Maharashtra Breaking News Update : आज महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. रामनवमीनिमित्त संपूर्ण राज्यात विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

याबरोबरच छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या सुमाराम दोन गटात राडा झाला. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात असली, यावरून दिवसभर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. याकडेही आपलं लक्ष असणार आहे.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
Maharashtra News in Marathi
Maharashtra News : नाना पटोलेंच्या अपघातामागे संजय राऊतांचा हात? संजय शिरसाटांचा गंभीर आरोप, म्हणाले…
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Live Updates

Marathi News Update : करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!, जिल्हा प्रशासन, महापालिकांना आरोग्य विभागाच्या सूचना

19:45 (IST) 30 Mar 2023
पुण्यातील कामासाठी अधिकारवाणीने कोणाला हाक मारायची?, नारायण राणे यांची भावना; बापट कुटुंबीयांची घेतली भेट

गिरीश बापट यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांचे मला कामात, कारभारात नेहमीच सहकार्य लाभले. बापट म्हणजे पुणे असे एक समीकरण होते. कोणतेही काम असल्यास अधिकारवाणीने बापट यांना सांगायचो, आता मात्र कोणाला हाक मारावी असा प्रश्न आहे, अशा भावना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी व्यक्त केल्या.

सविस्तर वाचा

19:24 (IST) 30 Mar 2023
पुणे : निधनानंतर चोवीस तासांतच गिरीश बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू

खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाल्यानंतर चोवीस तासांतच त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. तसेच बापट यांचे संपर्क कार्यालय या पुढेही सुरूच राहणार आहे. खासदार गिरीश बापट यांचे गुरुवारी निधन झाले. बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक पदापासून सुरुवात करून पुण्याचे खासदार होण्यापर्यंतचा राजकीय प्रवास केला.

सविस्तर वाचा

19:22 (IST) 30 Mar 2023
पुणे : रिझर्व्ह बँकेकडून सहा सहकारी बँकांवर कारवाई

रिझर्व्ह बँकेने सहा सहकारी बँकांवर नियमभंग केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकांना १.१० लाख ते ३ लाख रुपयांदरम्यान दंड ठोठावण्यात आला आहे. यात पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवीतील श्री गणेश सहकारी बँक आणि सोलापुरातील व्यापारी सहकारी बँक मर्यादित या बँकांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा

19:07 (IST) 30 Mar 2023
लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे भाजपकडे नवे हत्यार : शशिकांत शिंदे

ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे नवे हत्यार भाजपाला मिळाल्याची टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी मोदी सरकारवर केली. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित जनता दरबारानंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा

18:54 (IST) 30 Mar 2023
जळगाव: पाळधी दगडफेक प्रकरणी १६ जणांना पोलीस कोठडी - गावात अजूनही संचारबंदी

धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांत दगडफेक झाली होती. याप्रकरणी ५८ जणांना अटक झाली असून, त्यांपैकी १६ जणांना पोलीस कोठडी, तर उर्वरित संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दंगलीतील दोषींवर निश्‍चितच कारवाई होईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा

18:53 (IST) 30 Mar 2023
आता ठाकरे संपले : नारायण राणे

प्रसार माध्यमांशी बोलतांना काही विषयांवर मते व्यक्त करतांना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.  खासदार नवनीत राणा यांचे हिंदू शेरनी अशा आशयाचे फलक लागले आहेत. यातून ठाकरे गटाला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर नारायण राणे म्हणाले की, पुणे शहराबाबत अनेक प्रश्न आहेत.

सविस्तर वाचा

18:47 (IST) 30 Mar 2023
आम आदमी पक्षातर्फे ‘मोदी हटवा, देश वाचवा’ मोहीम

मोदी सरकारकडून विरोधी पक्षांवर केली जाणारी कारवाई, वाढता भ्रष्टाचार, घटनाविरोधी कामकाज या विरोधात आम आदमी पक्षातर्फे अकरा भाषांमध्ये मोदी हटवा देश वाचवा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यातही जनजागृही अभियान राबवले जाणार आहे.

सविस्तर वाचा

18:29 (IST) 30 Mar 2023
नागपूर: गोंधळ घालणाऱ्या लोकांना पाच, सात वर्ष महाराष्ट्राबाहेर ठेवा; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, कोणत्याही समाजाचे असो…

संभाजीनगर येथे गोंधळ घालणारे लोक घातक आहेत. ते कुठल्याही समाजाचे असो, अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे. अशा घटना झाल्यावर काही विरोधी गटातील राजकीय नेते राजकारण करून समाजाला भडकवण्याचे काम करतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वाचा

18:28 (IST) 30 Mar 2023
पुणे: रामनामाच्या जयघोषात श्री रामनवमी उत्सव; पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात भाविकांची गर्दी

बाळा जो जो रे.. दशरथ नंदना… बाळा जो जो रे.. चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषात श्रीरामनवमी उत्सव पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरासह शहरातील विविध मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

सविस्तर वाचा

18:28 (IST) 30 Mar 2023
बुलढाणा: ‘श्रीं’ ची देखणी आरास ठरली लक्षवेधी; शेगावमध्ये ११६ दिंड्यांना भजनी साहित्य वाटप

शेगाव संस्थानच्या वतीने १२९ वा रामनवमी महोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. शेगावसह राज्यातील सात शाखांवर तब्बल दीड लाख भाविकांना आज महाप्रसाद वितरण करण्यात आले. तसेच ११६ नवीन दिंड्यांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सविस्तर वाचा

18:23 (IST) 30 Mar 2023
ठाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला शिंदे समर्थकांची मारहाण; मारहाणीचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी समाजमाध्यमावर मजकूर लिहीतो असे म्हणत ठाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला तीन जणांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करणारे शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:56 (IST) 30 Mar 2023
टिटवाळ्यात शिवसेना-भाजपमध्ये ‘कमळ’ चिन्हावरुन वाद; शिंदे समर्थकांनी उतरविण्यास लावले पेहरावावरील कमळ चिन्ह

कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील सार्वजनिक स्वच्छता कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पेहरावावर लावलेले पक्षाचे कमळ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने काढण्यास सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ उडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने आपणास शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.

सविस्तर वाचा...

17:46 (IST) 30 Mar 2023
अमरावती: प्रेमवीर मुलीला म्हणाला, तू फक्‍त हो म्‍हण, दोघांसाठी रेल्‍वेचा डबा बुक केला आहे, पुढे झाले असे की…

अल्‍पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका मजनूने तिचा पाठलाग सुरू केला. ती बसस्‍थानकावर पोहचताच तो तिच्‍या पुढ्यात उभा ठाकला. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू फक्‍त हो म्‍हण, दोघांसाठी रेल्‍वेचा डबा बुक केला आहे, असा दावा त्‍याने केला.

सविस्तर वाचा

17:30 (IST) 30 Mar 2023
यंदा ठाणे जिल्ह्यात पाणी कपात नाही; बारवी धरणात मुबलक पाणी साठा

बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ५० टक्के भरलेले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत ठाणे जिल्ह्याला अखंडित पाणी पुरवठा करता येणार असून यंदा कोणतीही पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. परिणामी जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 30 Mar 2023
दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; खासदार उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक” उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथे केली.

सविस्तर वाचा...

16:59 (IST) 30 Mar 2023
हनुमान चालिसेचा आवाज मातोश्री पर्यंत पोहोचला पाहिजे, रणी राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

हनुमान चालिसा पठण केलं म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी हनुमान चालिसेचा विरोध केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि धनुष्यबाण गेलं. यंदा हनुमान जयंतीला नवनीत राणा यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही हनुमान चालिका पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा आवाज मातोश्री पर्यत पोहोचला पाहिजे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.

