Today’s News Updates, 07 October 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याने आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्याकरता पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी उपोषणाला बसले असून त्यांना राजकीय पाठिंबाही वाढत जातोय. काल रात्री आंदोलनस्थळी नेत्यांची भाषणं झाली. या भाषणांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोहित पवारांनीही या आंदोलनाला धार दिली आहे. तसंच, महाज्योती परीक्षेदरम्यानही आज गोंधळ झाला. विद्यार्थ्यांना पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याने त्यांना परीक्षाकेंद्राबाहेर उभं करण्यात आलं होतं. यावरून मंत्री अतुल सावे यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना मानून धनुष्यबाण चिन्ह दिले. आता न्यायालयासमोर या निर्णयाच्या घटनात्मक, कायदेशीर आधाराची तपासणी होत आहे. मंगळवारची सुनावणी अपूर्ण राहिली असून बुधवारी युक्तिवाद होणार आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Today’s Live News Updates from Maharashtra , 07 October 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

18:50 (IST) 7 Oct 2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेत शंकरराव गडाख, रणजीतसिंह देशमुख बिनविरोध ;सुजय विखे, विवेक कोल्हे व चंद्रशेखर घुले बिनविरोधच्या मार्गावर

अहिल्यानगर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर आणखी ३ जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर आहे. तोपर्यंत आणखी किती जागा बिनविरोध होतात व किती जागांसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट होईल. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठी आता नेत्यांची कसोटी लागेल.

सविस्तर वाचा

17:41 (IST) 7 Oct 2026

मंत्री उदय सामंत यांनी केलं विवेकानंद पाटीलचं कौतुक, पोस्ट लिहित म्हणाले; “तो फोटो पाहून मला आनंद झाला”

MPSC आंदोलनामुळे चर्चेत आलेला विद्यार्थी विवेकानंद पाटील हा मूळचा कोल्हापूरमधल्या राधानगरीचा आहे. विवेकानंद पाटीलचं घर अतिशय साधं, पत्र्याचे आणि मातीच्या भिंतींचे आहे. मात्र या घराचा फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कारण मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी देखील विवेकानंद पाटीलच्या घराचा व्हिडीओ एक्सवर टाकत कौतुक केले आहे. एवढंच नाही तर त्याच्या घरात असलेल्या फोटोचा उल्लेख करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 7 Oct 2026

शक्तीपीठ मार्गासाठी पंढरपूर तालुक्यातील जबरदस्ती विरोधात राज्यभर ९ ऑक्टोबरला आंदोलने; कोल्हापुरातील बैठकीत निर्णय

शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत जयंत पाटील, सतेज पाटील अन् राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल ...सविस्तर बातमी
15:31 (IST) 7 Oct 2026

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांचा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा

https://twitter.com/RRPSpeaks/status/2107763388982186091

15:29 (IST) 7 Oct 2026

LIVE : "परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले, तर आवाज उठवायचा नाही का?" हेमंत ढोमेचा सरकारला थेट सवाल

https://twitter.com/hemantdhome21/status/2107762303731220915

15:12 (IST) 7 Oct 2026

डोशात उंदीर सापडताच तुकाराम मुंढेंच्या FDA विभागाकडे तक्रार, नंतर समोर आला २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रकार

याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन बहिणींविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
15:01 (IST) 7 Oct 2026

विद्यार्थ्याला समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महाज्योतीची जबाबदारी - विजय वडेट्टीवार

https://twitter.com/VijayWadettiwar/status/2107723624954404883

15:00 (IST) 7 Oct 2026

LIVE : "बँकांनी शेतकऱ्यांना केराची टोपली दाखविण्याचे उद्योग सुरू केले", सुप्रिया सुळेंची टीका

https://twitter.com/supriya_sule/status/2107754707011895794

14:28 (IST) 7 Oct 2026

जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता; शेतीपिकांनंतर दुग्ध व्यवसायावरही संकट

