Today’s News Updates, 09 October 2026 : ‘एसआयआर’ विरोधात जनमत भडकवणाऱ्या काँग्रेसने तत्कालीन केंद्रीय कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचे संसदेतील जुने वक्तव्य ऐकावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले. ‘राजकारणाचे रंग बदलले, पण संसदेतील रेकॉर्ड बदलत नाहीत,’ अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील राजकारण, MPSC आंदोलन, दुष्काळ आणि पाणीटंचाईसह विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहुयात.

MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि नोकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या चर्चेनंतर लवकरच विद्यार्थ्यांच्या बाजूने चांगली बातमी समोर येईल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दीपके यांनी सरकारच्या निर्बंधांवर प्रश्न उपस्थित केले. “तुम्ही मेट्रो, ट्रेन आणि रस्ते बंद करताय. जम्मू आणि नक्षलग्रस्त भागांतून सुरक्षा दलांना दिल्लीत आणलं. देशातील तरुणांची एवढी भीती कशासाठी?” असा सवाल त्यांनी केला. तसेच “किती लोकांना ताब्यात घेणार?” असा सवाल करत दीपके यांनी आंदोलनावरील निर्बंधांवर टीका केली. तसेच, “ज्ञानेश कुमार यांनी १३ कोटी मतदारांची नावे रद्द करण्याची परवानगी घेतली होती का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या पाहणीत पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, या पथकाच्या अहवालाच्या आधारे केंद्राकडून आर्थिक मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून, हे पथक मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘एसआयआर’ प्रक्रियेसंदर्भात सादरीकरण करत मतदारांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील मे महिन्यातील आणि ऑगस्ट महिन्यातील मतदारसंख्येत सुमारे साडेसात लाखांची तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मे ते ऑगस्टदरम्यान मतदारांची संख्या कमी कशी झाली, याबाबत स्पष्टता द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Live Updates

Today’s Live News Updates from Maharashtra , 09 October 2026

17:43 (IST) 9 Oct 2026

अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरांचा ‘तलवार म्यान’ करण्यास नकार; अधिकृत उमेदवारांना मतविभागणीची चिंता

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारासह चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले ...अधिक वाचा
17:01 (IST) 9 Oct 2026

राज्य अतिथींच्या सरबराईसाठी १२.कोटी ६८ लाख रुपयांची ४४ नवी वाहने; बुलेटप्रूफ लँड क्रूझरसाठी ४.०७ कोटी

राज्यात भेट देणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीची व्यवस्था मुंबईत शासकीय परिवहन सेवा, वरळी यांच्यामार्फत, तर अन्य जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील राजशिष्टाचार शाखेमार्फत केली जाते. ...अधिक वाचा
17:00 (IST) 9 Oct 2026

मुख्यमंत्र्यांच्या गृहशहरात भाजपला बंडखोरी शमविण्यात अपयश, प्रा. सोले रिंगणात कायम

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपमधील बेबनाव पुढे आला. ...सविस्तर बातमी
16:47 (IST) 9 Oct 2026

दिवाळी कशी साजरी करू?, निमगाव वाघाच्या शेतकऱ्याची आर्त हाक; केंद्रीय पथकाकडून अहिल्यानगरमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

नगर शहरापासून सुमारे १३-१४ किमी. अंतरावर निमगाव वाघा गाव आहे. या गावात श्रीपती सहादू देवकर यांची तीन एकर जिरायती शेती आहे. ...सविस्तर वाचा
16:31 (IST) 9 Oct 2026

तिहेरी हत्याकांड:  जमिनीचा वाद ठरला कारणीभूत, आरोपीचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडामागे शेतीचा हिस्सा आणि त्यावरून सुरू असलेला कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. ...सविस्तर वाचा
16:31 (IST) 9 Oct 2026

सीबीएसई शाळांमधील शिक्षकांची मोठी बातमी, शाळा सुटल्यानंतरच्या अशैक्षणिक कामांपासून ते रविवारच्या सुट्टीपर्यंत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर…

सीबीएसई शाळांमधील शिक्षकांना शाळेच्या निर्धारित वेळेनंतर अशैक्षणिक कामे देण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ...अधिक वाचा
16:16 (IST) 9 Oct 2026

'समृद्धी'वर पुन्हा अपघात, एक ठार, दोघे गंभीर

समृद्धी महामार्ग आणि अपघात हे  दुर्दैवी  समीकरण  कायम आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या  समृद्धी महामार्गावर  झालेल्या अपघातात एक इसम ठार तर दोघे प्रवासी  गंभीर जखमी झाले आहे. ...वाचा सविस्तर
16:06 (IST) 9 Oct 2026

स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत मोठी बातमी! नवरात्रोत्सवापासून धम्मचक्र दिनापर्यंत सक्ती…

नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, गरबा महोत्सव आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी तात्पुरती वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांना यंदा एक महत्त्वाचा बदल स्वीकारावा लागणार आहे. ...सविस्तर वाचा
15:37 (IST) 9 Oct 2026

जीएसटी प्रकरणात राज्य कर विभागाचे दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, नंदुरबारमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

संदीप देवराम पाटील (राज्य कर अधिकारी) आणि विवेक विश्वनाथ घोडके (राज्य कर निरीक्षक) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
15:37 (IST) 9 Oct 2026

‘आई गेली, आता आम्ही अनाथ झालो’, मुलांना वाटले होते आई परतणार नाही; नागपुरात दोन वर्षांनी मायलेकरांची भेट!

वडिलांचे छत्र हरपले होते. त्यानंतर आईही बेपत्ता झाली. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली, अनेक ठिकाणी चौकशी केली; पण तिचा पत्ता लागला नाही. ...अधिक वाचा
15:35 (IST) 9 Oct 2026

दिल्लीतील आंदोलनामुळे रेल्वे गाड्या रद्द; नागपूरमार्गे धावणाऱ्या गाड्या सुरूच

राजधानी दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द केल्या आहेत. ...सविस्तर वाचा
15:16 (IST) 9 Oct 2026
“ही गोपनीय चौकशी असून कोणालाही सांगू नका”, सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात ; निवृत्त अभियंत्याला लाखो रुपयांचा फटका

नाशिक येथील निवृत्त अभियंत्याला सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढले. पैशांचा गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) केल्याचे आणि अटक करण्याची भीती या अभियंत्याला दाखविण्यात आली. ...सविस्तर बातमी

15:06 (IST) 9 Oct 2026

नगरसेवक-प्रशासन वादावर संजय केळकरांची प्रतिक्रिया, आक्षेपार्ह वक्तव्ये निषेधार्हच पण, प्रशासनाने नियमात काम करावे

लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यावर केलेले गंभीर आरोप आणि वापरलेले आक्षेपार्ह शब्द याचा निषेध करत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन केले होते. या आंदोलनावर आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...अधिक वाचा
14:57 (IST) 9 Oct 2026

धक्कादायक: दुष्काळी मदतीच्या अर्जापोटी दिड हजाराची लाच घेताच वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

वनरक्षक राहुल रागदास बहिरम (३०, रा. वन विभागाचे शासकीय निवासस्थान, सांगवी, ता. शिरपूर; मूळ रा. धवळीविहीर, पो. जेयापूर, ता. साक्री, जि. धुळे) असे लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. त्याने १४ शेतकऱ्यांच्या अर्जांसाठी एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. ...अधिक वाचा
14:50 (IST) 9 Oct 2026

सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा मृत्यू

वडवणी तालुक्यातील रुई (पिंपळा) येथे बाळराजे कन्स्ट्रक्शन रेडी मिक्स कॉन्क्रीट केंद्रात एका १६ वर्षीय बालकामगाराचा मिक्सरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ८) दुपारी  घडली. ...अधिक वाचा
14:44 (IST) 9 Oct 2026

सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवासाठी मोठे नियोजन; खासगी वाहनांना प्रवेशबंदी, वाहतुकीत बदल

सप्तशृंग गडाकडे जाणारा रस्ता घाटातून जात असून, तो अरुंद आणि वळणावळणाचा आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी झाल्यास वाहतूक कों ...सविस्तर बातमी
14:38 (IST) 9 Oct 2026

दुष्काळाची झळ; अकोला जिल्ह्यातील तरणतलाव बंद करण्याचे आदेश; ‘तत्काळ बंदीचे आदेश

‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान झाले. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले असून भूजल पातळीत मोठी घट झाली. हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
14:34 (IST) 9 Oct 2026

चारकोप-मालवणीतील पाच एकर शासकीय भूखंड अतिक्रमणमुक्त! भूखंडाचे अंदाजित मूल्य ११३.२५ कोटी रुपये

मालवणी व चारकोप परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. यापैकी २२ एकर भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याचा मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
14:08 (IST) 9 Oct 2026

कसारा रेल्वे स्थानकात विनयभंगाचा आरोप झालेल्या तिकीट तपासणीसाची मुक्तता

सीसीटीव्हीमध्ये तिकीट तपासणी मुलीचा हात पकडताना दिसत असला, तरी या प्रकरणातील कथन व स्थितीतून त्या कृतीमागे लैंगिक हेतू असल्याचा प्रथमदर्शनी संकेत दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. ...वाचा सविस्तर
13:50 (IST) 9 Oct 2026

