आयुक्तांनी दिले महत्वाचे निर्देश

ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी भागात असून येथूनच पालिकेचा कारभार चालतो. याशिवाय, नागरिकांना विविध कामांसाठी मुख्यालयात यावे लागू नये यासाठी पालिकेने शहरात नऊ ठिकाणी प्रभाग समिती कार्यालये उभारलेली आहेत. ...अधिक वाचा
15:36 (IST) 25 Nov 2025

नांदेड बँकेतील नोकरभरती नव्या संचालकांच्या राजवटीत?

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सादर केलेला बिंदू नामावली (रोस्टर) प्रस्ताव शासनाकडून अद्याप मंजूर झालेला नसल्यामुळे या बँकेतील कर्मचारी भरतीवरील स्थगिती मागे घेता येणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. ...सविस्तर वाचा
15:22 (IST) 25 Nov 2025

डोंबिवली : देवीचापाडा येथे बेकायदा नकली विदेशी दारू अड्ड्याने रहिवासी हैराण

मच्छिंद्र चिमण पाटील उर्फ मच्छ्या असे हा नकली विदेशी दारूचा अड्डा चालविणाऱ्या मालकाचे नाव आहे. ...अधिक वाचा
15:14 (IST) 25 Nov 2025

“कितीही कांगावा केला, तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,”, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि बहिणींना मिळणारे १५०० रुपये सुरूच राहतील. ...अधिक वाचा
15:12 (IST) 25 Nov 2025

घोडेस्वारीची मात्रा घ्या अन् 'हे' दोन आजार दूर ठेवा

घोडेस्वारीबद्दलचे अनुभव सांगताना वयाची ७५ वर्षे पार केलेले डॉ. सुरेशचंद्र चौधरी सांगतात की, रपेटीनंतर हृदयावर ताण येत नाही. ...अधिक वाचा
14:48 (IST) 25 Nov 2025

नाशिकमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात लाचखोरी... एक लाखांची लाच स्वीकारताना अधिकारी जाळ्यात

महत्वाची बाब म्हणजे संशयित अधिकाऱ्याने पोलीस ठाण्याच्या आवारात लाचेची रक्कम स्वीकारली. या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...वाचा सविस्तर
14:17 (IST) 25 Nov 2025

"पक्ष माझ्या काकांचा नाही, पक्ष तुमच्याच काकांचा आहे तो...", योगेश क्षीरसागर यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली. आमच्याकडे सगळे एबी फॉर्म मागत होते. पक्ष तुझ्या काकाचा आहे का असे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर आता भाजपा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पक्ष माझ्या काकाचा नाही. पक्ष तुमच्याच काकाचा आहे तो व्यवस्थित चालवा. अशा शब्दात भाजपचे नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. क्षीरसागर म्हणाले की, बीडमध्ये खालची टोळी जमा झाली त्यांनी काहीतरी मिस फीड दादांना केले. मी अजित पवारांना स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या व्यस्त शेड्युलमध्ये माझे काही बोलणे झाले नाही. परंतु, त्यांनी सुद्धा तशी विचारणा मला केली नाही. त्यांना काही प्रिफिड केलं असेल आणि त्यांनी काही निर्णय घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काही बोलू शकत नाही. पक्ष हा माझ्या नाही त्यांच्याच काकांचा आहे. त्यांनी तो व्यवस्थित सांभाळावा आणि खालच्या लोकांनी काय सांगितले त्याची शहानिशा करावी, म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ते कळेल असे देखील डॉ. योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

14:12 (IST) 25 Nov 2025

Video: धक्कादायक ! जीर्ण टाकी रेल्वे रुळावर कोसळली, युद्धपातळीवर उपाययोजना…

शेगाव तालुक्यातील जलंब येथून मुंबई ते नागपूर लोहमार्ग गेला आहे. रजतनगरी असलेल्या खामगावला जलंब येथून रेल्वे मार्ग जोडला आहे. ...वाचा सविस्तर