Mumbai News Update Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (१ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. त्याचे पडसाद आजही (२ जून) पहायला मिळत आहेत. या भेटीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच राज्यातील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
Mumbai News Updates Today : राज्यातील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत फारच आक्रमक झाले आहेत. विविध मुद्द्यांवरून ते शिंदे गट आणि भाजपाला हेरत असतात. सरकारच्या विविध धोरणांवर आणि योजनांवर ते टीका करत असतात. तसंच, कधीकधी थेट नेत्यांवर निशाणा साधतात. रोज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करतात. आज तर भर पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या खासदाराचं नाव ऐकताच त्यांनी थूं असं म्हटलं.
गेल्या काही महिन्यांमध्ये गौतम अदाणी आणि अदाणी उद्योह समूह या दोन बाबी चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. हिंडेनबर्गनं दिलेल्या अहवालामध्ये गौतम अदाणींनी शेअर बाजारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर अदाणींचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यांचं जागतिक श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही मोठ्या प्रमाणावर घसरलं. या पार्श्वभूमीवर अदाणींशी संबंधित सर्वच व्यक्तींकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असताना आता गौतम अदाणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना त्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Maharashtra 10th Result 2023 Declared Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह