Latest Marathi News Live Updates: अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणी आमदार रोहित पवार देशातील नेत्यांची भेट घेत असताना, अधिवेशनात याबाबत अद्याप चर्चा का होत नाही? असा सवाल विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, याबाबत अजित पवारांचे पूत्र जय पवारही पत्रकार परिषद घेऊन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजात आज काय होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात राजकारण, कला – क्रीडा – संस्कृती, गुन्हे, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Pune Maharashtra Live News Today, 10 March 2026: महाराष्ट्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स

20:48 (IST) 10 Mar 2026

सीएनजी-पीएनजी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता

इराण-इस्त्रायल युद्धामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी आणि पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...सविस्तर वाचा
20:33 (IST) 10 Mar 2026

शासन निधी वगळून मिरा भाईंदर महापालिकेचा १ हजार ४३९ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर

मिरा भाईंदर महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १,४३९ कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला आहे. आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी स्थायी समितीसमोर हा अर्थसंकल्प मांडला असून, यात कोणतीही नवीन करवाढ न लावता नागरी सुविधांना प्राधान्य दिले आहे. ...अधिक वाचा
20:20 (IST) 10 Mar 2026

उष्णतेचा पारा वाढणार! पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी

पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असून हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. वसई-विरारसह संपूर्ण जिल्ह्यात ११ ते १५ मार्च दरम्यान तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
20:09 (IST) 10 Mar 2026

बुलेट ट्रेनच्या कामगारांना सुरक्षेचे धडे; ६ हजार कामगारांसाठी राबवली विशेष मोहीम, पहा सविस्तर.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असतानाच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (NHSRCL) कामगारांच्या सुरक्षेसाठी 'प्रयास' ही नुक्कड नाटक मालिका राबवली. मुंबई आणि गुजरातमधील ४० बांधकाम स्थळांवरील ६००० हून अधिक कामगारांना याद्वारे सुरक्षा उपकरणांच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. ...वाचा सविस्तर
20:01 (IST) 10 Mar 2026

डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; तपासासाठी नायगावचे ग्रामस्थ आक्रमक

नाशिकमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून, नायगावच्या ग्रामस्थांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. ...अधिक वाचा
19:50 (IST) 10 Mar 2026

कोकणाची चव आणि ग्रामीण कलेचा संगम वसईत, रंगणार कोकण सरस महोत्सव

वसई-विरारमध्ये १२ ते १६ मार्च दरम्यान 'कोकण सरस २०२६' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोकण विभागातील १५० महिला बचत गटांच्या हस्तकला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे. ...सविस्तर वाचा
19:33 (IST) 10 Mar 2026

वांगणी - शेलू नको, मुंबईतच घरे हवी, गिरणी कामगारांचा निर्धार

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी सरकारने प्रस्तावित केलेल्या वांगणी-शेलू प्रकल्पाला १६ कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. मुंबईतच हक्काची घरे मिळावीत, या मागणीसाठी आझाद मैदानावर कामगारांनी जोरदार निदर्शने केली. ...अधिक वाचा
19:00 (IST) 10 Mar 2026

जिल्हा परिषदेचा १३.१५ कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प आरोग्य, कृषी, शिक्षण व ग्रामीण विकासाला मजबूत चालना; नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश

पालघर जिल्हा परिषदेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३.१५ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रशासक मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर झालेल्या या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, कृषी आणि पर्यटन क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
18:27 (IST) 10 Mar 2026

शेअर बाजार आणखी पडणार? गिफ्ट सिटीतील पहिला ‘आयपीओ’ लांबणीवर

आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गुजरातमधील गिफ्ट सिटीतून येणारा पहिलावहिला 'एक्सईडी एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट'चा आयपीओ लांबणीवर पडला आहे. आता हा १० डॉलर किंमतपट्टा असलेला आयपीओ १६ मार्चपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. ...वाचा सविस्तर
18:18 (IST) 10 Mar 2026

'मालेगावचे भोसले घराणे बांगलादेशी आहे का?' – माजी नगराध्यक्षांचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर संताप

मालेगावचे माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपल्या नागरिकत्वाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर संताप व्यक्त केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विधानानंतर भोसले यांनी आपल्या ६० वर्षांच्या राजकीय वारशाचा दाखला देत चौकशीची मागणी केली आहे. ...सविस्तर बातमी
18:09 (IST) 10 Mar 2026

