Maharashtra Latest Marathi News Updates: मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅससाठी रांगेत उभं राहवं लागत आहे. दरम्यान, राज्यात गॅसची टंचाई नसल्याचे निवेदन मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधानसभेत केले. आहिल्यानगरमध्ये सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यावरुन देखील राज्यात आणि विधानसभेत तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोषींवर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती माहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून, विदर्भ, मराठवाड्यासह २२ जिल्ह्यात गारपीठीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा, कला, संस्कृती यासह विविध क्षेत्रातील घडामोडी लाईव्हा ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Today, 18 March 2026: महाराष्ट्रात दिवसभर घडणाऱ्या ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

20:43 (IST) 18 Mar 2026

आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. ...वाचा सविस्तर
20:34 (IST) 18 Mar 2026

कोल्हापूर जिल्ह्यात गारांसह पाऊस; शेतीचे नुकसान

हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला होता. ...वाचा सविस्तर
20:27 (IST) 18 Mar 2026

भारतीय रेल्वे जगातील किफायतशीर वाहतुकीपैकी एक; केंद्राकडून ६० हजार कोटींचे अनुदान

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये भारतीय रेल्वेसाठी सुमारे २.७८ लाख कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
20:16 (IST) 18 Mar 2026

सीबीएसईची दहावीची दुसरी परीक्षा मेमध्ये होणार; ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरणानुसार विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मिळणार संधी

पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेमध्ये कमाल तीन विषयांमध्ये गुण सुधारण्याची संधी ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरणामुळे उपलब्ध होणार आहे. ...अधिक वाचा
20:09 (IST) 18 Mar 2026

मुलीवरील ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सर्वपक्षीय रास्तारोको

शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नागरिक, महिला, विद्यार्थिनी, युवकांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत कोल्हार-घोटी मार्गावरील तळेगाव दिघे फाट्यावर आज, बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. ...सविस्तर बातमी
20:02 (IST) 18 Mar 2026

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

बेस्ट उपक्रमाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांची प्रत्येक आठवड्यात एक दिवस चर्चा करून प्रत्येक महिन्याच्या शेवटी चर्चेचा आढावा घेण्यासाठी महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. ...सविस्तर वाचा
19:52 (IST) 18 Mar 2026

सात अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए (इंटिग्रेटेड), एमसीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांना मुदतवाढ. ...वाचा सविस्तर
19:45 (IST) 18 Mar 2026

Pimpri Chinchwad Crime : भाड्यावरून वाद आणि चालकाने घेतला प्रवाशाच्‍या बोटाचा चावा...

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी चावा घेण्यापासून ते कोयत्या हल्ल्यापर्यंतच्या गुन्हेगारी घटनांनी खळबळ उडाली असून पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींना अटक केली आहे. ...सविस्तर वाचा
19:40 (IST) 18 Mar 2026

विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे राष्ट्रसेविका समितीचा कार्यक्रम रद्द! नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयातील प्रकार

स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉ.सुरेन्द्र बारलिंगे, गांजवे मामा, नरहर कुरुंदकर, म.द.पाध्ये, डॉ.ना.य.डोळे आदींनी नावारुपास आणलेल्या या संस्थेचा अमृतमहोत्सव अलीकडे साजरा झाला. ...सविस्तर वाचा
19:37 (IST) 18 Mar 2026

गुढीपाडव्याला फूल बाजार बहरला! झेंडू, मोगरा, गुलछडी, शेवंतीला मागणी...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्याच्या मार्केट यार्डात फुलांची विक्रमी आवक झाली असून झेंडूच्या दरात १० टक्क्यांनी घट झाली असली तरी मोगरा आणि गुलछडीला मोठी मागणी दिसून येत आहे. ...वाचा सविस्तर
19:29 (IST) 18 Mar 2026

सीईटी परीक्षांचे तात्पुरते प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध; परीक्षेच्या चार दिवस अगोदर अंतिम प्रवेशपत्र मिळणार

विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणे सोपे जावे यासाठी काही दिवसांपूर्वी सीईटी कक्षाने परीक्षांचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले होते. त्यानुसार २४ मार्च ते १६ मे या कालावधीत विविध परीक्षा घेण्यात येणार आहेत. ...वाचा सविस्तर
19:25 (IST) 18 Mar 2026

सांगली महापालिकेत पाणी प्रश्नावरून महासभेत एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा प्रयत्न

महापालिकेच्या सभेत शहरातील अपुर्‍या पाणी प्रश्‍नावरून काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यात वादावादी झाली. ...वाचा सविस्तर
19:20 (IST) 18 Mar 2026

डोंबिवलीत कोपर पुलावर उबेर कार चालकाची पोलिसांच्या दुचाकीला धडक; दोन पोलीस जखमी…

डोंबिवलीच्या कोपर उड्डाणपुलावर भरधाव उबेर कारने गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन जखमी केले आणि मदतीऐवजी चालक घटनास्थळावरून पसार झाला. ...सविस्तर वाचा
19:11 (IST) 18 Mar 2026

भारताच्या चंद्र मोहिमेचा प्रवास उलगडणार; ‘नेहरू तारांगण’ येथे नव्या कार्यक्रमाला सुरुवात

या कार्यक्रमाची पटकथा इस्रोच्या क्षमता बांधणी कार्यक्रम कार्यालयाचे माजी संचालक डॉ. सुधीर कुमार यांनी लिहिली असून पुणे येथील वेदार्थ ॲनिमेशन स्टुडिओकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
19:03 (IST) 18 Mar 2026

Nagpur Crime Update Today: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग ते हिट अँड रनमुळे तरुणीचा अंत; वाचा नागपुरातले ५ धक्कादायक गुन्हे!

Nagpur Crime Incidents : १३ वर्षांच्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून झालेला विनयभंग, भरधाव सफारीच्या धडकेत २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू, तर ३७ लाखांची मोठी फसवणूक; महाराष्ट्राच्या उपराजधानीत एकाच दिवसात घडलेल्या ५ धक्कादायक गुन्हेगारी घटनांचा थरार वाचा सविस्तर. ...अधिक वाचा
19:01 (IST) 18 Mar 2026

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक कामांच्या निविदेत ‘रिंग’ झाल्याचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे आंदोलन

स्मारकाच्या स्थापत्य आणि विद्युत कामासाठीच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी भाजप सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. ...सविस्तर वाचा
18:55 (IST) 18 Mar 2026

मध्ये रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करा; खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची मागणी…

रेल्वे स्थानकांवर मराठी साहित्याचे स्टॉल्स सुरू करण्यासोबतच कल्याण-सीएसएमटी मार्गावरील सर्व लोकल १५ डब्यांच्या करण्याची महत्त्वाची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत लावून धरली आहे. ...सविस्तर बातमी
18:52 (IST) 18 Mar 2026

एमटीएनएलच्या वायर चोरणारी उत्तर प्रदेशातील टोळी मुलुंडमध्ये जेरबंद

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात जमिनीखालून गेलेल्या एमटीएनएलच्या वायरची मोठ्या प्रमाणात चोरी होत होती. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
18:43 (IST) 18 Mar 2026

रवी पुजारी कोण आहे? अभिनेते, बिल्डरांना धमकावत परदेशात राहूनही अशी चालवायचा गँग…

कर्नाटकच्या उडुपीमधून मुंबईत आलेल्या रवी पुजारीने एका टोळीच्या म्होरक्याच्या हत्येचा बदला घेत गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले आणि पुढे छोटा राजनचा खास हस्तक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ...अधिक वाचा
18:38 (IST) 18 Mar 2026

असुविधेचे बेस्ट बस थांबे

बेस्टच्या बसने दिवसभरात जवळजवळ २३ लाख प्रवासी प्रवास करतात. बसची वाट पहात प्रवासी बस थांब्यावर उभे राहतात. मात्र शहरातील अनेक बस थांबे हे सुस्थितीत नाहीत. मुंबई शहरात बेस्टचे सुमारे सहा हजार बस थांबे आहेत. ...वाचा सविस्तर
18:37 (IST) 18 Mar 2026

