Mumbai News Update Today : पुणे अपघातप्रकरणी सातत्याने येणाऱ्या नवनव्या बातम्या अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या आहेत. एका मुलाला वाचवण्याकरता अख्खं प्रशासन कसं कामाला लागलं होतं, याचे पुरावे विरोधकांकडून दिले जात आहेत. दरम्यान, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ मे) महाड येथील चवदार तळे येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन केले. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचाही अवमान झाला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढत जात असून अनेक ठिकाणी पाण्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने सरकार पातळीवर निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आचारसंहिता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासह राज्यातील विविध बातम्या वाचा एका क्लिकवर.

Live Updates

Marathi News Updates 30 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:15 (IST) 30 May 2024
मुंबईत दोन दिवस उकाड्याचे

काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

सविस्तर वाचा…

20:06 (IST) 30 May 2024
“यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या”, उच्च न्यायालयात याचिका; आक्षेप काय? जाणून घ्या…

यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचले आहे.

सविस्तर वाचा…

19:57 (IST) 30 May 2024
मुंबई: पशुवधगृहातील प्राण्यांचे इअर टॅगिंग करणार, पालिकेकडून पशुसंवर्धन विभागाला उपकरणे देणार

ईदच्या कालावधीत देवनार पशुवधगृह येथे विक्रीसाठी सुमारे दीड लाख ते दोन लाख बकरे आणि १२ हजार ते १५ हजार म्हैसवर्गीय प्राणी आणण्यात येतात.

सविस्तर वाचा…

19:41 (IST) 30 May 2024
एका लाखाच्या मोबदल्यात चार लाख! फेसबुकवर जाहिरात पाहिली अन् चप्पल विक्रेता…

एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देणार, अशी जाहिरात चक्क फेसबुकवर टाकण्यात आली.

सविस्तर वाचा…

19:41 (IST) 30 May 2024
सोलापूर : जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून महायुतीचा संताप

सोलापूर : शासनाच्या पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या क्रांतिस्तंभाजवळ मनुस्मृतीचे दहन करताना त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाटले गेल्याने संतापलेल्या महायुतीने सोलापुरात आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.

19:28 (IST) 30 May 2024
सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवरून इंडिया आघाडीत आतापासूनच वाद

प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांची सोलापूर शहर मध्य विधानसभेची रिक्त होणारी जागा माकपला सोडण्याचे ठरले होते, असा दावा आडम मास्तर यांनी यापूर्वीच केला होता.

सविस्तर वाचा…

19:11 (IST) 30 May 2024
वसई: यूट्यूबर निघाला चोर, चोरी प्रकरणात अटक

अज्ञात चोराने कार्यालयाचे शटर तोडून रोख रकमेसह पावणे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला होता.

सविस्तर वाचा…

18:51 (IST) 30 May 2024
सांगली : जितेंद्र आव्हाडांचा भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध

सांंगली : महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गुरुवारी सांगलीसह इस्लामपूर, विटा आदी ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले.

18:49 (IST) 30 May 2024
डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.

सविस्तर वाचा…

18:38 (IST) 30 May 2024
राम मंदिराचं दर्शन झाल्याने आज फार आनंद झालाय – फडणवीस

रामसेवक आणि कारसेवक म्हणून रामजन्मभूमी आंदोलनात मी सहभागी झालो होतो. मंदिर बनत होतं तेव्हा इथं यायची संधी मिळाली होती. २२जानेवारी रोजी संधी मिळाली होती. त्यामुळे मनात ओढ आणि हुरहूर होती. आणि आज ते दर्शन मिळालं, याचा फार आनंद आहे. माझा आनंद गगनात मावत नाहीय – देवेंद्र फडणवीस</p>

18:31 (IST) 30 May 2024
पुणे कार अपघात प्रकरण : रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोघा डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

सरकारी पक्षाचे वकील युक्तिवाद करतेवेळी म्हणाले की, अल्पवयीन आरोपीचे रक्त घेण्यात आले नसून इतर व्यक्तीचे रक्त घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

18:30 (IST) 30 May 2024
अखेर इचलकरंजीतील अतिक्रमणांवर हातोडा; मोहीम कठोरपणे राबवण्याची मागणी

नेहमीच अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते, हातगाडे आदींवरही कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा…

17:36 (IST) 30 May 2024
आपत्ती व्यवस्थापनासाठी पनवेल पालिका सज्ज

पनवेल ः पनवेलमध्ये पावसाळ्यात आपत्ती आल्यास सरकारी विभागांचे आपसातामधील समन्वय असावे तसेच मागील वर्षी आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी यावेळी उद्भवल्यास त्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल यासाठी नूकतीच पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी विविध विभागांची समन्वय बैठक पार पडली.