सांगली : दहापैकी तीन पंचायती समितीत काँग्रेसचे सभापती

सांगली जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ३ समित्यांवर वर्चस्व मिळवले असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपापले बालेकिल्ले राखले आहेत. ...सविस्तर बातमी
18:02 (IST) 10 Mar 2026

येत्या पावसाळ्यात मेट्रो प्रशासनानेही पाणी उपसा पंप बसवावे; पालिका प्रशासनाची सूचना

मुंबईत आगामी पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मेट्रो प्रशासनाला स्थानकांवर स्वखर्चाने पाणी उपसा पंप बसवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या वर्षी वरळी मेट्रो स्थानकात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
17:48 (IST) 10 Mar 2026

अहिल्यानगरमध्ये १३० ग्रामपंचायतींना वितरित केलेल्या ई-कचरागाड्या धुळखात पडून; कोट्यवधींचा खर्च कचऱ्यात

अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वितरित केलेल्या ३६७ ई-कचरागाड्यांपैकी १३० गाड्या वर्षभरातच निकामी झाल्या आहेत. देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि बॅटऱ्या चोरीला गेल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे समोर आले आहे. ...सविस्तर वाचा
17:47 (IST) 10 Mar 2026

मालेगावात 'इस्लाम पार्टी'शी दोस्ती पावली; महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे!

मालेगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची बिनविरोध निवड झाली आहे. इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या 'सेक्युलर फ्रंट'ला दिलेल्या समर्थनाचे हे फळ मानले जात आहे. ...सविस्तर वाचा
17:43 (IST) 10 Mar 2026

Gold Investment Fraud : स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून महिलेने केली अडीच कोटींची फसवणूक

घाटकोपरमध्ये स्वस्त दरात सोने देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोनल रबारी नामक महिलेने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला विश्वासात घेऊन कोट्यवधींचा गंडा घातला ...अधिक वाचा
17:24 (IST) 10 Mar 2026

RTE Admission: आरटीईच्या १ किमीच्या नियमाला स्थगिती, मात्र पालकांमध्ये संभ्रम

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने आणलेल्या १ किमी अंतराच्या जाचक अटीला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातून सुमारे १९ हजार अर्ज आले असतानाच, या तांत्रिक बदलामुळे आता जुन्या अर्जांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 10 Mar 2026

मोठी बातमी : दुसरी ते आठवीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर… कसे आहे नियोजन?

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'संकलित मूल्यमापन चाचणी २' चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुणे विभागातर्फे जारी सूचनांनुसार ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी प्रमुख विषयांच्या परीक्षा पार पडतील. ...वाचा सविस्तर
16:24 (IST) 10 Mar 2026

Buddha Idol Sun Rays : वेरूळमध्ये बुद्धमूर्ती सूर्यप्रकाशाने तेजाळली, दरवर्षी कधी येतो किरणोत्सव योग ?

छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेणी क्रमांक ९ मध्ये तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होणारा अभूतपूर्व सोहळा सुरू झाला आहे. मात्र, १० मार्च रोजी मुख्य किरणोत्सवाच्या दिवशीच लेणीला साप्ताहिक सुटी असल्याने हजारो पर्यटकांना या क्षणापासून मुकावे लागले आहे. ...अधिक वाचा
16:22 (IST) 10 Mar 2026

वसई-विरार परिवहन विभागाचा ८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर; पण महिला सवलतीसाठी फक्त १ लाखाची तरतूद

वसई-विरार महापालिकेने परिवहन विभागाचा २०२६-२७ या वर्षाचा ८३.५५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात ई-बस सेवा आणि पायाभूत सुविधांवर भर दिला असला तरी, महिलांच्या ५० टक्के तिकीट सवलतीसाठी अवघ्या १ लाखाची तरतूद केल्याने चर्चा सुरू झाली आहे. ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 10 Mar 2026

नाशिक जिल्ह्याला वणव्यांचा वेढा, चार दिवसांत चार डोंगर खाक

नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढताच वणव्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चार दिवसांत चार डोंगरांना आग लागली आहे. मखमलाबाद, रामशेज आणि सप्तश्रृंग गड परिसरातील वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून, पर्यावरणप्रेमींनी वन विभागाच्या नियोजनावर टीका केली आहे. ...वाचा सविस्तर
16:09 (IST) 10 Mar 2026

सायबर गुन्ह्यांचा रिकव्हरी रेट जेमतेम २% … मग २००० कोटींचा निधी नेमका कुठे होतो खर्च ?

