Maharashtra News Highlights: छगन भुजबळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यानंतर सामनातून अग्रलेख लिहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांबाबत आदर असेल तर राजीनामा द्या असा सल्ला देण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मात्र, आता त्याच छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे. असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच करोनाचे रुग्णही महाराष्ट्रात वाढत आहेत. एवढंच नाही तर अनेक भागांमध्ये पावसाच्या सरीही कोसळत आहेत. यांसह सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Today  "एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण भुजबळ..", उद्धव सेनेची मागणी; यासह महत्त्वाच्या घडामोडी

17:36 (IST) 21 May 2025

"सैन्याचे मनोबल खच्ची करणे हेच काँग्रेस नेत्यांचे एकमेव काम", देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, "मी आधी म्हटल्याप्रमाणे, मूर्खांना काय म्हणता येईल? काँग्रेस नेत्यांना गोष्टींमधील फरक दिसत नाही. त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांनी शेतात वापरल्या जाणाऱ्या ड्रोन आणि लढाऊ ड्रोनमध्ये काही फरक वाटत नाही. तर, अशा लोकांना काय उत्तर द्यावे? काँग्रेस नेत्यांचे एकमेव काम म्हणजे सैन्याचे मनोबल कमी करणे."

16:32 (IST) 21 May 2025

दहशतवाद्यांचा नाश करण्यासाठी जगाने एकत्र येणे महत्त्वाचे: आदित्य ठाकरे

दहशतवादाविरुद्ध भारताचे सततच्या प्रयत्नांबाबत माहिती देण्यासाठी भारताशी मैत्रिपूर्ण संबंध असणाऱ्या देशांना भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाबद्दल बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही देशासाठी आपले प्राण देण्यास तयार आहोत. आम्हाला जगाला सांगायचे आहे की, केलेले हल्ले पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी केले आहेत आणि त्यांचा नाश करण्यासाठी जगाने एकत्र येणे खूप महत्वाचे आहे."

15:42 (IST) 21 May 2025

विलवडे येथे कोसळलेली दरड हटविण्यात कोकण रेल्वेला यश,कोकण रेल्वे मार्गावर तीन तास उशिराने वहातूक सुरु

मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती, पण रात्री उशिरा सर्व गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. ...अधिक वाचा
15:38 (IST) 21 May 2025

मराठवाड्यात पूराची सूचना ‘ ड्रोन’ च्या सहाय्याने देण्याच्या हालचाली

मराठवाड्यात पूरस्थितीत सूचना देण्यासाठी आता ‘दवंडी’ऐवजी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांत ड्रोन वापर सुरू असून अन्य जिल्ह्यांनाही तशा सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...वाचा सविस्तर
15:07 (IST) 21 May 2025

भाजपात प्रवेश करणार नाही, डी.पी.सावंत यांचे स्पष्टीकरण

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांवर पूर्णविराम देत आपण पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, नांदेडमध्ये अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठ्या नेत्यांना गळ टाकण्याची रणनीती सुरू केली आहे. ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 21 May 2025

गेले ते दिन गेले; थोरात जुन्या आठवणींमध्ये रमले !

नांदेड दौऱ्यानंतर हैदराबादकडे जाताना बाळासाहेब थोरात ‘भारत जोडो’ यात्रेच्या आठवणीत रमले. यात्रेदरम्यानचा काँग्रेसचा उत्साह आणि आजची पक्षाची स्थिती यातील तफावत त्यांनी अनुभवली. दुसरीकडे, भाजपवासी झालेले अशोक चव्हाण त्या विवाह सोहळ्यात अनुपस्थित राहिल्याने थोरात-चव्हाण भेट टळली. ...सविस्तर वाचा
14:04 (IST) 21 May 2025

Puja Khedkar : "तिने खून केलाय का?", पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Puja Khedkar Case : न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
13:53 (IST) 21 May 2025

शासकीय धानाची गुजरातमध्ये विक्री; गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२४-२५ मधील धानाची भरडाई न करता परस्पर गुजरात राज्यात विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ...सविस्तर बातमी
13:39 (IST) 21 May 2025

नाशिक जिल्ह्यात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमानुसार १६ मे ते तीन जून २०२५ या कालावधीत हे निर्बंध लागू केले आहेत. ...वाचा सविस्तर
13:25 (IST) 21 May 2025

पावसात लघुशंकेला गेला आणि काळ आला; विजेच्या झटक्याने १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अंबरनाथमधील घटना

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश कचरे हा सोळा वर्षांचा तरुण या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडला आहे. ...वाचा सविस्तर
12:45 (IST) 21 May 2025

पिंपरी : मुदत संपूनही पिंपरीत रस्ते खोदाई; महापालिकेने दिला गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्ते खोदाईसाठी दिलेली १५ मेची मुदत संपूनही शहरात काही ठिकाणी खोदाई सुरू आहे. यासंदर्भात महापालिकेने संबंधितांवर दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. ...सविस्तर बातमी
12:40 (IST) 21 May 2025

देशाचं ऐक्य दाखवण्याची ही वेळ आहे, टीका करण्याची नाही-सुप्रिया सुळे

सध्याची वेळ ही सरकारवर टीका करण्याची नाही. दहशतवादाविरोधातली ही लढाई आहे. शरद पवार यांनीही सांगितलं होतं की आम्ही सरकारवर टीका करणार नाही. हीच बाब आम्ही सांगत आहोत. आम्ही कुणावरही टीका करणार नाही. ही ती वेळ नाही. सध्याची वेळ देश म्हणून ऐक्य दाखवण्याची आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

12:20 (IST) 21 May 2025

कल्याणमध्ये श्री सप्तश्रृंगी इमारतीत विनापरवानगी दुरुस्ती केल्याबद्दल सदस्यावर मनुष्य वधाचा गुन्हा

महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना प्रादेशिक अधिनियम कलम ४४ सह एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम २(२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
11:35 (IST) 21 May 2025

जलजीवन योजनांचा भार एमआयडीसीच्या पाण्यावर…

जलजीवन योजनेचा मुख्य उद्देश गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण करणे असला तरी अलिबाग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. परिणामी, योजनेच्या मूळ हेतूलाच तडा जात आहे. ...सविस्तर वाचा
11:01 (IST) 21 May 2025

Mumbai News : चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी नाल्यात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटनेने खळबळ

नाल्यात पडल्यानंतर चिमुकलीने मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून दोन शेजारी संदीप सुतार (३७) आणि शहजाद शेख (२७) तिच्या मदतीसाठी आले. तिला वाचवण्यासाठी दोघांनीही नाल्यात उडी मारली. ...सविस्तर बातमी
10:43 (IST) 21 May 2025

महापालिकेतील बदल्या, बढत्या पुन्हा वादात,अभियंत्यांच्या बढत्यांना स्थगिती, तर काही बदल्यांवर प्रश्नचिन्ह

नवी मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या बढतीला आयुक्त कैलास शिंदे यांनी स्थगिती दिल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, बदल्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...सविस्तर बातमी
10:30 (IST) 21 May 2025

इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन कथित ‘भाई’ला शिवीगाळ केल्याने अपहरण आणि मारहाण

इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर सध्या गल्लीबोळामध्ये राहणाऱ्या तरुणांमध्ये कथित ‘भाई’ बनण्याचे आकर्षण वाढले आहे. ...वाचा सविस्तर
10:21 (IST) 21 May 2025
..तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे, उद्धव सेनेची मागणी काय?

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मात्र, आता त्याच छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे. ते आता भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार का, असा सवाल ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विचारण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात भुजबळांची 'मांडी' नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने फक्त भुजबळांची नव्हे, तर इतर अनेकांची शोकांतिका झाली. फडणवीस, एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल. शिंदे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

minister post Chhagan Bhujbal Ajit Pawar BJP Mahayuti State Government

छगन भुजबळांना मंत्रिपद अजित पवार की भाजपमुळे ? ( image source - Chhagan Bhujbal FB page )

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मात्र, आता त्याच छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे. असा उल्लेख करण्यात आला आहे.