Top Marathi News Updates, 28 August 2026: रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. “आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बारामतीमध्ये उभारण्यात आलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, धनंजय मुंडे आणि आशिष शेलार यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

तर दुसरीकडे, राज्यात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होऊन आठवडा झाला नाही, तोच हा निर्णय स्थगित करण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे. हिंदी भाषिकांच्या दबावापुढे माघार घेत या कारवाईला वर्षभरासाठी स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरच, जर रिक्षाचालक हिंदीत बोलले तर ‘मनसे प्रसाद’ देणार आणि परप्रांतीय रिक्षाचालकांनी मराठीत संभाषण न केल्यास मनसे शैलीत चोप देणार, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.

नेपाळ-तिबेट परिसरात भूकंप, पूर आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील नागरिकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सतर्क असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर घडामोडी जाणून घ्या. राज्यातील पावसाचे आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…

Live Updates

Latest Marathi News Live Updates, 28 August 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स

19:21 (IST) 28 Aug 2026

आयुष्मान भारत लाभार्थींच्या यशोगाथा आता ‘रील्स’मधून मांडणार, वर्धापन दिनानिमित्त राज्य आरोग्य हमी सोसायटीने कंबर कसली

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा वर्धापनदिन २३ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
19:00 (IST) 28 Aug 2026

नेपाळच्या जलप्रलयात मुंबईतील दोन नामांकित डॉक्टरांसह १२० पर्यटक

डॉ. देशपांडे यांची भाची मैथिली मुंडलेने माहिती दिली की, कुटुंबियांचे त्यांच्याशी बुधवारी सकाळी ८.२८ वाजता शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर नातेवाइकांनी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. ...सविस्तर बातमी
19:00 (IST) 28 Aug 2026

नेपाळच्या जलप्रलयात मुंबईतील दोन नामांकित डॉक्टरांसह १२० पर्यटक

डॉ. देशपांडे यांची भाची मैथिली मुंडलेने माहिती दिली की, कुटुंबियांचे त्यांच्याशी बुधवारी सकाळी ८.२८ वाजता शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर नातेवाइकांनी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. ...सविस्तर बातमी
18:47 (IST) 28 Aug 2026

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीकडून कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीची घोषणा

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही १९६५ मध्ये स्वर्गीय आमदार तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेली राज्यातील जुनी शिक्षक संघटना आहे. ...सविस्तर वाचा
18:40 (IST) 28 Aug 2026

वसई आणि भाईंदर स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक

ब्लॉकच्या कालावधीत जलद मार्गावरील सर्व गाड्या विरार ते भाईंदर/बोरीवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. ...सविस्तर बातमी
18:34 (IST) 28 Aug 2026

रक्षाबंधन - नारळी पौर्णिमेचा दुहेरी योग; नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली

आज नारळी पौर्णिमा असल्याने शेकडो भाविकांनी सकाळपासूनच कृष्णा नदीत पवित्र स्नान केले. ...सविस्तर वाचा
18:30 (IST) 28 Aug 2026

नाशिकचा कांदा महागला, मुख्यमंत्र्यांची मिश्कील टिप्पणी; ‘यावेळी कांदे भेट म्हणून मिळाले नाहीत’

सध्या कांदा महाग असल्याने कोणी या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाही. ती भेट मिळाली असती तर घरी नेले असते, अशी मिश्कील टिपणी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या उंचावलेल्या दरावर भाष्य केले. ...वाचा सविस्तर
18:30 (IST) 28 Aug 2026

मुरबाडमध्ये २० हजारांची लाच घेताना तलाठी व पोलीस पाटील ठाणे एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ...सविस्तर बातमी
18:28 (IST) 28 Aug 2026

वैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

अखिल भारतीय कोट्यातील दुसऱ्या फेरीसाठी ३ ते ८ सप्टेंबरदरम्यान नोंदणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया होईल. ...सविस्तर बातमी
18:17 (IST) 28 Aug 2026

