Today’s Maharashtra News Updates, 15 October 2026: पुणे शहरात आजपासून (गुरुवार, दि. १५) आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे पुणेकरांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दुसरीकडे, नाशिक महापालिकेनेही शहरासाठी आणि कुंभमेळ्यासाठी मिळून सुमारे ८ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. १५ ऑक्टोबरनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या संर्दभातील बैठक होणार आहे.
साताऱ्यातील विजयादशमी सोहळा साधेपणाने
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचे भान राखत जलमंदिर पॅलेस येथील शाही सोहळ्यातील झगमगाट टाळण्याचा महत्त्वाचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.
सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांना शिवसेना शिंदे गटाचं पद
सोशल मीडियावर आपल्या “कैसा हराया…” भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या मुंब्र्यातील AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. प्रत्यक्षात दिवाळीपूर्वी अवघ्या पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने उद्या पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या बातम्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे थेट अपडेट्स आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत…
Today’s Live News Updates from Maharashtra , 15 October 2026 | मराठी न्यूज लाईव्ह अपडेट
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात ११४ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती; दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न!
म्हाडाच्या घरांच्या आमिषाने १६ जणांची चार कोटींची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा
'एसआयआर' अंतर्गत कोल्हापुरात ९९.९४ टक्के काम पूर्ण
व्यसनमुक्त भारत अभियानासाठी राज्याचा ३ कोटी ६९ लाखांचा कृती आराखडा मंजूर
मोसमी पावसाची देशातून माघार; दक्षिणेत ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय
मध्य रेल्वेच्या तिजोरीत गेल्या सहा महिन्यांत भाड्याव्यतिरीक्त ७३ कोटींचा महसूल; ई-लिलावातून ३९ कंत्राटे
विरोधकांचा श्रेयवादी अहंकार 'गोकुळ'चे सभासदच मोडीत काढतील; विनय कोरे यांचे सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र
नवी मुंबई विमानतळावर खाद्यपदार्थ पुरवठा, माल साठवणूक सुविधांचा अभाव; एमिरेट्सचा दावा
भारत सोडण्याबाबत मिळालेल्या नोटिशीविरोधात अभिनेता इमरान खान मुंबई उच्च न्यायालयात जाणार
एअर इंडियाच्या आर्थिक वर्षातील २२,२३८.२३ कोटींच्या तोट्यानंतर शिस्त, काटकसरीवर भर; सुधारणांसाठी विशेष समिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जांभूळ येथील जमिनीवर स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश
अवघ्या १७ महिन्यांच्या आयरिशचा जागतिक विक्रमाला स्पर्श! पाठीवर तरंगत १०० मीटर अंतर पार
अभिजीत दिपके, नेहा बोरा यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ; मोदी-शाहांनी एका माणसासाठी जनतेविरोधात युद्ध पुकारल्याची दिपकेंची टीका
नवी मुंबई आणि रायगड साठी महत्त्वाच्या पाच धरणांची कामे का रखडली?
‘शक्तीपीठ’साठी पोलिसांचा गैरवापर; जबरदस्तीची मोजणी थांबवा, अन्यथा शेतात उतरू; सोलापुरात ‘महाविकास आघाडीचे’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिमेंटचा बाक अंगावर पडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; वनराई पोलीस वसाहतीतील घटना
शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट सोडा, दुष्काळाकडे लक्ष द्या; जयंत पाटील यांची सरकारवर टीका
कर्नाटकात किती दुष्काळ आहे आम्हाला माहित नाही पण महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे शेतकरी संकटात आहेत. पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना काही मदत होणार नाही. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला जर पैसे नसतील तर शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे आले कुठून? शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट सरकारने सोडला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
कल्याणमध्ये मेट्रोची सळई पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
खासगी पाणी शुद्धीकरण केंद्रांची आता टँकर बांधणीपर्यंत मजल; पाणीबाजारात तेजी; हजारो पाणी विक्रेत्यांच्या भरवशावर पुरवठ्याची यंत्रणा
नालासोपारा लैंगिक अत्याचार प्रकरण: आरिफ शेख विरोधात तीन मुलींच्या तक्रारी
वाकोल्यातील रस्ता रुंदीकरणासाठी मोकळी जागा संपादित करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू; ३७० बांधकामांचा अडथळा
उल्हासनगरात बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित मालमत्ता प्रकरणांच्या चौकशीचे आदेश
महारेराच्या वसुली आदेशांच्या अंमलबजावणीनंतर दहा महिन्यांत विकासकांकडून ३७० कोटी रुपये वसूल
‘कैसे हराया’ फेम सहर शेखच्या वडिलांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा; वडिलांनीच केला खुलासा !
बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना वन्यजीव छायाचित्रणाचा ‘ऑस्कर’
पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अग्रीम मदतीवरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, मी वारंवार सांगतो की, भाजपा शेतकरीविरोधी आहे. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पुरावे देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वस्तुस्थिती समजू लागली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. काल सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच हजार रुपयांत नेमकं काय होणार, हे सांगता येत नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांना शिवसेना शिंदे गटाचं पद
सोशल मीडियावर आपल्या “कैसा हराया…” भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या मुंब्र्यातील AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Kalyan Latur Highway: कल्याण-लातूर महामार्गात मुरबाडच्या २२ गावांमधाील २७२ शेतकऱ्यांची जमीन बाधित
सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. प्रत्यक्षात दिवाळीपूर्वी अवघ्या पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
Video: "नानांना श्रद्धांजली वाहण्याइतकी ताकद माझ्यात नाही", नाना पाटेकरांच्या शोकसभेत तुकाराम मुंढे भावूक

मराठी न्यूज लाईव्ह अपडेट| महाराष्ट्र दुष्काळ अपडेट (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