सविस्तर वाचा

17:34 (IST) 30 May 2024
नाशिक : प्रदूषण रोखण्यासाठी आता नंदिनी काठावर सीसीटीव्ही, सावधानतेचा इशारा देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणाही

नाशिक : शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंतच्या नदीकाठावर २३ ठिकाणी ५५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतले आहे.

सविस्तर वाचा…

17:29 (IST) 30 May 2024
सिडकोच्या तळोजातील महागृहनिर्माणात मजूर ठार

पनवेल ः तळोजा येथे मोठ्या प्रमाणात सिडको महामंडळाचे महागृहनिर्माणाचे काम सूरु आहे. पावसाळ्यात बांधकाम करणे शक्य नसल्याने पावसाळ्यापूर्वी कामे आटपून घेण्यासाठी झपाटा सूरु आहे. मात्र सूरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याने  बी. जी. शिर्के कंपनीचे काम सूरु असताना क्रेन ऑपरेटरच्या दुर्लक्षामुळे एका मजूराच्या अंगावर कॉलम हाताळताना क्लीप तुटून अंगावर कॉलम पडून मजूराचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

17:27 (IST) 30 May 2024
Video:…अन् ताडोबातील वाघिणीने पाणवठ्याजवळच ठोकला मुक्काम

वातानुकूलीत यंत्रणेचा पर्याय देखील या गर्मीपुढे नापास ठरला आहे. माणसांची जिथे हे हाल आहेत, तिथे जंगलातल्या प्राण्यांचे काय होत असेल?

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 30 May 2024
आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेलमध्ये निदर्शन

पनवेल ः महाड येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांनी गुरुवारी दुपारी पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आव्हाड यांच्या छायाचित्राला जोडे मारुन निदर्शने केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, भाजपचे शहाध्यक्ष अनिल भगत, कामगार सेलचे पदाधिकारी जितेंद्र घरत, भाजपचे पदाधिकारी अरुण सोळंकी, विनायक मुंबईकर, सुमित झुंझारराव, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड, श्याम साळवी, मयूर कदम, रावसाहेब खरात, मधुकर उरणकर, अमोल जाधव, कोषाध्यक्ष शोभा मिंठबावकर, चित्रा भंडारी, सदस्य संजय कांबळे, आनंद जाधव, संतोष म्हस्के, चंद्रकांत सोनवणे, सुरजित टाक, सर्जेराव साळवे, गोपाल पडे, अनंता वाहुळकर, उमेश कांबळे, आत्रम, गणेश जाधव, बंटी रसाळ, विष्णू गायकवाड, चेतन कांबळे, यांच्यासह भीम अनुयायी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

17:12 (IST) 30 May 2024

पुणे अपघात प्रकरणाची सुनावणी संपली; डॉ. तावरे, डॉ. हळनोर यांच्यासह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

17:05 (IST) 30 May 2024
कोल्हापूर: राधानगरी धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू

राधानगरी तालूक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भटवाढी गावाच्या हद्दीत असणार्‍या बॅकवाॅटर परिसर पाहाण्यासाठी हे सर्वजण काल गेले होते.

सविस्तर वाचा…

16:54 (IST) 30 May 2024
हिंजवडीतील कुटुंब गेलं परदेशात; चोरट्याने घर केलं साफ, पण सीसीटीव्हीने केली कमाल..!

परदेशात फिरायला गेल्यानंतर हिंजवडीतील एका कुटुंबाच्या घरात शिरून आरोपींनी घरफोडी केली होती.

सविस्तर वाचा…

16:21 (IST) 30 May 2024
ठाण्यात पाणी कपातीचा धोका लांबला

शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा…

15:56 (IST) 30 May 2024
ठाण्यात अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई; बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष

अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

15:50 (IST) 30 May 2024
उदयनराजेंचे खासदार म्हणून पिंपरी- चिंचवडमध्ये झळकले फ्लेक्स! चर्चेला उधाण

“श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले हे खासदार पदी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा”, अशा आशयाचे हे फलक लावण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

15:40 (IST) 30 May 2024
परम संगणक निर्मितीला किती खर्च आला ? विद्यार्थ्यांची जिज्ञासा अन् डॉ. विजय भटकर यांचे हितगूज

नाशिक : तुम्ही भारतीय ‘परम’ संगणक कसा निर्माण केला, पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले का, अडचणी आल्या का, खर्च किती आला, किती दिवस लागले, संघ कसा तयार केला, परम संगणकाच्या निर्मितीवर अमेरिकेची काय प्रतिक्रिया होती, भविष्यातील संगणक कसा असेल, ‘एलियन्स’ आहेत का, देव असतो का, भूतं असतात का, स्वतःची आंतरिक प्रेरणा कशी जागृत करावी… असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यानी भारतीय ‘परम’ या सुपर-संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना विचारले.

सविस्तर वाचा…

15:23 (IST) 30 May 2024
अन्यथा डोंबिवलीकरांवर भ्याड नागरिकांचे शहर म्हणून शिक्का, विद्यानिकेतन शाळेच्या जनजागृती फलकातील संदेश

‘लोकसत्ता’ने बुधवारी अग्रलेखातून डोंबिवलीकरांच्या सोशिक वृत्तीवर प्रहार करून सुसंस्कृत डोंबिवलीकरांनी शहराला उच्चवर्णीयांची झोपडपट्टी असे बिरूद चिकटू नये यासाठी प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे सूचित केले आहे.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 30 May 2024
कोल्हापुरात पासिंगच्या दंडाविरोधात आपचे आंदोलन; दंडात्मक कारवाई थांबवा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा

पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहे.

सविस्तर वाचा…

15:04 (IST) 30 May 2024
जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्राला जोडेमार आंदोलन, आता प्रत्येक तालुक्यात असेच….

गोंदिया:- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे महाड येथे मनुस्मृतीचे दहन करत असताना त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाटले. त्यांच्या कृतीचे पडसाद गोंदियातही उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज गुरुवार ३० मे रोजी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या छायाचित्राला जोडेमार आंदोलन करण्यात आले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाद्वारे करण्यात आलेल्या या आंदोलनात आधी आव्हाड यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला. जितेंद्र आव्हाड मुर्दाबादचे नारे देत त्यांच्या छायाचित्राला जोड्याने मारत आंदोलन करण्यात आले.

14:21 (IST) 30 May 2024
दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरले; भाजपच्या माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

शहरातील भारतनगर भागातही संशयितांनी रात्री साडेनऊच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा…

14:16 (IST) 30 May 2024

सुषमा अंधार यांनी ललित पाटील प्रकरणात माझं नाव घेतलं होतं. माझं नाव घेतल्यानंतर अंधारे यांना जाहीर माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं की ललित पाटील प्रकरणात माझा थेट, अप्रत्यक्ष असा कोणाही दुरान्वयानेही संबंध नाही. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं. अंधारे यांनी हे वक्तव्य मागे घेतलं नाही. आम्ही पाटणच्या न्यायालयात मागे घेतलं नाही. यावर तारखा पडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असल्याने निवडणुका झाल्यानंतर तारीख देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाची सुट्टी संपल्यानंतर ललित पाटील प्रकरणी तारीख लवकर लावायची विनंती करणार आहे. ही केस पाटण न्यायालयात असताना अंधारे यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला, त्यामुळे अवमानकारक याचिका प्रलंबित असताना परत परत उल्लेख करून न्यायायलयीन प्रक्रियेला जुमानत नाही असं दाखवून दिलं आहे. आजच माझ्या वकिलांच्या मार्फत नोटीस बजावली आहे. या प्रकरणात माझा उल्लेख केला आहे, याबाबतीत विधान मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई केली जाईल. केवळ स्टंटबाजी सुरू आहे. त्यांनी तीन दिवसांत यात खुलासा केला नाही तर ललित पाटील प्रकरणात कायदेशीर कारवाई न्यायालयात केली तसंच या बाबतीतही कारवाई करेन – शंभूराज देसाई

14:09 (IST) 30 May 2024
मुंबईत आजपासून ५ टक्के पाणीकपात, येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत आजपासून (३० मेपासून) ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सविस्तर वाचा..

(फोटो-फेसबुक पेज)

Marathi News Live Updates 30 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर