Maharashtra Political Crisis, 27 March 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टीप्पणीवरून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. यावरून देशात काँग्रेस विरूद्ध भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. तर, मालेगावात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाचा समाचार घेतला आहे. यावरूनही राज्यात टीका-टीप्पणी सुरू झाली आहे.
Marathi News Live Updates : देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर….
“भाजपाने लिहून दिलेली स्क्रीप्ट मुख्यमंत्र्यांनी वाचली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इशारा केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कागद वाचला. याचा अर्थ लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचली. सावरकरांची यात्रा काढणार असेल स्वागत आहे. पण, सावरकांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने महाराष्ट्रात करण्यात येत आहे. ८ वर्षे केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सर्वात आधी सावरकरांना भारतरत्न द्या. मग विचारधारा यात्रा काढावी, ” असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा-शिंदे सरकारला दिलं आहे.
नवी मुंबई : तंत्रज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना सायबर प्रशिक्षण आवश्यक झाले आहे. हिच निकड लक्षात घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आमगाव नगर परिषदेच्या न्याय प्रविष्ट प्रकरणावरून आठ गावे पेटून उठले होते. दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत असल्यामुळे सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण निकाली काढण्याचे ठोस आश्वासन आमदार परिणय फुके यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांना दिल्यानंतर रविवारी रात्री हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आमगाव संघर्ष समितीचे यशवंत मानकर यांनी दिली.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत २०२०च्या तुलनेत यंदा गैरप्रकार घटल्याचे निदर्शनास आले. यंदा बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका संस्थेशेजारील प्रवेशद्वाराने आता केवळ फेस रिडींगच्या माध्यमातूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १० एप्रिलची मुदत देण्यात आली असून, नोंदणीविना प्रवेश दिला जाणार नसल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.
“काँग्रेस संसद चालू देत नाही. वेगवेगळी विधान करत जनतेची दिशाभूल करत आहे. आज ( २७ मार्च ) काँग्रेसचे लोक संसदेत काळ्या कपड्यात आले. त्यांना कायद्याचा अपमान करायचा आहे का? ते ओबीसीबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करतात का?,” असे सवाल भाजपाचे नेते पीयूष गोयल यांनी उपस्थित केले आहेत.
Delhi | There have been 12 other cases as well of the members who were disqualified after the court's decision. His own party leader was asking Rahul Gandhi to apologise but he didn't do that due to his arrogance: Piyush Goyal, BJP pic.twitter.com/71R8UKFoPo
— ANI (@ANI) March 27, 2023
यंदाच्या २०२३ या वर्षात मार्च या एकाच महिन्यात तीन ऋतुंचा अनुभव ठाणे जिल्ह्यात अनुभवास आला. मार्च महिन्याच्या सुरूवातीला पहिल्या पंधरवड्यात तापमान चाळीशीपार गेले होते. त्यानंतर १६ मार्चनंतर काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.
कल्याण पूर्वेतील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलंगगड रस्त्यावर आडिवली-ढोकळी गावातील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी तीन माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती.
“राहुल गांधी वारंवार सांगत आहे, मी सावरकर नाही गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यात नाही, तुम्ही काय सावरकर होऊ शकता. तुम्ही देशाची निंदा परदेशातून जाऊन करता. याच्यापेक्षा काय जास्त दुर्दैव असू शकतं,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
खासगी शिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हे दाखल असून अद्यापही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द कण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी गांधी चौकात काँग्रेस व समविचारी पक्षाच्या नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन करून भाजपचा निषेध नोंदविला.
आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'चेतावणी धरणे आंदोलन' करण्यात आले.जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, महासचिव विष्णू उबाळे, प्रशांत वाघोदे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जळगाव – शहरातील गोलाणी व्यापारी संकुलात रविवारी रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. सोपान हटकर (३५, रा. हरिविठ्ठललनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर फरार संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी : चिंचवड येथील राज्यस्तरीय लावणी महोत्वसात मी राजसा तुम्हासाठी ग्रुपच्या नर्तीका सोनाली जळगावकर यांनी ‘कस गाऊ मी तुमचे गुण, तुमचे माझ्यावर रून’, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, तुमच्या पायात हवा’.. ही लावणी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी सादर केली. लावणी पाहताना पुणेकर यांना अश्रू अनावर झाले.
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील तलावावर रविवारी सकाळी दहा परदेशी राजहंसांचे दर्शन झाले. मागील आठवड्यात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेले रोशन धोत्रे यांनाही चौदा राजहंस दिसल्याची माहिती पक्षीमित्र, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी दिली.
जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम दत्तात्रय मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला. नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली.
पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे, तर दुसरीकडे त्यांची पत्नी सोनाली चव्हाण यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाठार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“गेल्या ३५ वर्षाच्या राजकारणात माझ्यावर कोणतीही चौकशी किंवा आरोप नाही. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून माझ्यावर प्रचंड अन्याय झाला. त्यामुळे आमचा स्वाभिमान टिकवण्यासाठी, या भागातील काम होण्यासाठी आम्ही भाजपात गेलो,” असं प्रत्युत्तर भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाण पाडा येथील खाडी किनारी हरितपट्ट्यामधील चार हजार चौरस मीटर जागेत शिव सावली नावाने १० बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प उभारणाऱ्या भूमाफियांना ‘महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाने’ (महारेरा) इमारत गृहप्रकल्पाची बनावट कागदपत्रे दाखल करुन ‘महारेरा’कडून बनावट नोंदणी क्रमांक मिळविल्याबद्दल नोटीस बजावली आहे.
गडचिरोली : सूरजागड येथे जाऊन आंदोलन करणार असे दोनदा नाना पटोले यांनी जाहीर केले होते. परंतु अद्याप ते आले नाही. यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.
“पवारांच्या पाठीमागे सर्व पिढीन-पिढी बर्बाद केली. आपल्या आजोबाने-बापाने दिलं, तुम्ही ही चूक करू नका. भावी पंतप्रधान असा विषय असतोका. ज्यांचे ४ खासदार तो माणूस देशात पंतप्रधान होऊ शकतो. सभागृहाच नाव जरी काढलं, तरी ते राष्ट्रीय नेते म्हणून सांगतात. त्यांच्यानंतर मायावती जयललिता, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. आण्णा हजारेंच्या आंदोलनाच नाचून नाचून केजरीवाल तीन वेळा मुख्ममंत्री झाले. तुम्हाला तुमचा आकडा १०० वर जात नाहीत. तरीसुद्धा तुम्ही अशा भाषा करता,” अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरीगाव येथे राहणारी एक महिला भाजी आणण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेली, मात्र घरी परत आल्यावर घराचा कडी कोयंडा तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सव्वासहा ते सात या केवळ पंचेचाळीस मिनिटांत चोर आले. त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व आत प्रवेश करीत अजून एका कपाटाचे कुलूप तोडून चोरी केली व निघूनही गेले.
मुंबई : राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. करोना चाचण्या करणाऱ्यांपैकी बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाणही गेल्या महिन्यांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत करोना चाचण्यांपैकी बाधित अहवाल येण्याचा दर ०.५३ टक्के होता. तोच दर मागील आठवड्यामध्ये ३.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शहरात गुन्हा करण्याच्य्या हेतूने आले खरे, मात्र पोलीसांना वेळीच खबर लागल्याने नागपूरचे पंकज प्रभाकर साठवणे, मिलिंद प्रेम हिराणी व आकाश ज्ञानेश्वर बांगडे हे जाळ्यात अडकले. या तिघांची अट्टल गुन्हेगार म्हणून पोलीस दफ्तरी नोंद आहे.
समाज माध्यमावर ओळख झाल्यावर त्या दोघांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर त्याने तिला कॉलेजला जाऊ नको, मला तुझ्यासोबत वेळ घालवयाचा आहे, असे म्हटले. मग काय, तिने दररोज कॉलेजला दांडी मारत त्याच्यासोबत फिरणे व चहा, नाश्त्याच्या टपरीवर वेळ घालविणे सुरू केले.
वाई : ऐन उन्हाळी हंगामात महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी परिसरात स्थानिक आणि पर्यटक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. आज तर महाबळेश्वरच्या वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदूचे हिमकणात रुपांतरण झाल्याचे पाहावयास मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवरदेखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले.
समाज माध्यमावर ओळख झाल्यावर त्या दोघांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर त्याने तिला कॉलेजला जाऊ नको, मला तुझ्यासोबत वेळ घालवयाचा आहे, असे म्हटले. मग काय, तिने दररोज कॉलेजला दांडी मारत त्याच्यासोबत फिरणे व चहा, नाश्त्याच्या टपरीवर वेळ घालविणे सुरू केले.
“मी पवारांच्या विरोधात बोलतो, याचा अर्थ निट समजून घ्या. कारण, पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली, ती मुळापासून काढून टाकावी लागेल. तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस नावाचा कार्यकर्ता २०१४ साली मुख्यमंत्री झाला. २०१४ ते २०१९ महाराष्ट्राचा विचार केला, तर शेतकऱ्यांना काय लागतं, त्याचा योग्य उपाय काढणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा लाभला,” असं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
विकासाच्या नावाने उरण मधील नैसर्गिक खारफुटी व पाणथळी या मातीचा भराव करून झपाट्याने बुजवल्या जात असून यामुळे उरणला पुराचा धोका निर्माण झाला आहे, भूजल पातळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
कल्याण व्यवसायातील ४५ लाख लाख रुपयांची रक्कम मालकाने आपल्या विश्वासू नोकराला बँकेत भरण्यासाठी दिली. विश्वासू नोकराने मालकाचा घात करुन ती रक्कम बँकेत भरणा न करता आपल्या राजस्थान मधील मूळ गावी पळून गेला.
