Mumbai Maharashtra News Updates, 18 September 2026: महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर भागांमधील जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असून दुष्काळ निवारणाचा कार्यक्रम हाती घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यासंबंधीच्या बातम्यांवर या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असेल. दरम्यान काल रात्रीपासून बीड, लातूरमध्ये काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेनेकडून (शिंदे) नीरज कौल यांनी बाजू मांडताना २०१९ सालातील शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी सादर केली. पक्ष संघटना आणि विधीमंडळ पक्ष वेगळे नाहीत, अशीही बाजू त्यांनी मांडली.
राज्यातील आजच्या प्रमुख महत्त्वाच्या घडामोडी खालील ब्लॉगमध्ये जाणून घ्या.
Marathi News Live Updates from Maharashtra | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
Video: एकनाथ शिंदेंकडून दरे गावात सफरचंद, ब्ल्यूबेरीची यशस्वी लागवड! म्हणाले, "आता विरोधकांच्या पोटदुखीवरही जमालगोटा झाडाची लागवड करणार"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अमित ठाकरे भावाच्या पाठीशी; म्हणाले, 'आदित्य अशा गोष्टींमध्ये…'
'संतोष पंडित आता थांबणार नाही, तुम्ही कुठेही टाका आपली तयारी आहे', कोथरूड पोलीस स्टेशनमधली 'आतली गोष्ट' सांगताना पंडित भावूक
शरद पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळ निवारणासंबंधी महत्त्वाची टिप्पणी
"राज्य सरकारने यापूर्वीच दुष्काळासंबंधी पावले उचलली आहेत. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा झाली आहे. कर्जमाफीची योजना आधीपासून सुरू आहे. तीन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत, पुढील याद्या लवकरच येतील. एनडीआरफची मदत मागणारच आहोत. पण त्यापूर्वी राज्य सरकार स्वतःहून मदत देणार आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चाऱ्याचे नियोजन अशी थेट मदत करणार आहोत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पाठविलेल्या पत्राबद्दल आनंदच वाटतो", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरण : उर्वरित २२ संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडी
नांदेडचे विभाजन केलेच तर मुखेड जिल्हा करा - आमदार राठोड
नाशिक साखर कारखान्याच्या ९०० शेतकऱ्यांची चार कोटींची ऊस बिले थकीत; आराखडा न दिल्यास मालमत्ता जप्ती
मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च १७ हजार कोटींवर! मूळ खर्चात साडेपाच हजार कोटींची वाढ
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाचा मान ग्रामसखींना ! सेलू तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींनी केला महिला नेतृत्वाचा सन्मान
मालेगावात खाजगी रुग्णालयांवर मनपाचा बडगा: 'रुग्ण हक्क सनद' व 'दरपत्रक' न लावणाऱ्या १० बड्या हॉस्पिटल्सना नोटिसा
शिवसेनेच्या (ठाकरे) आमदाराच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची एका पादचाऱ्याला धडक बसल्याची माहिती मिळत आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुनील प्रभू यांची गाडी चालक चालवत असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात पादचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
धंगेकरांच्या कट्टर समर्थकाने कसब्यात साकारली पंतप्रधान मोदींची भव्य ‘रांगोळी’ !
बदलापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद, ७६ टक्क्यांहून अधिक मूर्ती पीओपीच्या
‘आमचे गाव विक्रीस काढले आहे, कोणीतरी विकत घ्या’; सिना-माढा योजनेचे पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांचे आंदोलन
Mumbai Ahmedabad Highway: सविस्तर : ‘बुलेट’ स्वप्नांत बिघडलेला महामार्ग!
शाब्बास ठाणेकर! तब्बल १८.६ टन निर्माल्य संकलित; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कळव्यात ५ झोपड्यांना भीषण आग; मिनी गॅस सिलेंडरचा स्फोट
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे अभिजीत दिपके यांना आव्हान, कारण तरी काय ?
कामाठीपुरा समूह पुनर्विकास: म्हाडा आणि कंत्राटदारामध्ये करार, आता संमती आणि पात्रता निश्चितीच्या कामाला सुरुवात
अंधेरी मेट्रो स्थानकात लवकरच विश्रांतीसह मुक्कामही करता येणार; पर्यटकांच्या, प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकातील पॉड हॉटेल महिन्याभरात होणार सुरू
"सरकारच्या विनंतीनंतर मुंबईत येऊन आंदोलन न करण्याचा निर्णय", जरांगे यांच्यातर्फे उच्च न्यायालयात माहिती
टिपू सुलतान छायाचित्र वाद: मालेगाव महापालिका ते हायकोर्ट; आता सर्वांच्या नजरा निकालाकडे!
भारताचा निवडणूक आयोग गेल्या १०-१२ वर्षांपासून अमित शाहांचा घरगडी म्हणून काम करत आहे. त्यामुळेच दबावाखाली निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय दिला नाही. मूळ राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकायला हवे हाच परिशिष्टाचा आत्मा आहे. धनुष्य-बाण हे चिन्ह फुटीर गटाला देणे, हा शेकडो कोटींचा घोटाळा होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आताचे आणि माजी निवडणूक आयुक्त हे अमित शाहांच्या घरगड्याप्रमाणेच वागले, असाही दावा त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्येही अशाच प्रकारची फूट पडल्याचे दिसते, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

शेतकऱ्यांना मदतीसाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे पत्र (फोटो - FB/Sharad Pawar)
