Maharashtra Breaking News Live Updates, 18 October 2024: केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आणि राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. येत्या काही दिवसांत महायुती व महाविकास आघाडीचं जागावाटप व त्यानंतर उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात होईल. यातून अनेक इच्छुकांची नाराजी आणि उमेदवारांचा प्रचार एकाच वेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच भेटीगाठींना वेग आला असून निवडणुकांचा राजकीय पट आता रंगू लागल्याचं दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Today, 18 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ संबंधित सर्व घडामोडींचा आढावा!
Congress Shares Elon Musks Old Video: काँग्रेसनं एलॉन मस्कचा जुना व्हिडीओ केला शेअर!
“ईव्हीएमवर निवडणुकीत मतदान होता कामा नये, कारण ईव्हीएम कम्प्युटर प्रोग्रॅमिंगशी जोडलेले असतात त्यामुळे ते हॅक करणं शक्य आहे”, काँग्रेसनं शेअर केला एलॉन मस्कचा ‘तो’ व्हिडीओ!
EVM से चुनाव में वोटिंग नहीं होनी चाहिए,
— Mumbai Congress (@INCMumbai) October 18, 2024
क्योंकि EVM कंप्यूटर प्रोग्रामिंग से जुड़ा हुआ होता है और इसे हैक करना संभव है – एलन मस्क pic.twitter.com/lkbu4SFiz1
Nana Patole on MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद? नाना पटोले म्हणतात…
माझ्या पक्षाच्या हिताचे, महाविकास आघाडीच्या हिताचे मुद्दे मी मांडणार. संजय राऊत जर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावंच लागत नाही, त्यांचे निर्णय उद्धव ठाकरेंचेच निर्णय असतील तर ते मोठे माणसं आहेत. पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे. आमचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला द्यावी लागते. जयंत पाटलांना शरद पवारांना माहिती द्यावी लागते. संजय राऊतांच्या बाबतीत असं काही नसेल तर तो त्यांचा भाग आहे. जागावाटपाचा तिढा सुटेल आणि सर्वकाही चांगल्या पद्धतीने होईल – नाना पटोले</p>
मी आत्ता कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्या बैठका चालू आहेत. खूप साऱ्या गोष्टी डोक्यात आहेत. मला माझ्या परिवाराचंही संरक्षण करायचं आहे. जेव्हा मला उत्तरं मिळतील, तेव्हा मी तुम्हालाही उत्तरं देईन. देवेंद्र फडणीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त असे सगळेच या प्रकरणात तपासाबाबत गंभीर आहेत – झिशान सिद्दिकी
मुंबई : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालयामध्ये ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बुलढाणा : चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांचा फॉर्म ७ व फॉर्म ८ ऑनलाईन भरुन त्यांच्या संमतीशिवाय मतदार यादीतून नावे वगळल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला.
अमरावती : बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात घडलेल्या एका महिलेच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीसोबत ‘नको त्या’ अवस्थेत बघितल्याने पतीने संतापाच्या भरात तिच्या डोक्यावर विटेने प्रहार करून हत्या केली.
नाशिक – वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील वित्त व लेखा विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. किरण दराडे (४०) आणि सचिन पाटील अशी दोघांची नावे आहेत. तक्रारदार हे शिक्षक असून त्यांच्यासह इतर १७ शिक्षकांची वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करणे बाकी होते. सेवापुस्तके लेखाधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून वेतन पडताळणी मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पंच साक्षीदार यांच्यासमक्ष सुरूवातीला प्रत्येक सेवा पुस्तकाचे ७०० रुपये याप्रमाणे १८ पुस्तकांचे १२, ६०० रुपये दराडे आणि पाटील यांना देण्याचे. तडजोडीत ११ हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की ….
नागपूर : एक व्यापारी सायबर गुन्हेगारांच्या ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात फसला व त्यानंतर त्याच्या मित्रानेच ‘न्यूड व्हिडिओ व्हायरल’करण्याची धमकी देत २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
नागपूर : जन्मानंतर बाळ रडले नाही तर त्यामध्ये गंभीर समस्या संभावत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
अधिकाऱ्यांना मलईदार पदांसाठी एकही रुपया मोजावा लागला नाही तर ते भ्रष्टाचार करणार नाहीत अशी मनिषा आयुक्तांची होती.
