Marathi News Live Update: लोकसभा निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी राजकीय नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यात जातनिहाय जनगणनेचा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे विरोधकांचे जाहीरनामे प्रकाशित होत असलाना सत्ताधारी गटाकडे नाशिकच्या जागेवर अद्याप सर्वमान्य उत्तर सापडलेलं नाही. त्यावरून सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
‘लय फडफड करत होता’; मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
Live Updates

Marathi News Live Today, 25 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:37 (IST) 25 Apr 2024
लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननाम्याची घोषणा केली आहे.

18:10 (IST) 25 Apr 2024
काँग्रेसला धक्का, डॉ. शुश्रथ गौडा यांचा भाजपात प्रवेश

म्हैसूर येथील काँग्रेसचे नेते डॉ. शुश्रथ गौडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते म्हैसूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा होती. यानंतर अखेर डॉ. शुश्रथ गौडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

17:41 (IST) 25 Apr 2024
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार

कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…

17:40 (IST) 25 Apr 2024
संजय राऊत यांची भाषा अर्वाच्च – गिरीश महाजन यांची टीका

महिला उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल  संजय राऊत इतक्या आक्षेपार्ह आणि अर्वाच्च पद्धतीने बोलले की बोलू शकत नाही. त्यांनी फक्त आता शिव्या द्यायचे बाकी ठेवले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर ते बोलले. सविस्तर वाचा…

17:40 (IST) 25 Apr 2024
रक्षा खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे यांचे सूतोवाच

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी गुरुवारी अर्ज भरण्यापूर्वी सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खडसे यांनी सून नव्हे; मुलगी रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा…

17:39 (IST) 25 Apr 2024
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक

महापालिका क्षेत्रातील खिडुकपाडा या गावामध्ये राहणाऱ्या एका नराधम काकाने आपल्या पुतणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून पोलीसांनी या नराधम काकाला अटक केली आहे. सविस्तर वाचा…

17:38 (IST) 25 Apr 2024
३५ लाखांची रोकड मोटारींमध्ये वाहतूकीदरम्यान सापडली; पनवेलच्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन वेगवेगळ्या केलेल्या तपासणी मोहीमेमध्ये दोन वेगवेगळ्या मोटारींमध्ये ३५ लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन प्रवास करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. सविस्तर वाचा…

17:20 (IST) 25 Apr 2024
वाढते तापमान, लग्नसराई, अवकाळीमुळे मतदानात घट होण्याची भीती; राजकीय पक्षांसमोर टक्का वाढविण्याचे आव्हान

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. शुक्रवारी लग्नाचा मोठा मुहूर्त आहे. शिवाय तापमानही ४० अंशाच्या वर असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा...

17:13 (IST) 25 Apr 2024
सांगलीच्या जागेबाबत विश्वजीत कदम यांची भूमिका

सगळं होऊन शेवटी काय झालं? लहानपणी आम्ही सापशिडी खेळायचो. या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला. पण या खेळात तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय आमचा राहील - विश्वजीत कदम

17:10 (IST) 25 Apr 2024
सांगलीच्या उमेदवारीवरून विश्वजीत कदम यांचा परखड सवाल

एकतर्फी उमेदवारी जाहीर कशी झाली? महाविकास आघाडीनं मिळून उमेदवारी जाहीर करायला पाहिजे. पण एकतर्फी निर्णय झाला. आम्ही पोटतिडकीनं ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केले. दीड महिने काय काय करावं लागलं माझं मला माहिती आहे - विश्वजीत कदम

17:02 (IST) 25 Apr 2024
रायगड: पत्नीनेच पतीविरोधात दिली बलात्काराची तक्रार, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पत्नीनेच आपल्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

16:13 (IST) 25 Apr 2024
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक

मुंबई: समाजमाध्यमांवर मैत्री करून एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दीड लाखांची फसवणूक केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सविस्तर वाचा...

16:06 (IST) 25 Apr 2024
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय

मुंबई : ॲन्टॉप हिल येथे एका जुन्या मोटरगाडीत दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 25 Apr 2024
काँग्रेसनं जाहीरनामा नव्हे, माफीनामा प्रसिद्ध करावा - एकनाथ शिंदे

काँग्रेसनं जाहीरनामा नव्हे, माफीनामा प्रसिद्ध करायला हवा. ५० वर्षांत काय केलं त्यांनी? २०१४ नंतर देशात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

15:57 (IST) 25 Apr 2024
अकोल्यात उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; छुप्या प्रचारावर जोर

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांचा छुप्या व अंतर्गत प्रचारावर जोर आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 25 Apr 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीकास्र!

अशा अनेक ऑडिओ क्लिप आहेत. एका वेळी मोदींची स्तुती करणं आणि काही वेळात त्यांच्यावर टीका करणं असा हा बेगडी प्रकार आहे. ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. लोकांना काम करणारं सरकार हवंय, घरी बसणारं सरकार नकोय. संविधान बदलणार हा अपप्रचार सुरू आहे. पण संविधान बदललं जाणार नाही - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

15:51 (IST) 25 Apr 2024
शिवाजी आढळराव पाटील हे डमी उमेदवार; अमोल कोल्हेंचा पुन्हा टोला

आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 25 Apr 2024
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : महिन्याभरापूर्वी मुलुंडमध्ये वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना उल्हासनगर येथून अटक केली.

