Marathi News Today : देशात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याचं बघायल मिळालं. यावरूनच आता निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनीही यावरून निवडणूक आयोग आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे.

याशिवाय पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात झालेल्या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. हा विषयसुद्धा दिवसभर चर्चे राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Mumbai News Updates 21 May 2024 : पबच्या संख्येबाबत महापालिकाही अनभिज्ञ, अनधिकृत ‘रूफटॉप’ हॉटेल्सवर कारवाईचे महापालिकेकडून पोलिसांना पत्र

19:05 (IST) 21 May 2024
मिरजेत मुसळधार पाऊस

सांगली : विजेचा कडकडाटसह वाऱ्याविना मंगळवारी सायंकाळी मिरज शहरात वळिवाच्या पावसाने झोडपले. दमदार पावसाने रस्ते जलमय झाले, तर बाजारासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची दैना उडाली. दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर वीजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळत होता. मिरजेतील स्टेशन रोडसह तांदूळ मार्केट, लोणी बाजार आदी सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. फोटो- मिरजेतील तांदूळ मार्केट परिसरात पावसाने रस्त्यावर जमा झालेले पाणी.

18:46 (IST) 21 May 2024
पुढील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर होण्याची शक्यता

पुणे : पुढील वर्षीपासून बारावी आणि दहावीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याची चाचपणी राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. नियमित परीक्षा लवकर झाल्याने पुरवणी परीक्षाही लवकर घेतली जाऊ शकते. तसेच, पुढील वर्षी प्रचलित पद्धतीनेच परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

वाचा सविस्तर…

18:43 (IST) 21 May 2024
आमदार पी.एन.पाटील यांच्यासाठी गावोगावी देवतांना साकडे

कोल्हापूर : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्यावर अपघातामुळे सध्या अस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू असताना विविध ठिकाणी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. मंदिरांमध्ये देवदेवतांना साकडे घातले जात आहे.

आमदार पाटील यांच्यावर अस्टर आधार रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांना दिलासा दिला जात आहे. दुसरीकडे, ते उपचारातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी गावोगावी मंदिरात प्रार्थना केली जात आहे. मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून आमदार पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना अध्यक्ष अरुण डोंगळे, सर्व संचालक, कर्मचारी व अधिकारी यांनी केली. दरम्यान, परदेशात गेलेले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील हे नियोजित कालावधीच्या आधी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ते गुरुवारी रात्री उशिरा कोल्हापूरात पोहोचणार आहेत. फोटो – आमदार पी. एन. पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी गोकुळ मध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक, कर्मचारी, अधिकारी यांनी प्रार्थना केली.

17:28 (IST) 21 May 2024
मुंबई : म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत फलक म्हाडा हटविणार

मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरु आहे. यासंबंधीचा अहवाल लवकरच म्हाडा प्राधिकरणाला सादर होण्याची शक्यता आहे. मात्र याआधीच म्हाडा उपाध्यक्षांनी मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील सर्व अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर तात्काळ फलक हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

वाचा सविस्तर…

17:15 (IST) 21 May 2024
महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे, नालेसफाईच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढा; आशिष शेलार यांची मागणी

मुंबई : मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून ७५ टक्के गाळ काढल्याचा दावा केला असून हे नालेसफाई कामांबाबत केलेले दावे खोटे आहेत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

वाचा सविस्तर…

17:02 (IST) 21 May 2024
मुंबई : भगवती रुग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे, कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी

मुंबई : बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या विस्ताराचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराने अनेक ठिकाणी अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदारावर योग्य कारवाई करून तो दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

17:01 (IST) 21 May 2024
मामाच्या गावी आलेल्या मुलाचा जड वाहतुकीने घेतला बळी

उन्हाळी सुट्टीनिमित्त हैदराबादहून सोलापुरात मामाच्या घरी आलेल्या एका आठ वर्षाच्या मुलाचा जड वाहतुकीने बळी घेतल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली. असद गौस शेख असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. सविस्तर वाचा

16:13 (IST) 21 May 2024
“बिल्डरच्या माजोरड्या मुलामुळे दोघांचा बळी गेला”, पुण्यातील अपघातावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

बिल्डरच्या माजोरड्या मुलामुळे दोघांचा बळी गेलाय आणि पोलीस आयुक्त आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला पोलीस स्टेशनमध्ये पिझा खायला दिला जातो. वैद्यकीय अहवाल चुकीचा दिला जातो. है दुर्दैवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

16:10 (IST) 21 May 2024
Maharashtra 12th HSC Results 2024: बारावीच्या निकालात पुणे विभागात पुणे जिल्ह्याची आघाडी… पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांचा निकाल किती?

Maharashtra Board Class 12th Results 2024 Announced प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ५८ हजार ६०८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ४० हजार ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सविस्तर वाचा…

15:48 (IST) 21 May 2024
डोंबिवलीतील कोपरमध्ये उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत

डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात बेसुमार बेकायदा इमारतींची कामे सुरू आहेत. पालिकेचे आरक्षित भूखंड, मोकळ्या जागा हडप करून या बेकायदा इमारती भूमाफियांकडून उभारल्या जात आहेत. सविस्तर वाचा…

15:46 (IST) 21 May 2024
रायगड जिल्ह्यातील ४९९ इमारती धोकादायक

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ४९९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सविस्तर वाचा…

15:31 (IST) 21 May 2024
मावळमध्ये निकालापूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी; खासदार श्रीरंग बारणेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले…

ज्यांनी काम केले नाही, त्यांची नावे पवार यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे निकालापूर्वीच मावळात महायुतीत वादाची ठिणगी पडली.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 21 May 2024
Thane 12th Result : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के- यंदाही मुलींची बाजी, विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा ९२. ०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा कमी लागला असला तरी, यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सविस्तर वाचा

15:12 (IST) 21 May 2024
अलिबाग : विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने महिलेकडून ४० लाख लुटले….

अलिबाग येथील वृध्द महिलेला जेष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगून ४० लाखांना लुटल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप बागल या प्रकरणाचा तपास करत आहेत. सविस्तर वाचा

14:26 (IST) 21 May 2024
डोंबिवलीत कोपर येथे नैसर्गिक तलाव रस्त्यासाठी बुजविण्याच्या हालचाली, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी

कल्याण, डोंबिवली शहरांमधील जुने तलाव, विहिरी विकास कामे, नवीन गृहप्रकल्पांसाठी बुजविण्याचा सपाटा बांधकामधारकांकडून सुरू आहे. आता डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात अनेक वर्षांचा नैसर्गिक झरे असलेला एका जुना तलाव बुजविण्याच्या जोरदार हालचाली रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून सुरू आहेत. सविस्तर वाचा

14:26 (IST) 21 May 2024
‘श्रीं’ची पालखी १३ जूनला पंढरपूरला होणार रवाना; ३३ दिवसांची पायदळ वारी

बुलढाणा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे. सकाळी ७ वाजता भक्तीमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी संत नगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल.

सविस्तर वाचा…

14:25 (IST) 21 May 2024
अजित पवार, पार्थ पवारांनी काम केलं, खालच्या कार्यकर्त्यांनी…बारणे यांनी व्यक्त केली खदखद

अजित पवार आणि पार्थ पवार यांनी माझं काम केलं. तश्या सूचना त्यांनी खालच्या कार्यकर्त्यांना केल्या, पण त्यांनी माझं काम केलं नाही. त्यांच्यात नाराजी होती, ती शेवटपर्यंत राहिली. त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल. अशी खदखद बारणे यांनी बोलून दाखवली आहे. सविस्तर वाचा…

14:25 (IST) 21 May 2024
अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९३ टक्‍के; उत्‍तीर्णतेच्या टक्‍केवारीत राज्‍यात सातवे स्‍थान

अमरावती : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्‍हणजेच इयत्‍ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९३.०० टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग सातव्‍या स्थानी आहे.

सविस्तर वाचा…

14:19 (IST) 21 May 2024
“माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे”; पुण्यातील अपघातावर संजय शिरसाटांची संतप्त प्रतिक्रिया

माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यांना कोणताही पक्ष जात धर्म नसतो. अशा लोकांनी कोणीही पाठिशी घालणार नाही. सामान्य लोकांचा जीव महत्त्वाचा असतो, याप्रकरणी एसआयटी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलीआहे.

13:32 (IST) 21 May 2024
पाच महिन्यांत १०७ नक्षल्यांचा खात्मा, नक्षलवाद्यांचा गड ‘अबुझमाड’ सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर!

अत्यंत किचकट भौगोलिक रचना, घनदाट जंगल व उंच टेकड्यांनी वेढलेला हा परिसर सामान्य नागरिकांसह प्रशासनासाठीदेखील एक गूढ कथा राहिलेला आहे. मोठ्या हिंसक कारवाईनंतर नक्षलावादी पळून जाऊन याच ठिकाणी लपून बसतात.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 21 May 2024
…अन् ‘ते’ राजीव गांधी यांचे राज्यातील अखेरचे जेवण ठरले, स्मृतीस उजाळा!

२१ मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन म्हणून भारतात पाळल्या जातो. कारण या दिवशी माजी पंतप्रधान यांचे निधन झाले होते.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 21 May 2024
ठाण्यात ठेकेदाराची मुजोरी, मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात आदेशानंतरही खोदकाम करून विद्युत वाहिनी तोडली

एका ठेकेदाराने मुजोरी करत चक्क मतदान यंत्रणा ठेवलेल्या जागेत म्हणजेच, दक्षता सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रुम) असलेल्या भागात रस्ते दुरुस्तीसाठी खोदकाम केले.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 21 May 2024
१०२१ मंडळामध्ये सुद्धा त्वरित दुष्काळी मदत द्यावी – रोहित पवार

संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असताना राज्य सरकारने मात्र केवळ ४० तालुक्यांमध्ये ुष्काळ जाहीर केला करून उर्वरित महाराष्ट्राला राज्य शासनाने वाऱ्यावर सोडले होते. सरकारच्या या चुकीचा फटका आज लाखो शेतकऱ्यांना बसत असून ४० तालुके वगळता इतर भागातील शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहत आहेत. शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला असून २०२४ वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच ४२७ शेतकऱ्यांनी आपललं जीवन संपवलं. दुष्काळाची दाहकता भयाण आहे, त्यामुळे सरकारने आता वेळ न दडवता उर्वरित १०२१ मंडळामध्ये सुद्धा त्वरित दुष्काळी मदत द्यावी, ही विनंती. तसेच ४० तालुक्यातील शेतकऱ्यांना आलेली दुष्काळी मदत बँकांनी परस्पर कर्ज खात्यात वळवल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यासंदर्भात शासनाने लक्ष द्यावे, ही विनंती!

https://twitter.com/RRPSpeaks/status/1792800233577124170

12:21 (IST) 21 May 2024
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

आरोपी मद्यप्राशन करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी कोणताही निगेटीव्ह ब्लड रिपोर्ट आलेला नाही. पोलीस पहिल्या दिवसांपासून कठोर कारवाई करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. याप्रकरणी पोलिसांवर कोणताती दबाव नाही, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

11:27 (IST) 21 May 2024
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर बार मालकासह मॅनेजरला अटक

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर आता बार मालकासह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असताना त्याला दारु देण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

11:04 (IST) 21 May 2024
दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी – विजय वडेट्टीवर

पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे CCTV फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?

रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?

नियम डावलून बार आणि पब सुरू होते का?

होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?

या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? त्यामुले या घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली.

11:00 (IST) 21 May 2024
…अन्यथा पुण्यातील लोकं रस्त्यावर येतील; संजय राऊतांचा इशारा

पुणे कार अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे. त्यांनी आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. एका तरुण जोडप्याचा मृत्यू होतो आणि आरोपीला २ तासांत जामीन मंजूर होते. हे कसं शक्य आहे? तो नशेत होता, त्याचे व्हिडीओसुद्धा बाहेर आले आहेत. मग त्याचा मेडीकल रिपोर्ट निगेटिव्ह कसा आला? याची उत्तर पोलीस आयुक्तांनी द्यावी. पुणे पोलीस आयुक्तांना लवकरात लवकर निलंबित करावे, अन्यथा पुण्यातील लोकं रस्त्यावर येतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

10:47 (IST) 21 May 2024
महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मानले राज्यातील जनतेचे आभार

महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी, महाराष्ट्रातील मतदारांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांबद्दल, मी त्यांचा मनापासून आभारी आहे, असे ते म्हणाले.

10:44 (IST) 21 May 2024
“यंत्रणा कशी भ्रष्ट करायची यात भाजपा, मिंधे गट माहिर”; संथ गतीने झालेल्या मतदानावरून संजय राऊतांची टीका

“आम्ही जागृत होतो त्यामुळे त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाहीत, पैसे वाटप आम्ही पकडलं, मग काय करायचं? मग अशा पद्धतीने यंत्रणा ढिली करायची. लोकांचा छळ करायचा. चार-चार तास लोकांना रांगेत उभं करायचं. ही डिजिटल इंडिया आहे ना? याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेलं. फेल करण्यात आलं. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशापद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही. आम्ही शेवटपर्यंत आवाहन केलं की रांग सोडू नका. पहाट झाली तरी चालेल. त्यामुळे अनेकठिकाणी रात्री ११ पर्यंत मतदान होऊ शकले. परंतु, अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत घडलं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

10:43 (IST) 21 May 2024
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, “६ जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा..”

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापूर्वी माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसंच सरकारला त्यांनी मुदत दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवली सराटीला गेले. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वाचा

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह टुडे

पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघातानंतर शहरातील पबचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पबच्या संख्येची कोणतीही नोंद महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम नियमानुसार केवळ रेस्टॉरंट सुरू करण्यास महापालिका मान्यता देते. त्यामुळे तेथे पब सुरू आहे की नाही, याची माहिती नाही. पबची माहिती पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाकडे असेल, असे सांगत महापालिका प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.