Mumbai Maharashtra Breaking News Today: पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हदरवून सोडले आहे. वैष्णवी यांच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार वैष्णवी यांना लग्नानंतर सासरच्या लोकांकडून शारीरिक त्रास होत होता. हुंड्याच्या मागणीसाठी त्यांना सातत्याने मारहाण होत होती.
वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हागवणे फरार होते. मात्र, आज पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला स्वारगेटमधून अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून ते फरार होते. राजेंद्र हगवणे कुटुंबीय राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे राज्यात हे प्रकरण चांगलेच तापले होते. काल हगवणे पिता-पुत्राची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
यासह राज्यातील पावसासह विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Maharashtra News Live Today 23 May 2025: महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स २३ मे २०२५.
हगवणे पिता-पुत्राला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी
जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात पसार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्यांचे चिरंजीव सुशील हगवणे यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. एच. बारी यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सविस्तर वाचा
“एका महिन्यात मुंबई अन् तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार”, किरीट सोमय्या यांचा दावा
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात एक मोठा दावा केला आहे. आता पुढील एका महिन्यात मुंबई आणि त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचं किरीट सोमय्या आंनी आज (२३ मे) माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
Vaishnavi Hagawane Death Case : "आता अति होतंय", वैष्णवी हगवणेप्रकरणात कस्पटे कुटुंबियांना भेटायला गेलेल्या रुपाली चाकणकरांना घेरलं!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : राजेंद्र आणि सुशील हगवणेला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
पुण्यातील वैष्णवी कस्पटे-हगवणे या २३ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. आता पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे. आता वैष्णवी कस्पटे-हगवणे यांचे दीर आणि सासऱ्याला पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० गावे तर ५ तालुके पूरप्रवण म्हणून जाहीर ; सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
पुण्यातील वैष्णवी कस्पटे-हगवणे या २३ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. आता पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे. आता वैष्णवी कस्पटे-हगवणे यांचे दीर आणि सासऱ्याला पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणावरील सुनावणी न्यायलयात पार पडत आहे.
"वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका", रोहिणी खडसे यांचे वकिलांना आवाहन
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी वकिलांनी आरोपींचे वकिलपत्र घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँँग्रेसच्या (शरद पवार) प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले आहे.
https://twitter.com/Rohini_khadse/status/1925837360832328086
धक्कादायक: पुण्यात पुन्हा एका नवविवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या
"आरोपींना पकडण्यात उशीर, यामागे 'पॉलिटिकल नेक्सस'ची शक्यता", वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, "हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आरोपींना पकडण्यात उशीर झाला, यामागे पॉलिटिकल नेक्सस असण्याची शक्यता आहे. गुन्हेगारांना कुठलीही मदत व्हायला नको, इतकी माफक अपेक्षा आहे. पीडितेच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून? याची सखोल चौकशी झाली पाहिजे."
Vaishnavi Hagawane Death Case : “तुला मुलगा होत नाही तर…”, सासरे-दिराकडून मयुरी जगतापला अश्लील शिवीगाळ? अंजली दमानियांकडून ‘ते’ पत्र शेअर
मयुरी जगताप (हगवणे कुटुंबियांची मोठी सून) हिने तिच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले होते. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तिच्या भावाने मयुरी जगतापवर होत असलेल्या अन्यायाबाबत पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. याबाबत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही माहिती दिली. यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी एक पत्रही जोडले आहे. महिला आयोगाला पाठवलेले हेच ते पत्र असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
Vaishnavi Hagawane Death Case : "वैष्णवीला हीच खरी श्रद्धांजली ठरेल", हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी सुप्रिया सुळे उभारणार लढा
हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी सुप्रिया सुळे येत्या २२ जून २०२५ पासून राज्यव्यापी जनजागृती कार्यक्रम राबवणार आहेत. याबाबत त्यांनी एक्सद्वारे माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्राची लेक वैष्णवी कस्पटे- हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंड्याची बळी ठरली. ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल. म्हणून येत्या २२ जून २०२५ पासून राज्यात हुंडाबळी व हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार करतो आहोत. समाजातील सर्व घटकांचा, सर्व यंत्रणांचा सहभाग यात घ्यावा लागेल. या मोहिमेतूनच "हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचे" उद्दिष्ट सध्या करता येईल आणि वैष्णवीला हीच खरी श्रद्धांजली ठरेल."
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींवर मकोका लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नियम..”
वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि नणंद यांना अटक केली आहे. तर फरार असलले सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना आज अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी पोलीस करतील.’ असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Maharashtra Live Updates: "कोणतेही खाते दिले तरी मी काम करेन", छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नुकतेच मंत्री म्हणून शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ खातेवाटपाबाबत बोलताना म्हणाले की, "मला कोणते खाते मिळावे याबद्दल मी कोणतीही मागणी केलेली नाही. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे. मला कोणतेही खाते दिले तरी मी काम करेन."
Vaishnavi Hagwane Case Live Updates: वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अटकेचा व्हिडिओ समोर
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी फरार असलेले त्यांचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. दरम्यान हगवणे यांच्या अटकेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, करूळ घाटात दरड कोसळली
“असे प्रकार सहन केले जाणार नाहीत”, वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा कठोर कारवाईचा इशारा
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असले कोणतेही प्रकार सहन केले जाणार नाही. मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमांत हे प्रकरण बसले तर आरोपींवर मकोको लावता येईल."
Marathi News Live Updates : जवान संदीप गायकर यांना लष्कराच्या वतीनं मानवंदना
किश्तवाडमधील चतरू इथल्या सिंगपोरा भागात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान कर्तव्य बजावताना शहीद झालेले जवान संदीप गायकर यांना लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1925780945904267415
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी आत्महत्येप्रकरणी बावधान पोलिसांनी पत्रकार परिषद दोन मिनिटांत गुंडाळली, पोलीस म्हणाले...
Vaishnavi Hagawane Death Case : "कस्पटेंच्या मुलीची दुःखद घटना घडली, यात माझा काय दोष?" वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
Marathi News Live Updates : "जोपर्यंत ईडी आहे तोपर्यंत मोदी-शाह आणि भाजपा", संजय राऊत यांची टीका
तामिळनाडूमध्ये TASMAC छाप्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला फटकारले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले, "यात नवीन काय आहे? मी देखील ईडीचा बळी आहे. मी यातून गेलो आहे, माझ्यासारखे अनेक जण आहेत. ईडी हे भाजपचा, पंतप्रधान मोदींचे, गृहमंत्री अमित शाह यांचे शस्त्र आहे. जोपर्यंत ईडी आहे तोपर्यंत मोदी-शाह आणि भाजपा आहे."
“वैष्णवी गरोदर असताना तिला उन्हात उभं केलं आणि…”; मयुरी हगवणेने काय सांगितलं?
वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघं राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेने म्हणजेच मयुरीने वैष्णवीला कसा त्रास दिला जात होता? ती गरोदर असताना तिचा कसा छळ केला जात होता हे सांगितलं आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या माहेरच्यांना धमकाविल्याप्रकरणी एकावर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना धमकविल्याप्रकरणी कर्वेनगर येथील नीलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाणने कस्पटे कुटुंबीयांना पिस्तूल दाखवले होते. त्यानुसार चव्हाणवर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त...
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अटकेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, "वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा,सुव्यवस्था व प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे.गुन्हा नोंद आहे,आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे."
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1925731550378733714
“विरोधकांनी आवाज उठवल्यानंतरच पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये”; हगवणे पिता-पुत्रांच्या अटकेवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्ये प्रकरणी त्यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी आज पहाटे अटक केली. वैष्णवी यांच्या आत्महत्येपासून फरार असलेल्या या पिता-पुत्रांवरील कारवाईला विलंब होत असल्याने विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आणि सरकारवर टीका केली होती.
आज हगवणे बाप-लेकाला अटक केल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “विरोधकांनी आवाज उठवल्यानंतरच पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आणि त्यांनी कारवाई केली.”
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स. (छायाचित्र:लोकसत्ता टीम)