Latest Marathi News Highlights Updates : नागपूर हिंसाचार प्रकरणी अद्यापही चर्चा सुरू असून दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. तसंच, या हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालवण्यात येणार आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. तर, दुसरीकडे कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्याचीही जोरदार चर्चा असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.

Live Updates

Maharashtra News Highlights Today, 24 March 2025 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

21:30 (IST) 24 Mar 2025

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पर्यटन पोलीस उपक्रम

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ऐतिहासिक मालवण भूमी आहे. किल्ले सिंधुदुर्ग हा ऐतिहासिक ठेवा आहे. तसेच याठिकाणी सागरी पर्यटनासाठी व मालवणी जेवणाचा आस्वाद लुटण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागात पर्यटकांची संख्या आता वाढत आहे. पर्यटकांना सुरक्षित वातावरण असावे यां दृष्टीने पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर आहे. सोबतच पर्यटन पोलीस उपक्रम अंतर्गत पोलीस बाईक पर्यटन सेवेत महत्वपूर्ण ठरतील. २४ तास ही वाहने सेवेत असतील. असे प्रतिपादन कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांनी मालवण येथे बोलताना केले

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत १८ दुचाकी वाहनांचा प्रदान सोहळा कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांच्या हस्ते मालवण बंदर जेटी येथे संपन्न झाला.यावेळी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सचिन हुंदळेकर, प्रदीप चव्हाण, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.प्रारंभी प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले

19:45 (IST) 24 Mar 2025

संशोधन : संगमनेरच्या अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांनी बनवली ई बाईक

नवी दिल्ली येथील नोएडा विद्यापीठात होणाऱ्या आयएसआय इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने नवकल्पना व उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित प्रदर्शनामध्ये या बाईकचा समावेश करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

19:38 (IST) 24 Mar 2025

परभणी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला दहा हजाराची लाच घेताना अटक

परभणी पंचायत समितीचा शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ताब्यात घेतले. पंधराव्या आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल व नालीचे बांधकाम तक्रारकर्त्याने केले होते. या बांधकामाची मोजमाप पुस्तिका लिहिण्यासाठी हिलाच संबंधित आणि स्वीकारली.

याबाबत अधिक माहिती अशी की ४ मार्च रोजी शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास या कामासाठी तक्रारदार भेटले. मात्र मोजमाप पुस्तिका लिहिण्याकरीता १० हजार रुपये द्यावे लागतील, असे तोडे यांनी सांगितले. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी लगेचच लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली. या खात्याच्या पथकाने १८ मार्च रोजी लाच मागणीची पंचा समक्ष पडताळणी केली. त्यावेळी अण्णासाहेब किशनराव तोडे याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविल्याचे निदर्शनास आले.

या खात्याच्या पथकाने सोमवारी (दि. २४) सापळा रचला, तेव्हा शाखा अभियंता तोडे यास तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले . या खात्याच्या पथकाने तोडे यांची अंगझडती घेतली, त्यात रोख रक्कम १ हजार ३३० रुपये व मोबाईल सापडला. पथकाने तातडीने तोडे यांच्या यशोधन नगरातील निवासस्थानी घरझडती घेतली, त्यात रोख ५८ हजार रुपये आणि ८० ग्राम सोन्याचे दागिने आढळून आले. दरम्यान, पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर (नांदेड) यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

19:37 (IST) 24 Mar 2025

कल्याण पूर्वेतील फेरीवाल्यांवर कारवाई, फेरीवाल्यांचे दोन ट्रक सामान जप्त

कल्याण पूर्वेतील जे, ड आणि आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कल्याण पूर्वेत शुक्रवारी फेरीवाला हटाव मोहीम राबवून फेरीवाल्यांचे दोन ट्रक सामान जप्त केले.

सविस्तर बातमी...

19:32 (IST) 24 Mar 2025
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालिकेचा मृत्यू - चौकशीसाठी समिती स्थापन

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात नवजात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा यास जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी नवजात बालिकेचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील जांबुटके परिसरात राहणाऱ्या गर्भवती महिलेची प्रसूती वेळ जवळ आल्याने तिला जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, बाळाचे वजन जास्त असल्याने नैसर्गिक प्रसूती अडचणीची ठरू शकेल, यासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. रविवारी महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. दुपारपासून तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. परंतु, संबंधित कक्षातील डॉक्टर, परिचारीका यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पालकांकडून शस्त्रक्रिया अशी विनवणी करण्यात आली होती. सायंकाळी उशीरा डॉक्टरांनी गर्भवतीबरोबर असलेल्या महिलांना कक्षातून बाहेर काढून प्रसूती केली. महिलेला मुलगी झाली. परंतु, बाळाचा काही वेळातच मृत्यू झाला. मृत्युला डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संबंधितांवर योग्य कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा नातेवाईकांनी दिला.

दरम्यान, जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडे याविषयी विचारणा केली असता हा प्रकार आरोग्य विद्यापीठाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून झाल्याचे कारण देण्यात आले. रुग्णालयातील आरोग्य विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयाच्या डाॅ. मृणाल पाटील यांनी, जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या सुचनेनुसार समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले.

19:22 (IST) 24 Mar 2025

चंद्रपूर पोलिसांची ‘टीप’ अन् कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कोरटकर गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

सविस्तर वाचा...

19:14 (IST) 24 Mar 2025

“आईकडून आम्हाला नेकीची शिकवण”, डॉ. बाबा आढाव यांच्याकडून मातृस्मृतींना उजाळा

बबुताई आढाव यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांनी आईच्या आठवणी जागविल्या.

सविस्तर वाचा...

19:08 (IST) 24 Mar 2025

विधानसभेत कौल दिलाय आता पालिका निवडणुकत द्या, आमदार जितेंद्र आव्हाड यांची कळवा-मुंब्रावासियांना साद

ठाणे : राज्यात काय झाले, हे मला माहित नाही पण, कळवा- मुंब्रा भागातील जनतेने आम्हाला प्रचंड कौल दिला आणि आम्ही लाखांच्या मताधिक्याने निवडुन आलो. आता महापालिकेच्या निवडणुका येतील. तेव्हाही आम्हाला कौल द्या, अशी साद राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी कळव्यातील शिमगोत्सवात बोलताना केला.

सविस्तर वाचा...

19:05 (IST) 24 Mar 2025

नारायणगाव : विघ्नहर कारखान्याच्या चेअरमनपदी सत्यशिल शेरकर यांची बिनविरोध निवड

श्री विघ्नहर कारखान्याच्या चेअरमनपदाकरीता सत्यशिल सोपानशेठ शेरकर यांचा एकमेव अर्ज दाखल होता.

सविस्तर वाचा...

18:49 (IST) 24 Mar 2025

‘एआय’च्या मदतीने क्षयरोगाचे निदान, गडचिरोलीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

माँ दंतेश्वरी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसांशी संबंधित काही आजारांचे निदान करण्यासाठी ‘एआय’चा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 24 Mar 2025

“कुणाल कामराच्या गाण्यामुळे आम्ही सुखावलो”, माजी खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका

इम्तियाज जलील यांनी नागपूरच्या दंगलीतील आरोपी फहीमखानच्या घरावर बुलडोजर चालवल्याच्या घटनेवरूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

सविस्तर वाचा...

18:31 (IST) 24 Mar 2025

दलित साहित्याचे मंदावलेपण सामूहिक प्रयत्नाने भेदावे लागेल – प्रा. भगत

बीजभाषक करताना डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या बळावर हे साहित्य विश्वजाणिवेचे साहित्य ठरले आहे.

सविस्तर वाचा...

18:21 (IST) 24 Mar 2025

चिपळूणच्या दिशेने येणारा खैर सोलीव लाकूड वाहतुकीचा ट्रक वन विभागाने पकडला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील वनउपज नाका येथे वन विभागाच्या अधिका-यांनी कारवाई करत चिपळूणच्या दिशेने जाणारा खैर सोलीव लाकूड वाहतुकीचा ट्रक पकडला. या ट्रक मध्ये खैर लाकडांसह ६ लाख रुपये किमतीचा ट्रक असा ६ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या पथकाने याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे खैर तस्करीचे चिपळूण कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने खैर सोलीय लाकडांची बेकायदेशीरपणे वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच रोहा उप वनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव, सहाय्यक वनसंरक्षक रोहित चौबे, वनक्षेत्रपाल विकास भामरे, महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनउपज तपासणी नाका येथे पोलादपूर वनविभागाच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू होती. या तपासणीमध्ये ट्रक (एमएच ०४ जेके ६७९७) मधून ६ हजार ८०५ घनमीटरचे ३५४ खैर सोलीव तुकडे बिनपासी मुद्देमाल वन विभाग पथकाच्या हाती लागला आहे. बेकादेशीररित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक गुफरान ईरफान अहमद (ऐनी हातीनसी उत्तर प्रदेश) याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. चालकाकडे विचारणा केल्यानंतर खैर लाकूड चिपळूण येथे घेऊन जाणार असल्याची कबुली त्याने पथकाला दिली आहे.

18:20 (IST) 24 Mar 2025

ओडीसा मधून येणारा ९ किलो ७८ ग्रॅम गांजा पकडला, रत्नागिरी स्थानिक पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरीत गांजा घेऊन येणाऱ्या तरुणाला सापळा रचून पकडले. ही कारवाई सांगली फाट्यावर करण्यात आली. या कारवाईत संशयिताकडून ९ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजित जाधव (वय ३४) रा. विकासनगर, इचलकरंजी असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून हा संशयित बसमधून प्रवास करीत होता. मात्र, पोलिसांनी बस अडवून गांजासह त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. संशयित हा लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याने बेरोजगार होता. सत्यजित जाधव गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो गांजा घेऊन रत्नागिरीकडे निघाल्याची माहिती पोलीस अंमलदार सागर चौगले यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक सांगली फाट्याजवळ तैनात करण्यात आले होते. रत्नागिरीला गांजा पोहोचविण्यासाठी जाधवने बसचा मार्ग निवडला होता. यासाठी इचलकरंजीतून एका बसमध्ये तो बसला. तो सांगली फाट्यावरून पुढे जाणार असतानाच पथकाने याच ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. दरम्यान, जाधव याने हा गांजा कोठून आणला, याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता, त्याने ओडिशातून गांजा आणल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्याकडे बसची तिकिटेही आढळून आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

18:19 (IST) 24 Mar 2025

कुणाल कामरा याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

अहिल्यानगरःउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कविता तयार केल्याने गायक कुणाल कामरा याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट येथे कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचे आंदोलन केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्‍यांना जसाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी पक्षाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिला.

कुणाल कामरा याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, पदाधिकारी संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, काका शेळके, संदिप दातरंगे, प्रविण भोसले, अण्णा घोलप, अरुण झेंडे, अभिजित अष्टेकर, रमेश खेडकर, सलोनी शिंदे, सुनिता बहुले, सागर थोरात, अभि दहिहंडे, पोपट पाथरे, अक्षय भिंगारे, दामोदर भालसिंग आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

18:17 (IST) 24 Mar 2025

नांदेडमध्ये भाजपा सदस्य नोंदणी धिम्या गतीने ! भोकरसह चार मतदारसंघ मागे : नायगाव व मुखेडमध्ये उद्दिष्टपूर्ती

राज्यातल्या महायुती सरकारमधील भाजपा आणि इतर दोन प्रमुख पक्षांचे नेते आपापल्या पक्षांचे संघटन बळकट करण्याच्या मोहिमेवर आहेत.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 24 Mar 2025

देवेंद्र फडणवीसांच्या उर्जाखात्याने १०० दिवसांत काय केले? रिपोर्ट कार्डमध्ये…

देवेंद्र फडणवीस यांनी आगामी २५ वर्षांच्या राज्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याची योजना निश्चित केला आहे.

सविस्तर वाचा...

18:10 (IST) 24 Mar 2025

नोकरी! युवक-युवतींना रोजगाराच्या संधी, प्लेसमेंट ड्राईव्ह ‘या’ तारखेला…

जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो.

सविस्तर वाचा...

17:56 (IST) 24 Mar 2025

संशयाचे भूत! पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध; चाकूने सपासप….

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. हत्या, बलात्कार, तरुणींवर अत्याचार या प्रकारच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 24 Mar 2025

फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न, विधानसभेत ठराव संमत

"भारतरत्न" हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 24 Mar 2025

अखेर आरोपी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

प्रशांत कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतरदेखील कोरटकर समोर आला नव्हता.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 24 Mar 2025

पेटवून दिल्याने जखमी स्वच्छता कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

नाशिक : पेटवून दिलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा अखेर जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शुभम जगताप (२२) या संशयिताने शुक्रवारी स्वच्छता कर्मचारी विजय गहलोत (५४) यांना पेटवून दिले होते. शुभम हा फिरस्ता आहे. मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह करतो. रात्री ठक्कर बाजार बस स्थानकातील मीटरपेटीच्या खोलीत तो राहत होता. या ठिकाणी गहलोत येऊन त्याची मस्करी करत. सतत वेगवेगळ्या कारणावरून त्यांचे वाद होत. शुक्रवारी जगताप याला खोलीत झोपू न देण्यावरून वाद झाले. शुभमने बाहेर जावून एका गाडीतून पेट्रोल काढून आणले. गहलोत यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. त्यामुळे गहलोत हे मोठ्या प्रमाणावर भाजले गेले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित शुभम याला अटक केली. त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सततच्या वादातून रागाच्या भरात गहलोत यांना पेटवून दिल्याची कबुली जगतापने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

17:47 (IST) 24 Mar 2025

सत्ताधाऱ्यांना चिंतेचे कारण काय - संजय राऊत यांचा प्रश्न

नाशिक : गद्दाराला गद्दार, रिक्षावाल्याला रिक्षावाला, बेईमानाला बेईमान, असे नाही तर काय म्हणणार, असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एखादा कलाकार कलेच्या माध्यमातून असे मांडत असेल तर, सत्ताधाऱ्यांना चिंता वाटण्याचे कारण नाही, अशी भूमिका घेत राऊत यांनी कुणाल कामराची पाठराखण केली.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी कामराच्या गाण्यावरून राज्यात उसळलेल्या वादावर भाष्य केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संविधान वाचावे लागेल, समजून घ्यावे लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी भाजपचे पूर्वीचे नेते आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत, बोलू देत नाहीत, अशी तेव्हा त्यांची तक्रार होती, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. जे गद्दार गुवाहाटीला गेले, ते सर्व नोंदीत आहे. गद्दार गेल्याचा इतिहास बदलायचा का, असा प्रश्न करुन त्यांनी गद्दार, रिक्षावाला, बेईमान या शब्दांसाठी सत्ताधाऱ्यांनी नवीन शब्दकोश केला असेल, असा टोला हाणला.

17:07 (IST) 24 Mar 2025

सावत्र पित्याकडून मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलीने वडिलांवर केला चाकू हल्ला, गुप्तांग कापले

प्रिती शुक्ला (२४) ही तरुणी नालासोपारा पुर्वेच्या संतोषभुवन येथील सर्वोदनय नगर चाळीत रहात होते.

सविस्तर वाचा...

17:06 (IST) 24 Mar 2025

‘एसटी’त वर्षानुवर्षे एकाच मुख्यालयात असलेल्यांची बदली… परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात…

आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 24 Mar 2025

नागपूर हिंसेतील आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई: उच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी; भेदभावपूर्ण, लक्ष्य करण्याच्या हेतूने…

नागपूर हिंसेतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी सकाळी महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 24 Mar 2025

यवतमाळच्या प्राध्यापकाची धामणगावात आत्महत्या, शैक्षणिक वर्तुळात खळबळ

प्रा. संतोष गोरे हे येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

सविस्तर वाचा...

16:17 (IST) 24 Mar 2025

दिशा सालियन मृत्यू प्रकरण: प्रफुल पटेल म्हणाले, “चोराच्या मनात चांदणं…!”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्याकरिता पटेल गोंदिया येथे आले होते .

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 24 Mar 2025

नागपूर दंगल, रमझान महिना, हिंदू उत्सव; पोलीस घेत आहेत विशेष खबरदारी

नागपूरच्या कारवाईचे इतरत्र पडसाद उमटू शकतात. हा धार्मिक भावनांचा उद्रेक ठरू नये म्हणून काळजी घेतल्या जात आहे.

सविस्तर वाचा...

15:59 (IST) 24 Mar 2025

नागपूर दंगलीवरुन भाजप आमदारांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “काँग्रेसचा हिंदू विरोधी…”

खोपडे यांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिले. ते म्हणतात, पाच दिवसामध्ये एक ही काँग्रेसचा नेता या दंगाग्रस्त भागात भटकला नाही व देवडिया काँग्रेस भवन सुद्धा त्यांनी बंद ठेवले.

सविस्तर वाचा...

Maharashtra News Highlights  Today, 24 March 2025 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा