Mumbai Maharashtra Breaking News Today : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेते आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आजपासून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे देखील त्यांच्याबरोबर असतील. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून पवारांच्या या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावरही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विष्णू चाटेच्या अर्जावरही आज निकाल येऊ शकतो. यावरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Today 19 May 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.

20:16 (IST) 19 May 2025

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता ३ जूनला सुनावणी; विष्णू चाटेचा अर्ज मागे, तर वाल्मीकचा कायम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी १९ मे रोजी पार पडली. ...वाचा सविस्तर
19:21 (IST) 19 May 2025

प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहायकांचे आंदोलन, खरिपाच्या तयारीत अडचणी वाढण्याची चिन्हे

कृषिमंत्री माणिक कोकाटे ज्या दिवशी शहरात खरीपपूर्व हंगामाच्या तयारीचा आढावा घेणार होते, तोच दिवस कृषी सहायकांनी आंदोलनासाठी निवडला. ...वाचा सविस्तर
19:00 (IST) 19 May 2025

काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली

भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्यावतीने तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
18:23 (IST) 19 May 2025

ऑनलाईनमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता - दादा भुसे यांचा दावा

पारदर्शकतेसाठी हे महत्वाचे पाऊल आहे, अशी भूमिका शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडली. ...सविस्तर बातमी
18:16 (IST) 19 May 2025

मधमाशी संवर्धनासाठी डहाणू, तलासरी मध्ये पोषक वातावरण, मधुक्रांतीतून शेती उत्पादन वाढवणे शक्य

देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली तशी जिल्ह्यात मधुक्रांती घडवण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे. ...सविस्तर बातमी
17:21 (IST) 19 May 2025

सरकारी अधिकारी असल्याचे भासवून एकाची फसवणूक; अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी

याप्रकरणी सोमवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...सविस्तर वाचा
17:13 (IST) 19 May 2025

कल्याणच्या एस. टी. बस आगारात बसमध्ये चढताना प्रवाशाला लुटले

धाराशिव जिल्ह्यात वाशीम तालुक्यात राहणारे औषध विक्रेते राहुल गायकवाड (३०) हे काही कामानिमित्त कल्याणमध्ये आले होते. ...सविस्तर बातमी
17:02 (IST) 19 May 2025

ठाण्यात बुधवारी पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत. ...सविस्तर वाचा
15:44 (IST) 19 May 2025

विधान भवनाच्या प्रदेशद्वाराजवळ शॉर्ट सर्किटमुळे आगीची दुर्घटना

महाराष्ट्र विधान भवनाच्या प्रदेशद्वारावर आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग विझवण्यात आली असून कोणतीही मोठी हानी झालेली नाही. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसेच या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

https://twitter.com/ANI/status/1924407028786585888

15:26 (IST) 19 May 2025

"हा आपल्या जवानांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार", राहुल गांधींच्या 'त्या' प्रश्नावर एकनाथ शिंदेंची टीका

राहुल गांधी यांचा प्रश्न आपल्या जवानांवर अविश्वास दाखवणारा आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेण्याआधी सरकारने पाकिस्तानला अलर्ट का केलं? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, असा प्रश्न विचारणं म्हणजे आपल्या जवानांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हा आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबातचा मुद्दा आहे. देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करून आपल्या देशावर व आपल्या जवानांवर प्रश्न उपस्थित करणं दुर्दैवी व निंदाजनक आहे.

15:01 (IST) 19 May 2025

तिरंगा रॅलीच्या अनुषंगाने राजकीय शक्ती प्रदर्शन,शिंदे व भाजप गटाच्या वेगवेगळ्या रॅली

दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली आणि ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याचा गौरव करण्यासाठी पालघरमध्ये भाजप व शिंदे गटाकडून स्वतंत्र तिरंगा रॅली काढण्यात आली. यामधून राजकीय शक्ती प्रदर्शनाचे चित्र दिसून आले. ...सविस्तर वाचा
14:40 (IST) 19 May 2025

जाता जात नाही त्याला जात म्हणतात... , सरन्यायाधिशांच्या स्वागतास पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांच्या गैरहजेरीवरून आव्हाड यांची प्रशासनावर टीका

देशाचे सरन्यायाधीश प्रथमच आपल्या मूळ राज्यात येत असताना त्यांच्या स्वागताला राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त यापैकी कुणीही हजर नसल्याबद्दल न्यायमूर्ती गवई यांनी नाराजी व्यक्त केली. ...वाचा सविस्तर
14:40 (IST) 19 May 2025

बदलापूर कर्जत मार्ग ठरतोय कोंडीचा; रस्ते खोदलेले, बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर

गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ शहरांत मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली. परिणामी रस्त्यावर त्याचा भार दिसून येतो. या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक नियंत्रण ही मोठी समस्या उद्भवू लागली आहे. ...वाचा सविस्तर
14:39 (IST) 19 May 2025

कार्यालयीन सुधारणांत कुळगाव बदलापूर पालिका प्रथम, कोकण विभागीय तालुका कार्यालयांमध्ये अव्वल, मुरबाड पोलिस निरिक्षकही पहिले

गेल्या काही दिवसात केलेल्या कार्यालयीन सुधारणा, पारदर्शकता, नागरिकस्नेही कार्यालयीन बदलांमुळे पालिकेचा प्रथम क्रमांक आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
11:37 (IST) 19 May 2025

जळगाव बाह्यवळण महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव शहरातील वाढत्या अपघातांमुळे सुरु करण्यात आलेल्या बाह्यवळण महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कामाची पाहणी केली. ...सविस्तर बातमी
11:05 (IST) 19 May 2025

महापालिकेची निवडणूक आली... चला चला भूमिपूजनांची वेळ झाली, मनसेचे नेते राजू पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

मनसेचे नेते राजू पाटील यांंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाज माध्यमातून (एक्स) केली आहे. ...सविस्तर बातमी
10:53 (IST) 19 May 2025

'या' समाजाचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल, "सरकार तर आले, आमचे काय?" फुंकला बिगुल…

विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आले की तुमच्या मागण्या मार्गी लावणार, अशी हमी दिली होती. ...सविस्तर बातमी
10:38 (IST) 19 May 2025
सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल

रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी रविवारी (१८ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं. खांद्यावर रुमाल ठेवून सर्वांसमोर हात जोडून त्यांनी उपस्थितांना नमस्कार केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

"वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी स्नेहल जगताप यांच्याशी चर्चा केली होती. तुम्ही स्नेहल यांना काय विचारलं आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं ते मला माहिती आहे. मी फार बोलत नाही. मी अधिक वेळ घेत नाही. तुम्ही सगळे जण आलात..." असं म्हणत तटकरे यांनी खांद्यावर रुमाल ठेवला, हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यानंतर तटकरे सर्वांचे आभार मानून मंचावरून खाली उतरले.