पुणे : डेअरीत आग लागून मालकाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर भागात घडली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या डेअरी मालकाचे नाव आहे.
मागील १७ महिन्यांत पोलीस अधिकारी बानकर व त्यांच्या पथकाने दंडात्मक कारवाईतून सव्वा कोटी रुपयांचा महसूल नवी मुंबई पोलीसांच्या तिजोरीत जमा केला होता.
मिरा रोड येथील मुस्ताक शाह नावाच्या मांत्रिकाने जादूटोणा करून आर्थिक परिस्थिती सुधारेल असा दावा केला होता.
नागपूर : काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणामध्ये दिलासा दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य शासनाने आव्हान दिले.
अंतर्गत कलहामुळे भाजपात उघड दुफळी माजली असतानाच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यापुढे नवनवी आव्हाने उभी राहत आहेत.
काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. याप्रकरणात पोक्सो कायद्यांतर्ग गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. परंतु अवघ्या दोन दिवसांत आरोपीला जामीन मिळाला.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव-नांदिवली पंचानंद येथील जमीन मालक जयेश म्हात्रे यांची वडिलोपार्जित जमीन हडप करून त्यावर स्थानिकांच्या मदतीने बेकायदा बांधकामाची उभारणी करणारा श्री स्वस्तिक होम्सचा विकासक मयूर रवींद्र भगत यांना मानपाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. सविस्तर वाचा…
जळगाव – चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला सुमारे ५०० फूट दूर फेकली जाऊन चार वेळा उलटली. या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. सविस्तर वाचा…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट कशी पडेल आणि अजित पवारांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. सविस्तर वाचा…
नागपूर : राज्यात १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर दरम्यान मागील दोन वर्षांची तुलना केल्यास यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ आहे. परंतु आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे
प्रसिध्द डान्स दिग्दर्शक रेमो डिसोजा याने या तरुणांच्या आयुष्यावर सिनेमा देखील बनविण्याची घोषणा केली होती. मात्र आमची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बृहन्मुंबई क्षेत्रात उभारत असलेल्या मेट्रो मार्गिकांच्या निधी पूर्ततेसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त विकास शुल्क वसूल केले जात आहे.
नागपूर : भाजपमध्ये पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या काही निष्ठावंत समर्थकांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरडब्ल्यूवाय ९/२७ आणि आरडब्ल्यूवाय १४/३२ या दोन धावपट्ट्यांची पावसाळ्यानंतरची वार्षिक देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा…
Raj Thackeray on Toll: हा काय आमच्या घरचा सत्यनारायण होता का? – राज ठाकरे
टोलनाक्याच्या आंदोलनासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत. हा काय आमचा घरचा सत्यनारायण होता का? ती लोकांसाठी म्हणून केलेली गोष्ट होती. आज सगळेच खूश असतील. इतकी वर्षं आपल्यावर टोळधाड पडली होती. पैसे कुठून आले, कुठे गेले, किती पैसे आले याचा कशाचाच पत्ता नव्हता. मी आज झालेल्या निर्णयासाठी मनसे कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो – राज ठाकरे</p>
‘परिवर्तन महाशक्ती’चे १५० जागांवर एकमत
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’चे राज्यातील १५० जागांवर एकमत झाले आहे.
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अंबाझरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ‘रमी क्लब’,‘सोशल क्लब’च्या नावाखाली चक्क आंतरराज्यीय जुगार अड्डे सुरू आहेत.
उपायुक्त भाग्यश्री नवटकेंना उच्चपदस्थांचा रोष भोवला!
मुंबई : पुणे पोलीस दलात आर्थिक गुन्हे विभागाच्या उपायुक्त असताना भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या चौकशी अधिकारी असलेल्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यावर तपासात जाणूनबुजून त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
उंदरांना पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदपट्ट्यांवरील बंदी रद्द करा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
मुंबई : उंदरांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोंदपट्ट्या या अमानवी आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींविरोधात असल्याचे जाहीर करून भारतीय प्राणी कल्याण मंडळाने त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.
Maharashtra Breaking News Today, 18 October 2024: महाराष्ट्रातील सर्व घडामोडींची बित्तंबातमी!