Maharashtra News Updates, 06 August 2026: शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचे नियंत्रण कायम राहते. त्यामुळे राजकीय पक्षाने वैध पद्धतीने घेतलेला कोणताही निर्णय हा विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो, असे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने बुधवारी, शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नोंदवले. या प्रकरणाची आज देखील सुनावणी होणार असून, गुरुवारी दुपारी २ वाजता सुनावणी सुरु होणार आहे. दुसरीकडे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या टीकेवरुन वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडून माफीची मागणी केली आहे. याप्रकरणी राज्यभरात विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेली गुंगी गुडिया टीका सकारात्मक घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गुंगी गुडिया ही काही शिवी नाही अथवा अपशब्द नाही, असेही सपकाळांनी स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या या पोस्टशी त्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासह राज्यातील राजकारण, गुन्हे, कला – क्रीडा – संस्कृती यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया…

Live Updates

Mumbai Pune Breaking News Live Updates, 06 August 2026: महाराष्ट्रातील घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

17:45 (IST) 6 Aug 2026

ज्या प्रमाणपत्रांवर निवडणुका लढल्या, तीच ठरली अवैध; वडेट्टीवारांचा धक्कादायक आरोप

राज्य सरकारने मराठा समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गातील कुणबी प्रमाणपत्रे दिली; मात्र जात वैधता पडताळणी प्रक्रियेत ही प्रमाणपत्रे अवैध ठरत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ...वाचा सविस्तर
17:26 (IST) 6 Aug 2026

जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई… गडकरींकडून दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश!

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
17:17 (IST) 6 Aug 2026

नाशिकच्या खड्ड्यांबद्दल मी क्षमा मागतो; कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचे वक्तव्य

शालेय वाहतुकीच्या बस आणि अन्य वाहनांना सध्या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असून, याबद्दल कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. ...वाचा सविस्तर
16:56 (IST) 6 Aug 2026

डॉक्टरांच्या संपाचा फटका!; शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, तपासण्या रखडल्या; खासगी रुग्णालयांतील रुग्णही अडचणीत

सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात मेडिकल आणि मेयो येथील निवासी डॉक्टरांनी आंदोलन तीव्र केले आहे. ...सविस्तर वाचा
16:52 (IST) 6 Aug 2026

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी समाप्त, पुढील आठवड्यात होणार सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी समाप्त झाली आहे. याप्रकरणी पुढील आठवड्यात मंगळवारी किंवा गुरुवारी होण्याची शक्यता आहे.

16:48 (IST) 6 Aug 2026

सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा सवाल

"जेव्हा आपण लोकशाही तत्त्वे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणाऱ्या संस्थांबद्दल बोलतो, तेव्हा साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की, राजकीय पक्षाने स्वतः लोकशाही पद्धतीने कार्य करणे अपेक्षित नाही का?", असा सवाल सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी उपस्थित केला.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2085271977523335269?s=20

16:43 (IST) 6 Aug 2026
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी उपस्थित केला सवाल

"जेव्हा आपण लोकशाही तत्त्वे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणाऱ्या संस्थांबद्दल बोलतो, तेव्हा साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की, राजकीय पक्षाने स्वतः लोकशाही पद्धतीने कार्य करणे अपेक्षित नाही का?", असा सवाल सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी उपस्थित केला.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2085271977523335269?s=20




16:40 (IST) 6 Aug 2026
सरन्यायाधीश सूर्य कांत काय म्हणाले?

"सुरुवातीला, पक्षाची घटना लोकशाही तत्त्वांवर आधारित होती. त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली आणि ती रचना अक्षरशः एका व्यक्तीच्या हाती केंद्रित झाली,"असे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले. तर, सिब्बल बोलताना, "मी याउलट वस्तुस्थिती असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पण, ही बाब निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, हा खरा प्रश्न असा आहे," म्हणाले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2085316347211501583?s=20

16:34 (IST) 6 Aug 2026

निवडणूक आयोग कसं असंवैधानिक वागलं हे आज कपिल सिब्बल यांनी सांगितलं - अरविंद सावंत

"निवडणूक आयोग कसं असंवैधानिक वागलं हे आज कपिल सिब्बल यांनी सांगितलं. त्यांची प्रत्येक घटना संविधानाला आव्हान देणारी आहे. आयोग घटनेला न मानता कसं मनाला वाटेल तसं वागतंय हे सांगण्यात आले", असे अरविंद सावंत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

16:22 (IST) 6 Aug 2026
निवडणूक आयोगाची चूक लक्षात आली; सुनावणीनंतर अनिल देसाई काय म्हणाले?

"१० व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र करणं गरजेचे होते. निवडणूक आयोगाची चूक लक्षात आली. निवडूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय आधी देणं अपेक्षित होतं", असे अनिल देसाई सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2085313627075346627?s=20

16:21 (IST) 6 Aug 2026

शिराळ्यातील जगप्रसिध्द नागपंचमी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन साजरी करावी

शिराळा येथे साजरी होणारी जगप्रसिध्द नागपंचमी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून साजरी करावी, कायद्याचे पालन करून नागपंचमी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ...अधिक वाचा
15:59 (IST) 6 Aug 2026
"शिंदे यांचे सरकार बनायलाच नको होते, आमदार अपात्र व्हायला हवे होते"- कपिल सिब्बल

"आमच्याकडे लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत होते. त्यामुळे संसदीय पक्ष पूर्णतः आमच्याकडे होते. त्यांनी कोणत्या अर्थाने पक्षावर दावा केला. शिंदे यांचे सरकार बनायलाच नको होते. आमदार अपात्र व्हायला हवे होते", असा युक्तिवाद सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

15:54 (IST) 6 Aug 2026

२०१८ ची घटना आणि निवडणूक पूर्णतः लोकशाही मार्गाने बनलेली - सिब्बल

"अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्षाच्या चिन्हाबाबतचा वाद निकाली काढला. अपात्रतेच्या कार्यवाहीतील उत्तरे २०२३ मध्ये दाखल केली; तोपर्यंत आयोगाने निर्णय घेऊन टाकले आणि त्यामुळेच आज आमच्यावर ही वेळ आलीय", असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. "२०१८ ची घटना आणि निवडणूक पूर्णतः लोकशाही मार्गाने बनलेली आहे", असेही सिब्बल म्हणाले.

15:52 (IST) 6 Aug 2026
अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेतला - सिब्बल

"अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेतला, नेमकी हीच समस्या आहे. एकदा का आयोगाने एखाद्या गटाला मान्यता दिली आणि पक्षाचे चिन्ह त्यांना बहाल केले, आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला, तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मी घटनापीठासमोर हाच युक्तिवाद केला होता आणि निवडणूक आयोगाने अपात्रतेच्या कार्यवाहीचा निकाल लागेपर्यंत वाट पाहावी, अशी विनंती केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने माझा तो युक्तिवाद फेटाळून लावला", असे सिब्बल म्हणाले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2085309353259913473?s=20

15:40 (IST) 6 Aug 2026

"आम्हाला अपात्रता ठरावायची आहे" - सर्वोच्च न्यायालय

"आम्हाला अपात्रता ठरावायची आहे", असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. “विधानसभा अध्यक्षांनी आमच्या विरुद्ध निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्याला आव्हान दिले”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

15:39 (IST) 6 Aug 2026

विधानसभा अध्यक्षांनी आमच्या विरुद्ध निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्याला आव्हान दिले - सिब्बल

"विधानसभा अध्यक्षांनी आमच्या विरुद्ध निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्याला आव्हान दिले", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

15:33 (IST) 6 Aug 2026
सिब्बल यांनी दिला काँग्रेस फुटी आणि समाजवादीच्या निवडणुकीचा संदर्भ

"कपिल सिब्बल यांनी काँग्रेस फुटल्यानंतर इंदिरा गांधींच्या केसचा आणि समाजवादीमध्ये अखिलेश यादव यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संदर्भ यावेळी दिला. २०१८ ची घटना महत्वाची आहे. मात्र आयोगाने कोणत्या अधिकारात यात बदल करण्याचा किंवा मुद्दा निकाली काढण्याचा निर्णय घेतला?", असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.

https://twitter.com/LiveLawIndia/status/2085303945216573578?s=20

15:27 (IST) 6 Aug 2026

"फक्त विधीमंडळ पक्षाच्या संख्येवरून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना देण्यात आला" - सिब्बल

"फक्त विधीमंडळ पक्षाच्या संख्येवरून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना देण्यात आला. विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असे नाही", असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. सुनावणीच्या निमित्ताने अनिल देसाई आणि अरविंद सावंत सर्वोच्च न्यायालयात उपस्थित आहेत.

15:24 (IST) 6 Aug 2026

"निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात एवढी लुडबुड करण्याचा अधिकार नाही", कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

"निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात एवढी लुडबुड करण्याचा अधिकार नाही. आयोगाकडून जे झाले ते योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे असतानाही निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरूनच बदल करण्यात आले. निवडणूक आयोगात प्रकरण गेल्यानंतर दोन्ही बाजूंना वेगळे चिन्ह आणि नाव देण्यात आले, नंतर मात्र नाव आणि पक्ष शिंदे यांना देण्यात आले", असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

15:23 (IST) 6 Aug 2026

प्रणित मोरेचा कमबॅक, ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर 'घायल'ची घोषणा! म्हणाला, 'माझ्या लाडक्या मुंबईतून…'

पोस्टर शेअर करत प्रणितने लिहिले, "भूतकाळात जे घडले ते मी बदलू शकत नाही, पण त्या घटनेमुळे मी भविष्यात कसा माणूस बनतो हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. ...वाचा सविस्तर
14:39 (IST) 6 Aug 2026

बनावट जीएसटी आयटीसी घोटाळा!; चार आयुक्तालयांतच अडकले तब्बल ३ हजार कोटी

छत्रपती संभाजीनगर, हावडा, चेन्नई दक्षिण आणि अकोला या चार जीएसटी आयुक्तालयांनी दिलेल्या माहितीनुसार १,८४४ बनावट आयटीसी प्रकरणांमध्ये एकूण २,९९६.७२ कोटी रुपयांची वसुली अद्याप बाकी आहे. ...सविस्तर वाचा
14:34 (IST) 6 Aug 2026

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपकेंची 'क्या बोलती पब्लिक' मोहिमेची घोषणा! सप्टेंबरपासून देशभरात…

पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दीपके यांनी संघटनेच्या आगामी 'क्या बोलती पब्लिक' या विशेष मोहिमेची माहिती दिली. ...सविस्तर बातमी
14:26 (IST) 6 Aug 2026

शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु, लाईव्ह अपडेट्स

शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. आजही कपिल सिब्बल उबाठा गटाची बाजू मांडतील.

14:10 (IST) 6 Aug 2026

बैठकीत सहभागासाठी दिपकेंच्या घराबाहेर दोन आंदोलकांची बसकण

गुजरातच्या अहमदाबादहून आलेल्या ब्रम्हभट यांनी, ‘ पक्षातील अंतर्गत शिस्त ठेवण्याऐवजी घरातील काही भावांना आणि मित्र परिवारातील काही मोजक्याच मंडळींना बरोबर घेऊन निर्णय घेतले जात आहे.’ असा आरोप केला. ...सविस्तर वाचा
13:53 (IST) 6 Aug 2026

"...तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल", मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

"ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर काहींना मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीका केली. उदय सामंत आणि लाड यांना तीनदा सांगून होत नाही. कारण त्यांचं ऐकत नाहीत. फडणवीस डोक्यातील हवा बाहेर काढा. एकदा आंदोलन सुरू झालं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला.

13:32 (IST) 6 Aug 2026

मराठवाड्यात ‘सहकार’प्रारुप नातेवाईकांपुरतेच !  महायुतीही गिरवतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा कित्ता

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप झालेली नाही. जिल्हा बँकेवर अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व असल्याचे नुकतेच निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. ...अधिक वाचा
13:25 (IST) 6 Aug 2026

Hinjwadi It Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये सायरन वाजला अन अमेरिकेच्या १७ कमांडोंसह…

सुरुवातीला प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याचा समज झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हा पूर्वनियोजित सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ...अधिक वाचा
13:05 (IST) 6 Aug 2026

रमेश म्हात्रे ओळख परेड; डाॅ. वैभव साळुंखेंनी म्हात्रेसह पाचही आरोपींना अचूक ओळखले; कल्याणच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत आधारवाडी तुरुंगात प्रक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्या. गौतम अंखड यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश म्हात्रे जामीन प्रकरण, डाॅक्टर मारहाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...सविस्तर वाचा
12:50 (IST) 6 Aug 2026

"ओबीसी असाल तर 'जय ओबीसी' म्हणायला लाज कसली?" बबनराव तायवाडेंचा विजय वडेट्टीवारांना टोला

ओबीसी आहात तर लाज कसली.. फायदे घेताना ओबीसी मात्र जय ओबीसी म्हणायला लाज वाटते. मंडल यात्रेवरून बबनराव तायवाडेंनी विजय वडेट्टीवार टोला लगावला आहे.

12:16 (IST) 6 Aug 2026

मनोज जरांगेंचं वक्तव्य, "एकनाथ शिंदेंच्या गद्दारीचा डाग मराठ्यांमुळे पुसला गेला, विसरु नका..."

"कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू आहे. मराठ्यांच्या मतांवर निवडून यायचं आणि नंतर मराठ्यांच्याच पाठीत खंजीर उपसून घात करायचा, हे सरकारचं धोरण आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही २०२९ मध्ये याचा सर्वात मोठा बदला घेऊ." असे जरांगे पाटील यावेळी म्हणालेत. ...अधिक वाचा

एकनाथ शिंदेंचा पोस्ट शेअर करत राऊतांची सूचक पोस्ट

एकनाथ शिंदेंचा पोस्ट शेअर करत राऊतांची सूचक पोस्ट (फोटो - X/ Sanjay Raut)