Mumbai News Update Today : पुणे अपघातप्रकरणी सातत्याने येणाऱ्या नवनव्या बातम्या अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या आहेत. एका मुलाला वाचवण्याकरता अख्खं प्रशासन कसं कामाला लागलं होतं, याचे पुरावे विरोधकांकडून दिले जात आहेत. दरम्यान, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ मे) महाड येथील चवदार तळे येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन केले. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचाही अवमान झाला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढत जात असून अनेक ठिकाणी पाण्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने सरकार पातळीवर निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आचारसंहिता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासह राज्यातील विविध बातम्या वाचा एका क्लिकवर.

Live Updates

Marathi News Updates 30 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

13:55 (IST) 30 May 2024
जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला कोल्हापुरात चपलेचा प्रसाद; भाजप आक्रमक

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

13:54 (IST) 30 May 2024
इचलकरंजी भाजपच्यावतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निदर्शने

कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील महाड येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले छायाचित्र फाडले. या कृतीचा निषेध इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला.

13:51 (IST) 30 May 2024
स्मार्ट मीटरविरोधात लोकलढा! नागपुरात विविध संघटना, राजकीय पक्षांचा निर्धार

नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरच्या नावाखाली विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात विविध संघटना, राजकीय पक्ष एकवटले असून या निर्णयाविरुद्ध लोकलढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी परवाना भवनात विविध, सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांची बैठक झाली.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 30 May 2024
एमएचटी सीईटीपाठोपाठ आता बीए, बीएस्सी व बी.एडचे प्रश्न, उत्तरे आक्षेपासाठी उपलब्ध

मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर आता बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेतील प्रश्न व उत्तर तालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 30 May 2024
“टिंगरेच्या शिफारसपत्रावर मुश्रीफांचा शेरा, म्हणूनच तावरेंची नियुक्ती केली”, ससूनच्या अधिष्ठातांची स्पष्टोक्ती

सुनील टिंगरे यांनी जे पत्र दिलं होतं, त्यावर मंत्रीमहोदयांनी अधिष्ठातांना लिहिलं होतं की डॉ. अजय तावरे यांना कार्यभार द्यावा, कारण ते प्राध्यापक पदावर आहेत. तत्कालीन सुप्रिटेंड होते ते प्राध्यापक होते. मेडिकल फंक्नशच्या नियमानुसार प्राध्यापकांना सुप्रिटेंड पदावर नियुक्ती देणं गरजेचं असतं. त्या आदेशान्वये मी अधिष्ठाता या नात्याने नियुक्ती केली होती – विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

12:49 (IST) 30 May 2024
ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम, सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने रहिवासी हैराण

ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील गृहसंंकुलांमध्ये मागील तीन महिन्यांंपासून महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. आतातर उन्हाची काहिली, घामाच्या धारांनी नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीत ९० फुटी रस्ता भागात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

वाचा सविस्तर…

12:45 (IST) 30 May 2024
भीक मागायला चल म्हणत आईवडिलांनी बेदम बदडले; तरीही ‘ चंद्रमुखी, मुस्कान ‘ चमकल्याच…

वर्धा : वर्धेलगत रोठा या गावी उमेद संकल्प हा प्रकल्प आहे. इथे अद्याप भीक मागणे हाच जीवन जगण्याचा मार्ग असलेल्या पारधी समाजातील मुलांचा सांभाळ होतो. संचालिका मंगेशी मून या समाजातील मुलांना अक्षरशः वेचून इथे आणतात व शाळेत घालतात.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 30 May 2024
मतमोजणीत पारदर्शकतेसाठी धडपड; नाशिक, दिंडोरीतील उमेदवारांच्या हाती यंत्राचे अद्वितीय क्रमांक

नाशिक : निवडणूक प्रक्रियेत विविध मुद्यांवरून राजकीय पक्षांनी आधीच आक्षेप नोंदविले असताना निवडणूक यंत्रणेने यात पारदर्शकता जपण्यासाठी धडपड चालवली आहे. मतमोजणी प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण होऊ नये म्हणून नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात प्रत्येक केंद्रावर वापरलेले मतदान यंत्र (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्ही पॅट) यांचे अद्वितीय क्रमांक उमेदवारांना देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 30 May 2024
डोंबिवलीतील घरडा सर्कल रस्ता मतमोजणीसाठी ४ जून रोजी बंद

कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात ४ जून रोजी होणार आहे. या कालावधीत सर्कल लगतचे सर्व रस्ते ४ जून रोजी पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर…

12:07 (IST) 30 May 2024
दक्षिण मुंबईतील काही भागात ३ व ४ जून दरम्यान पाणीकपात

मुंबई : रूरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्राध्यापकांमार्फत येत्या ३ व ४ जून रोजी मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मलबार हिल जलाशयाचा कप्पा क्रमांक १ आणि २ टप्प्या-टप्प्याने रिक्त करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 30 May 2024
अमरावती : धावाधाव, धक्काबुक्की, जीवाची बाजी! हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा जीव धोक्यात…

अमरावती : गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू आली की आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात… टँकरचे पाणी विहिरीत ओतले जाते, तोवर महिलांची स्पर्धा सुरू होते ती पाणी खेचण्याची… हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या काठावर उभे राहून या महिला जीवाचा आटापिटा करून पाणी मिळवतात.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 30 May 2024
समृद्धी महामार्गाच्या आणखी एका मजूराचा निष्काळजीमुळे मृत्यू, नवयुगा कंपनीच्या कर्मचाऱ्यासह मजूर ठेकेदार अटकेत

ठाणे : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निर्माणाचे काम ठाणे जिल्ह्यातील कसारा भागात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी लोखंडी तुळई पडून २० कामगारांचा मृत्यू झाला होता. नुकतेच आणखी एका मजूराचा ठेकेदार आणि कंत्राटी कंपनीच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 30 May 2024
कार वॉशिंग व्यवसायिकांना यंदा संघाचे बौद्धिक, संघाची कार्यपध्दती समजावून सांगणार

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांने संघाची व्याप्ती,कार्यक्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. विविध क्षेत्रातील, प्रवाहातील, संवर्गातील नागरिकांना संघाशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कार वॉशिंग व्यावसायिकांचा विशेष वर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगर शाखेतर्फे रविवारी २ जूनला रेशीमबाग नागपूरमध्ये आयोजित केला आहे.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 30 May 2024
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा

पुणे : महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 30 May 2024
अकरावी प्रवेश प्रक्रिया : महाविद्यालय पसंतीक्रमाचा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून भरता येणार

मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. सध्या विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरत आहेत.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 30 May 2024
वसई: वर्सोवा पुलाजवळ सुर्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामा दरम्यान भूस्खलन, पोकलेन सह चालक ढिगाऱ्याखाली अडकला

वसई : वर्सोवा खाडी पुलाजवळ सुर्या जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान भूस्खलन होऊन पोकलेनसह चालक त्या ढिगाऱ्याखाली अडकला असल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.

सविस्तर वाचा…

10:25 (IST) 30 May 2024
डॉ.आंबेडकरांच्या छायाचित्राची आव्हाडांकडून विटंबना; जयंत पाटील म्हणाले, “विरोधकांच्या खोट्या प्रचाराला…”

जितेंद्र आव्हाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही. आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे – जयंत पाटील</p>

(फोटो-फेसबुक पेज)

Marathi News Live Updates 30 May 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर