Maharashtra Political News Updates, 16 April 2026 : सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार केला जात आहे. तर दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचाली सुरू झाल्या आहेत. याबरोबरच संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणी विविध नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस अधीक्षक तथा अचलपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वात १० पोलीस अधिकारी आणि ३६ अंमलदाराचे स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील धागेदोरे लवकरच उघड होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. या आणि इतर ताज्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत….
Maharashtra Mumbai Pune News Live Updates, 16 April 2026 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा
नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई! आठ अधिकारी निलंबित, सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांचीही चौकशी, कारण काय?
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या आईचा उशीने तोंड दाबून खून
नाशिक टीसीएस प्रकरण; भाजपानंतर आता सकल हिंदू समाज आक्रमक, 'कॉर्पोरेट जिहाद'विरोधात एल्गार!
शोरुम चालकाला हत्याराचा धाक दाखवून १४ लाखाला लुटले
भुसावळ नगराध्यक्षांच्या गंभीर आरोपानंतर… रजनी संजय सावकारे यांची ‘ही’ पहिली प्रतिक्रिया
धुळ्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पार; उकाड्याने नाकरिकांचे हाल, आरोग्य विभागाचा उष्माघाताबाबत इशारा!
धुळे जिल्ह्यात तापमानाने ४२ अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत असून थंड पेये व पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत तापमान वाढण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम धुळे जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत असून मागील काही दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी ३८ अंशांच्या आसपास असलेले तापमान दोन दिवसांपूर्वी ४० अंशांवर गेले. त्यानंतर ४१ अंशांवर स्थिरावत आता थेट ४२ अंशांपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
CBSE Topper : अभ्यासासाठी पालकांनी दबाब टाकला नाही म्हणून यश मिळाले; सुरभी रानडे या विद्यार्थींनीची प्रतिक्रिया
प्रत्येक जिल्ह्यात ‘बिबट्या सफारी’चा सरकारचा विचार; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यात शिक्षकांचे आंदोलन
Video : लोकसभेत आदित्य ठाकरेंच्या उल्लेखावरून मोठा गदारोळ! निशिकांत दुबे आणि अरविंद सावंत यांच्यात 'हाय व्होल्टेज' ड्रामा
Video : लोकसभेत आदित्य ठाकरेंच्या उल्लेखावरून मोठा गदारोळ! निशिकांत दुबे आणि अरविंद सावंत यांच्यात 'हाय व्होल्टेज' ड्रामा
गॅस बिल भरण्याच्या नावाखाली सायबर चोरांकडून दोघांची १ लाख ४४ हजारांची फसवणूक
डोंबिवली टिळकनगर रोडवर जांभळीच्या झाडाची फांदी कोसळली; दुचाकीचे नुकसान, पादचारी किरकोळ जखमी…
सहाय्यक आयुक्तांचे दालन पंचतारांकित; प्रभाग समिती अध्यक्षांच्या पदरी कोंडवाडा
"मराठी सक्ती करा, पण आजच बोला म्हणू नका!", गणेश नाईक यांची प्रताप सरनाईक यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया
मशरूमच्या शेतीतून स्वयंरोजगाराकडे वाटचाल! मुरबाड तालुक्यात सविता गायकर यांचा मशरूम शेतीचा यशस्वी प्रयोग…
Mumbra Diva Mangroves: मुंब्रा-दिवा भागातील ६६ एकर क्षेत्रातील खारफुटी नष्ट
शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतील वाढत्या दुचाकी वाहनांमुळे वाहन कोंडी; भीषण अपघाताची प्रवाशांना भीती
Bribery Case: ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; २५ हजारांची लाच घेताना वनपाल आणि वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात
देवघर येथील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश
माती भराव टाकून बावखले उध्वस्तसंवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थ आक्रमक
नांदेडमध्ये चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू!
टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?
महागाईचा ठसका! मसाला पदार्थांच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ, गृहिणींचे बजेट कोलमडले...
वणव्यांचा विळखा; नाशिकच्या वनसंपदेची धग, वन विभागाच्या कागदी नियोजनावर ग्रामस्थांचा संताप
३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा, पण मतदारसंघ पुनर्रचना थांबवा - उद्धव ठाकरे
होट्टलच्या काळा पाषाणात तुळजाभवानी मंदिराचे पुनरुज्जीवन; नांदेडच्या होट्टलमधील पाषाणातून २० स्तंभांची उभारणी
होट्टलच्या काळा पाषाणात तुळजाभवानी मंदिराचे पुनरुज्जीवन; नांदेडच्या होट्टलमधील पाषाणातून २० स्तंभांची उभारणी
महिला आरक्षणावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, "३३ टक्के महिला आरक्षण..."
"माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महिला आरक्षण विधेयका बाबत ताजे निवेदन: “महिला आरक्षण विधेयकावर सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे . शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे २०२३ साली महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले आहेच, त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा! मतदार संघ पुनर्रचना म्हणजे delimition या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे , हा एक व्यापक व राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, आमच्यासाठी हा एकाद्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा विषय नसून देशाच्या भविष्याचा विषय आहे.म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणे आवश्यक आहे!” उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख," अशी पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे.
