Marathi News Updates : चेंबूरमध्ये बुधवारी मध्यरात्री एका व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून एकीकडे सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांकडील अर्थखात्याकडून कधीकधी निधी येत नसल्याचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत अजित पवारांबाबत नाराजी असल्याचं समोर येऊ लागलं आहे. यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे.
Mumbai-Maharashtra News Live Today, 10 April 2025 : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Chhanagn Bhujbal on Mahatma Phule Memorial: मी फक्त एक आमदार, उपोषण करायला मोकळा - छगन भुजबळ
इथे अनेक लोक आहेत जे स्वत: महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी जागा द्यायला तयार आहेत. पण अधिकारी त्यांना सांगतात की किती पैसे द्यायचे ते आम्हाला माहिती नाही, प्रक्रिया पूर्ण झाली नाही वगैरे. फक्त टोलवाटोलवी चालू आहे. मी काही उपोषण वगैरे करत बसत नाही. पण आता असं वाटतं की ठीक आहे, शेवटचा उपाय म्हणून बसू उपोषण करायला. मी सरकारमधल्या एका पक्षाचा एक आमदार आहे. म्हणूनच मी सांगतोय की आता इथे उपोषण करायला मी मोकळा आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते - छगन भुजबळ, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
सांगलीत ८ पासून ’सामाजिक समता सप्ताह’ लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ’सामाजिक समता सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. सामाजिक न्याय भवन, सांगली येथे या सप्ताहाचे उदघाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा प्रतिभा इंगळे, सदस्य नागनाथ चौगुले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहायक संचालक धनश्री भांबुरे, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी चे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विश्वकर्मा योजनेच्या जाचकअटी दूर करण्याची मागणी
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेत जाचक अटी असल्याने लाभार्थींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्या दूर करून लाभार्थींनी मदतीची भूमिका घ्यावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे बुधवारी सादर केले.
केंद्र सरकारने हाताने, अवजाराने काम करणाऱ्या कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी नोंदणी सुरू केली असली तरी अनेक स्वरूपाच्या तांत्रिक अडचणी येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ही निविदा आपोआप रद्द होत आहे.
प्रशिक्षण होऊन सुद्धा अनुदान मिळत नाही. अशा विविध अडचणी मांडणारे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉ. आनंद गुरव, सुशीला पाटील, अर्जुन सुतार, नंदकुमार कीर्तीकर, महेश यादव यांच्यासह लाभार्थींनी सादर केले. जिल्हाधिकारी येडगे यांनी त्रुटींचा आढावा घेऊन दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
कोल्हापुरात विश्वशांतीसाठी नवकार महामंत्र उपक्रमाला जैन समाजाचा मोठा प्रतिसाद
कोल्हापूर : विश्वशांती नवकार महामंत्राचा जप बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आला. हा उपक्रम विश्वविक्रमामध्ये नोंदला जाणार असल्याचा दावा संयोजकांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कार्यक्रमास उपस्थित राहून या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ) या संस्थेच्या वतीने जगभरात १०८ देशांमध्ये सहा हजाराहून अधिक ठिकाणी विश्वशांतीसाठी नवकार महामंत्र जपाचे आयोजन केले होते.
कोल्हापुरात दहा हजाराहून अधिक जैन बांधवांनी हजेरी लावली. उद्योजक संजय घोडावत, अनिल पाटील आदींची उपस्थिती होती. इचलकरंजीत ५ हजारावर जैन बांधवांसह माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, पदमचंद जैन यांची उपस्थिती होती. मनीष मुनोत यांनी सूत्रसंचालन केले.
देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या वारसदाराबाबत मांडली भूमिका (फोटो - पीटीआय संग्रहीत)
Mumbai-Maharashtra News Live Today, 10 April 2025 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा...