Mumbai Maharashtra News Updates, 04 June 2026: विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. कोकणात विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे, नितेश राणेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला मोठ्या बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे, बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात दाखल झाले आहेत. अनेक जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या बातम्यांसहच दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Today’s Live News Updates from Maharashtra, 04 June 2026

19:09 (IST) 4 Jun 2026

VIDEO:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत उदयास आला राजकीय समन्वयाचा संजय राठोड पॅटर्न

या प्रक्रियेत पालकमंत्री संजय राठोड यांनी दाखवलेल्या सर्वपक्षीय राजकीय समन्वयाच्या नव्या 'राठोड पॅटर्न'ची आता जिल्हाभर चर्चा रंगली आहे. ...अधिक वाचा
19:03 (IST) 4 Jun 2026

विधान परिषद निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात; सत्तारांचे बंड शमले ; शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराकडून अर्ज मागे

भाजपचे सुहास शिरसाठ यांच्या विरोधात पर्यायी म्हणून गणेश लोखंडे यांनी भरलेला अर्ज प्रमूख उमेदवाराचा अर्ज म्हणून ग्राह्य धरण्यात आला. ...वाचा सविस्तर
19:01 (IST) 4 Jun 2026

तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्र्यांच्या शहरात मोठी कारवाई: ५८ लाखांचे रेडी टू सर्व ड्रिंक आणि न्युट्रास्युटीकल जप्त

चुकीच्या लेबलिंगमुळे 'मिसब्रँडेड' ठरलेले सुमारे ३६ हजार लिटर एनर्झल फ्रूट ड्रिंक, न्युट्रास्युटीकल आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांसह एकूण ५८.४२ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला ...वाचा सविस्तर
18:44 (IST) 4 Jun 2026

VIDEO: ५० वर्षात तुकाराम मुंढेसारखा अधिकारी पाहिला नाही; माजी मंत्र्यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र, ही केली मागणी

५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आपण असा कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिला नसल्याचे सांगत सावजी यांनी मुंढेंच्या २१ वर्षांतील २४ बदल्यांची चौकशी करण्याची मागणीही या पत्रात केली आहे. ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 4 Jun 2026

अवैध शाैचालयाच्या बांधकामावरील कारवाईनंतर राजकारण तापले

या कारवाईनंतर पनवेलमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ताधारी आणि प्रशासनावर जनतेच्या पैशांचा अपव्यय केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...अधिक वाचा
18:08 (IST) 4 Jun 2026

वाघांच्या कॉरिडॉरवरील खाणकाम वादात नवे वळण, आदित्य ठाकरेंचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला पत्र

या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून प्रस्तावित लोहखनिज उत्खनन प्रकल्पाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (NTCA) पत्राद्वारे केली आहे. ...सविस्तर वाचा
18:08 (IST) 4 Jun 2026

नागपुरात काँग्रेसच्या डमी उमेदवाराची माघार , पोतदार- लोंढे यांच्यात थेट लढत

त्यामुळे आता भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...सविस्तर वाचा
18:05 (IST) 4 Jun 2026

घोडबंदरमधील ५० हून अधिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद; आठवडाभरात कृती आराखडा राबविण्याचा निर्णय

१५ एसटीपी प्लांट नादुरुस्त तर ३० पेक्षा अधिक अद्याप सुरूच नाही; २५ टक्के पाण्याचा पुनर्वापर रखडला ...सविस्तर वाचा
17:58 (IST) 4 Jun 2026

गोकुळच्या ४२७ दूध संस्था अपात्र प्रकरणी सतेज पाटील यांच्या संस्थांच्यावतीने सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल

सुट्टीच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यास मिळाली परवानगी; ॲड. श्रीकृष्ण गणबावले मांडणार बाजू ...वाचा सविस्तर
17:51 (IST) 4 Jun 2026

प्रयागराज-हुबळी दरम्यान नागपूर मार्गे धावणार समर स्पेशल ट्रेन

नागपूर मार्गे धावणाऱ्या या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूंनी ६-६ अशा एकूण १२ फेऱ्या होणार असून, यामुळे विदर्भातील व नागपूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...अधिक वाचा
17:47 (IST) 4 Jun 2026

गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्प २०२८ मध्ये पूर्ण करण्याच उद्दिष्ट्य ; बोगदा खणण्यास लवकरच सुरुवात होणार

दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडपर्यंत ४.७० किमीचे समांतर जुळे बोगदे; बोगदा खनन संयंत्राचे (TBM) सुटे भाग जोडण्याचे काम गतीने सुरू ...सविस्तर बातमी
17:32 (IST) 4 Jun 2026

एक्स्प्रेसमधून सव्वातीन लाखांचा गुटखा जप्त; तस्करीचा पर्दाफाश

रोहित मिश्रा आणि पंकज साहू या विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन तस्करांना आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात ...अधिक वाचा
17:15 (IST) 4 Jun 2026

सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटना आक्रमक; १८ जूनपासून पुकारणार कामबंद आंदोलन

येत्या ७ दिवसांत ग्रॅच्युइटी, थकीत सुट्टीचा पगार आणि सुरक्षा साहित्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास १८ जून २०२६ पासून संपूर्ण पालिका क्षेत्रात तीव्र कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा संघटनेने दिला आहे. ...अधिक वाचा
17:12 (IST) 4 Jun 2026

