Maharashtra Breaking News : काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह आज (४ डिसेंबर) मुंबईत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दिग्विजय सिंह हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा संदेश घेऊन मुंबईत आल्याची सध्या चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीला आज सर्व पालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने मिनी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम बदलण्याचे संकेत देण्यात आले आहे.

दरम्यान, मुंढव्यातील (पुणे) जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी करण्यात आल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या बाहरीन येथील लग्नानंतर ते पुन्हा एकदा चौकशीसाठी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोजी आज नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील खासदारांना भेटणार आहे. लोकसभेतील नऊ व राज्यसभेतील सात मराठी खासदारांना ते मार्गदर्शन करणार आहेत. यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Pune Nagpur Breaking News Live : राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

18:49 (IST) 4 Dec 2025

महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता ‘महाराष्ट्र लोकभवन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

"केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. ‘लोकभवन’ हे केवळ राज्यपाल यांचे निवासस्थान व कार्यालय नसून राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटना यांच्यासह संवाद आणि सहभाग साधणारे एक केंद्र आहे," अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर केली आहे.

18:48 (IST) 4 Dec 2025

दिव्यात शाळेतील वाद हत्येपर्यंत, आठ जणांकडून एकाची हत्या, चार अल्पवयीन मुलांचा सहभाग

दिवा या शहरात नागरिकरण वाढत असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांनी एका २० वर्षांच्या मुलाची हत्या केली. ...वाचा सविस्तर
18:21 (IST) 4 Dec 2025

लोकसभेत ‘या’ विषयाला जागा नाही? खासदार संजय दिना पाटील यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील आरोग्याच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांना बोलविण्यात आले होते. यावेळी संजय दिना पाटील यांनी मतदारसंघातील आरोग्यांच्या समस्यांबाबत सरकारवर जोरदार टीका केली. ...वाचा सविस्तर
17:31 (IST) 4 Dec 2025

मुंब्र्यात तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या सुधीर भगत यांचे मतदार यादीतून नाव गायब, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संताप

मुंब्रा शहरातून सुधीर भगत हे तीनवेळा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्येही मतदान केले होते. ...सविस्तर बातमी
17:30 (IST) 4 Dec 2025

हद्दच झाली; सिगारेट न दिल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण व गल्ल्याची चोरी

निगडी येथे सिगारेट न दिल्याच्या रागातून तरुणाने ७५ वर्षीय दुकानदारासह एका महिलेला मारहाण करून गल्ल्यातील ३,७६० रुपये चोरले. ...अधिक वाचा
17:14 (IST) 4 Dec 2025

डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभुमीचे अत्याधुनिक पध्दतीने सुशोभिकरण; वर्षभरात काम पूर्ण करण्याचे पालिकेचे आदेश

स्मशानभूमी पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी पाच कोटी ७४ लाख रूपये खर्च करून अत्याधुनिक पध्दतीची स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
16:53 (IST) 4 Dec 2025

"सरकारने कधी वृक्षपुनर्रोपणाचा हिशेब दिला नाही अन् अता तपोवनातील झाडं तोडतायत", सयाजी शिंदेंचा संताप

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, "कुंभ मेळे व्हावेत किंवा होऊ नयेत हा काही माझा प्रश्न नाही. कुंभ मेळे व्हावेत, जत्रा व्हाव्यात, सण साजरे करावेत, आमचा त्याला काही विरोध नाही. त्यामुळे तुम्ही आम्हा आंदोलकांबाबत बोलताना विचार करा. झाडं वाचावीत एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही. वृक्षपुनर्रोपनाच्या नावाखाली विनाकारण खर्च करू नका, लोकांची दिशाभूल करू नका. वृक्षपुनर्रोपनाचा हिशेब आजवर कधी मिळाला नाही. ३३ कोटी झाडांचा हिशेब सरकारने कधी दिला नाही. रस्त्यांलगतची झाडं तोडली. त्याबदल्यात दुसरी झाडं लावू असं सांगितलं होतं, ती झाडं लावली का? कुठे लावली? याबाबत काही सांगितलं नाही. आजवर झालं ते झालं. मात्र आता नवी झाडं तोडू नका. झाडं तुटता कामा नयेत. नवी झाडं लावली तर ती टिकली पाहिजेत."