Video: डोंबिवली अनमोलनगरी रिंगरूट रस्त्यांवरील आठवडी बाजारात फेरीवाल्यांच्या सामानाची मोडतोड

या बेकायदा बाजारातून फेरीवाला हटाव पथकाने सामान, हातगाड्या असा एकूण दोन टेम्पो सामान जप्त केले. हे सर्व सामान पालिकेच्या साठा केंद्रावर नेण्यात आले. ...वाचा सविस्तर
13:40 (IST) 9 Oct 2026

केंद्रीय दुष्काळी पथकाचा दौरा सुरू; देमनी शिवरात करपलेल्या सोयाबीनची पाहणी

 मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय  पथकाने आज देमनी शिवारात कपरलेल्या सोयाबीन पिकाची  पाहणी केली.  ...सविस्तर वाचा
13:39 (IST) 9 Oct 2026

शिवडी परिसरातील पदपथांवरील २२ अनधिकृत दुकाने, तात्पुरत्या शेडचे निष्कासन, ‘पादचारी प्रथम’ अभियान अभियानांतर्गत ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून ''पेडेस्ट्रियन फर्स्ट'' अभियान राबविण्यात येत आहे. ...वाचा सविस्तर
12:36 (IST) 9 Oct 2026

नाना पाटेकर यांच्या निधनाने पुन्हा चर्चेत ‘सायलेंट अटॅक’; तरुणांच्या हृदयालाही धोका

अभिनेते नाना पाटेकर यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनामुळे हृदयविकाराचा धोका पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, हा धोका आता केवळ ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ...सविस्तर वाचा
12:31 (IST) 9 Oct 2026

शासकीय कामांची देयके थकल्याने आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या; अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना

शासकीय विकासकामे पूर्ण करूनही दीर्घकाळ देयकांची रक्कम मिळत नसल्याने कंत्राटदारांचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. ...सविस्तर वाचा
12:20 (IST) 9 Oct 2026

'तुम्ही नाही म्हणा की हॊ म्हणा, मी उभा राहणारच' कराळे मास्तर सांगतात, शरद पवार भेटीचे सत्य

नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढाई बंडखोरीनेच अधिक गाजू लागली आहे. महायुतीचे सुधाकर कोहळे व बंडखोर प्रा. अनिल सोले तर महाआघाडीचे अभिजित वंजारी तर बंडखोर नीलेश कराळे उर्फ खदखद मास्तर. ...अधिक वाचा
12:06 (IST) 9 Oct 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ कधी ? भगूर नगरपालिकेच्या ठरावावरुन पुन्हा विषय चर्चेत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी सातत्याने केली जाते. देशात सुमारे दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून भाजपचे सरकार आहे. ...सविस्तर बातमी
11:54 (IST) 9 Oct 2026

दुष्काळामुळे रासगरबा रद्द, डोंबिवलीत शिंदे शिवसेनेच्या नवरात्रोत्सवाची भव्यता कायम

मैदानातील मंडपाची भव्यता आणि शामियाना पाहून शिंदे शिवसेनेने फक्त रासगरबाच रद्द केला आहे. बाकी लाखोची उधळपट्टी करणारी भव्यता कायम ठेवली असल्याची चर्चा डोंबिवली शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. ...वाचा सविस्तर
11:39 (IST) 9 Oct 2026

सोने-चांदीत पुन्हा तेजी..! खरेदीपूर्वी जाणून घ्या जळगावमधील आजचे ताजे भाव

शुक्रवारी सकाळी सोन्याच्या किमतीत १.०२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति औंस ४,१९९.५० डॉलरवर पोहचला. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत १.५९ टक्क्यांची वाढ झाली असून तिचा भाव प्रति औंस ६०.३७० डॉलरवर गेला आहे. ...सविस्तर वाचा
11:31 (IST) 9 Oct 2026

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळू शकतात एक कोटी? जाणून घ्या सॅलरी पॅकेज

रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करताना सेवेत असताना मृत्यू झालेल्या कळमेश्वर येथील ट्रॅक मेंटेनर नरेश सुरकर यांच्या कुटुंबाला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे सॅलरी पॅकेजअंतर्गत एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. ...वाचा सविस्तर
11:11 (IST) 9 Oct 2026

एमपीएससी आंदोलनात राज ठाकरे यांची मध्यस्थी, थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी च्या पेपरफुटी प्रकरणात आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार  यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत. ...वाचा सविस्तर