भटक्या कुत्र्यांच्या निधीवर डल्ला; घोटाळ्याची फेरचौकशी, केडीएमसीतील आणखी चार अधिकारी येणार अडचणीत

भटक्या कुत्र्यांसाठी कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे पत्रीपूल भागात चालविण्यात येणाऱ्या निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्रातील गैरव्यवहाराची फेरचौकशी केली जाईल. ...सविस्तर वाचा
18:32 (IST) 18 Mar 2026

मुंबईच्या रस्त्यावर खासगी गाड्यांचीच गर्दी; बेस्ट बसचा वाटा केवळ ०.७४ टक्के

मुंबईतील वाहनांची संख्या २०२३ मध्ये ४५ लाख ३७ हजार २११ आणि २०२४ मध्ये ४७ लाख ५९हजार ९७६ वरून हळूहळू वाढून मार्च २०२५ पर्यंत ५० लाख ५४ हजार ९०७ झाली. सध्या वाहनांची संख्या ५३ लाखांच्या घरात पोहोचली आहे. ...सविस्तर बातमी
18:24 (IST) 18 Mar 2026

सांगली जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा; अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ॠषिकेश लाड

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्‍वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय डाचपेचावर मात करत मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेवर भाजपेतर पक्षाचा झेंडा रोवला आहे. ...अधिक वाचा
18:16 (IST) 18 Mar 2026

राज्यात फक्त दोन टक्के विद्युत वाहने चार्गिज स्टेशनची कमतरता, वाहनांच्या किंमती जास्त

पेट्रोल-डिझलेच्या सतत वाढणाऱ्या किंमती, धुरामुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण यामुळे विद्युत-वाहनांवर भर देण्यात आला. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी दिली. ...सविस्तर वाचा
18:12 (IST) 18 Mar 2026

विमानातील आसन निवड विनाशुल्क; केंद्र सरकारचा निर्णय, हवाई प्रवाशांना मोठा दिलासा

अनेक विमान कंपन्या आसन निवडण्यासाठी वेगळे शुल्क घेत होत्या. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घेतल्यानंतरही अधिक पैसे मोजावे लागत होते. याबाबत प्रवाशांनी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. ...अधिक वाचा
18:07 (IST) 18 Mar 2026

कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची पदे कागल तालुक्यात; हसन मुश्रीफ यांचे राजकीय ग्रह बलवत्तर; सहकाऱ्यांच्या नशिबी राजयोग...

मध्यंतरी राजकीय झाकोळ निर्माण झालेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकीय ग्रह सध्या भलतेच बलवत्तर असल्याचे दिसत आहे. त्यांच्याच नव्हे तर सहकाऱ्यांच्या नशीबी राजयोग लिहिला जात आहे. ...अधिक वाचा
18:07 (IST) 18 Mar 2026

"आई आणि मुलांची काळजी घे" असं हातावर लिहून क्रेन ऑपरेटरनं केली आत्महत्या; नातेवाईकांना हत्येचा संशय, तक्रार दाखल!

मोताळा तालुक्यातील गोसिंग गावात ही धक्कादायक घटना घडली असून, सलमान खान पठाण या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...सविस्तर बातमी
18:00 (IST) 18 Mar 2026

ठाण्यात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट...प्रशासन डाॅक्टरांचा शोध घेऊन करणार गुन्हे दाखल

ठाणे शहरात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट झाल्याची बाब बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आली. ...सविस्तर वाचा
17:40 (IST) 18 Mar 2026

नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक निलंबित… प्रशासकीय कामावर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवत…

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आकस्मिक पाहणीत समोर आलेल्या अस्वच्छता आणि अन्न व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आरोग्य विभागाने ही मोठी कारवाई केली ...वाचा सविस्तर
17:38 (IST) 18 Mar 2026

महाराष्ट्रासाठी बुलेट ट्रेनची घोषणा; नव्या मार्गाचा समावेश…

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या हायस्पीड कॉरिडॉरला प्राधान्य देण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर

Shahajiraje Bhonsale Jayanti

शहाजीराजे भोसले यांची जयंती (फोटो - X/ Sharad Pawar)