जालना जिल्ह्यात पावसाअभावी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता या परिस्थितीचा थेट परिणाम शेतीला जोडधंदा म्हणून सुरू असलेल्या दुग्ध व्यवसायावरही होत आहे. चारा नाही, पाणी नाही... त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष तांगडे यांच्या दुग्ध व्यवसायावरही कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

13:18 (IST) 7 Oct 2026

रायगडच्या खोपोलीत आठ दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात राडा

रायगडच्या खोपोली शहरातील सुमित्राराज खासगी रुग्णालयात आठ दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आक्रमक झाले. नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत बालिकेचे शव पुढील प्रक्रियेसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

13:17 (IST) 7 Oct 2026

दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आर्थिक अडचणींबरोबरच शेतकऱ्यांना मानसिक तणावाचाही सामना करावा लागत आहे. शासनाने धुळे जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

12:50 (IST) 7 Oct 2026

पुणे पदवीधरसाठी ‘राष्ट्रवादी’ची खेळी; शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ...वाचा सविस्तर
12:38 (IST) 7 Oct 2026

LIVE : विवेक भीमनवारांसहित मंत्री अतुल सावेंचाही राजीनामा घ्या, रोहित पवारांची नवी मागणी

महाज्योती परीक्षेतही गोंधळ झाल्याप्रकरणी आता मंत्री अतुल सावे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

12:24 (IST) 7 Oct 2026

IIT मुंबईतील हॉस्टेलमध्ये कोणते पंखे बसवायचे? विद्यार्थ्यांकडून घेणार फिडबॅक; दिले 'हे' चार पर्याय!

IIT Bombay ceiling fans vote student suicide news update : आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर वसतिगृहातील छताचे पंखे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...अधिक वाचा
11:52 (IST) 7 Oct 2026

घराची किल्ली शू रॅकमध्ये ठेवली; चोराने हेरून घरात घुसून रोकड लांबवली

शयनगृहातील कपाटातून रोकड, सोन्याचे दागिने असा दोन लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. ...सविस्तर बातमी
11:44 (IST) 7 Oct 2026

२५ वर्षे विकासाची, मानव कल्याणाची आणि नव्या क्षितिजाला घेऊन जाणारी- देवेंद्र फडणवीस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेड ऑफ दि स्टेट म्हणून २५ वर्षे पूर्ण केले असून आजच्याच दिवशी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द सुरू केली. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून देशाचे पंतप्रधान झाले. आज २५ वर्षे पूर्ण केली, ही २५ वर्षे विकासाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजाला घेऊन जाण्याची आहेत. १२ वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रजाइल फाईलवरून टॉप ५ मध्ये नेण्याचं काम झालं आहे. २५ कोटी गरिबांना गरिबीतून बाहेर काढून नवीन व्यवस्था कायम केली आहे. पुन्हा एकदा संकल्प केला आहे की २०४७ ला विकसित भारत असेल. त्यासाठी वी विल डू इट हा नारा घेतला आहे - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

11:44 (IST) 7 Oct 2026

रावलापाणी सत्याग्रह स्थळाच्या विकासाची योजना, ६० कोटी रुपयांचा आराखडा तयार

स्मृती स्थळावर अत्याधुनिक ग्रंथालय, ॲम्पिथिएटर, संग्रहालय आणि निझरा नदीकाठी वॉक वे ची उभारणी केली जाणार. ...सविस्तर वाचा
11:43 (IST) 7 Oct 2026

समाजाला नेहा बोरासारखे आंदोलनजीवी लागतातंच!