16:58 (IST) 30 Mar 2023
Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड

दिग्गज टेक कंपनी असलेले Google सध्या चॅटजीपीटीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे गुगलने देखील Bard लॉन्च केले आहे. मात्र असे असतानाच NCLAT म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनलने गुगलला जोरदार धक्का दिला आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने गुगलला Play Storeच्या धोरणांचा गैरवापर केल्याबद्दल १,३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. वाचा सविस्तर बातमी

15:47 (IST) 30 Mar 2023
VIDEO:धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या नादात महिला पडली, मग मुलीनेही धावत्या गाडीतून उडी मारली; दैव बलवत्तर म्हणून…

अकोला रेल्वेस्थानकावर धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या नादात एक महिला फलाट व रेल्वेच्या मध्यात पडली. काही क्षणातच उपस्थित नागरिकांनी त्या महिलेला बाहेर ओढून जीव वाचवला. हे दृश्य पाहून रेल्वेमध्ये चढलेल्या त्या महिलेच्या मुलीनेही धावत्या गाडीतून फलाटावर उडी मारली.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 30 Mar 2023
“त्यांना आता इतके आजार झाले की....”; एकनाथ खडसेंच्या 'त्या' टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

गिरीश महाजनांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना इतके आजार झाले आहे की त्यांनी आता त्या आजाराकडे लक्ष द्यावं, माझ्या कावीळचा विचार करू नये, असे ते म्हणाले. जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली

15:05 (IST) 30 Mar 2023
संभाजीनगरमध्ये काल रात्री नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “रात्री ११च्या सुमारास...”

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली. ते एबीपी माझा वृत्तावाहिनीशी बोलत होते. सविस्तर वाचा

14:00 (IST) 30 Mar 2023
पुणे : “संजय राऊत म्हणत होते, ते हेच दंगे….”, किरीट सोमय्यांचं पुण्यातून टीकास्र

संजय राऊत म्हणत होते की,आता दंगे सुरू होणार आहेत.संजय राऊत यांना हेच दंगे म्हणायचे होते का आहेत का ? मी पुन्हा एकदा सांगतो की, संजय राऊत हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या वतीने सांगत होते.आता पुढे दंगलीच सुरू होणार आहे.ही जी दंगल आहे. सविस्तर वाचा…

13:59 (IST) 30 Mar 2023
नितीन गडकरी म्हणतात “मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याचे दुःख”; सांगितली नवी डेडलाईन

मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाचे दु:ख असून या महामार्गाच्या बांधकामाविषयी काही बोलण्यासारखे आहे, मात्र काही सांगण्यासारखे नाही अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पनवेल व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा…

13:58 (IST) 30 Mar 2023
पुणे : ‘फॉरेक्स ट्रेडिंग’ मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला दोन कोटींचा गंडा, एक आरोपी अटकेत, साथीदार दुबईत फरार

परदेशी चलन खरेदी-विक्री व्यवहारात (फाॅरेक्स ट्रेडिंग ) गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या आमिषाने महिलेला दोन कोटी रुपयांची गंडा घालून पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. विक्रांत रमेश पाटील (वय २५, रा. मोराळे, पलूस, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…

13:57 (IST) 30 Mar 2023
शेगावात लाखांवर भविकांच्या साक्षीने रामनवमी उत्सव साजरा; राज्यातील नऊशे दिंड्यांसह हजारो वारकरी दाखल

नटले-सजलेले  ‘श्रीं’ चे मंदिर, राज्यभरातील लाखांवर भाविक, नऊशे दिंड्यासह आलेले वारकरी, प्रभू रामचंद्रांचा गगनस्पर्शी जयजयकार अन ‘गण गण गणात बोते’ चा निरंतर घोष, अशा थाटात अन् पारंपरिक उत्साहात विदर्भ पंढरी शेगाव येथे आज, गुरुवारी माध्यान्ही प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. सविस्तर वाचा…

13:57 (IST) 30 Mar 2023
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलावर पिसवलीतील तरुणाचा बलात्कार

कल्याण पूर्व नेवाळी नाका भागातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शीळ रस्त्यावरील पिसवली गावातील एका ४० वर्षाच्या इसमाने बुधवारी या भागातील एका लॉजमध्ये बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. सविस्तर वाचा…

13:45 (IST) 30 Mar 2023
पाणीकपात धोरण तयार करा; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे आगामी पावसाळ्यात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

सविस्तर वाचा

12:32 (IST) 30 Mar 2023
धुळे: महिलेच्या आत्महत्येनंतर भूखंड हडपणार्या संशयितांविरुध्द गुन्हा

धुळे येथील एमआयडीसीमधील पतीच्या नावे असलेला भूखंड परत मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करुनही न्याय न मिळाल्याने शीतल गादेकर या महिलेने मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्या केली.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 30 Mar 2023
नागपूर: ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराचा शंभर वर्षांचा इतिहास; सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेली ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. रामजन्मोत्सवनिमित्त मंदिरातून गेल्या ५७ वर्षांपासून निघणारी शोभायात्रेचा आता केवळ नागपूरच नाही महाराष्ट्रात नावलौकिक असून लाखो लोक या शोभायात्रेत सहभागी होत असतात.

सविस्तर वाचा

12:02 (IST) 30 Mar 2023
मुंबई : पत्रकाराच्या मारहाणप्रकरणी तक्रार रद्द, अभिनेता सलमान खान याला उच्च न्यायालयाचा दिलासा

पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरोधात दाखल तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. त्यामुळे सलमान याला दिलासा मिळाला आहे. कायद्यासमोर सगळे सारखे असतात. त्यामुळे अभिनेता असो किंवा पत्रकार त्यांनाही कायद्याचे पालन करावेच लागेल, अशी टिप्पणी न्यायालयाने मागील आठवड्यात केली होती.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 30 Mar 2023
प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैशांचा व्यवहार काँग्रेसच्या आमदारावर शेकणार ?

विधान परिषदेचे आमदार डॉ. वझाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाख रूपयांची लाच घेताना मंगळवारी नागपूर येथे एका सरकारी कर्मचाऱ्यासह तथाकथित शिक्षक नेत्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईने राजकीय क्षेत्रासह प्रादेशिक परिवहन खात्यात खळबळ उडाली. सविस्तर वाचा…

11:50 (IST) 30 Mar 2023
वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर

बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते. दर्शनासाठी वेग वेगळ्या राज्यातून भाविकांचा जनसागर उसळला असून बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांची सभा चांगलीच गाजली.

सविस्तर वाचा

11:48 (IST) 30 Mar 2023
संभाजीनगरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे - देवेंद्र फडणवीस

संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यानी दिली. तसेच तणाव निर्माण होईल, असं वर्तन कोणीही करू नये. सर्वांनी शांतता ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं

11:33 (IST) 30 Mar 2023
राजू शेट्टी, संभाजीराजे यांची लोकसभेची तयारी सुरु

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्ष, संघटनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे बिगुल वाजवले आहे.

सविस्तर वाचा...

11:27 (IST) 30 Mar 2023
सप्तश्रृंग गडावर आजपासून चैत्रोत्सव; मंगळवारी कीर्तिध्वज फडकविणार

कळवण:उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गडाच्या शिखरावर चार एप्रिल रोजी कीर्तिध्वज फडकविला जाणार आहे. चैत्रोत्सव सहा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

सविस्तर वाचा

11:04 (IST) 30 Mar 2023
नाशिक: पोलिसांची तपासणी मोहीम; शंभरपेक्षा अधिक गुन्हेगारांविरुध्द कारवाई

शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वजण हैराण झाल्याने चहुबाजूने त्याविषयी ओरड सुरु झाल्यावर उशिराने का होईना पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार मंगळवारी रात्री शहरात ठिकठिकाणी तपासणी (कोम्बिंग ऑपरेशन) करण्यात येऊन सराईतांसह समाजात दहशत निर्माण करणाऱ्या शंभरपेक्षा अधिक जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा

10:46 (IST) 30 Mar 2023
खळबळजनक! वाघ आला आणि घराच्या अंगणातून चार वर्षीय बाळाला उचलून जंगलात घेऊन गेला

सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील  बोरमाळा या गावातून हर्षल संजय कारमेगे या चार ते पाच वर्षीय बालकाला वाघ घराच्या अंगणातून उचलून जंगलात घेऊन गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन खाते तथा पोलिस विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले आहे. सविस्तर वाचा…

10:45 (IST) 30 Mar 2023
३६ बँकांमधील ३५४ कोटींच्या फसवणुकीत ३८० कर्मचारी सहभागी! माहितीच्या अधिकारात २०२२ मधील वास्तव उघड

देशातील ३६ बँकांमध्ये २०२२ या वर्षभरात ३५४.७६ कोटींच्या फसवणूकीत ३८० कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. सर्वाधिक प्रकरणे ‘आयसीआयसीआय’ आणि ॲक्सिस बँकेतील असून या घटनांमुळे बँकांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सविस्तर वाचा…

10:44 (IST) 30 Mar 2023
अश्लील छायाचित्र काढून विवाहित प्रियकाराचा प्रेयसीवर बलात्कार

एकाच कार्यालयात नोकरी करताना झालेल्या प्रेमप्रकरणातून विवाहित प्रियकराने प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर ते छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीचे तीन वर्षे लैंगिक शोषण केले. सविस्तर वाचा…

10:37 (IST) 30 Mar 2023
संभाजीनगरमधील राड्यावरून संजय राऊतांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र; म्हणाले, “मिंधे गटाच्या अनेक टोळ्या...”

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास राडा झालयाची घटना घडली. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या राड्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकावर टीकास्र सोडलं आहे. या घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

10:34 (IST) 30 Mar 2023
नागपूर: अहमदाबाद, पुणे, महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

भुसावळ विभागातील भुसावळ-भादली दरम्यान चौथा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम करण्यासाठी नागपूरमार्गे धावणाऱ्या आणि नागपूरला येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.रेल्वेमार्गाच्या कामासाठी भुसावळ विभागात बिगर इंटरलॉकिंगचे काम ३० आणि ३१ मार्चला करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

10:31 (IST) 30 Mar 2023

राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया (रोबोटिक सर्जरी) केंद्राचा प्रस्ताव विविध कारणांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र, आता खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच अमेरिकेतून हे यंत्र नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) पोहोचणार आहे.

सविस्तर वाचा

10:26 (IST) 30 Mar 2023
Video: “गेल्या ३५ दिवसांत तर सगळ्या मर्यादा पार…”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांचा केला उल्लेख!

आव्हाड म्हणतात, “हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केलं, तर ते गुंड. मग पोलीस छळणार. स्वत: मुख्यमंत्री…!”

वाचा सविस्तर

10:25 (IST) 30 Mar 2023
“…तेही स्वप्नं बघायला लागले, तर कसं होणार राजकारणाचं?” अजित पवारांना शिंदे गटाचा टोला; जयंत पाटलांच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख!

“संजय राऊत काहीही बोलतात. काल सागाची लाकडं चंद्रपुरातून अयोध्येला गेली. त्यांना कधी हे…!”

वाचा सविस्तर

10:06 (IST) 30 Mar 2023
नाशिक: २० लाखाची लाच स्वीकारताना सहायक निबंधकासह दोघे जाळ्यात

सावकारी कायद्यान्वये कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहकार विभागाचे सहायक निबंधक रणजित पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप वीर नारायण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सविस्तर वाचा

10:06 (IST) 30 Mar 2023
नागपूर: ..तर कुलगुरूंचा राजीनामा मागणार? बाविस्कर समितीचा अहवाल नव्याने राज्यपालांकडे

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंवर कारवाईचा अधिकार हा राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती यांना आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीचा अहवाल आता नव्याने राज्यपाल रमेश बैस यांना देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

10:05 (IST) 30 Mar 2023
संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. जमावाने रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती. अफवांवर विश्वास ठेवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

सविस्तर वाचा

10:05 (IST) 30 Mar 2023
यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडूनच २५ लाखांची लाच घेताना मंगळवारी एकाला अटक झाली होती. दुसरा आरोपी फरार आहे. हे प्रकरण ताजे असतानाच डॉ. मिर्झा यांच्या नावानेच यवतमाळमधील आरटीओतील एका अधिकाऱ्याला अडीच कोटींच्या लाचेची मागणी झाल्याचे पुढे येत आहे.

सविस्तर वाचा

राज्यामध्ये बुधवारी ४८३ करोना रुग्ण सापडले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे करोनाचा प्रमाण वाढत असले तरी घाबरू नका, पण काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून नागरिकांना देण्यात आला.