Maharashtra, Mumbai Breaking News Updates : ज्ञानवापी मशिदीत ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले तो भाग सर्वासाठी प्रतिबंधित करा, असे आदेश सोमवारी येथील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले. न्यायालयीन आदेशानुसार या मशिदीचे चित्रीकरण सर्वेक्षण सोमवारी करण्यात आले. तर वाराणसीतील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी संकुलाचे सर्वेक्षण करण्याच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दुसरीकडे केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
dharashiv, lok sabha, ranajagjitsinha patil
Maharashtra News : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार? पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता
maharashtra heatstroke marathi news, risk of heatstroke in maharashtra
उष्माघाताचा धोका वाढला! राज्यात १३ रुग्णांची नोंद; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रकोप
Live Updates

Maharashtra Latest News Updates: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या

22:08 (IST) 17 May 2022
VIDEO: मला जगू द्याल की नाही? विचारत राज ठाकरे भडकले पत्रकारांवर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान बाजीराव रस्त्यावरील एका पुस्तकाच्या दुकानात जात असताना राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले आहेत. सविस्तर बातमी

21:15 (IST) 17 May 2022
मीरा भाईंदर: महासभा सुरू असताना २ भाजपा नगरसेविका आपसात भिडल्या, घटनेचा LIVE VIDEO

मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सुरू असताना दोन भाजपा नगरसेविका आपसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्या होत्या. सविस्तर बातमी

18:32 (IST) 17 May 2022
ज्ञानवापी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, “शिवलिंगाच्या जागेला…”

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर वाद आणखी चिघळला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षाने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याबाबत मुस्लिम पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. अधिक वाचा...

15:24 (IST) 17 May 2022
कल्याण: बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका, ३४ लाखांचा दंड वसूल

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक विभागानं दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यात बेशिस्त वाहनचालकांना ई चलानद्वारे दंड पाठवण्यात आला होता. पण दंडात्मक रक्कम वाहन मालकांकडून वाहतूक विभागाकडे भरली जात नव्हती. वारंवार समज देऊनही या रकमा भरल्या जात नव्हत्या. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, कोळसेवाडी वाहतूक विभागात अस्वस्थता होती. त्यानंतर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये थकबाकीदार वाहन मालकांना हजर राहण्याचे आदेश देऊन वाहतूक विभागाने ७ हजार १६१ वाहन मालकांकडून ३४ लाख ५३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. सविस्तर बातमी

14:05 (IST) 17 May 2022
सभा करायच्याच असतील तर अयोध्यामध्ये करुन दाखवा - दीपाली सय्यद

अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. यावरुनही आता मनसेवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

13:34 (IST) 17 May 2022
पुण्यातील सभा कुठे होणार हे राज ठाकरे उद्या जाहीर करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसाच्या पुणे दौर्‍यावर येत आहे. आम्ही २१ ते २७ मे दरम्यान सभेच पुण्यात नियोजन करीत आहे. नेमकी सभा कुठे होणार,त्याबाबत राज ठाकरे उद्या जाहीर करतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली.

13:16 (IST) 17 May 2022
जितेंद्र आव्हाडांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

“यांना भोंग्यांवर, जातीवर, धर्मावर बोलायचं असतं. भारताच्या नागरिकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका या पाचही देशांचं धर्मव्यवस्थेमुळे, जातीवादामुळे, समूहवादामुळे काय वाटोळं झालं आहे. त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक”, असं आव्हाड म्हणाले.

https://twitter.com/LoksattaLive/status/1526468968067702784

13:08 (IST) 17 May 2022
राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचे काही कारण नाही – दिलीप वळसे पाटील

मनेस प्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचे काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवनागी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला हरकत नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

13:03 (IST) 17 May 2022
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही अतिशय आक्षेपार्ह बाब - गृहमंत्री

केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. वाचा सविस्तर...

12:30 (IST) 17 May 2022
औरंगाबादेतील औरंगजेबचं थडगं जमीनदोस्त करण्याची मनसेची मागणी

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेनं केली आहे. मनसेचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घ्या येथे क्लिक करुन

12:10 (IST) 17 May 2022
रोहित पवार यांचा भाजपावर निशाणा!

“गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे”, असं ट्वीट रोहीत पवारांनी केलं आहे.

https://twitter.com/LoksattaLive/status/1526452112065851392

11:39 (IST) 17 May 2022

Photos: माईंची खरी कमाई… सिंधुताईंनी संभाळलेल्या त्या ९ मुलींच्या लग्नाला ३००० पाहुण्यांची हजेरी

'अनाथांची माय' पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा रविवारी दि. १५ मे २०२२ रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे थाटात पार पडला. माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातून तीन हजार पेक्षा जास्त पाहुणे मंडळी यांनी हजेरी लावली.

फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

11:06 (IST) 17 May 2022
औरंगाबादचे नामांतर करणे आमच्या सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही - राजेश टोपे

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. वाचा सविस्तर...

10:53 (IST) 17 May 2022
खडसे म्हणतात, "या सगळ्याकडे फक्त मनोरंजन म्हणून बघा!"

“हे जे काही चाललं आहे, ते मनोरंजन म्हणून पाहा. ते फार गांभीर्याने घेऊ नका. भोंगा काढला काय, राहिला काय, तुमचं पोट भरणार नाहीये”, अशी टिप्पणी एकनाथ खडसेंनी केली आहे.

वाचा नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे

10:44 (IST) 17 May 2022
फडणवीस विभीषणाप्रमाणे वागत असल्याच्या शिवसेनेच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्ही बिभीषण मग तुम्ही…”

फडणवीस यांनी रविवारी मुंबईत घेतलेल्या सभेमधून शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर आज शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधताना त्यांची तुलना थेट विभीषणाशी केली आहे. शिवसेनेच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या येथे क्लिक करुन

10:35 (IST) 17 May 2022
ज्ञानवापी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी; शिवलिंग आढळून आलेल्या सर्वेक्षणाविरोधात याचिका, पण…

तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर ज्ञानवापी मशिदीत ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले तो भाग सर्वासाठी प्रतिबंधित करा, असे आदेश सोमवारी वाराणसीमधील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले. आज या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. मात्र ज्या कायद्याच्या आधारे याचिका करण्यात आलीय तो कायदाच वादात सापडलाय.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

10:33 (IST) 17 May 2022
“फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे, ठाकरे नसते तर महाराष्ट्रात…”; शिवसेनेनं साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेवरुन शिवसेनेनं भाजपा आणि विरोधी पक्ष नेत्यांवर टीका केली आहे. फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे, अशी टीका शिवसेनेनं केलीय.

संपूर्ण वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

10:15 (IST) 17 May 2022
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार, नऊ जखमी

मुंबई-आग्रा महामार्गवर धुळ्यातील मित्रनगर भागाक काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. मागून येणाऱ्या मालमोटारीने रिक्षाला धडक दिल्यामुळे नियंत्रण सुटून ही रिक्षा समोरून येणाऱ्या क्रूजर कारवर आदळली. हा अपक्षात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षा आणि क्रूजर कारचा अक्षरश: चुराडा झाला.

नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

10:14 (IST) 17 May 2022
मोसमी पाऊस ६ दिवस आधीच अंदमानात दाखल

अंदमानाच्या समुद्रात सोमवारी मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारी दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळात तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. वाचा सविस्तर...

10:13 (IST) 17 May 2022
स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ; काँग्रेस-राष्ट्रवादीची निदर्शने

केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. वाचा सविस्तर...

10:11 (IST) 17 May 2022
तेव्हा रुग्णवाहिकेचे, आता बाकीचे भोंगे! उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी

वर्षभरापूर्वी करोनाकाळात केवळ रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजू लागले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या पुस्तक प्रकाशनात मनसे व भाजपच्या राजकारणावर फटकेबाजी केली. वाचा सविस्तर...

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.