Mumbai News Highlights : भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्रातूनही अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या कारवाईत महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधकही सरकारच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युद्ध हे दहशतवादावर उत्तर नसतं, अशी भूमिका घेतल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Live Updates

Mumbai-Pune News Highlights 08 May 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी

20:56 (IST) 8 May 2025

वैभववाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; लग्नसमारंभांना फटका, आंबा-काजूचे नुकसान

सावंतवाडी : वैभववाडी तालुक्यात आज गुरुवारी सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी आज विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते, या पावसामुळे या सोहळ्यांमध्ये मोठा व्यत्यय आला.

या अवकाळी पावसाचा फटका अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा आणि काजूच्या पिकालाही बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि आज सकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे तालुक्यातील कुसर, कुंभवाडे, करूळ, नावळे, खांबाळे या प्रमुख गावांसह अन्य भागांमध्येही जोरदार पाऊस झाला.

20:53 (IST) 8 May 2025

मखमलाबाद शिवारातील हरित क्षेत्र विकास योजना रद्द ; ७५३ एकर क्षेत्रावरील निर्बंध हटणार

शेतकऱ्यांचा विरोध व योजनेस झालेला विलंब लक्षात घेऊन या प्रारुप नगररचना योजनेचा प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. ...सविस्तर वाचा
20:53 (IST) 8 May 2025

रत्नागिरीत देश विरोधी स्टेटस ठेवल्याने तरुणाला बेदम मारहाण; पोलिसांकडून गुन्हा दाखल

भारतविरोधी तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे धर्मविरोधी मोबाईल स्टेटस ठेवल्याने रत्नागिरीत संतप्त भावना निर्माण झाल्या. ...अधिक वाचा
19:34 (IST) 8 May 2025

Maharashtra News LIVE Updates : “सौ चुहे खाके, बिल्ली…”, अजित पवार गटात होणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत गुलाबराव पाटलांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आता अजित पवार गटात जाण्याबाबत बोलत आहेत. या विषयावर बोलत असताना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक जण पक्षात प्रवेश करत आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचे उदाहरण आहे. 'सौ चुहे खाके, बिल्ली अभी हज को चली' तशा पद्धतीचं काम चाललं आहे."

19:12 (IST) 8 May 2025

बनावट डाॅक्टराविरुध्द गुन्हा

नाशिक -वैद्यकीय कायद्यानुसार परवानगी नसतांनाही वेगवेगळ्या आरोग्य पध्दतीचा अवलंब करत उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाविरूध्द नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दोन ते तीन वर्षांपासून अभिजीत मुखर्जी वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्याकडे इलेक्ट्रोपॅथीची पदवी आहे. याशिवाय नेचरथेरेपीसह अन्य काही पदव्या आहेत. परंतु, डॉक्टर ही पदवी लावण्यासाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण त्यांच्याकडे नाही. त्यांना वेगवेगवेगळ्या पॅथींचा अभ्यास करत उपचार करण्याची परवानगी नसतांनाही ते रुग्णांवर औषधोपचार करत होते. याविषयी आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुखर्जी यांच्या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी वैद्यकीय साहित्य साधनासह ॲलोपॅथीचे उपचार करतांना आढळले. अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17:13 (IST) 8 May 2025

Anil Parab on Operation Sindoor: अनिल परब यांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया

आपल्या लष्कराच्या ताकदीवर संपूर्ण भारताचा विश्वास आहे. आपल्या लष्कराचं एवढं सामर्थ्य आहे की ते पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेतील - अनिल परब, ठाकरे गटाचे आमदार

16:52 (IST) 8 May 2025

भरधाव डंपरची एसटीला धडक; अपघातात ४ ठार १५ जखमी, रायगडमधील तारणे गावाजवळील घटना

या भीषण दुर्घटनेत बसमधील तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे, विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 8 May 2025

निशाणा जितेंद्र आव्हाडांवर लक्ष्य मात्र भाजप !

कळवा, मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले हे नगरसेवक मागील तीन महिन्यांपासुन भाजपच्या संपर्कात होते. ...सविस्तर वाचा
16:38 (IST) 8 May 2025

उल्हासनगरात २६३ इमारती धोकादायक; अतिधोकादायक २, तातडीने दुरूस्तीयोग्य ३७ इमारती

उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात कमकुवत झालेल्या जुन्या इमारती, त्यांचे स्लॅब कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
14:09 (IST) 8 May 2025

Gulabrao Patil on Raj Thackeray: "ते जातील ना दहशतवाद्यांना शोधायला"

दहशतवादावर युद्ध हा पर्याय नसून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधलं पाहिजे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर त्यांनी विधान केलं होतं. या विधानावर राजकीय वर्तुळातून टीका होत असताना शिंदे गटाचे आमदार व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांना शोधायला हवं, या राज ठाकरेंच्या विधानावर "राज ठाकरे जातील ना दहशतवाद्यांना शोधायला", अशी टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केली.

13:49 (IST) 8 May 2025

नाशिक : दुर्घटना टाळण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा, आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीने मान्सूनपूर्व रस्ता दुरुस्ती, गटार आणि नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ...सविस्तर बातमी
13:01 (IST) 8 May 2025

Sharad Pawar: शरद पवार पवारांनी मांडली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भूमिका; म्हणाले, "पक्षातल्या एका गटाला वाटतंय की…"

Sharad Pawar on Ajit Pawar: शरद पवार गट व अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का? यासंदर्भात शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. ...सविस्तर वाचा
12:55 (IST) 8 May 2025

नंदुरबारमधील आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यातील किती तलावातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवू शकतो, याबाबत चर्चा करण्यात आली. ...सविस्तर बातमी
12:29 (IST) 8 May 2025

धुळे जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची तयारी

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री रावल यांनी धुळे जिल्हा प्रशासनास दिल्या. ...सविस्तर बातमी
12:21 (IST) 8 May 2025

जळगाव जिल्ह्यात पावसाने ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, केळीबागांना अधिक फटका

जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीसह वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे १४ तालुक्यातील सुमारे ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. ...सविस्तर बातमी
12:19 (IST) 8 May 2025

Malegao BlastCase: पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी

१७ वर्षांपूर्वी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह या प्रकरणात प्रमुख आरोपी असून त्यांच्याबाबत न्यायालय काय निकाल देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

12:09 (IST) 8 May 2025

Maharashtra Rain Update Today: राज्यावर अवकाळीसह गारपीटीचे संकट कायम

Maharashtra Weather Today: राज्यावर अवकाळीचे संकट कायम असून सध्या सगळीकडे पावसासाठी पोषक असे वातावरण आहे. आधी विदर्भात आणि आता विदर्भासह मराठवाडा, मुंबईतही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. ...सविस्तर बातमी
11:47 (IST) 8 May 2025

वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा; डहाणूतील मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान, २३० घरे उद्ध्वस्त तर ८६ बोटिंचे नुकसान

परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बोटी स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्यामुळे आता त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...सविस्तर वाचा
11:37 (IST) 8 May 2025

दादरमधील सावरकर सदन संवर्धित करा; उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान असलेले दादर येथील सावरकर सदन संवर्धित करण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली. ...सविस्तर बातमी
11:23 (IST) 8 May 2025

जितेंद्र आव्हाडांना धक्का, अजितदादांना ठेंगा तर भाजपला इशारा; ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणखी एक खेळी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पक्षाकडून नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढवली होती. ...सविस्तर वाचा
11:16 (IST) 8 May 2025

"कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणे हटवा", वनमंत्री गणेश नाईक यांचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांना आदेश

कांदळवन क्षेत्रात असलेल्या अतिक्रमण संदर्भात बैठकीत नाईक यांनी कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. ...वाचा सविस्तर
11:14 (IST) 8 May 2025

पुण्यात आणखी एका खासगी रुग्णालयाने देयकासाठी मृतदेह अडविल्याचा प्रकार

संबंधित रुग्णालयात जो प्रकार घडला, त्याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेला दावा असा आहे, की रुग्णाला ४ मे रोजी अँजिओप्लास्टीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
10:59 (IST) 8 May 2025

Malegao Blast Verdict: मालेगाव स्फोट प्रकरणी आज निकाल

१७ वर्षांपूर्वी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंह या प्रकरणात प्रमुख आरोपी असून त्यांच्याबाबत न्यायालय काय निकाल देणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

10:58 (IST) 8 May 2025

साताऱ्यात रक्तटंचाई !केवळ दहा दिवसांचा रक्तसाठा शिल्लक

सातारा शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी झाला आहे.त्यात निगेटिव्ह रक्तगटाची मोठी कमतरता भासत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये दहा दिवस, तर काही ठिकाणी चार दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. ...सविस्तर वाचा
10:57 (IST) 8 May 2025

Mumbai Rain: मुंबईसह आसपासच्या उपनगरांत पावसाची शक्यता

मुंबईत आजही मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईसह आसपासच्या ठाणे, पालघर, वसई-विरार या भागातही पावसाची शक्यता आहे.

10:41 (IST) 8 May 2025

Raj Thackeray-Devendra Fadanvis Meeting: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? यासंदर्भात सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.

Devendra Fadnavis On Operation Sindoor :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Mumbai-Pune News Live Today 08 May 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी