Marathi News Updates, 09 October 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची महत्वाची बैठक देखील पार पडणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपाला मोठं यश मिळालं. भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे आता हरियाणात सलग तिसऱ्यांजा भाजपाचं सरकार स्थापन होईल. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणामधूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today, 09 October 2024 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
पुणे : शिक्षण विभागाकडून पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची भरती राबवली जाणार आहे.
चंद्रपूर : मूल तालुक्यातील आणि सावली वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या राजोली बिटातील डोंगरगाव शेत शिवारात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला.
नवी मुंबई : पोलीस मुख्यालयात कार्यरत असताना रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी साडेतीनलाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एन.आर.आर. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली. एसीबीच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली.
नागपूर : कंत्राटदाराने जर चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर त्यांच्यासह अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
कल्याण – गाई, म्हशींनी अधिक दुधाळ व्हावे म्हणून या दुधाळ प्राण्यांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनमध्ये लागणारे औषध बेकायदा तयार करणाऱ्या एका इसमाला कल्याण गुन्हे शाखा आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी कल्याण पश्चिमेतील तबेले बहुल भागातील गोविंदवाडी परिसरात अटक केली.
शहरातील विधानसभेच्या तीनपैकी दोन जागांसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस हे दोघे अडून बसले असताना महाविकास आघाडीचा तिन्ही मतदारसंघात प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येकाने एकेक जागा लढवावी, असा तोडगा राष्ट्रवादीने (शरद पवार) सुचविला आहे.
अमरावती : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला काही दिवसांचा अवधी राहिला आहे. पण, राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे.
पिंपरी : लोकसभा निवडणुकीवेळी काही लोकांना शब्द दिले होते. परंतू, ते शब्द आता बाजूला गेले. आणि तिथे दुसऱ्या लोकांना घेण्यात आल्याचे सांगत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशावरून टोला लगाविला.
मुंबई : जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी साडेतीनलाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एन.आर.आर. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली. एसीबीच्या मुंबई विभागाने ही कारवाई केली.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या चार भूखंडांवर २,३९८ घरांचे बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे.
महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा ब-यांच अंशी सुटलेला आहे. थाेडा फार बाकी आहे. ताे आम्ही लवकरच एकत्र बसून साेडवू. – अजित पवार</p>
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव पासून सुरू झालेली हिंदू बहुजन सन्मान यात्रा सातारा , कराड , मान, माळशिरस तुळजापूर,बार्शी ,करमाळा मार्गे आज कर्जत जामखेड विधानसभेत दाखल झाली यावेळी जवळा, नान्नज, हाळगाव ,चौंडी कर्जत येथे ग्रामस्थांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले.
भारतीय जनता पार्टीचे आमदर योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात बहुजन हिंदू सन्मान यात्रा सुरू असून यामध्ये सावित्री ते अहिल्या अशा पहिल्या टप्प्याचे आयोजन केले गेले होते , आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मारकाला अभिवादन करून आमदार योगेश टिळकेरानी यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे समारोप केला.
यावेळी बोलताना त्यांनी या महाराष्ट्रात काही राजकीय पक्षांकडून राजकीय हेतूने हिंदू धर्मात फूट पाडण्याचं पाप सुरू आहे हिंदू धर्मातील जाती – जातीमध्ये वाद लावून कधी अभिजना विरुद्ध बहुजन असे म्हणायचं तर कधी प्रतिगामी पूरोगामी असे चित्र निर्माण करून या बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे परंतु हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या भगव्याचा असून या भगव्या छताखाली आम्ही सकल बहुजन हे एकत्र गुण्या-गोविंदाने राहणार असून आमच्यात कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचे डाव आपण हाणून पाडणार आहोत असे बोलताना श्री टिळेकर म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर (ट्विटर) दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आह.
कोणाला देण्यात आली उमेदवारी
मलकापूर विधानसभा मतदार संघामधून शाहेजाद खान सलीम खान, बालापूर मतदारसंघामधून खतीब सईद नतीकुद्दीन, परभणीमधून सईद सामी सईद साहेबजान, छत्रपती संभाजीनगरमध्यमधून मोहम्मद जावीद मोहम्मद इश्क, गंगापूरमधून सयैद गुलाम नबी सयैद, कल्याण पश्चिममधून अयाझ गुलजार मौलवी, हडपसरमधून एड.मोहम्मद अफ्रोज मुल्ला, माणमधून इम्तियाज जफर नडाफ, शिरोळमधून आरिफ मोहम्मद अली पटेल आणि सांगलीमधून आल्लाउद्दीन काजी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its second list of candidates for the Maharashtra Assembly elections. #maharashtraassembly2024 #voteforvba #voteforgascylinder pic.twitter.com/giKQ2aiYrd
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 9, 2024
कल्याण – कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी गुणवंत विद्यार्थी सोहळ्याच्या निमित्ताने कल्याण पश्चिम, मोहने, टिटवाळा भागात लावण्यात आलेले रस्त्यांवरील फलक काही अज्ञातांनी फाडून टाकले आहेत. याप्रकरणी राजकीय, सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, बाजारपेठ पोलिसांकडे केली आहे.
नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील दोन नेत्यांत सुरू असलेला वाद आता पालिकेच्या दारात पोहोचला आहे. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असलेल्या उद्घाटन कार्यक्रमांवर आक्षेप घेत ‘अर्धवट कामांचे उद्घाटन कशाला’, असा संतप्त सवाल आमदार गणेश नाईक यांच्या समर्थकांनी पालिका आयुक्तांना केला.
नवी मुंबई : लाच लुचपत विभागाच्या मुंबई युनिटने एन आर आय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना चार लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले. सदर कारवाई अपरात्री करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटने पूर्वी रस्त्यावर गस्त पोलिसांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या पाच पोलिसांना निलंबित केले होते.
पनवेल: नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने तळोजा परिसरातील एकटपाडा येथील एका इमारतीमध्ये धाड घालून मंगळवारी दुपारी २५ लाखांचा अंमली पदार्थाचा साठ्यासह तीघांना अटक केली. मागील अनेक महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
बल्लारपूर या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर शिवसेना( ठाकरे ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत रस्सीखेच पहायला मिळू शकते. सविस्तर वाचा
विक्रमगड विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून भाजपाच्या विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षातील स्थानिक उमेदवाराला यंदा उमेदवारी द्यावी यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरला आहे. सविस्तर वाचा
नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी महायुतीमध्ये चुरस असताना महाविकास आघाडीची मात्र याठिकाणी उमेदवासाठी शोधाशोध सुरू आहे. सविस्तर वाचा
धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या हालचालींमुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यात राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. सविस्तर वाचा
जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर आणि परतूर या विधानसभेच्या जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. महायुती मध्ये जिल्ह्यातील पाचपैकी या तीन जागांच्या व्यक्तीरिक्त उर्वरित घनसांगवी आणि जालना या दोन जागांवरही भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही दावा सांगत आहेत. सविस्तर वाचा
राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सविस्तर वाचा
काळाचौकी येथील अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अॅण्ड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. सविस्तर वाचा
अंबरनाथः एका हत्येच्या घटनेने अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली. अंबरनाथमध्ये पतीनेच पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ही घटना घडली. पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता.
डोंबिवली येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील सागाव भागातील चेरानगरमधील रविकिरण सोसायटी येथे भंगाराचा व्यवसाय करणारे चार जण या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची दररोज छेड काढत होते. या सर्व महिलांनी मिळून मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर मानपाडा पोलिसांनी या चारही भंगार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील कृष्णा टाॅवरच्या बाजूस आणि पालिका पाण्याच्या टाक्यांच्या समोरील भागात सार्वजनिक वर्दळीचा रस्ता बंद करून एका सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम भूमाफियांनी सुरू केले आहे.
भारतीय जनता पक्षाला हरियाणाच्या निवडणुकीत मोठं यश मिळालं. मात्र, काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी हरियाणातील पराभव हा दुर्देवी आहे. मात्र, यातून आम्हाला खूप गोष्टी शिकता येतील. देशातील निवडणुका आम्हाला एकत्र लढाव्या लागतील. कुणी स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचे यश. मात्र, हरियाणातील निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही.पण काँग्रेसलाही एक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. “त्यांनी अग्रलेख मुद्दाम लिहिला का? असं त्यांना विचारणार आहे”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.