रोहित पवार म्हणाले, VSR कंपनीच्या विरोधात पुरावे देणार

अजितदादांना जाऊन आज सात महिने पूर्ण झाले आहेत परंतु ना CID चा तपास पुढे सरकला ना CBI कडे तपास दिला गेला. साधा FIR सुद्धा नोंद झाला नाही, एवढेच नाही तर कर्नाटकात नोंद झालेला FIR देखील महाराष्ट्र सरकारने वर्ग केलेला नाही. VSR ला वाचवण्यासाठी एवढी धडपड कोण करतय ? का करतंय? हे सर्व ४ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसकट सविस्तर सांगेन. असं म्हणत रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. आता रोहित पवार ४ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत काय पुरावे सादर करणार आणि नेमके काय खुलासे करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा मृत्यू म्हणजे घातपात होता का? हे तपासण्यासाठी सीबीआय किंवा सीआयडी चौकशी करा ही मागणी करत पाठपुरावा केला आहे.

18:04 (IST) 28 Aug 2026

आदिवासी विद्यार्थी अमरावतीहून पायीच निघाले यवतमाळच्या दिशेने, मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन तीव्र..

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर शुक्रवारपासून आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. ...अधिक वाचा
18:00 (IST) 28 Aug 2026

कूपर रुग्णालयात रुग्णांना तुसडेपणा, तिरस्काराची वागणूक; मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार अमित साटम यांचे पालिका आयुक्तांना पत्र

डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयाची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत असून या रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना अतिशय तुसडेपणाची व तिरस्काराची वागणूक देत असतात. ...सविस्तर वाचा
17:58 (IST) 28 Aug 2026

ठाण्यात हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळ्यात ३५०हून अधिक बांधवांचा सहभाग

गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. दरवर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. ...अधिक वाचा
17:44 (IST) 28 Aug 2026

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ...सविस्तर वाचा
17:25 (IST) 28 Aug 2026

रेड्यांची झुंज लावणे अंगलट

रेड्यांना झुंजवणे किंवा स्पर्धेत सहभाग घेणे आयोजकांसह म्हशी मालकांच्या आणि सहभागी होणाऱ्यांच्या अंगलट आले आहे. ...सविस्तर वाचा
17:19 (IST) 28 Aug 2026

Mohan Bhagwat US Visit : सविस्तर... सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्याला विरोध का?

Mohan Bhagwat US Visit Controversy : भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील भारतीय समुदाय, विविध सामाजिक संस्था तसेच आंतरधर्मीय संघटनांशी संवाद साधणार आहेत. ...सविस्तर बातमी
17:07 (IST) 28 Aug 2026

​नायगाव-बापाणे रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी व काँग्रेसचा रस्ता रोको

नायगाव पूर्व ते बापाणे रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहे. ...अधिक वाचा
17:02 (IST) 28 Aug 2026

वाकड येथील शिल्पा गवारे आत्महत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्र्यांची कलाटे कुटुंबियांना ग्वाही

खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवला जाईल आणि विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलाटे कुटुंबाला दिली आहे. ...वाचा सविस्तर
17:00 (IST) 28 Aug 2026

मलेशिया एअरलाइन्सचे मुंबई इंडियन्सच्या रंगात रंगलेले विमान मुंबईत

९ एम-एमटीएम या नोंदणीकृत वाइड-बॉडी विमानाने, क्वालालंपूरहून मुंबईत एमएच-१९४ म्हणून आपले पहिले व्यावसायिक उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले. ...सविस्तर वाचा
16:48 (IST) 28 Aug 2026

संगमनेरमधील सहल कंपनीमार्फत नेपाळला गेलेले ४५ पर्यटक सुखरूप

शहरालगतच्या घुलेवाडी येथील निर्मला गुंजाळ या त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत सहलींचे गेल्या अनेक वर्षांपासून आयोजन करतात. ...अधिक वाचा
16:41 (IST) 28 Aug 2026

३२ वर्षीय तरुणाचा मारहाणीत खून; नांदेडच्या एकतानगर येथील घटना

एकता नगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आकाश दवणे व सावते परिवारात वाद झाला होता. ...सविस्तर बातमी
16:25 (IST) 28 Aug 2026

जोगेश्वरी ट्रॉमा केअरमध्ये मेंदू विकारग्रस्तांना अद्ययावत उपचार

मुंबई-अहमदाबाद महामार्ग व परिसरातील अपघातांमुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेले, पक्षाघात झालेले वा तातडीच्या मेंदूशी संबंधित उपचारांची गरज असलेले रुग्ण येथे मोठ्या प्रमाणावर येतात. ...सविस्तर बातमी
16:23 (IST) 28 Aug 2026

रक्षाबंधनासाठी निघालेल्या बहिणींचे रेल्वे, रस्ते प्रवासात हाल

ठाणे रेल्वे स्थानकासह दिवा, डोंबिवली, कल्याण व बदलापूर स्थानकावरही प्रवाशांची वर्दळ वाढली होती. गर्दीमुळे लोकलमध्ये चढताना आणि उतरताना महिलांना मोठी कसरत करावी लागली. ...सविस्तर बातमी
16:23 (IST) 28 Aug 2026

इगतपुरी आश्रमशाळेतून सहा विद्यार्थी अचानक गायब; मध्यरात्री नदीकाठावर सापडले, नेमकं काय घडलं?

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथील शासकीय आश्रमशाळेतील सहा विद्यार्थी गुरुवारी मधल्या सुट्टीत अचानक बेपत्ता झाले. ...वाचा सविस्तर
16:04 (IST) 28 Aug 2026

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विक्रमी किंमत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार; शेतकरी राजी होण्याचा विश्वास - हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सुरू होणार असून याला सतेज पाटील, राजू शेट्टी यांनी विरोध जोरदार विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. ...वाचा सविस्तर
15:51 (IST) 28 Aug 2026

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण: "पैसे कुठून आणायचे, पप्पा तणावात आहेत", ऋतुजा-गौरवच्या व्हॉट्सॲप चॅटमधून समोर आला ५ लाखांच्या डीलचा प्लॅन

MPSC ड्रग्ज इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुख्य आरोपी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट समोर आले आहे. ५ लाखांची डील, घरात गुप्तता पाळण्याचे आदेश आणि संशय टाळण्यासाठी मुद्दाम १० उत्तरे चुकीची लिहिण्याचा बनाव या चॅटमधून उघड झाला आहे. ...सविस्तर बातमी
15:51 (IST) 28 Aug 2026

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण: "पैसे कुठून आणायचे, पप्पा तणावात आहेत", ऋतुजा-गौरवच्या व्हॉट्सॲप चॅटमधून समोर आला ५ लाखांच्या डीलचा प्लॅन

MPSC ड्रग्ज इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुख्य आरोपी ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट समोर आले आहे. ५ लाखांची डील, घरात गुप्तता पाळण्याचे आदेश आणि संशय टाळण्यासाठी मुद्दाम १० उत्तरे चुकीची लिहिण्याचा बनाव या चॅटमधून उघड झाला आहे. ...सविस्तर बातमी
15:46 (IST) 28 Aug 2026

मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून नवजात कन्येचा पहिला खास प्रवास

मुंबईतील विविध भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयासमोर एक बाळंतीण आपल्या नवजात कन्येला घेऊन रिक्षाची वाट पाहत उभी होती. ...अधिक वाचा
15:36 (IST) 28 Aug 2026

सतेज पाटील - महाडिक 'गोकुळ'साठी एकत्र येण्याला माझ्या शुभेच्छा; हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली भूमिका

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील - महाडिक यांच्या सलगी वाढताना दिसत आहे. ...अधिक वाचा
15:18 (IST) 28 Aug 2026

नेपाळमध्ये पूल ओलांडल्यानंतर दोन तासांत तोच पूल वाहून गेला; नाशिकचे ११ विद्यार्थी काठमांडूत अडकले

मनकामना देवीचे दर्शन घेऊन पूल ओलांडल्यानंतर अवघ्या दोन तासांत तो पूल आणि मुख्य रस्ता वाहून गेला. ...सविस्तर बातमी

Maharashtra News Live Updates in Marathi| Maharashtra Weather Update Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स