डोंबिवली- वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांमध्ये आणि उद्घोषकांमधून स्थानकांच्या नावाची उद्घोषणा करताना मोडतोड होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई : मराठवाड्यात लागोपाठ दोन जाहीर सभा घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या ‘रयतूबंधू’ आणि ‘दलितबंधू’ या योजनांचे राज्यातील शेतकरी आणि अनुसूचित जातीच्या लोकांना प्रलोभन दाखवत आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेलंगणाच्या पक्षाला राज्यातील मतदार स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.
तुम्ही म्हणताय कांद्याला भाव मिळाला नाही, मी म्हणतो मिळाला. गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली, किती खोक्याला एक कांदा गेला. एक कांदा ५० खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके, रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
गेल्या आठवड्यात विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारल्या होत्या. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली. “मला दिल्लीत संसदेच्या लॉबीत पंतप्रधान मोदी, अमित शाह
लोणावळा : लोणावळा परिसरात एका डाॅक्टरच्या बंगल्यातून चोरट्यांनी पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डाॅ. किरण राघवेंद्र चुळकी (वय ४४, रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे. सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या निमंत्रण आलेल्या चार स्थळांना साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार असून, २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नवरत्न स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (भारतीय अवकाश संशोधन केंद्र) बंगळुरू येथे सहलीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या सहलीवर विरजण पडले आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आपल्या ‘पीएच.डी.’ प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. विद्यापीठाने संशोधन प्रबंध पूर्ण करण्याचा कालावधी ५ वर्षांवरून ६ वर्षे केला आहे. यासोबतच संशोधकाकडून आलेल्या अर्जाच्या आधारे ६ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्याला २ वर्षांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या कर्णबधिर तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ वर्षीय मुलाला रविवारी रात्री उशीरा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे.
पर्यावरण मंडळाची मंजुरी न मिळल्याने आणि शासनाच्या वाळू घाटांच्या नवीन धोरणामुळे जिल्ह्यातील ३३ वाळू घाटांचे लिलाव रखडले आहेत. परिणामी लिलावाच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावरसुद्धा यामुळे पाणी फेरले जात असून वाळू तस्करांना मात्र मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात लहान मोठे असे एकूण ६५ वाळू घाट आहेत.
स्वित्झर्लंड येथील “कॅट्स” या अंतराष्ट्रीय संस्थेच्या कार्यसमितीने देशातील सहा व्याघ्र प्रकल्पांना मानांकीत केले आहे. यामध्ये काली, मेळघाट, पिलीभीत, नवेगांव-नागझीरा, पेरीया व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे.
पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंबटशौकीन ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आले.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओवरून गंभीर आरोपही करण्यात आले. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. यावरून राजकारण तापलेलं असतानाच शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वेगळंच ‘ट्विटर वॉर’ सुरू झाल्याचं दिसत आहे. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सगळ्याला सुरुवात झाली ती शीतल म्हात्रेंच्या २५ मार्च रोजी केलेल्या एका ट्वीटपासून!
२१ व्या शतकात रंगभूमी ही लोकाश्रयाच्या अधीन आहे. सरकार म्हणजे राजाश्रय हवाच आणि तो उत्तम आणि आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीतून दिला जाणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत अभूतपूर्व गर्दी झाली होती. गर्दीचा सागरच इथे मी पाहतो आहे असं उद्धव ठाकरेही म्हणाले. तसंच करोना काळात मालेगावकरांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी मालेगावच्या जनतेचे आभार मानले. या सभेत आलेला मुस्लिम मावळा लक्ष वेधून घेत होता. उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्या हृदयात आहेत आणि तेच महाराष्ट्राचे वाघ आहेत असं या मुस्लिम मावळ्याने म्हटलं आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने आपल्या आक्रमक भूमिकांमुळे चर्चेत असतात. विशेषत: त्यांनी बारामती मतदारसंघ आणि पवार कुटुंबीय यांच्यावर सातत्याने आरोप केल्यामुळे त्या त्या वेळी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडल्याचं पाहायला मिळालं आहे. गोपीचंद पडळकर बारामतीमधून निवडणूक लढवायलाही उभे राहिले होते. मात्र, तेव्हा मोठ्या पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. त्यानंतरही त्यांनी पवार कुटुंबीयांना असलेला विरोध जाहीरपणे बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर आता पडळकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर खोचक टीका केली आहे.
सभा पाहून उद्धव ठाकरेंची दया आली. उत्तर महाराष्ट्राने या सभेतून घ्यायचं काय? एकीकडे राहुल गांधींना अपात्र ठरवलं म्हणून निषेध करायचा. सभेत राहुल गांधी सावकरांबाबत चुकीचं बोललं सांगायचं. या दुट्टपी भूमिका योग्य नाही. ही फक्त टोमणे सभा होती, अशी टीका शिवसेना ( शिंदे गट ) आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा, तातडीने निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं होतं. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…