सायबर गुन्ह्यांत पैसे परत मिळण्याचा दर जेमतेम २% असताना २००० कोटींचा निधी कुठे खर्च होतोय? असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत विचारून सरकारला धारेवर धरले आहे. ...वाचा सविस्तर
16:07 (IST) 10 Mar 2026

अश्लील संदेशांचा आरोप, इन्काउंटरची भीती आणि दीड कोटींना गंडा; ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक

सीबीआय अधिकारी आणि न्यायाधीशांच्या नावाने बनावट व्हिडिओ कॉल करून ही फसवणूक करण्यात आली. ...सविस्तर बातमी
16:04 (IST) 10 Mar 2026

Iran war : युद्धाचा प्लास्टिक उद्योगास फटका. खुर्च्या, बॉटल, पाईप महागणार. कारण…

इराण-अमेरिका युद्धाचा फटका प्लास्टिक उद्योगाला बसला असून कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे 'रेजिन' महागले आहे. यामुळे शेतीसाठी लागणारे पाईप आणि प्लास्टिक वस्तूंच्या किमती ९० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. ...सविस्तर वाचा
16:04 (IST) 10 Mar 2026

नाशिकच्या अशोका हॉस्पिटलचे अतिक्रमण विधानसभेत; आ. फरांदेंनी पालिकेला झापले!

नाशिकमधील अशोका हॉस्पिटलने केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. नगररचना विभागाच्या संगनमताने झालेल्या या बांधकामावर कारवाईची मागणी करत त्यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ...सविस्तर बातमी
16:01 (IST) 10 Mar 2026

दहा वर्षे पूर्ण झालेल्या बँक संचालकांना ‘निवृत्तीचे नारळ!’

महाराष्ट्रातील सहकारी आणि नागरी बँकांमध्ये १० वर्षांहून अधिक काळ संचालक असलेल्या नेत्यांना आता पद सोडावे लागणार आहे. सहकार विभागाने आरबीआयच्या नियमावलीनुसार कार्यवाही सुरू केली असून, नांदेडसह राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे संचालकपद धोक्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
15:55 (IST) 10 Mar 2026

शिवसेनेला संख्याबळासाठी समर्थन देणाऱ्या मनसेची कल्याण डोंबिवली पालिकेत कोंडी; भाजपची कोंडी करण्याच्या प्रयत्नात...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या मनसेची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. ...सविस्तर वाचा
15:54 (IST) 10 Mar 2026

जन्मदात्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क नाकारला!, 'सिनिअर सिटीझन ट्रिब्युनल'ने मुलाला दिले घर खाली करण्याचे आदेश

यवतमाळमध्ये जन्मदात्यांना घरातून हाकलणाऱ्या मुलाला 'ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने' मोठा दणका दिला आहे. मुलाला घर खाली करण्याचे आणि वडिलांना दरमहा ५ हजार रुपये पोटगी देण्याचे ऐतिहासिक आदेश देण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
15:46 (IST) 10 Mar 2026

Central Railway : तिकीट विचारल्याने महिला टीसीला बेदम मारहाण, ठाणे रेल्वे स्थानकातील घटना

ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलावर सोमवारी सकाळी ३९ वर्षीय हेड टीसी या प्रवाशांच्या तिकीट तपासत होत्या. ...वाचा सविस्तर
15:38 (IST) 10 Mar 2026

संशयाने घेतला जीव; कुजलेल्या मृतदेहाच्या गूढाचा ४८ तासांत उलगडा; प्रियकर मजुरानेच केला घात…

नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकर मजुराला जरीपटका पोलिसांनी ४८ तासांत बेड्या ठोकल्या. होळीच्या रात्री झालेल्या वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आली होती. ...सविस्तर बातमी
15:37 (IST) 10 Mar 2026

विदर्भ साहित्य संघ निवडणूक : गडचिरोलीत मत चोरीचा सपाटा, अनेकांच्या नावे बोगस मतदान?

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत गडचिरोलीत मतपत्रिकांची चोरी आणि बोगस मतदानाचा प्रकार उघड झाला आहे. मृत आणि स्थलांतरित व्यक्तींच्या नावेही मते नोंदवली गेल्याने साहित्यिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...सविस्तर बातमी

rohit pawar meet kharge

रोहित पवारांनी घेतली खर्गेंची भेट (फोटो - X/rohit pawar)

रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खर्गे यांची भेट.