Mumbai News Update Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (१ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. त्याचे पडसाद आजही (२ जून) पहायला मिळत आहेत. या भेटीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच राज्यातील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…

Live Updates

Mumbai News Updates Today : राज्यातील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

21:17 (IST) 2 Jun 2023
"देशात कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण नाही, कारण..."; असदुद्दीन ओवैसींचं मोठं विधान, म्हणाले...

सत्ताधारी भाजपावर देशात धार्मिक धृवीकरण केल्याचा आरोप वारंवार होतो. यावरून विरोधकांनी अनेकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, अशातच ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील धार्मिक धृवीकरणावर मोठं विधान केलं आहे. देशात कोणत्याही प्रकारचं धार्मिक धृवीकरण होत नाही, असा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ते शुक्रवारी (२ जून) इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

सविस्तर वाचा...

20:29 (IST) 2 Jun 2023
राज्यात आता विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय व्यवसाय मार्गदर्शन; शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांचे निर्देश

पुणे: राज्यातील दहावीच्या निकालातून सुमारे आठ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा...

20:05 (IST) 2 Jun 2023
नाशिक: महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात

नाशिक: वादग्रस्त महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर आणि शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना ५५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

19:26 (IST) 2 Jun 2023
भरपत्रकार परिषदेत 'त्या' खासदाराचं नाव घेताच तुम्ही का थुंकलात? संजय राऊतांनी सांगितलं कारण, म्हणाले...

माझ्या जीभेला त्रास होतो. शस्त्रक्रिया झाल्याने दात जीभेला लागतो. त्यामुळे मला बोलता बोलता थुंकावं लागलं. त्याचा माध्यमं वेगळा अर्थ काढत आहेत.

मी त्यांच्यावर थुंकलो नसलो, तरी हे खरं आहे की, जनता त्यांच्यावर थुंकत आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्राने त्यांच्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे. भविष्यात महाराष्ट्र त्यांच्यावर कसा थुंकतो हे सर्वांना दिसेल. माध्यमांनी त्याचा संबंध माझ्याशी जोडू नये.

- संजय राऊत

18:57 (IST) 2 Jun 2023
वीजेची मागणी २७ हजार मेगावॅटवर; राज्यात वीज निर्मिती किती?

नागपूर: राज्यातील बऱ्याच भागात तापमान वाढल्याने राज्याची वीजेची मागणी शुक्रवारी २७ हजार मेगावॅटवर गेली आहे. ही मागणी आणखी वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार करत आहे.

सविस्तर वाचा...

18:47 (IST) 2 Jun 2023
नागपूर: सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचे काम सुरू

नागपूर: पुढील वर्षी महापालिकांसह लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे.

सविस्तर वाचा...

18:34 (IST) 2 Jun 2023
पर्यावरण संवर्धन संदेशासाठी कल्याणमध्ये रविवारी सायकल फेरी

जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय सायकल दिनाचे औचित्य साधून ४ जून रोजी कल्याण शहरात कल्याण डोंबिवली पालिका, बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि डोंबिवली, कल्याण मधील विविध सायकल गटांतर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रसिध्द सायकलपटू आणि पालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

सविस्तर वाचा

18:21 (IST) 2 Jun 2023
मुंबई: सर्च इंजिनवर कुरिअर कंपनीचा संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; वृद्ध व्यक्तीची सायबर फसवणूक

मुंबई: कुरिअर कंपनीचा संपर्क क्रमांक सर्च इंजिनवर शोधणे वृद्ध व्यक्तीला भलतेच महाग पडले. आरोपीने वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरण्याच्या बहाण्याने ६९ वर्षीय तक्रारदाराच्या खात्यातून एक लाख रुपये काढले. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा...

18:17 (IST) 2 Jun 2023
नाशिक जिल्ह्यात ६६ दारू अड्ड्यांवर एकाचवेळी छापे; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक – जिल्ह्यातील ६६ गावठी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

18:04 (IST) 2 Jun 2023
‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ कंपन्या स्पर्धेत

मुंबई: नवी मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ कंपन्या इच्छूक आहेत. त्यामुळे आता या ११ कंपन्यामध्ये स्पर्धा असणार आहे. दोन टप्प्यात या मार्गिकेचे काम करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी १० तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ९ निविदा सादर झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 2 Jun 2023
जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्ले पूर्व भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

मुंबई महानगरपालिकेच्या ‘के – पूर्व’ विभागकार्यालयाच्या हद्दीतील महाकाली गुंफा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’जवळ, तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व)’ येथे नवीन १५०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) जोडण्याचे काम सोमवार, ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

17:44 (IST) 2 Jun 2023
मुंबई : एमएमआरसी पावसाळ्यासाठी सज्ज

मार्गिकेच्या परिसरादरम्यान पावसाळ्यात पाणी साचू नये यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. कंत्राटदारांच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सविस्तर वाचा

17:44 (IST) 2 Jun 2023
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, तुकाराम मुंढेंसह 'या' २० अधिकाऱ्यांची बदली, कुणाची कुठे वर्णी? वाचा...

कुणाची कोठे बदली?

१. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली.

२. एस. व्ही. आर श्रीनिवास यांची एमएमआरडीएमधून धारावी पुनर्विकास प्रकल्पात नियुक्ती करण्यात आली.

३. बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्र यांची महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

४. राधिका रस्तोगी यांची विकास आणि नियोजन विभागात नियुक्त करण्यात आली.

५. महिला आणि बालकल्याण विभागातील आय. ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.

६. संजीव जयस्वाल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

७. आशीष शर्मांची मुंबई महानगरपालिकेतून नगर विकास विभागात नियुक्ती करण्यात आली.

८. महाडिस्कॉमच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टचे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

९. खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

१०. अल्पसंख्याक विभागाचे सचिव अनुप यादव यांची महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

११. तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१२. महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जल जीवन मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

१३. नाशिकचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त (पुणे) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१४. उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त डॉ. माणिक गुरसाल यांची महाराष्ट्र मेरिटाईमच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

१५. कोल्हापूरचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजेंसी, पुणेच्या (MEDA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

१६. प्रदिपकुमार डांगे यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातून रेशीम विभागाच्या (नागपूर) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

१७. मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची सिडकोच्या (नवी मुंबई) सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१८. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची माहिती तंत्रज्ञान विभागाचे (मुंबई) सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१९. एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशुसंवर्धन (पुणे) विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२०. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (AMC) नियुक्ती करण्यात आली.

17:42 (IST) 2 Jun 2023
अमरावती विभागात यवतमाळ टक्केवारीत तळाला, दहावीचा निकाल ९१.४९ टक्के

यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या आज शुक्रवारी घोषित झालेल्या निकालात मुलींनी उत्तीण होण्याच्या टक्केवारीत आघाडी घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.४९ टक्के लागला.

सविस्तर वाचा...

17:37 (IST) 2 Jun 2023
२० वर्षांपूर्वीच्या सामूहिक हत्याकांडातील फरार आरोपीला अटक, जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना झाला होता फरार

वसईच्या खैरपाडा मध्ये २० वर्षांपूर्वी झालेल्या ४ जणांच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणातील फरार आरोपीला वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोल्हापूरच्या इचलकरंजी येथून अटक केली आहे. दिलीप तिवारी असे या आरोपीचे नाव असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना २०२१ मध्ये संचित रजेवरून फरार झाला होता.

सविस्तर वाचा

17:33 (IST) 2 Jun 2023
बुलढाणा : खामगाव परिसरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला, २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे मंगळवारी सशस्त्र दरोड्याप्रकरणी ‘काँबिंग ऑपरेशन’ राबवणाऱ्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना फत्तेपूर (ता. खामगाव) येथे आज शुक्रवारी उत्तररात्री घडली. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून किमान २५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:20 (IST) 2 Jun 2023
भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के

भंडारा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात भंडारा जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 2 Jun 2023
राज्य सरकारकडून निधी मिळूनही ढोकाळीत शौचालयाची दुरावस्था; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

ठाणे: शहरातील रस्ते तसेच नालेसफाईच्या कामांची पोलखोल केल्यानंतर भाजपने आता ढोकाळी परिसरातील शौचालये, आरोग्य केंद्र आणि पाण्याच्या टाकीची दुरावस्था झाल्याची बाब उघडकीस आणली आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 2 Jun 2023
चित्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी आमची, पण… केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना नेमके म्हणायचे तरी काय?

नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन चित्त्यांचा आणि भारतात जन्मलेल्या तीन बछड्यांच्या मृत्यूची जबाबदारी अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वीकारली. मात्र, त्याचवेळी भारतातील चित्ता स्थलांतरण प्रकल्पाला मोठे यश मिळेल, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा..

16:30 (IST) 2 Jun 2023
कल्याणमध्ये व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटसवरील धारदार सुरे तरुणाला पडले महाग

कल्याण: येथील एका तरुणाने धारदार चार सुरे जवळ बाळगत या चारही सुऱ्यांबरोबरची एक दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली. तसेच या सुऱ्यांसोबतचे आपले छायाचित्र स्वताच्या व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटसवर स्थापित केले.

सविस्तर वाचा...

16:26 (IST) 2 Jun 2023
नागपूर : हवामानाने बदलले रंग, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी नाही, तर…..

नागपूर : भारतीय हवामान खात्याने राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील असे भाकित केले होते, पण हवामान खात्याने त्याचे रंग बदलले. येत्या रविवारपर्यंत पावसाच्या सरी नाही तर उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

सविस्तर वाचा..

16:18 (IST) 2 Jun 2023
लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीपासून नागपुरातील काँग्रेस नेत्यांना का दूर ठेवले ?

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात शुक्रवारपासून बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 2 Jun 2023
मुंबईत रेल्वेचा १४ तासांचा मेगा ब्लॉक; कुठे-कधी ? वाचा सविस्तर…

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा

16:08 (IST) 2 Jun 2023
अहमदनगरचे नामांतर केल्याने अजित पवार म्हणाले, “नामांतराचा घाट हा…”

पुणे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून सुरू झालेले निषेध आंदोलन, तसेच धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी अहमनदनगरचे अहल्यानगर असे नामांतर करण्याचा घाट घालण्यात आल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

सविस्तर वाचा

15:31 (IST) 2 Jun 2023
जळगाव : पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातील नशिराबादेत पाणीबाणी; महिन्यातून तीन वेळा तासभर पुरवठा; राष्ट्रवादीचा घागर मोर्चा काढण्याचा इशारा

जळगाव – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नशिराबाद येथे ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावात सध्या महिन्यातून केवळ तीन वेळा, तेही तासभर पाणी मिळते. त्यामुळे दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी भटकावे लागते.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 2 Jun 2023
जळगाव : अबब… स्टेट बँक शाखेतील सोने चोरीचा आकडा साडेतीन कोटींवर

जळगाव – शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सकाळी पडलेल्या दरोड्यात रोख रकमेसह किती सोने चोरीस गेले, हे उघड झाले असून सुमारे १७ लाख १० हजार ३७० रुपयांच्या रोकडसह तीन कोटी ६० लाखांचे सोने, भ्रमणध्वनी संच आणि दुचाकी, असा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. जिल्हाभरात पोलिसांकडून शोध सुरू असला तरी अद्याप चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.

सविस्तर वाचा...

15:15 (IST) 2 Jun 2023
डोंबिवलीत बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचा प्रयत्न, पालिकेचा फौजदारी कारवाईचा इशारा

डोंबिवली: येथील पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ एका सात माळ्याच्या बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचा भूमाफियांचा प्रयत्न पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी हाणून पाडला.

सविस्तर वाचा...

15:02 (IST) 2 Jun 2023
दहावीतही बुलढाणा विभागात द्वितीय! ९३.९० टक्के निकाल; सावित्रीच्या लेकीच आघाडीवर!

बुलढाणा : इयत्ता बारावीप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याने इयत्ता दहावीच्या निकालातही दमदार कामगिरी करीत अमरावती विभागातून (मंडळ) द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९३.९० इतका लागला असून यावेळीही सावित्रीच्या लेकींनी मुलांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. देऊळगाव राजा जिल्ह्यात प्रथम ठरला आहे.

सविस्तर वाचा...

14:58 (IST) 2 Jun 2023
Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९३.६३ टक्के लागला आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के इतके आहे. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी निकालात मात्र मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा

14:48 (IST) 2 Jun 2023
"पक्ष माझा नाही" वक्तव्यावरून राजकारणाचा पारा चढला, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काही लोक..."

मला भाषण करताना नेहमीप्रमाणे जे सुचतं ते मी बोलते. बदल हा अपरिहार्य असतो. निसर्गात आणि जीवनात बदल होत असतात. गोपीनाथ मुंडे असतानाही हे बदल झाले आणि नसतानाही होत आहेत. मी भाषण समोरच्या माणसांना उत्साह, प्रेरणा देण्यासाठी करते. भाषण ऐकण्यासाठी लोक येतात असे खूप कमी वक्ते आहेत. मला अभिमान आहे आणि गोपीनाथ मुंडेंनाही होता की, माझं भाषण ऐकायला लोक येतात. माझ्या भाषणाला नकारात्मक करण्याचे काही लोक प्रयत्न करत असतील. मात्र, त्यामुळे मी थांबत नाही, थकत नाही आणि झुकतही नाही. मी जे बोलते ते समोरच्या व्यक्तींना उद्देशून त्या प्रसंगासाठी बोलते. प्रत्येक ठिकाणी माझं वेगळं भाषण असतं. हे साहजिक आहे की, आजूबाजूला जे घडतंय त्याप्रमाणे लोक भाषणाचे अर्थ लावतात. त्यामुळे मी कुणालाही दोष देऊ इच्छित नाही. मला त्याची दखलही घ्यायची नाही.

- पंकजा मुंडे

Maharashtra Marathi News Live Updates

महाराष्ट् न्यूज लाइव्ह