Maharashtra Budget Session, 24 March 2023: राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर २४ तासांच्या आत पालिका प्रशासनानं माहीमच्या समुद्रातील बांधकाम हटवलं आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस आता शिल्लक असून त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Live News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

18:11 (IST) 24 Mar 2023
राहुल गांधींवरील कारवाईवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल गांधींवर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई ही राज्यघटनेच्या मूळ रचनेलाच धक्का लावणारी आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडवणारी आहे. आपल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे”, असं शरद पवार या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

17:41 (IST) 24 Mar 2023
ठाणे: अधिकृत फलकबाजीच्या अतिरेकाला लगाम बसण्याची चिन्हे; ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले संकेत

शहरातील मुख्य रस्त्यांवरील उड्डाण पुल, संरक्षक भिंती आणि चौकांमध्ये विविध संकल्पेनेतून रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभिकरणांची कामे सुरु असतानाच, दुसरीकडे पालिकेच्या परवानगी शहरातील चौक आणि रस्त्यांलगत उभारण्यात आलेल्या फलकांच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रुपीकरण होताना दिसून येत आहे.

सविस्तर वाचा

17:34 (IST) 24 Mar 2023
राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया…

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया…

17:01 (IST) 24 Mar 2023
माफी मागितली नाही, म्हणून अपात्र करणार का? – आदित्य ठाकरे

ही कारवाई एका खासदारापर्यंत मर्यादित नाही. देशातली लोकशाही संपत चालली आहे हेच यातून सिद्ध होतंय. जे खरं बोलतायत, त्यांना स्कोप राहिलेला नाही हेच यातून समोर येतंय. माफी मागितली नाही, म्हणून अपात्र करणार का? – आदित्य ठाकरे

17:00 (IST) 24 Mar 2023
…ते सिद्ध करणारी आजची कारवाई आहे – आदित्य ठाकरे

सगळ्यात धक्कादायक आहे की अशा प्रकरणात तातडीनं अपात्र ठरवणं गरजेचं होतं का? आम्ही लोकशाही धोक्यात आहे ते सांगत होतो, राहुल गांधीही सांगत होते. ते सिद्ध करणारी आजची कारवाई आहे – आदित्य ठाकरे

16:48 (IST) 24 Mar 2023
कडोंमपा पालिका शाळेत ६४२ शाळाबाह्य मुलांना प्रवेश

‘गुढीपाडवा-शाळेचा पट वाढवा’ या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमध्ये ६४२ शाळाबाह्य मुलांना प्रवेश देण्यात आला. शालेय साहित्य देऊन या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 24 Mar 2023
बुलढाणा : टिप्परची एसटी बसला धडक, अपघातात २२ प्रवासी जखमी

बुलढाणा : मेहकर-खामगाव मार्गावरील जानेफळ नजीकच्या समृद्धी महामार्गाच्या अंडरपास नजीक एसटी बस व रेतीवाहक टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे २२ प्रवासी जखमी झाले. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

सविस्तर वाचा..

16:28 (IST) 24 Mar 2023
स्रोत प्रदूषित झाल्याने शुद्ध जल मिळणे कठीण, काय म्हणतात जलतज्ज्ञ?

नागपूर :  पाण्याचे स्रोत प्रदूषित होत असल्यामुळे शुद्ध जल मिळणे कठीण होत आहे, त्यामुळे जलसाठे संरक्षित करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असा सूर जलतज्ज्ञांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा..

16:26 (IST) 24 Mar 2023
पिंपरी : स्वत:चा अल्पवयीन मुलगा, भाच्याला लावत होता मोबाइल फोन चोरायला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी : स्वत:चा अल्पवयीन मुलगा आणि भाच्याला मोबाईल फोन चोरी करायला लावणाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. सुरेश दगडू जगताप (वय ३८, रा. कुसगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा..

16:24 (IST) 24 Mar 2023
एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमाचा वाद आता उच्च न्यायालयात; २०२३ पासून अभ्यासक्रम लागू करण्यासाठी याचिका

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा वाद आता न्यायालयात गेला आहे. अभ्यासक्रम २०२३ पासूनच लागू करण्याच्या मागणीसाठी दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

सविस्तर वाचा..

16:24 (IST) 24 Mar 2023
उत्पन्न मिळवण्यात उल्हासनगर महानगरपालिका नापास; मालमत्ता करवसुली २३ टक्के, विकास शुल्क ६ टक्केच

मालमत्ता कर वसुलीत कायमच अपयशी ठरणारी उल्हासनगर महापालिका यंदाही कर वसुलीत नापास झाल्याचे समोर आले आहे. मालमत्ता कराचे नियोजित लक्ष गाठताना अवघे २३ टक्के कर वसुली झाली आहे.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 24 Mar 2023
विवाहितेच्या आत्महत्येनंतर पती, ननंद आणि ‘तिच्या’ विरोधात गुन्हा दाखल

पनवेल: विवाहानंतर पती, नंनद तसेच पतीची प्रियसी यांच्याकडून जाच सहन न झाल्याने 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. कामोठे वसाहतीमध्ये ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात पती, ननंद आणि तीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर…

15:53 (IST) 24 Mar 2023
पनवेलच्या दर्गावरील कारवाईसाठी मनसे आक्रमक

पनवेल: तालुक्यामधील पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील पारगांव टेकडीवर फुलपीरबाबा शाह दर्ग्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी शुक्रवारी सिडको महामंडळासमोर फलकबाजीतून उपस्थित केला आहे. पारगांव टेकडीवरील दर्ग्यांमुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला धोका असून अवैध दर्ग्यावर सिडको महामंडळ कारवाई कधी करणार, या आशयाचे फलक पनवेलच्या मनसेने महामार्गावर उभारले आहेत.

वाचा सविस्तर…

15:17 (IST) 24 Mar 2023
या खटल्यासाठी न्यायाधीश बदलले गेले होते – अरविंद सावंत

लोकशाहीच्या मुळावर हे सगळे कसे येत आहेत, संस्था वेठीला कशा धरल्या जातायत हे आता दिसत आहे. अपेक्षा होतीच की हे असं काही घडणार. उद्या अपीलात जर सांगितलं की हे सदस्यत्व रद्द करणं चुकीचं होतं, तर काय करणार तुम्ही? यामुळे राहुल गांधींचं वैयक्तिक नुकसान काय होईल माहिती नाही, पण भाजपाचं नक्कीच होईल. सूरतला या खटल्याच्या सुनावणीच्या दोन दिवस आधी न्यायाधीश बदलले गेले – अरविंद सावंत

15:12 (IST) 24 Mar 2023
हे सरकारला महागात पडेल – विजय वडेट्टीवार

राहुल गांधींची खासदारकी रद्द करणं हे मोदी सरकारला महागात पडेल, असा इशारा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.

15:11 (IST) 24 Mar 2023
हे अपेक्षाभंग करणारं आहे – सुप्रिया सुळे

आधी पी. पी. मोहम्मद फैझल आणि आता राहुल गांधी – अजित पवार</p>

15:10 (IST) 24 Mar 2023
राहुल गांधींच्या खासदारकी रद्द प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला. ही हुकुमशाहीच्या अंताची सुरुवात आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. आता फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल.

15:07 (IST) 24 Mar 2023
ही लोकशाहीची हत्या आहे – नितीन राऊत

निवडणुकीच्या सभांमध्ये केलेल्या वक्तव्याची दखल बऱ्याच दिवसानी घेऊन या प्रकारची शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाते. त्यावर तत्परतेनं लोकसभा काम करते. राहुल गांधींची खासदारकी रद्द होते हे निषेधार्ह आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. बाहेरचं भांडण सभागृहात आणण्याचा हा प्रयत्न आहे – नितीन राऊत

15:03 (IST) 24 Mar 2023
विरार येथे रेल्वे अपघात, रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

वसई: विरार येथे रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करताना अपघात घडला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वाचा सविस्तर…

14:44 (IST) 24 Mar 2023
इंदिराजींच्या बाबतीतही असंच झालं होतं – अजित पवार

इंदिराजींच्या बाबतीतही असंच त्या वेळचं सरकार थोडं वेगळ्या पद्धतीने वागलं,. ज्या इंदिरा गांधींना १९७७ साली आणीबाणीच्या निमित्ताने पराभूत केलं होतं, त्याच इंदिरा गांधींना १९८० साली पुन्हा सत्तेत बसवण्याचं काम लोकशाहीनं केलं. त्यामुळे आत्ताच्या घटना सामान्य माणसांना पटणाऱ्या नाहीत – अजित पवार

14:42 (IST) 24 Mar 2023
लोकसभेनं घेतलेला निर्णय लोकशाहीविरोधी, आम्ही धिक्कार करतो – अजित पवार

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची खासदारकी रद्द केली गेली. वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचं मलातरी काही आठवत नाही. हे संविधानात बसत नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पण तरी आज ज्या प्रकारचा निर्णय लोकसभेनं घेतलाय, तो आपल्या लोकशाहीला धक्का देणारा आहे – अजित पवार

14:37 (IST) 24 Mar 2023
नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हा निर्णय लोकशाहीविरोधातला आहे. गेल्या ९ वर्षांत मोदींचं सरकार आपल्या मित्रोंसाठी, ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्यासाठी किंवा अशा अनेक लोकांसाठी पाठिंबा देण्याचं काम मोदींचं सरकार करतंय. त्यांच्याविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत. त्यांना लोकसभेत बोलू दिलं जात नाहीये. खोटी तक्रार गुजरातमध्ये टाकून जिल्हा न्यायालयाकडून निर्णय घेऊन राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला – नाना पटोले

14:33 (IST) 24 Mar 2023
काँग्रेसच्या आमदारांचा विधानसभेतून सभात्याग

हुकुमशाही व्यवस्थेकडे आपण चाललो आहोत. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय झालाय. हे दुर्दैवी आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही सभात्याग करतो – नाना पटोले

14:22 (IST) 24 Mar 2023
मुंबई: भाजी मंडईतील गाळ्यांच्या भाड्यात सातपट वाढ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मंडईतील गाळ्यांच्या भाड्यात तब्बल सातपट वाढ करण्यात आली आहे. गाळ्यांचे भाडे २०० रुपयांवरून थेट १३०० ते १४०० रुपये करण्यात आले आहे. ही भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी मंडईतील गाळेधारकांकडून करण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

14:15 (IST) 24 Mar 2023
चंद्रपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २८ मार्चला दिल्ली येथे निदर्शने

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे केंद्र सरकारशी संबंधीत मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता २८ मार्च २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शने करण्यात येणार आहे.ओबीसी समाजाच्या संविधानीक मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित असून या मागण्या केंद्र सरकारनी लवकरात लवकर सोडवाव्यात या करिता केंद्राशी संबंधित मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघ निदर्शने आहेत.

सविस्तर वाचा

14:15 (IST) 24 Mar 2023
बुलढाणा: भांडण सोडविणे बेतले जीवावर, बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

चुलत भावाला वाचविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शेतकऱ्याला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. लोणार तालुक्यातील भूमराळा दरी येथे ही दुर्देवी घटना घडली. प्रकरणी पोलिसांनी जालना जिल्ह्यातील तीन रहिवासीयांसह पाच आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर वाचा

14:14 (IST) 24 Mar 2023
राज ठाकरेंनीही माझ्या डोळा मारण्याची दखल घेतली – अजित पवार

सभागृहातल्या पुरुष आमदारांना विनंती आहे की व्हिडिओ कॉल आला की तुमचा चेहरा दाखवूच नका. आपण बघायला लागलो तर तिकडून फोटो काढतात आणि सांगतात की हे बघा आम्ही यांच्याशी बोलत होतो. ही फसवणाऱ्या लोकांची पद्धत आहे. याला सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे आमदार बळी पडू नयेत. आपण डोळा बंद केला चुकून तरी डोळा मारला, डोळा मारला म्हणत राहतात. मी आणि मुख्यमंत्री तिथे उभे होते तर तिथेही घटना घडली. आम्ही ५-६ लोक बसलो असताना त्यांनी नानांना डोळा मारला. उद्धवजी तिकडे बोलायला आले नेमकं तेव्हा मी कुणालातरी डोळा मारला. तर त्यावरून वाद झाला. पार राज ठाकरेंनीही माझ्या डोळा मारण्याची दखल घेतली – अजित पवार

14:09 (IST) 24 Mar 2023
VIDEO: वाघाची अख्ख्या कुटुंबासह पाण्यात मनसोक्त भटकंती; निमढेला बफर क्षेत्रात मुक्त संचार

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण. इथे येणाऱ्या पर्यटकाला वाघ कधी निराश होऊ देत नाही. वन्यजीव छायाचित्रकारांसाठी जणू ते तयारच असतात. इंद्रजित मडावी त्यातलेच एक. त्यांनी वाघांच्या असंख्य मुद्रा, हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. नुकतेच त्यांनी निमढेला बफर क्षेत्रात वाघाचे अख्खे कुटुंब टिपले आहे.

सविस्तर वाचा

14:05 (IST) 24 Mar 2023
अजित पवारांनी वाचून दाखवलं मुश्रीफांच्या पत्नीचं ‘ते’ विधान

हसन मुश्रीफांच्या पत्नीनं वेदनादायी वक्तव्य केलं. किती वेळा यायचं ते या, किती त्रास द्यायचा तो द्या. काही आहे की नाही? आम्ही करायचं तरी काय? आम्हाला एकदाच्या गोळ्या घाला आणि खलास करा असं वक्तव्य त्यांनी केलं. आपण विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. पण कुरघोडीचं राजकारण थांबलं पाहिजे – अजित पवार

13:57 (IST) 24 Mar 2023
२०२३-२४ करीता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केले ९ हजार ५१५ कोटींचे अंदाज पत्रक

सध्या राज्यातील सर्व महापालिकामध्ये प्रशासकांच्या माध्यमांमधून कामकाज केले जात आहे.त्या पार्श्वभूमीवर आगामी २०२३-२४ करीता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ९ हजार ५१५ कोटींचे अंदाज पत्रक सादर केले आहे. गतवर्षी ८ हजार ५०० कोटींचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला होता.त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात जवळपास हजार कोटींची वाढ केल्याचे स्पष्ट होत आहे.यामध्ये प्रामुख्याने २४ तास समान पाणी पुरवठा, ३४ समाविष्ट गावे आणि रस्त्यांना या अंदाजपत्रकात अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

13:54 (IST) 24 Mar 2023

गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांची ओमानमध्ये तस्करी केली जाते. त्यांचं शोषण केलं जातं, त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जातो. यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केंद्राशी बोलावं लागेल – अजित पवार

13:47 (IST) 24 Mar 2023
महाराष्ट्रात आत्महत्या होईपर्यंत वाट पाहणार आहात का? – अजित पवार

चेन्नईत ४० लोकांनी या अॅपच्या नादी लागून पैसे गमावले आणि आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात लोकांनी आत्महत्या करेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत का? – अजित पवारांचा सवाल

13:47 (IST) 24 Mar 2023
“…त्या अॅप्सवर बंदी आणा”, अजित पवारांची विधानसभेत मागणी!

फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर लॉटरी अॅपच्या जाहिराती दाखवल्या जातात. त्या बंद केल्या जाव्यात. युवक बक्षिसांच्या लालसेपोटी जुगार खेळायला लागले आहेत. महाराष्ट्रातील नामांकित सिने अभिनेते खोट्या जुगारी अॅपची जाहिरात करतात. महाराष्ट्रात तरी अशा अॅपवर बंदी असली पाहिजे. याची जाहिरात करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत – अजित पवार

13:36 (IST) 24 Mar 2023
अजित पवार अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना म्हणतात…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलीस बंदोबस्त दिला जातो. मंत्र्यांना बंदोबस्त असतोच, पण आमदारांनाही बंदोबस्त दिला गेला. पण राज्यात पोलिसांची संंख्या कमी आहे. अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. बंदोबस्तासाठीच्या पोलिसांपैकी आजच्या घडीला सगळ्यांना किती बंदोबस्त आहे, याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं – अजित पवार

13:34 (IST) 24 Mar 2023
कुणीतरी बाहेरून येतात आणि धडाधड गोळ्या घालतात – अजित पवार

कुणीतरी बाहेरून येतात आणि धडाधड गोळ्या घालतात, अशा अनेक घटना घडत आहेत. खुद्द शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातही हे प्रकार घडत आहेत – अजित पवार

13:30 (IST) 24 Mar 2023
अधिवेशनात मी हे पहिल्यांदाच बघतोय की… – अजित पवार

मी पहिल्यांदा अधिवेशनात बघतोय की २९३ चे तीन प्रस्ताव आहेत, पण त्याला अजून उत्तर मिळालेलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे विधिमंडळाच्या इतिहासात त्या त्या आठवड्यातल्या प्रस्तावाला त्याच आठवड्यात उत्तर दिलं जात होतं. यात दोष कुणाचा आहे ते तुम्ही ठरवा – अजित पवार

13:27 (IST) 24 Mar 2023
नाशिक: जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ – एकाच दिवसात १८ जण संक्रमित

नाशिक बदलत्या हवामानाचा फटका नागरीकांना बसत असून आरोग्य विषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत करोना सदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत १८ ने वाढ झाली असून त्यापैकी ११ रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 24 Mar 2023
जळगाव: लाच स्विकारताना तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात

जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा येथील शेतकर्याच्या हिश्श्याची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठ्यासह कोतवालास गुरुवारी सापळा रचत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सविस्तर वाचा

13:26 (IST) 24 Mar 2023
कल्याण: आयुक्त दांगडेंच्या भूमिकेवरुन बेकायदा बांधकामांना बळ?

कल्याण डोंबिवली पालिकेेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागरी सुविधा कामांसाठी निधी देताना हात आखडता घेतला आहे. तेच आयुक्त कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या विषयावर पोटतिडकीने बोलत असल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा

13:24 (IST) 24 Mar 2023
राहुल गांधींना चार वर्षाची शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी पुण्यात भाजपच आंदोलन

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? असा प्रश्न त्यांनी विचारला होता.या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.त्या निर्णयानंतर काल देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.

12:58 (IST) 24 Mar 2023
नागपूर: उपराजाधानीत स्टेरॉईड, बनावट प्रोटीनची विक्री!

व्यायामशाळेत जाणारे युवक पिळदार शरीरयष्टीसाठी प्रतिबंधित असलेले अँनाबॉलिक स्टेरॉइडचे सेवन करीत आहेत. शहरातील अनेक दुकानांमध्ये हे स्टेरॉइड व बनावट प्रोटीनची सर्रास विक्री होत आहे.

सविस्तर वाचा

12:58 (IST) 24 Mar 2023
महाविकास आघाडी, युवा ग्रॅज्युएट दोन जागांवर विजयी; नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढल्याने मतविभाजनाचा जबर फटका महाविकास आघाडी आणि समविचारी इतर संघटनांना बसला आहे.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 24 Mar 2023
बुलढाणा: शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या

प्रयोगशील कष्टाळू शेतकरी व शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांनी गुरुवारी पहूरजीरा (तालुका शेगाव) येथील शेतात आत्महत्या केली. यामुळे शेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 24 Mar 2023
नागपूर: प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार? विद्यापीठाचे महाविद्यालयांवर नियंत्रणच नाही

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हिंदी विभागातील मानसिक छळाचे आणि डॉ. धवनकर प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाशी संलग्नित नंदनवन येथील स्व. वसंतराव नाईक शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकावर १९ वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

सविस्तर वाचा

12:56 (IST) 24 Mar 2023
चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे; प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे

आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटातून मांडले पाहिजे. या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा तेव्हा बाजूला राहतो, असे मत प्रसिध्द लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी पिंपरी- चिंचवड च्या सांगवीत बोलताना व्यक्त केले.

12:56 (IST) 24 Mar 2023
ठाणे: सासऱ्याच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय महिलेची आत्महत्या

ठाण्यातील बाळकूम भागात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून रेखा सुर्यवंशी (२२) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेखा हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तिच्या सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 24 Mar 2023
वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी उठणार? विधानसभेत मंत्री म्हणतात…

वर्धा जिल्ह्यात सतत चर्चित दारूबंदीचा विषय आज विधानसभेत आमदार डॉ.पंकज भोयर यांनी उपस्थित केला.अधिवेशन सुरू होताच त्यांनी अवैध दरुविक्रेत्यांची साखळी कशी तोडणार,पोलीस दारूबंदीची जबाबदारी उत्पादन शुल्क खात्यावर टाकत असल्याने त्या खात्यास अतिरिक्त मनुष्यबळ देणार का व ही बंदी नफ्याची की तोट्याची हे कसे ठरविणार असे प्रश्न आ.भोयर यांनी उपस्थित केले.

सविस्तर वाचा

12:55 (IST) 24 Mar 2023
अकोला: संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव, ‘या’ उपाययोजना करा…

संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहणीत निदर्शनात आले आहे. या किडीमुळे फळांवर विकृती येत असून रोग देखील वाढत आहे. त्याचा परिणाम फळांच्या दर्जावर होतो.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 24 Mar 2023
सांगली: पहिल्या महाराष्ट्र महिला केसरीसाठी प्रतिक्षा आणि वैष्णवी यांच्यात लढत

सांगली: पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतिक्षा बागडी आणि कोल्हापुरची वैष्णवी पाटील यांच्यात लढत होत आहे. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा सुरु आहेत. शुक्रवारी झालेल्या उपांत्य स्पर्धेत प्रतिक्षा बागडी व वैष्णवी पाटील या दोघींनी प्रतिस्पर्धींना पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

वाचा सविस्तर…

12:53 (IST) 24 Mar 2023
राज्यात मालमत्ता खरेदी-विक्री जोरात, मुद्रांक शुल्कापोटी तब्बल ३८ हजार कोटींचा महसूल

पुणे: एकीकडे महागाईबाबत चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्री जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यभरातून २४ लाख १४ हजार ९६३ दस्त नोंदविण्यात आले असून तब्बल ३८ हजार ५९७.४४ कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

वाचा सविस्तर…

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mumbai Maharashtra Live News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!