Latest Marathi News Updates: इराण- इस्त्रायल युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसू लागली असून, राज्यात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा संघर्ष लांबत गेल्यास राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा देखील निर्माण होणार आहे. मुंबई – पुण्यातील अनेक रेस्टॉरंट गॅस तुटवड्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यात लवकरच मेगा भरती जाहीर केली जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. तसेच, मुंबई महानगर क्षेत्रातील सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी लवकर या, लवकर जा अशी वेळेत सवलत देण्याच्या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केली. यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Pune Maharashtra Live News Today, 11 March 2026: महाराष्ट्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

21:29 (IST) 11 Mar 2026

हॉटेलमधील ७५ टक्के पदार्थ गायब…चोखंदळ खवय्ये आणि हॉटेलवर विसंबून असलेल्यांचे हाल

काही हॉटेल व्यावसायिकांनी पदार्थ शिजविण्यासाठी कोळशावरील चुलीचा पर्याय निवडला आहे. मात्र सर्वच पदार्थ चुलीवर रांधणे शक्य नसल्याने हॉटेलमध्ये मोजकेच पदार्थ उपलब्ध आहेत. ...अधिक वाचा
21:29 (IST) 11 Mar 2026

‘महाराष्ट्र केसरी’च्या गोंधळाविरुध्द पहिलवानांचा मुंबईच्या दिशेने मोर्चा; ४० महाराष्ट्र केसरी, १० हिंद केसरी आंदोलनात आक्रमकपणे सहभागी

देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे, ख्यातनाम मल्ल खाशाबा जाधव यांच्या कराडमधील स्मारकाला अभिवादन करून, आक्रोश मोर्चास प्रारंभ करण्यात आला. ...सविस्तर वाचा
21:16 (IST) 11 Mar 2026

नरेश म्हस्केजी औकादीत राहा… अन्यथा; राजन विचारे यांचा म्हस्केंना इशारा

नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत निवडून येण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांच्यावर टीका देखील केली होती. ...अधिक वाचा
21:06 (IST) 11 Mar 2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेची मतदारयादी तयार करण्यापूर्वी बोगस संस्था रद्द करा; माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची मागणी

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली आहे. बँकेची निवडणूक घेण्यासाठी सहकार प्राधिकरणाने मतदार यादी तयार करण्याची सूचना जिल्हा बँकेला केली आहे. ...सविस्तर बातमी
20:54 (IST) 11 Mar 2026

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदलीचे प्रकरण; महापौरांच्या पत्रामुळे नवीन वाद

मुंबई महापालिकेतील सहाय्यक अभियंता व दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बदल्यांचे प्रकरण ऑक्टोबर २०२५ मध्ये खूप गाजले होते. ...सविस्तर वाचा
20:51 (IST) 11 Mar 2026

मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ; हवा गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली होती. मागील काही दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला जात होता. ...अधिक वाचा
20:42 (IST) 11 Mar 2026

आता बाटली भरण्याचीच अडचण ! गॅस न मिळाल्यास किती कोटीचे नुकसान होईल ? बिअर आणि मद्य उद्योगासमाेर नवे संकट

छत्रपती संभाजीनगरमधील बिअर आणि मद्य उद्योगासमोर आता बाटल्यांच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. ...अधिक वाचा
20:37 (IST) 11 Mar 2026

येऊरच्या जंगलात उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होणार; आव्हाडांच्या प्रश्नावर वन मंत्री गणेश नाईक यांचे उत्तर

काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात उत्खनानासाठी तहसीलदारानेच परवानगी दिल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. ...अधिक वाचा
20:27 (IST) 11 Mar 2026

कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या भूमी अधिग्रहणासाठी १४०० कोटी, प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या कल्याण-मुरबाड प्रकल्पाच्या भूमी अधिग्रहणासाठी तब्बल १४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ...सविस्तर बातमी
19:44 (IST) 11 Mar 2026

विद्युत वाहनांवर भर देणाऱ्या राज्य सरकारचा डिझेल बसकडे कल; एसटी महामंडळात २०० डिझेल बस खरेदीची निविदा

पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासह अनेक व्याधी झाल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांचा वापर करून, पर्यावरण संवर्धनासाठी, वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. ...सविस्तर वाचा
19:06 (IST) 11 Mar 2026

आयआयटी मुंबईचा वर्धापन दिन उत्साहात; प्रा. राजीव दुसाने यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान; १८ माजी विद्यार्थ्यांचा गौरव

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी महासंचालक प्रा. (डॉ.) बलराम भार्गव उपस्थित होते. ...अधिक वाचा
19:01 (IST) 11 Mar 2026

सांगली : महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अतुल माने अविरोध

महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली असून विषय समिती आणि प्रभाग समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
18:57 (IST) 11 Mar 2026

महसूल आयुक्तालयासंबंधी लवकरच निर्णय घेणार! आ.राजेश पवार यांच्या प्रश्नाला महसूलमंत्र्यांचे उत्तर

नांदेडमध्ये नवीन महसूल आयुक्तालय आणि भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालय स्थापन करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. ...सविस्तर बातमी
18:21 (IST) 11 Mar 2026

सायरन वाजला की बंकरकडे धाव; इस्रायलमध्ये राहणाऱ्या मराठी जोडप्याचा युद्धातील अनुभव; युद्धजन्य परिस्थितीमध्येही जीवन सुरळीत

मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील समता गोखले-दांडेकर आणि त्यांचे पती योगेश दांडेकर हे भौतिकशास्त्र संशोधक म्हणून गेली चार वर्षे इस्रायलमध्ये काम करत असून वास्तव्यास आहेत. ...सविस्तर वाचा
18:12 (IST) 11 Mar 2026

स्मार्ट मीटरचा वीज पुरवठा खंडित झाल्यावर आता ग्राहकांना पुनर्जोडणीसाठी मन:स्ताप… एकच महिन्याचे देयक थकल्यास बत्ती गुल…

नागपूरसह राज्यभरात महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. एका महिन्याचे देयक थकल्यास थेट वीजपुरवठा खंडित होत असून, देयक भरल्यानंतरही तो पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. ...वाचा सविस्तर
18:12 (IST) 11 Mar 2026

राजकीयदृष्ट्या दुरावलेली दोन शहरे; नव्या रेल्वेमार्गामुळे येणार निकट!

नांदेड-लातूर या नव्या रेल्वेमार्गामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर तब्बल २०० किमीने कमी होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येत असून केंद्र सरकार लवकरच या प्रकल्पाला मंजुरी देणार आहे. ...अधिक वाचा
18:12 (IST) 11 Mar 2026

हॉटेलात घरगुती सिलेंडर असेल तर खैर नाही, साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, दक्षता पथके सज्ज

वर्ध्यात गॅस टंचाईचे संकट गडद; हॉटेल्समध्ये घरगुती सिलेंडर वापरल्यास होणार थेट कारवाई. ...सविस्तर वाचा
18:04 (IST) 11 Mar 2026

स्मार्ट मीटरची सक्ती नको; बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकरांचा हरकती मुद्दा

बेस्टच्या वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नका, अशी आक्रमक भूमिका नितीन नांदगावकर यांनी मांडली. डेटा लीक होण्याची भीती आणि प्रीपेड सिस्टिममुळे गरीब ग्राहकांना बसणारा आर्थिक फटका यावर सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. ...वाचा सविस्तर
18:03 (IST) 11 Mar 2026

बेस्टच्या डेपो, थांब्यावर चित्रीकरण महागले

मुंबईत बेस्टच्या डेपो आणि बस थांब्यांवर चित्रीकरण करणे आता महाग झाले आहे. बेस्टने १ एप्रिल २०२५ पासून चित्रीकरण शुल्क आणि पार्किंग दरात १० टक्क्यांहून अधिक वाढ लागू केली आहे. ...सविस्तर बातमी
17:47 (IST) 11 Mar 2026

१०८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ३.३० कोटींची रोकड, एक किलो सोने पोलिसांच्या स्वाधीन, इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रांसह संपत्तीचेही समर्पण

छत्तीसगडमधील बस्तर विभागात 'पुनर्वसन ते पुनरुत्थान' मोहिमेतंर्गत १०८ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडला आहे. नक्षलवादाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रे, ३.३० कोटींची रोकड आणि एक किलो सोने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
17:42 (IST) 11 Mar 2026

गॅस तुटवड्यामुळे खाणावळींमध्ये चुलीवर स्वयंपाकाची वेळ

इराण-इस्त्रायल संघर्षामुळे खनिज तेल, एलपीजी आणि सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याच्या झळा आता भारतातील विविध क्षेत्रांनाही बसू लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
17:41 (IST) 11 Mar 2026

PAT exam Maharashtra 2026: एप्रिलअखेरच्या उकाड्यात होणार ‘पॅट’ चाचणी; शिक्षक संघटनांचा आक्षेप काय?

राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 'पॅट' (नियतकालिक मूल्यमापन चाचणी) एप्रिल महिन्यात होणार आहे. मात्र, उन्हाळ्याचा कडाका आणि निकालासाठीचा अपुरा वेळ यामुळे शिक्षक संघटनांनी वेळापत्रकावर आक्षेप नोंदवला आहे. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 11 Mar 2026

“१२ वी रसायनशास्त्र पेपरफूट प्रकरणात धक्कादायक खुलासा : माजी बोर्ड सदस्यच सूत्रधार?”

नागपूरमधील १२ वी रसायनशास्त्र पेपरफुटी प्रकरणात माजी बोर्ड सदस्य सतीश खर्चे याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. खर्चे यानेच २०२३ मधील प्रश्नपत्रिका संच टार्गेट अकादमीला पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...वाचा सविस्तर
17:38 (IST) 11 Mar 2026

बेस्ट अध्यक्षांची महापालिकेकडे ३ हजार कोटींच्या अनुदानाची मागणी; महापालिका आयुक्तांना पाठविले पत्र

आर्थिक संकटात सापडलेल्या 'बेस्ट'ला सावरण्यासाठी तृष्णा विश्वासराव यांनी ३,००० कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे. पालिकेने दिलेले १,००० कोटींचे अर्थसहाय्य दैनंदिन कामकाज आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्यांसाठी अपुरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...सविस्तर बातमी
17:38 (IST) 11 Mar 2026

एअर इंडियाचा विमान प्रवास महागला; युद्धाचा फटका

इराण-इस्रायल युद्धामुळे विमान इंधनाच्या किमती वाढल्याने एअर इंडियाने तिकीट दरात वाढ केली आहे. १२ मार्चपासून देशांतर्गत प्रवासावर ३९९ रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासावर मोठी दरवाढ लागू होईल. ...सविस्तर वाचा
17:32 (IST) 11 Mar 2026

पालिका उपायुक्तांच्या विशेष पथकाकडून डोंबिवली पूर्वेतील फेरीवाल्यांचा बिमोड, पूर्व भाग फेरीवाला मुक्त

कारवाईमुळे डोंबिवली पूर्व भागातील चिमणी गल्ली, नेहरू रस्ता, फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, रामनगर, डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी गल्ली, राजाजी रस्ता भागातील फेरीवाले दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. ...अधिक वाचा
17:20 (IST) 11 Mar 2026

वांगणीतील हर्णे आयुर्वेदिक काॅलेजमधील विद्यार्थ्यांची शुल्काची रक्कम हडप करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील दुगलगाव चारी वस्तीमधील रहिवासी आहेत. संत हे मार्च २०२५ पासून महाविद्यालय व्यवस्थापनाला कोणतीही पूर्वसूचना न देता काम सोडून निघून गेले आहेत. ...वाचा सविस्तर
17:19 (IST) 11 Mar 2026

काळाबाजारीमुळे ठाण्यात गॅस टंचाई ! ठाणे हॉटेल संघटनेचा आरोप

पत्रकार परिषदेत हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या स्तरावर सध्या देशात किमान एक महिना पुरेल इतका एलपीजी गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
17:15 (IST) 11 Mar 2026

शंभर वर्ष टिकणारे धरण आणि सोबत वीज प्रकल्पही गारगाई धरण अखेर टप्प्यात

मुंबईची तहान भागवण्यासाठी पालघरमध्ये गारगाई धरण बांधले जाणार असून, त्यातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. या ५,००० कोटींच्या प्रकल्पातून १.२ मेगावॅट वीजनिर्मितीही केली जाईल. ...सविस्तर बातमी
17:13 (IST) 11 Mar 2026

नागपूर: अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून गॅस एजन्सीच्यागोदामाची तपासणी

नागपूर शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने जरीपटका येथील एका गॅस एजन्सीवर अचानक तपासणी केली. साठ्याची पडताळणी करून अनियमिततेचा शोध घेतला जात आहे. ...सविस्तर बातमी

जिष्णू देव वर्मा

जिष्णू देव वर्मा (फोटो - X/ CMO Maharashtra)

जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ.