Today’s Maharashtra News Updates, 14 October 2026: नालासोपारा-वसई लिंक रोडवरील ‘इंपिरियल हाईट्स’ या इमारतीमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या १४ मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरील नागरिकांना अक्षरशः मृत्यूचे दर्शन झालं. या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.
दुसरीकडे, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, बुधवारी (१४ ऑक्टोबर) पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
पुण्यातील एमपीएससी आंदोलन गाजवणारा कोल्हापूरचा विवेकानंद पाटील काल रात्री मूळ गावी माजगाव येथे परतला. विवेकानंद पाटील मूळ गावी परतल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. माजगावमध्येही विवेकानंद पाटील याने जोरदार भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांचा मला फोन आला होता, आता मुंबईला येऊन भेटून जा, असं राज ठाकरे मला म्हणालेत, त्यामुळे आता मी पुन्हा मुंबईला जाणार आहे, अशी माहिती विवेकानंद पाटीलने दिली. या बातम्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे थेट अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत…
Today’s Live News Updates from Maharashtra, 14 October 2026 | वाचा राज्यातील बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स
“दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना ५ हजार रूपये देणार, आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर”; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत. यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित होते. या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
दुष्काळाच्या सावटात गोसेखुर्द चार जिल्ह्यांसाठी संजीवनी ठरणार! ४०.४९ टीएमसी जलसाठ्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या आशा पल्लवित
स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’ला केंद्राची मंजुरी; नाशिकसह मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच विभागांचा समावेश
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. राजेंद्र शिंदे आज गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आल्याबाबत विचारले असता राजेंद्र शिंदे यांनी होकारार्थी उत्तर दिले. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.
ॲमेझॉन डेटा सेंटरच्या पर्यावरणीय परिणामांचा शास्त्रीय अभ्यास होणार; डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती
बीडचे निलंबित माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठकला अखेर जामीन
एसटी बँकेतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी सात अधिकाऱ्यांची नियुक्ती; ठेवीतील घट, नोकरभरती, फर्निचर खरेदीसह १० मुद्द्यांची तपासणी; तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
बच्चू कडू म्हणतात, “शिक्षक मतदारसंघात डॉ. अनिल बोंडे महायुतीचा धर्म पाळतील”
बावधन भागातील पाच ‘आरएमसी’ प्रकल्पांवर महापालिकेचा हातोडा !
"राष्ट्रध्वज फडकावणे गुन्हा कसा? देशात आणीबाणी लादायची असेल तर अधिकृतपणे लादा", अभिजित दिपकेंची मोदी सरकारवर टीका
पुनर्विकासातील नव्या सदनिकाधारकांना तीन महिन्यांत सभासदत्व देणे बंधनकारक; राज्य सरकारच्या ३०सप्टेंबर शासन निर्णयात तरतूद
Draught Affected Students help : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त… महाविद्यालयांनी अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाईचा इशारा!
NEET पेपरफुटीचा CBI तपास पूर्ण! NTA अधिकाऱ्यांचा थेट सहभाग नाही; चार्जशीटमध्ये काय? वाचा सविस्तर
फलक हटवले पण विल्हेवाटीचे काय? पीव्हीसी फ्लेक्सच्या पुनर्प्रक्रियेचे आव्हान; जप्त फलकांच्या विल्हेवाटीबाबत प्रश्न
मुलुंडमधील क्रीडासंकुलाचे आरक्षण बदलून पेट्रोल पंपासाठी जागा; पालिकेने मागवल्या हरकती व सूचना
भाजपा आमदार खोपडे यांनाच गंडवण्याचा प्रयत्न; भामट्या व्यवस्थापकाने दिली बँकेत नोकरीची ऑफर
वर्ध्यात पक्ष्यांचा अनोखा ‘रोडमॅप’! ९५ प्रजातींची नोंद थेट जागतिक व्यासपीठावर
ग्रामीण भागातही शहरांप्रमाणे हद्दपारीचे अधिकार पोलिसांकडे?
पहिल्या मजल्यावरील झोपडीवासीयांना घर देण्याबाबत झोपु प्राधिकरण अनुकूल!
राज्यात तीव्र उष्णतेचा ताप असताना वादळी पावसाचा अंदाज का ? ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
सत्तेविरोधात जनमत दाखविण्याची संधी; पदवीधर, शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, बुधवारी (१४ ऑक्टोबर) पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
नालासोपारा-वसई लिंक रोडवरील 'इंपिरियल हाईट्स' या इमारतीमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजता आग
नालासोपारा-वसई लिंक रोडवरील 'इंपिरियल हाईट्स' या इमारतीमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. या १४ मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरील नागरिकांना अक्षरशः मृत्यूचे दर्शन झालं. या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.

मराठी न्यूज लाईव्ह अपडेट