श्रीकांत पाटलांची माघार, विक्रम काकडेंचा मार्ग मोकळा

पुणे विधानपरिषद निवडणूकीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

17:00 (IST) 4 Jun 2026

कल्याण-डोंबिवली पालिका नगररचना विभागातील नियमबाह्य नियुक्त्या, गैरकारभाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात मंजूर नसलेल्या पदांवर अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर नियुक्त्या करून बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
16:46 (IST) 4 Jun 2026

'बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी', खासदार संजय राऊत

"बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे", अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/2062450060949078276

16:41 (IST) 4 Jun 2026

परळीत पुन्हा पैशांच्या वादातून खून; मित्राला संपवून मृतदेह रेल्वे सुळावर फेकला

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाने लागला माग ...सविस्तर बातमी
16:35 (IST) 4 Jun 2026

डोंबिवली म्हात्रेनगरमध्ये लॉन्ड्री व्यावसायिकाला तीन तरूणांची लॉन्ड्रीत घुसून बेदम मारहाण

पतीच्या बचावासाठी आलेल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाळ, व्यावसायिकाच्या भावालाही कमरेच्या पट्टयाने मारले ...सविस्तर बातमी
16:27 (IST) 4 Jun 2026

यवतमाळ विधान परिषद निवडणूक; महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत व्हावा, यासाठी यवतमाळ विधानपरिषदेची जागा भाजपलाच मिळावी, अशी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 4 Jun 2026

दारूबंदीने व्यसनमुक्ती होत नाही : वडेट्टीवारांचे विधान

दारूबंदी लागू केल्यामुळे कोणताही माणूस व्यसनमुक्त होत नाही, त्यामुळे या मुद्द्यावरील चर्चा पूर्णपणे अयोग्य असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात सांगितले. ...सविस्तर वाचा
16:18 (IST) 4 Jun 2026

विद्युत बसचालकांना चार आठवड्यांचे प्रशिक्षण ; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्टचा निर्णय

मुंबईत बेस्टच्या भाडेतत्त्वावरील विद्युत बसचे वाढते अपघात आणि आगीच्या सत्रानंतर प्रशासनाने चालकांसाठी ४ आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. ...सविस्तर वाचा
16:16 (IST) 4 Jun 2026

जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोलीत शेतकऱ्यांचा आक्रोश; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्यांसह बेमुदत ठिय्या..

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण असून शेतकऱ्यांची मोठी गर्दी आणि आंदोलनाची संभाव्य तीव्रता लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
16:16 (IST) 4 Jun 2026

पुत्राच्या कॅसिनो प्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची ठाकरेसेनेकडून मागणी; रविकिरण इंगवले यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई - ऋतुराज क्षीरसागर

कोल्हापूरचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ जारी करत ठाकरे गटाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...अधिक वाचा
16:12 (IST) 4 Jun 2026

नांदेडमध्ये काँग्रेसची माघार; वि.प.साठी तिरंगी लढत!

आता भाजपचे अमरनाथ राजूरकर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांच्यात तिरंगी लढत निश्चित झाली असून, महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. ...सविस्तर वाचा
16:11 (IST) 4 Jun 2026

'चांदी की दिवार ना…' चांदीच्या आयातीवर केंद्राचे निर्बंध; बाजारपेठ सुन्न आणि सुवर्णकर म्हणतात आता काळाबाजार…

देशांतर्गत बाजारात होणारी चांदीची विक्रमी आयात रोखण्यासाठी आणि देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल टाकल्याचे म्हटल्या जात आहे. ...वाचा सविस्तर
16:07 (IST) 4 Jun 2026

‘राज्य नाट्य स्पर्धे’च्या अंतिम नाटकांची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दर्जेदार नाटकांची तिकिटे पहिल्यांदाच 'तिकीटालय' ॲपवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ...सविस्तर बातमी
16:00 (IST) 4 Jun 2026

राज्यातील वीज क्षेत्रात मोठा बदल; कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी, महावितरणच्या वीज दरावर हा परिणाम…

राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या पुनर्रचना व हस्तांतरण योजनेची आयोगाने अधिकृत नोंद घेत कृषी ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र शासकीय कंपनीला वितरण परवानाधारक म्हणून मान्यता दिली आहे. ...सविस्तर वाचा
15:56 (IST) 4 Jun 2026

‘MPSC’च्या ताज्या घडामोडी: एका क्लिकवर बघा आठ दिवसांतील निकाल आणि मुलाखतीच्या कार्यक्रमाची माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आयोगाने चार दिवसांमध्ये अनेक परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ...वाचा सविस्तर
15:52 (IST) 4 Jun 2026

हेलिकॉप्टरसमोर प्रपोज करणाऱ्या कॅप्टनवर कारवाई होणार?; निवृत्त लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लों भडकले, ट्रोलर्सना सुनावले खडे बोल!

Army Pilot Proposal Video Gen KJS Dhillon backs the young captain: या संपूर्ण वादात लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग धिल्लों यांनी उडी घेतली असून, त्यांनी तरुण कॅप्टनची पाठराखण करत ट्रोलर्सचे कान टोचले आहेत. ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 4 Jun 2026

कोकणात महाविकास आघाडीला धक्का; मानेंच्या माघारीने तटकरे यांचा मार्ग सुकर! ‘घोडेबाजारा’च्या आरोपांदरम्यान मानेंची माघार

भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. ...वाचा सविस्तर

Latest Maharashtra News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स