आजचे सत्ताधारी नेहा बोरासारख्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवतात, पण नेहा त्या गटात मोडते- जो ही टीकासुद्धा बिरुदासारखी मिरवेल... ...वाचा सविस्तर
11:43 (IST) 7 Oct 2026

सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेच्या मुलाखतीची भीती ?, नाशिकमध्ये प्रशिक्षणासाठी सुविधा

भारतीय सैन्य, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदाच्या भरतीसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मार्फत घेतली जाणारी परीक्षा. ...सविस्तर वाचा
11:43 (IST) 7 Oct 2026

कुंभमेळ्यात भाविकांसाठी पैशांचे व्यवहार कसे ?, मोबाईल एटीएम, कॅश चेस्ट्स,पीओएस, यूपीआय सुविधांचा विस्तार

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
11:37 (IST) 7 Oct 2026

महाज्योती परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांना पुरेसे संगणक नसल्याचा दावा; रोहित पवारांनी शेअर केला VIDEO

https://twitter.com/RRPSpeaks/status/2107695303151485271?s=20

11:37 (IST) 7 Oct 2026

Gen Z : 'जेन झी' म्हणजे नेमके कोण? कुंभमेळ्याला गेलेल्यांपैकी ६५ टक्के लोक ‘जेन झी’?

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या १४व्या दीक्षांत समारंभात ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन’चे अध्यक्ष प्रा. एस. गुरुमूर्ती बोलत होते ...सविस्तर बातमी
11:26 (IST) 7 Oct 2026

Aditya Thackeray: शिक्षण पद्धतीत बदलासाठी लढा उभारण्याची गरज… शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे असे का म्हणाले?

‘एमपीएससी’ भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस. एम. जोशी पूल येथे आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...सविस्तर बातमी
10:47 (IST) 7 Oct 2026

कांद्याचा वांधा आता संपणार, कोणत्याही हवामानात पिकणारे ८ नवे संशोधित वाण लवकरच बाजारात येणार

कांद्याचे दर आणि हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकरी अन् ग्राहक दोघेही सातत्याने होणाऱ्या नुकसानीने त्रस्त असतात. यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR-DOGR) शास्त्रज्ञांनी क्रांतिकारी तोडगा शोधला आहे. ...अधिक वाचा
10:34 (IST) 7 Oct 2026

अजित पवार यांच्यानंतर बारामतीतील माळेगाव कारखान्याला ७० कोटींचा तोटा? युगेंद्र पवार यांचा आरोप

बारामतीतील प्रतिष्ठित माळेगाव सहकारी साखर कारखान्याला अवघ्या आठ महिन्यांत ७० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे. ...अधिक वाचा
10:33 (IST) 7 Oct 2026

रायगड, पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

आशिका पवार आणि संजना पवार अशी मृत पावलेल्या चिमुकल्या मुलींची नावे असून हळहळ व्यक्त होत आहे. ...सविस्तर वाचा
10:17 (IST) 7 Oct 2026

सायबेरियातून हजारो किमी उडून पक्षी जगतातील 'सुपरमॅन' सोलापुरात दाखल

वन्यजीव सप्ताहादरम्यान या दुर्मीळ पाहुण्याचे दर्शन घडल्याने पक्षीअभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...सविस्तर बातमी
10:15 (IST) 7 Oct 2026

उन्हाळ्यासारखे ऊन तापतेय, ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; अमरावतीत पारा ३९.६ अंशांवर

विदर्भात मान्सूनच्या माघारीनंतर 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा तीव्र झाला असून नागरिकांना उन्हाळ्यासारख्या तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ...सविस्तर बातमी
10:00 (IST) 7 Oct 2026

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मुंबईतही येणार? रोहित पवारांनी विचारल्यानंतर विद्यार्थी काय म्हणाले?

आता आपण ठरवलंच आहे की एकतर एमपीएससी आपल्या दारात येईल, किंवा आपण त्यांच्या दारात येऊ - आदित्य ठाकरे</p>

मग मुंबईत जायचं का असं रोहित पवारांनी विचारल्यावर विद्यार्थ्यांनी हात उंचावून होकार दिला.

Sanjay Raut Press Conference Live: संजय राऊतांची दिल्लीतून पत्रकार परिषद Live

Today’s Live News Updates from Maharashtra , 07 October 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा