Maharashtra Politics News Updates: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. रिफायनरीमधील उत्पादन दिवसाला ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले असून, अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. यासह राज्यातीली राजकारण, पर्यटन, क्रीडा, कला यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Pune Maharashtra Live News Today, 13 March 2026: महाराष्ट्रातील घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

22:10 (IST) 13 Mar 2026

ईव्हींच्या विक्रीत पुन्हा घट; फेब्रुवारीमध्ये जागतिक विक्री ११ टक्क्यांनी घसरून १० लाखांवर

जगभरातील सरकारांनी विद्युत वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आखलेल्या धोरणांना कात्री लावण्यास सुरुवात केली असताना, चीनने जुन्या गाड्यांच्या बदल्यात नवीन गाड्या घेताना मिळणारे आर्थिक अनुदान काढून घेतले आहे. ...वाचा सविस्तर
21:46 (IST) 13 Mar 2026

राज्यावर गारपीट, उन्हाळी पावसाचे सावट; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ...अधिक वाचा
21:20 (IST) 13 Mar 2026

निफ्टीत मार्च २०२६ मधील सर्वात मोठी घसरण

जागतिक स्तरावर वाढलेल्या भू-राजकीय तणावाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावरही दिसून येत आहे. ...अधिक वाचा
21:19 (IST) 13 Mar 2026

ट्रम्प यांच्या मालकीच्या क्रिप्टो कंपनीच्या नव्या खेळीने वादंग

कंपनीने योजनेत सहभागी होणाऱ्या या बड्या गुंतवणूकदारांना ‘सुपर नोड्स’ असे नाव दिले आहे. ५० लाख डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या या गुंतवणूकदारांना कंपनीच्या व्यवसाय विकास संघाशी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येईल. ...वाचा सविस्तर
21:10 (IST) 13 Mar 2026

‘फिच’चा भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावाद; तेलाचा दर २०२६ मध्ये ७० डॉलरवर राहण्याचा अंदाज

विद्यमान २०२५-२६ आणि आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा अंदाज अनुक्रमे ७.५ टक्के आणि ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवणारा सुधारीत अनुमान फिच रेटिंग्जने शुक्रवारी वर्तवले. ...अधिक वाचा
21:02 (IST) 13 Mar 2026

महिला उद्यमशीलतेचा आज ‘एक्स्प्रेस पुरस्कारा’ने गौरव; ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चा फिक्की-फ्लोशी भागीदारीतील उपक्रम

या सोहळ्यात एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार, झिया जे. मोदी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...वाचा सविस्तर
20:46 (IST) 13 Mar 2026

मोदी सरकारकडून गंगाजळीतील डॉलरच्या टेकूने रुपयाला आधार

परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकी डॉलरचे वाढते सामर्थ्य, परकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर झालेला निर्गमन आणि देशांतर्गत शेअर बाजारात झालेली सततची विक्री यामुळे रुपयावर आणखी दबाव आला. ...सविस्तर वाचा
20:43 (IST) 13 Mar 2026

युद्धासारख्या परिस्तिथीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचे मोठे पाऊल

सुमारे २.०१ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाचा समावेश असलेल्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांना सभागृहाने 'ध्वनी मताने' (voice vote) मंजुरी दिली. ...वाचा सविस्तर
19:43 (IST) 13 Mar 2026

उत्तन येथे कचरा संकलनाकडे पालिकेचे दुर्लक्ष; उत्तनचे नागरिक हैराण

मिरा भाईंदर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असून तो गोळा करण्यासाठी महापालिकेने खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. ...सविस्तर वाचा
19:40 (IST) 13 Mar 2026

लाल दहशतीचे काळे पर्व संपुष्टात! ‘बुढापहाड’चा क्रूर ‘मृत्युंजय’ अखेर जेरबंद

झारखंड, छत्तीसगड आणि बिहार सीमा भागातील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या ‘बुढापहाड’चा शेवटचा क्रूर नक्षल नेता अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात अडकला आहे. ...वाचा सविस्तर
19:35 (IST) 13 Mar 2026

भूसंपादनावरून गडचिरोलीतील भाजप नेत्यांची कोंडी,एकीकडे पक्षाचा आदेश, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा रोष….

चामोर्शी तालुक्यातील सुमारे ३ हजार ५०४ हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना निघताच परिसरात असंतोषाचा भडका उडाला आहे. ...अधिक वाचा
19:25 (IST) 13 Mar 2026

वसई विरार शहरात क्लस्टर योजना होणार सुरू? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले निर्देश

वसई विरार शहरातील अनधिकृत इमारतींची वाढत जाणारी संख्या, शासकीय आणि खाजगी जागांवर होणारे अतिक्रमण, तसेच धोकादायक इमारतींची होणारी पडझड यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ...अधिक वाचा
19:19 (IST) 13 Mar 2026

१०० रुपयांसाठी व्यसनाधीन तरुणानं जन्मदात्या वडिलांना संपवलं; दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात पावशीने वार!

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दारूड्या मुलाने वडिलांची लाकडी दांडा आणि पावशीने हल्ला चढवून हत्या केली. ...अधिक वाचा
19:03 (IST) 13 Mar 2026

भीषण अपघातात राजस्थानमधील दोन ठार, चार बकऱ्याही दगावल्या

बुलढाणा जिल्ह्याच्या हद्धीतील खामगाव–अकोला मार्गावर आज शुक्रवारी झालेल्या भीषण वाहन अपघातात दोन जणांचा मृत्यू ओढावला. ...अधिक वाचा
19:01 (IST) 13 Mar 2026

नागपूर भाजपात समीकरणं बदलणार? रामदास तडस अमित शाहांच्या भेटीला, गृहमंत्र्यांनी काय केली सूचना?

गृहमंत्री अमित शहा यांनी आज भेटीची वेळ दिल्याचा निरोप माजी खासदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस यांना काल गुरुवारी मिळाला. ...अधिक वाचा
18:55 (IST) 13 Mar 2026

विरारमध्ये 'स्पर्म बँक'चा बेकायदा व्यापार उघड; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४५ डोनर स्पर्म व्हायल्स जप्त

विरार पूर्वेकडील एन पी रस्त्यावरील पद्मीबाई टॉवरमधील 'जिवदानी सायंटिफिक कंपनी'च्या ठिकाणी बेकायदेशीर डोनर गॅमेट्सची विक्री होत असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. ...वाचा सविस्तर
18:30 (IST) 13 Mar 2026

आयएएस उत्तीर्ण ओबीसी उमेदवारांना दिलासा; क्रिमिलेअर‑नॉन-क्रिमिलेअर मुद्द्यावर पुन्हा चर्चेला वाव

सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निर्णयाचा भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ...अधिक वाचा
18:11 (IST) 13 Mar 2026

Video: लोकसत्ता इम्पॅक्ट! परिचारिका प्रशिक्षणार्थी तरुणींकडून साफसफाई करून घेणं भोवलं; तिघांची बदली, एकाला नोटीस

भंडारा येथील शासकीय परिचर्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात प्रात्यक्षिकांऐवजी बेड आणि भिंती पुसण्यासारखी सफाईची कामे करण्यास सांगण्यात आले होते. ...वाचा सविस्तर
18:10 (IST) 13 Mar 2026

“ज्या घरातली महिला सक्षम आहे ते घर सुद्धा सक्षम”, कोकण सरस महोत्सवात कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

१२ ते १६ मार्च दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनात १५० महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच राज्यात १७ 'उमेद मार्ट' सुरू करण्यात येणार आहेत. ...सविस्तर बातमी
18:03 (IST) 13 Mar 2026

ठाण्यात चित्रपटाचे चित्रीकरण, ठाणेकर मात्र तप्त उन्हात वाहतुक कोंडीने हैराण

चित्रीकरणाच्या व्हॅनिटी व्हॅन्स आणि इतर गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या केल्यामुळे रस्ते अरुंद झाले होते, परिणामी राम मारुती रोड, गडकरी चौक आणि गोखले रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 13 Mar 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. ...सविस्तर बातमी
17:46 (IST) 13 Mar 2026

उद्योजकांच्या गॅसच्या अडचणीवरती उद्योगमंत्र्याकडून बांबू लागवडीचा उतारा

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक वसाहतीत गॅस तुटवड्यामुळे कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. फ्लोमीटरच्या कमतरतेमुळे नवीन जोडण्यांना विलंब होत असून, उद्योजकांसमोर कर्जाच्या व्याजाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ...अधिक वाचा
17:26 (IST) 13 Mar 2026

नाश्ता-चहाच्या दुकानांची शटर बंद, सिलिंडरचा दर अव्वाच्या सव्वा

छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे हॉटेल आणि नाश्ता सेंटर्ससमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅसअभावी अनेक दुकानांची शटर बंद झाली असून, उपलब्ध असलेला गॅस चढ्या दराने विकला जात असल्याने सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ...सविस्तर वाचा
17:22 (IST) 13 Mar 2026

आरटीई संकेतस्थळावरील १ किलोमीटरचा नियम, १२ तासात हटवा अन्यथा… राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक…

यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तातडीने पोर्टल अपडेट करण्याची मागणी केली आहे. ...अधिक वाचा
17:01 (IST) 13 Mar 2026

LPG Gas Shortage : ४५ दिवस नोंदणी बंदी; माध्यान्ह भोजन योजनेबाबत शिक्षक संघटनेची मागणी काय?

शालेय माध्यान्ह भोजन आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांत अन्न शिजविल्या जाते. मागील काही वर्षात शाळांना एलपीजी सुविधा देताना एक सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. ...वाचा सविस्तर
17:00 (IST) 13 Mar 2026

बाजारात गॅस पुरवठा सुरळीत,शिधावाटप कार्यालयाचा दावा

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक घाबरून जाऊ नये, असे प्रशांत काळे आवाहन प्रशांत काळे यांनी केले आहे. ...वाचा सविस्तर
16:49 (IST) 13 Mar 2026

नंदुरबार कृषी विभागातील अनागोंदीची चौकशी होणार ! जिल्हाधिकारी डाॅ. मित्ताली सेठी यांचे आदेश

नंदुरबार कृषी विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या २८ कोटींच्या निधीतून शेतकरी उत्पादक कंपन्यांना केलेल्या नियमबाह्य वाटपाची आता चौकशी होणार आहे. 'लोकसत्ता'ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कडक पावले उचलत आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...वाचा सविस्तर
16:43 (IST) 13 Mar 2026

गॅसनंतर बाटलीबंद पाणी देखील महागणार ? - घाऊक बाजारात बाटलीबंद पाण्याच्या दरात वाढ

कच्च्या तेलाच्या टंचाईमुळे प्लास्टिक बाटल्यांच्या निर्मितीचा खर्च वाढल्याने बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात मोठी वाढ झाली आहे. ...सविस्तर वाचा
16:30 (IST) 13 Mar 2026

एसटी महामंडळात १७ हजार पदांवर जम्बो भरती, चालक व वाहकांसह अनेक पदांसाठी …

राज्य सरकारने मेघभरतीची घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आता पुन्हा एकदा १७ हजार पदांवर नवीन भरती होणार आहे. ...वाचा सविस्तर
16:28 (IST) 13 Mar 2026

Video : बंडू धोतरे यांचा नऊ दिवसांपासून अन्नत्याग: सत्याग्रहाच्या समर्थनार्थ चंद्रपूरकरांची 'मानवी साखळी', सरकारविरोधात रोष…

आंदोलनाच्या नवव्या दिवशी 'सेव्ह लोहरडोंगरी, सेव्ह चंद्रपूर' या मोहिमेअंतर्गत शेकडो समर्थकांनी भव्य मानवी साखळी निर्माण करून सरकारचे लक्ष वेधले. ...सविस्तर बातमी

पंजाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पार्थ पवार यांच्या पंजाब राज्यातील आगमनाच्या पूर्वतयारीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. (फोटो - X/ Mahancpspeaks)