16:51 (IST) 4 Dec 2025

"तुमच्या आई-बापावर हल्ला केला तर गप्प बसाल का?" तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी सयाजी शिंदेंचं नागरिकांना एकजुटीचं आवाहन

Sayaji Shinde on Trees in Tapovan : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, "तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी राज्यातील लेखक, कवी, साहित्यिक व सामान्य जनता भूमिका घेत आहे. मला सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी जागरुक राहावं, कुठे झाड तोडलं जात असेल तर त्याचा विरोध करावा." ...सविस्तर वाचा
16:45 (IST) 4 Dec 2025

राज्यातील महाविद्यालयंनी ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उभारावेत; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मंत्रालयातून ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ...सविस्तर बातमी
15:50 (IST) 4 Dec 2025

सालेकसा नगरपंचायतची ईव्हीएमचे सील तोडल्या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली…

जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी सालेकसा  नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांची बदली केली आहे. ...सविस्तर वाचा
15:36 (IST) 4 Dec 2025

जमीन विक्रेत्यांवर कारवाई; खरेदीदार सुटले कसे? मुख्यमंत्री बारामतीकरांच्या पाठीशी - विजय वडेट्टीवार

पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक होते पण पार्थ पवारवर कारवाई का होत नाही? मुख्यमंत्र्यांचा बारामती करांच्या पाठीशी किती मोठा आशीर्वाद आहे हे स्पष्ट होते अशी टीका नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 4 Dec 2025

महायुती सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मुंबईकरांची पसंती; ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेस मोठा प्रतिसाद

मुंबईकरांनी भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि गृहनिर्माण अशा महायुती सरकारच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले आहे. ...अधिक वाचा
14:56 (IST) 4 Dec 2025

शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात दाखल

- पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात काल शीतल तेजवानीला अटक करण्यात आली होती

- पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी आरोपी असून पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

- काही वेळापूर्वी त्यांना पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात आले आहे.

- आता त्यांना न्यायालयात नेलं जाणार आहे.

14:50 (IST) 4 Dec 2025

शीतल तेजवानीला न्यायालयासमोर हजर करणार

मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला थोड्याच वेळात न्यायालयासमोर हजर करणार.

14:08 (IST) 4 Dec 2025

Jalgaon Crime : जळगाव हादरले… मोबाईलवर व्हिडीओ टाकल्याच्या कारणावरून मारहाण झालेल्या तरूणाचा मृत्यू !

जळगाव शहरातील तरूणाला यावल तालुक्यात बेदम मारहाण करण्यात आली होती. उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानंतर मोबाईलवर व्हिडीओ टाकल्याच्या कारणावरूनच त्याला जीवे ठार मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
14:04 (IST) 4 Dec 2025

निवडणूक आयोगाला हाताशी धरून…शिवसेनेचा भाजपावर आरोप

अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेने लावलेल्या एका फलकाची सध्या शहरात चर्चा रंगली आहे. यात अप्रत्यक्ष भाजपावर टीकास्त्र सोडले असून २१ डिसेंबरला विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळतील, असेही त्यावर नमूद केले आहे. ...सविस्तर वाचा
13:50 (IST) 4 Dec 2025

EVM घोटाळा करण्यासाठीच मतमोजणी लांबवली : विजय वडेट्टीवार

सत्ताधारी महायुती सरकारने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम घोटाळा करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी लांबवल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले, सरकारची अधिवेशनाला सामोरे जाण्याची इच्छा दिसत नाही. सरकार घाबरलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. जमीन बळकावण्याचे प्रकार घडत आहेत, जमिनीचे मोठमोठे घोटाळे बाहेर येत आहेत, राज्यात गुंडांची दादागिरी वाढली. सत्ताधारी पक्षांचे आमदार लोकांना कापण्याची, मारण्याची, उडवून देण्याची भाषा करत आहेत. त्यावरून जनता संतापली आहे. त्यामुळे सरकारला आता जनतेची भीती वाटते.

13:16 (IST) 4 Dec 2025

Video : पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ, प्रवासी संतप्त

इंडिगो कंपनीच्या विमान सेवेत तांत्रिक बिघाड झाला असल्याने पुणे आंतरराष्ट्रीय विमान सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. ...सविस्तर वाचा
12:39 (IST) 4 Dec 2025

डोंबिवलीतील साप दंश प्रकरणात प्रशासकीय निष्काळजीपणाचा डाॅ. योगेश चौधरी यांच्यावर ठपका

डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथील दोन महिलांचा साप चावून मृत्यू झाल्याच्या घटनेची कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेत दोषी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांवर बुधवारी प्रशासनाने कारवाई केली. ...सविस्तर बातमी
12:34 (IST) 4 Dec 2025

मोठी बातमी! डिजीटल ७/12 ला कायदेशीर मान्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्याच्या महसूल विभागाने एक मोठं पाऊल उचललं आहे. जमिनीच्या ७/१२ बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक जमिनींच्या व्यवहारांसंबंधीची रखडलेली प्रकरणं एका क्षणात मार्गी लावण्याची तरतूद केली आहे. डिजिटल सातबाऱ्याला आता कायद्याचे संरक्षण दिले आहे. Digital 7/12 विषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयीचे शासन परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. याचा राज्यातील कोट्यवधी जनतेला मोठा फायदा होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

12:22 (IST) 4 Dec 2025

Serendipity Arts Festival : 'सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल २०२५' … गोव्यातील फेस्टिव्हलची महाराष्ट्राला उत्सुकता का?

दक्षिण आशियातील कला आणि संस्कृतीला आकार देणारा 'सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल २०२५' यंदा १२ ते २१ डिसेंबर या कालावधीत गोव्यात होणार असून, महाराष्ट्रातील कलाकारांच्या योगदानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ...अधिक वाचा
12:05 (IST) 4 Dec 2025

वाढीव नफ्याचे आमिष दाखवून डोंबिवली पलावामधील ११ जणांची ४१ लाखाची फसवणूक

डोंबिवली पलावा परिसरातील ११ नागरिकांची ऑनलाईन गुंतवणूक योजनेत वाढीव नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ४१.१२ लाखांची फसवणूक झाली आहे. ...सविस्तर बातमी
11:34 (IST) 4 Dec 2025

उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीवर वसाहतवादाची छाप; निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांचा आरेखनावर आक्षेप...

Justice Temple Not A Star Hotel : मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नव्या इमारतीच्या आरेखनावर निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी आक्षेप नोंदवून, या वास्तूत वसाहतवादाची छाप असल्याचे मत नोंदवले. ...सविस्तर बातमी
11:33 (IST) 4 Dec 2025

राज्यातील अखिल भारतीय वकील परीक्षेत अनियमितता; न्यायालयीन हस्तक्षेपाच्या मागणीसाठी विधि पदवीधर उच्च न्यायालयात...

राज्यात पार पडलेल्या अखिल भारतीय वकील परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करून मुंबई शहर वकील गटातील विधि पदवीधर आणि तरुण वकिलांच्या एका गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...सविस्तर वाचा
10:23 (IST) 4 Dec 2025

पोलिसांनी आता दिग्विजय पाटील व पार्थ पवारांकडे मोर्चा वळवावा : विजय कुंभार

शीतल तेजवानीला अटक केली असली तरी या प्रकरणात संशयाला वाव आहे, असं वक्तव्य माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय कार्यकर्ते) विजय कुंभार यांनी केलं आहे. कुंभार यांनीच मुंढव्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढलं होतं. ते म्हणाले, "पुढच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन होत असून या अधिवेशनात मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारावरून गोंधळ होऊ नये म्हणून ही अटक केल्याची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तेजवानी यांना अटक झाल्याबद्दल खूश व्हायचं काही कारण नाही.मुळात या अटकेला टाळाटाळ का केली जात होती असा प्रश्न उपस्थित करायला हवा. तसेच आता दिग्विजय पाटील व पार्थ पवारांनाही अटक करायला हवी", असंही त्यांनी सुचवलं आहे."