सविस्तर वाचा...

15:14 (IST) 25 Apr 2024
नोकरीची संधी : नवोदय विद्यालय समितीतील भरती

NVS अंतर्गत देशभरातील ६५० जवाहर नवोदय विद्यालयांत तसेच NVS चे मुख्यालय, ८ रिजनल ऑफिसेस, ७ नवोदय लिडरशिप इन्स्टिट्यूट्समध्ये पुढील नॉन-टिचिंग पदांची भरती.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 25 Apr 2024
कल्याण: कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा तोडण्याचे आदेश

दोन दिवसांत हा खुराडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.

सविस्तर वाचा...

14:49 (IST) 25 Apr 2024
वडाळ्यातील किराणा दुकानाला भीषण आग, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू

मुंबई : वडाळा येथील ॲन्टॉप हिल नजीकच्या जय महाराष्ट्र नगरमधील एका किराणा दुकानाला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये स्वयंपाकाच्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पन्नालाल वैश्य (७०) यांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 25 Apr 2024
“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. खरे तर ‘शपथनामा’ नाव देणे हीसुद्धा जनतेची फसवणूकच असून त्यांना या जाहीरनाम्यावर मत मिळणार नाहीत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वाचा...

14:41 (IST) 25 Apr 2024
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल

मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू परस्परांना जोडणारा बहुप्रतिक्षित तुळई अखेर बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान वरळीत दाखल झाली. प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तुळई वरळीत आणण्याचे काम रखडले होते. मात्र, अखेर ही तुळई वरळीत दाखल झाल्यामुळे सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

14:27 (IST) 25 Apr 2024
मतदारसंघ आढावा : हिंगोली; उमेदवार बदलल्याने शिंदे गटाची कसोटी

हिंगाेली : विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची कसोटी लागली आहे. शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन गटांमध्येच चुरशीची लढत होणार आहे. मागील चार दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची एक खास परंपराही हिंगाेली मतदारसंघाने यंदाही जपली आहे, हे विशेष !

सविस्तर वाचा...

14:26 (IST) 25 Apr 2024
खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले

नागपूर : नागपूरसह देशभरात गेल्या काही महिन्यांपासून सतत सोन्याच्या दरात वाढ होत आहे. बघता बघता सोन्याचे दर विक्रमी स्तरापर्यंत वाढले. परंतू गेल्या दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २० एप्रिलच्या तुलनेत नागपुरात २५ एप्रिलला हे दर सुमारे दोन हजारांनी कमी झाले आहे.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 25 Apr 2024
पुणे: घरफोडीचे १५० गुन्हे दाखल असलेल्या ‘जयड्या’ गजाआड

घरफोडीचे १५० हून जास्त गुन्हे दाखल असलेला चोरटा जयवंत उर्फ जयड्या गायकवाडला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 25 Apr 2024
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…

जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

सविस्तर वाचा...

13:20 (IST) 25 Apr 2024
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात चुरस; मागासवर्गीय, मुस्लीम व आदिवासी मते ठरणार गेम चेंजर!

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात कुणबी मताचे प्राबल्य असले तरी मागासवर्गीय, आदिवासी व मुस्लिमांची मते निर्णायक ठरणार आहेत.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 25 Apr 2024
सांगली: माजी आमदार जगताप यांच्या मोटारीवर जतमध्ये दगडफेक

लोकसभा निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी रात्री भाजपमधून बाहेर पडलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मोटारीवर दगडफेक झाली.

सविस्तर वाचा...

13:01 (IST) 25 Apr 2024
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला प्रियांका गांधींचा 'तो' व्हिडीओ!

प्रियांका गांधीनी अतिशय योग्य प्रकारे मोदींना प्रत्युत्तर दिलंय. ज्या व्यक्तीला स्वतःच्या बायकोच्या मंगळसूत्राचा आदर राखता आला नाही, ती व्यक्ती इतर महिलाच्या मंगळसूत्राबद्दल खोट्या बाता करतेय. ज्या व्यक्तीने देशातील महिलांवर साठवलेलं सोनं कोरोना काळात विकण्याची वेळ आणली ती व्यक्ती सोन्याबद्दल बोलतेय. अरे किती खोटं बोलाल आणि किती विष पेराल याची काही मर्यादा राहिलेली नाही. पण तुम्ही जे पेराल तेच उगवेल. काळ तुम्हाला याची शिक्षा देईल. मतदार धडा शिकवतील - जितेंद्र आव्हाड

https://twitter.com/Awhadspeaks/status/1782834946903798272

12:43 (IST) 25 Apr 2024
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील १४ वर्ष घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

सविस्तर वाचा...

12:31 (IST) 25 Apr 2024
जयंत पाटील यांनी गृहमंत्र्यांचे आभार का मानले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

12:29 (IST) 25 Apr 2024
पंतप्रधान असे कसे बोलू शकतात? शरद पवार यांचा सवाल

पहिल्या टप्प्यात जनमत भाजप विरोधात गेले आहे. त्यामुऴे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

12:26 (IST) 25 Apr 2024
रायगडाच्या प्रचारात बॅ. अंतुले यांचे वलय आजही कायम

अलिबाग- रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे दिवंगत नेते बॅरीस्टर ए. आर. अंतुले असल्याचे दिसून येत आहे. महायुती आणि इंडीया आघाडी दोन्हींच्या सभामध्ये अंतुलेच्या नावाचा वापर केला जात आहे. अंतुले यांच्या नावाचे वलय निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे.

सविस्तर वाचा...

12:11 (IST) 25 Apr 2024
पंतप्रधान असे कसे बोलू शकतात? शरद पवार यांचा सवाल

पहिल्या टप्प्यात जनमत भाजप विरोधात गेले आहे. त्यामुऴे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

12:05 (IST) 25 Apr 2024
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक

मुंबई : ‘वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिच्युअल ट्रस्ट’द्वारे मुंबई महानगरपालिकेच्या १२ उद्यानांचा १६ वर्षे गैरवापर केला जात असताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

12:02 (IST) 25 Apr 2024
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल आहे. त्या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांंनी प्रवास करावा, असे प्रवाशांंचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 25 Apr 2024
मुंबई, ठाण्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात, तरीही मतदारसंघ, उमेदवार ठरेनात

राज्यातील पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या (शुक्रवार) सुरुवात होत असली तरी महायुतीत मतदारसंघाचे वाटपच अंतिम झालेले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत मुंबईतील उमेदवार काँग्रेसने अद्यापही निश्चित केलेले नाहीत.

सविस्तर वाचा...

11:42 (IST) 25 Apr 2024
जयंत पाटलांचा अमित शाहांवर हल्लाबोल

अमित शाहांनी अमरावतीतच भाषण केलं - २००१ ते २०१३ या काळात अमरावतीत दरवर्षी आत्महत्यांचं प्रमाण १६८ होतं. आता २०१४ ते २०२२ या काळात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण ३५३ आहे. अकोल्यात १०९ होतं, ते १७१ झालं. यवतमाळमध्येही ही परिस्थिती २१४ वरून ३२४ झालं. बुलढाण्यात ११७ वरून २८९ वर आकडा गेला. वाशिममध्ये ८१ वरून १०१ झालं. यावर अमित शाहांचं काय उत्तर आहे? - जयंत पाटील.

11:39 (IST) 25 Apr 2024
अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला

संजय राऊत यांच्यासोबत राहिल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संयम ठेवावा, असा मोलाचा सल्ला शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिला आहे.

सविस्तर वाचा...

11:38 (IST) 25 Apr 2024
पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”

मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडती घेणयास सुरू केली.

सविस्तर वाचा...

11:37 (IST) 25 Apr 2024
ठाणे: दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

सविस्तर वाचा...

11:37 (IST) 25 Apr 2024
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना

‘आकाशाची सावल’ ही स्वरचित मराठी कविता सादर करून त्यांनी दिदींना आदरांजलीही वाहिली.

सविस्तर वाचा...

11:36 (IST) 25 Apr 2024
परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत तृतीय वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) पाचव्या सत्राची परीक्षा ही ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

11:36 (IST) 25 Apr 2024
शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क मैदानात पोलिसांची परेड आयोजित केली जाते.

सविस्तर वाचा...

11:35 (IST) 25 Apr 2024
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…

देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत पुणे देशात नवव्या स्थानी आहे, मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत पुण्याचा पहिला १० विमानतळांमध्येही समावेश नाही.

सविस्तर वाचा...

11:24 (IST) 25 Apr 2024
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण, शरद पवार गटाचं आश्वासन

महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. "देशभरात ३० लाखाच्या आसपास रिक्त जागा आहेत. आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू. महिलांचं शासकीय नोकरीतलं आरक्षण ५० टक्के ठेवण्याचा आग्रह केला जाईल. जीएसटी देशातल्या लोकांना लुबाडण्याचं काम करतोय. त्याला मानवी चेहरा देण्याचं काम आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल", अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

11:24 (IST) 25 Apr 2024
काय आहे शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात?

आज सकाळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख केला. "शपथपत्रात समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं म्हणणं मांडलं आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून ५०० रुपयांपर्यंत आणल्या जातील. गरज पडली, तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल, जसं पूर्वी यूपीएच्या काळात व्हायचं. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मर्यादेत आणण्याचं काम होईल", असं म्हणत जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील दोन प्रमुख तरतुदींचा उल्लेख केला आहे.

Mumbai Maharashtra Live News in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Marathi News Live Today, 25 April 2024: राजकीय घडामोडींचा आढावा