Mumbai Maharashtra News Highlights: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्यानं भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. यादरम्यान राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीकडे आपले लक्ष असेल. याबरोबरच राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरही राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, या पार्श्वभूमीवर हवामानाचा आढावा देखील आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Today 15 May 2025 : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर
तरुण कलावंतांचे प्रयोगशील नाट्याविष्कार पाहण्याची संधी, प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सवाला २२ मेपासून सुरुवात
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर ऑपरेशन सिंदूरचा जयघोष ! चित्रफित दाखवून जवानांना सलामी
ठाणे-कळवा रेल्वे रुळावर घातपाताचा प्रयत्न, सिमेंटचा पोल रुळावर…
ठाणे पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार जूनमध्ये गणवेश ?
सफाळ्यातील पादचारी पुलाची उभारणी लवकरात लवकर करण्याचे रेल्वेकडून आश्वासन, तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच
टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु, प्रवेशद्वारांवरील कोंडीचा प्रश्न गंभीर
सावंतवाडी शहरातील ३० वर्षांवरील इमारतींना संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
महावितरणची मान्सूनपूर्व कामे ३१ मे पर्यंत, अवकाळी पावसामुळे महावितरणच्या कामांना उशीर
महामार्गालगत भर दिवसा पादचाऱ्याला लुटले
श्रीरामपूरमध्ये १४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; एकास अटक, रसायन अभियंत्याविरुद्धही गुन्हा
"भारताने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) परत घ्यावे, कारण ...", रामदास आठवले स्पष्टच बोलले
"पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना प्रोत्साहन दतो. भारतावर अनेक वेळा दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. या हल्ल्यांसाठी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी सैन्य जबाबदार आहे. भारताने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) परत घ्यावे, कारण जर पीओजेके पाकिस्तानकडेच राहिले तर भारतावर दहशतवादी हल्ले होत राहतील. वेळ पडल्यास भारताने पाकिस्तानचा ताबाही घ्यावा," अशी प्रतिक्रिया केंद्री मंत्री रामदास आठवले यांनी जालना येथे बोलताना दिली.
रो-रोमुळे नवजात बाळाचे प्राण वाचले, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटात झाल्याने वेळेवर उपचार मिळाले
शिर्डीतून साडेतीन किलो सोने, ४ लाखांची रोकड लंपास; मुंबईतील व्यापाऱ्याला गंडा
ड्रोन उडवाल तर खबरदार… ठाणे पोलिसांचा इशारा
जातनिहाय जनगणनेचे श्रेय घेण्यासाठी राज्यात काँग्रेस प्रयत्नशील; राहुल गांधींच्या उपस्थितीत जालन्यात मेळावा
नाशिकमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हिंदू विराट सभेत लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने सिडको परिसरात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधिचा व्हिडीओ समोर आला आहे.
नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराच्या घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला
श्रेणिक लोढा (अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा)ाजा येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २४ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी गांभीर्य ओळखत आरोपीला अटक केली आहे. ही चिमुरडी घराबाहेर खेळत असताना २४ वर्षीय आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पिंपळगाव राजा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. श्रेणिक लोढा (अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
तुर्की कंपनीशी संबंध तोडा... शिवसेनेची मुंबई विमानतळाबाहेर निदर्शने
सेलेबी एनएएस अएरपोर्ट सर्व्हिसेस या टर्किश कंपनीबरोबरचे संबंध तोडावेत अशी मागणी करत आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबईतील छत्रपती शिवारी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळ येथे १३ मे रोजी निदर्शने केले.
सेलेबी ही कंपनी मुंबई विमानतळावरील जवळपास ७० टक्के ग्राउंड ऑपरेशन्स हाताळते, यामद्ये पॅसेंजर सेवा, लोड कंट्रोल, फ्लाइट ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सर्व्हिसेस, वेअरहाऊस आणि ब्रीज ऑपरेशन्स यांचा समावेश आहे.