Mumbai Breaking News Today: लाडकी बहीण योजनेवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या योजनेत लाडक्या बहिणींना २१०० रुपये न मिळण्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. या विधानावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांनुसार महाराष्ट्रातदेखील मॉक ड्रील होणार का? कशी होणार? याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.
Mumbai-Pune News Live Today 06 May 2025 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा
कराड : बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ३ दिवस पोलीस कोठडी
सांगली : मीठाची भेसळ केलेले १० लाखाचे दूध नष्ट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मॉक ड्रिलचा सराव सुरू
पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी व्यवसायिकांसमोर चिंतेचे ढग
सोलापुरात तळपत्या उन्हात आणखी एक एसटी बस जळाली; आग लागण्याची लागोपाठ चौथी घटना
स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींना २७ % आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत - राजुरकर
खालच्या जातीची असल्याचे कारण देत लग्नास नकार, वसईतील तरुणीची आत्महत्या
नेत्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ताकारणाचा मार्ग मोकळा
Vijay Wadettiwar on Mock Drill: हा फक्त देखावा ठरू नये, एक घाव दोन तुकडे करून टाका - विजय वडेट्टीवार
जर सरकारची भूमिका युद्धाची असेल, तर काँग्रेस म्हणून आमची भूमिका नक्कीच त्यांना समर्थन द्यायची आहे. पण यात वेळ का घालवला जातोय. सध्या युद्ध फक्त वृत्तवाहिन्यांवरच चालू आहे. प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. सरकारनं ते तातडीनं करावं. मॉक ड्रील वगैरे फक्त देखावा ठरू नये. लढाई करा आणि विषय संपवून टाका. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आणि लाहोरपर्यंत सैन्य घुसवलं होतं. ही ताकद त्या काळात होती. आता तर आपला देश कोणत्याही युद्धासाठी समृद्ध झालेला आहे. युद्धाची आपल्या देशाची शक्ती प्रचंड मोठी आहे. १४० कोटींचा हा देश आहे. भारतानं सीमेवर सूसू केली तरी ते वाहून जातील. एक घाव, दोन तुकडे करून टाका - विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar on Mock Drill: विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
युद्ध करायचं असेल, तर एवढं करायची गरज नाही. दहशतवादी सापडत नाहीयेत. ते सीमेपार गेले किंवा आत आहेत ते माहिती नाही. ३०० किलो आरडीएक्स इथे आलं, ते कुणी आणलं हेही अजून सापडलेलं नाही. या सरकारला दहशतवादी का सापडत नाहीयेत? सुरक्षेचा मुद्दा वाऱ्यावर का सोडला? - विजय वडेट्टीवार
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
Maharashtra Local Body Elections : पालिका निवडणुकांमध्ये महायुती, महाविकास आघाडीची कसोटी
Devendra Fadnavis on BMC Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल - देवेंद्र फडणवीस
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महसूल आयुक्तालयाच्या विषयाचा नांदेडच्या भाजपा - सेना नेत्यांना विसर
Devendra Fadnavis in Chaundi: महाराष्ट्रातील मंदिरांच्या विकास आराखड्यांसाठी ५५०३ कोटींना मंजुरी
अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार - १४७ कोटी, तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा - १८६५ कोटी, ज्योतिबा मंदिर विकास आराखडा -२५९ कोटी, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा - २७५ कोटी रुपये, महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा - १४४५ कोटी, माहुरगड विकास आराखडा - ८२९ कोटी असे ५५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Devendra Fadnavis in Chaundi: चौंडीमध्ये देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, अहिल्यादेवी स्मतीस्थळासाठी ६८१ कोटींच्या निधीला मंजूरी
मंत्रिमंडळ बैठकीत चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६८१ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यातून इथे विविध प्रकारची कामं होतील. अखिल भारतीय स्तरावरचं प्रेरणास्थळ म्हणून हे ठिकाण तयार व्हावं असा प्रयत्न आपण केला आहे - देवेंद्र फडणवीस</p>
"चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा", सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; OBC आरक्षणाचं काय?
Chaundi Cabinet Meeting : चौंडी येथे मंत्रिमंडळास खास कांस्य धातूच्या थाळीतून पुरणपोळी, आमरसाची मेजवानी
डीजे संस्कृतीतही पारंपरिक वाद्याचा बाज कायम सनई, वाड्याचे सुरांनी टिकवली आहे पारंपरिक संस्कृती
शिक्षण विभागाचा संचमान्यता आदेश रद्द न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय - आमदार महेश सावंत
प्लास्टिक वापर सुरूच, चार दिवसांत ३६, ३०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
अखेर जलपर्णी सुकवण्यास सुरूवात, नदी किनारची जलपर्णीही हटवण्यास सुरूवात
Jitendra Awhad on Chandrashekhar Bawankule: नको त्या राजकारणाला हात घालू नका, आव्हाडांचं प्रत्युत्तर
काँग्रेस ही लोकचळवळ आहे. काँग्रेस लोकांच्या मनामनात आहे. राजकारणात भाजपा निवडून येते. पण काँग्रेस ही लोकचळवळ आहे. जेव्हा लोक गद्दारी करून इंग्रजांची जी हुजुरी करत होते, तेव्हा काँग्रेसचे लोक जेलमध्ये गेले होते. मग ते गांधी असोत, नेहरू असोत, वल्लभभाई पटेल असोत, सुभाषचंद्र बोस असोत, चंद्रशेखर आझाद असोत किंवा भगकसिंग असोत. त्यामुळे नको त्या राजकारणाला हात घालू नका - जितेंद्र आव्हाड</p>
संदर्भ - चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस रिकामी करण्याचं, काँग्रेसच्या लोकांना भाजपात प्रवेश करवून घेण्याचं आवाहन केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यावरून आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अंबरनाथ : धुमाकुळ घालणारे माकड अखेर जेरबंद, वन विभागाच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनद्वारे कारवाई, बाजार समिती आवार, कोपरी गावात सर्वाधिक बेकायदा धंदे
उरण -द्रोणागिरी रेल्वे स्थानकात यावर्षीही पावसात तळे? स्थानकातील पाणी काढण्यासाठी कायमस्वरूपी पंप
MNS on Rakhi Sawant Praising Pakistan: राखी सावंतला भारतातून हाकलून लावण्याची मनसेची मागणी
"भारतात राहून, भारतात प्रसिद्धी आणि पैसे कमावणाऱ्या राखी सावंत, पाकिस्तान मी तुमच्यासोबत आहे असं म्हणतात ? हे का खपवून घेतलं जातं ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान महोदयांनी या बाईला तात्काळ देशाबाहेर हाकलून द्यावं... " अनिश खंडागळे, चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
Cabinet Meeting in Chaundi: अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक
अहिल्यानगरमधील चौंडी या गावी आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Mumbai-Pune News Live Today 06 May 2025 : मुंबई-पुण्यातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर