Maharashtra Political Crisis Updates, Eknath Shinde Oath Ceremony : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (३० जून) बहुमताच्या चाचणीसाठी बोलावलेलं विशेष अधिवेशन रद्द केलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी घोषित केले आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले जाणार आहे. भाजपाने शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट…

CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल
Arvind Kejriwal
‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन-तीन दिवसांत अटक केले जाईल’, ‘आप’ नेत्याचा मोठा दावा
Prime Minister Narendra Modi expressed confidence about the upcoming Lok Sabha elections
आयेगा तो मोदीही! पंतप्रधानांना विश्वास; परदेशांतून जुलै-ऑगस्टमधील आमंत्रणे आल्याचा दावा
Live Updates

Maharashtra Political Crisis Live : एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा; वाचा प्रत्येक अपडेट…

22:41 (IST) 30 Jun 2022
उद्धव ठाकरेंकडून नवनिर्वाचित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, म्हणाले...

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!"

https://twitter.com/OfficeofUT/status/1542538623303979008

21:06 (IST) 30 Jun 2022
बहुमत गेल्यावर कटकटी करु नये- शरद पवार

अगोदर बंड झाले होते, तेव्हा एवढी गडबड नव्हती झाली. एक दिवस आम्ही लोकांनी ठवरलं आणि वसंतदादांना आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर जात आहोत असं सांगितलं. ते झाल्यानंतर वसंतदादांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिवसेनेला संपवण्यात काही संबंध नाही. त्यांच्याकडे सध्या बहुमत आहे. त्यामुळे बहुमत आहे, हे लक्षात आलं तर जास्त कटकटी करु नये. बहुमत गेले हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. माझ्या दृष्टीने ते चांगलं आहे. १९८० मध्ये माझ्या नेतृत्वात ७९ आमदार निवडून आले. निवडणूक झाल्यावर मी भारताच्या बाहेर सुट्टीला गेलो. परत आल्यानंतर माझ्यासह फक्त सहा लोक शिल्लक राहिले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. माझं पदही गेलं. पण नंतर निवडणूक झाली आणि जे मला सोडून गेले त्यांचा जवळपास सगळ्याचा पराभव झाला.

21:02 (IST) 30 Jun 2022
फडणीसांनी दोन नंबरची जागा आनंदाने स्वीकारल्याचे दिसत नाही- शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी नंबर दोनची जागा फडणवीस यांनी आनंदाने स्वीकारली असे दिसत नाही. त्यांचा चेहरा सांगत होता. पण ते नाखूश आहेत. त्यांनी नागपूरमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आदेश आल्यावर तो पाळायचा असतो, असे संस्कार त्यांच्यावर झाले असावेत, बाकी काही कारण असू शकत नाही.

20:53 (IST) 30 Jun 2022
मी बंड थोपवण्यासाठी चर्चा केली- शरद पवार

मी बंड थोपवण्यासाठी चर्चा केली. मात्र ज्या वेळी ३९ लोक राज्याच्या बाहेर जातात आणि त्यांची मतं काही वेगळी असतात. तर दुरुस्ती करण्यात काही स्कोप राहत नाही.

20:52 (IST) 30 Jun 2022
उद्धव ठाकरेंनी विधीमंडळाची पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे दिली- शरद पवार

माझ्या मते उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एखाद्यावर विश्वास टाकल्यानंतर त्याच्यावर पूर्ण जबाबदारी द्यायची. उद्धव ठाकरे यांनी संघटनेची विधीमंडळाची पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. त्याचा परिणाम बंडखोरी आहे का हे मला माहिती नाही.

20:48 (IST) 30 Jun 2022
३८ आमदार बाहेर जातात ही साधी बाब नाही- शरद पवार

महाविकास आघाडी सरकार कमी पडले नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेतील नेत्यांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. ३८ आमदार बाहेर जातात ही काही साधी बाब नाही. हे आमदार बाहेर नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली यातच त्यांचे यश आहे. या योजनेची तयारी आधीच होती, असे ऐकण्यात येत आहे. राज्यातून सुरत, सुरतहून आसाम अशी योजना एका दिवसात होत नाही.

20:43 (IST) 30 Jun 2022
शिंदे यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम व्हावे- शरद पवार

एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी पडली आहे. माझं त्यांचं बोलणं झालं. त्यांना मी शुभेच्छा दिल्या. एकदा शपथ घेतल्यानंतर तो राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील सर्व विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून काम व्हावे, अशी माझी अपेक्षा आहेत. त्यासाठी मी त्यांना अंत:करणातून शुभेच्छा देईन.

20:39 (IST) 30 Jun 2022
सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली- शरद पवार

आताचे मुख्यमंत्री झाले ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाणे जिल्ह्यात काम आहे. पण ते मूळ सातारा जिल्ह्यातील आहेत. योगायोग असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साताऱ्याचे होते. मी मुख्यमंत्री झालो. माझे मूळ गावा साताऱ्यात आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील होते. आता एकनाथ शिंदे हेदेखील सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सातरा जिल्ह्याला लॉटरील गालली असे म्हणावे लागेल.

20:39 (IST) 30 Jun 2022
मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेतील अन्य पदं स्वीकारण्याची अनेक उदाहरणं- शरद पवार

एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेतील अन्य पदं स्वीकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रीमंडळामध्ये शकंरराव चव्हाण अर्थमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री होतो. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. शंकरराव यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते, पुढे ते मंत्री झाले. अशोकराव चव्हाण सध्याचे जे मंत्री होते आमचे सहकारी होती, तेदेखील मुख्यमंत्री होते. अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडलेली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही.

20:32 (IST) 30 Jun 2022
फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली, हा आश्चर्याचा धक्का- शरद पवार

दुसरं आश्चर्य म्हणजे, या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो तंतोतंत पाळावा लागतो. त्याचं उदाहरणं म्हणजे जे मुख्यमंत्री होते, नंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व केलं त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते, याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले.

20:27 (IST) 30 Jun 2022
शिंदेंवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी येईल याची कल्पना कोणालाही नव्हती- शरद पवार

गेले काही दिवस, या राज्यातील काही आमदार आसाम राज्यात गेले होते. एक तर राज्याचे नेतृत्व बदलण्याची त्यांची इच्छा असावी. आसाममध्ये जे सहकारी गेले आणि त्यांचे ज्यांनी नेतृत्व केले मला वाटत नाही की त्यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक होती. पण भाजपामध्ये एकदा आदेश आला की त्याच्यामध्ये तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली. याची कल्पना कोणालाही नव्हती. कदाचित शिंदे यांना नव्हती.

20:23 (IST) 30 Jun 2022
नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

20:20 (IST) 30 Jun 2022
बेसावध राहू नका, जपून पाऊल टाका, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

बेसावध राहू नका, जपून पाऊल टाका, असा सल्ला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

  • 20:17 (IST) 30 Jun 2022
    अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या शुभेच्छा

    अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या शुभेच्छा

    19:45 (IST) 30 Jun 2022
    आता राज्याचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

    एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील.

    19:40 (IST) 30 Jun 2022
    फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

    भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंत आत फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील.

    19:39 (IST) 30 Jun 2022
    भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्या घोषणा

    एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा जयजयकार केला.

    19:37 (IST) 30 Jun 2022
    बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना स्मरुन घेतली शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ

    बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत.

    19:34 (IST) 30 Jun 2022
    राज्यपाल दाखल, काही क्षणात शपथविधीला होणार सुरुवात

    राज्यपाल भगसिंह कोश्यारी दाखल झाले असून काही क्षणात शपथविधीला सुरुवात होणार आहे. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

    19:21 (IST) 30 Jun 2022
    थोड्याच वेळात शपथविधीला होणार सुरुवात, अनेक नेत्यांची उपस्थिती

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही क्षणातच शपथविधी होणार आहे. त्यासाठी अनेक नेते उपस्थित आहेत. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, आशिष शेलार असे भाजपाचे नेते या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.

    19:06 (IST) 30 Jun 2022
    देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाह यांची ट्वीट करत माहिती

    अमित शाह म्हणाले, "भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन केलं. तसेच महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रती त्यांची खरी निष्ठा आणि सेवाभाव दाखवतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."

    https://twitter.com/AmitShah/status/1542500419376922625

    19:00 (IST) 30 Jun 2022
    "देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं"; भाजपा अध्यक्षांचा आदेश

    "देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं"; भाजपा अध्यक्षांचा आदेश

    https://twitter.com/ANI/status/1542495109014757376

    17:38 (IST) 30 Jun 2022
    "...म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो"; देवेंद्र फडणवीस यांचं भर पत्रकार परिषदेत वक्तव्य

    https://twitter.com/LoksattaLive/status/1542477244450234368

    भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली. "भाजपाचे कार्यकर्ते असो की एकनाथ शिंदे याचे शिवसैनिक असो कुणालाही शपथविधी सोहळ्याला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

    सविस्तर बातमी...

    16:56 (IST) 30 Jun 2022
    भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला : एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे म्हणाले, "भाजपाकडे १२० चं संख्याबळ आहे. असं असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद पाहिजे असं काही नव्हतं. जे घडलं ते तुमच्यासमोर होतं."

    16:55 (IST) 30 Jun 2022
    बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार - एकनाथ शिंदे

    आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    16:35 (IST) 30 Jun 2022
    जनमताचा अपमान करुन महाविकास आघाडी जन्माला आली : देवेंद्र फडणवीस

    बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, हिंदुत्वाचा विरोध केला, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन भाजपाला बाहेर ठेवला. हा जनमताचा अपमान होता. जनतेनं मतं महाविकास आघाडीला दिलं नव्हतं. ते युतीला दिलं होतं. जनमताचा अपमान करुन महाविकास आघाडी जन्माला आली.

    चालू कामांना स्थगिती, नवी विकास योजना नाही, प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला : देवेंद्र फडणवीस

    16:33 (IST) 30 Jun 2022
    शिवसेनेच्या ५६ जागांसह भाजपा-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकल्या : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, "२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ५६ जागांसह भाजपा-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकल्या. अपक्ष मिळून १७० लोक निवडून आले होते. यावेळी ही अपेक्षा होती की भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. तेव्हा मोदींनी सर्वांच्या उपस्थितीने भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणाही केली होती. निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला."

    16:05 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील भाजपा नेत्यांच्या भेटीची माहिती

    एकनाथ शिंदे यांनी मुंबईत भाजपा नेत्यांच्या भेटीची माहिती ट्वीट करत दिली. ते म्हणाले, "भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली."

    https://twitter.com/mieknathshinde/status/1542453803756433408

    16:00 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा सादर

    एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा सादर, सोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर भाजपा नेतेही हजर, सायंकाळी राजभवनातील राजदरबार हॉलमध्ये शपथविधी होण्याची शक्यता

    15:13 (IST) 30 Jun 2022
    फडणवीस-शिंदेंचा आज शपथविधी - सूत्र

    देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर जाणार आहेत. यानंतर संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात यासाठी तयारी करण्यात आली आहे.

    15:07 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर दाखल

    राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे देंवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्याआधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

    14:36 (IST) 30 Jun 2022
    काँग्रेस नेत्यांकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

    काँग्रेस नेत्यांकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, बाळासाहेब थोरात, पृथ्वाराज चव्हाण, नाना पटोले, सुनील केदार इत्यादी नेते उपस्थित

    14:31 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदे मुंबईत दाखल

    एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, मंगलप्रभात लोढाही शिंदेंसोबत हजर, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही विमानतळावर उपस्थित

    13:51 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड

    शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याआधी गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.

    सविस्तर बातमी

    13:37 (IST) 30 Jun 2022
    उद्धव ठाकरेंसोबतच्या १६ आमदारांची आमदारकी रद्द होणार का? दीपक केसरकर म्हणाले...

    दीपक केसरकर म्हणाले, "मला विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या १६ आमदारांचं काय होईल? त्यावर मी सांगितलं आहे की ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावं लागतं. आम्ही विधीमंडळात आमचा पक्षाची नोंदणी केली तेव्हा आम्ही आमच्या आमदारांच्या स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे १६ आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्या १६ आमदारांना देखील बंधनकारक राहील. आम्ही त्यांना आमच्यासोबत चला असा म्हणणार नाही."

    13:37 (IST) 30 Jun 2022
    पक्षाची घटना बंधनकारक ही जनतेची दिशाभूल : दीपक केसरकर

    दीपक केसरकर म्हणाले, "पक्षांतर बंदी कायदा विधीमंडळात काय कृती करता यावर लागू होतो. व्हिपने हजर राहण्यास सांगितलं, मतदान करायला सांगितलं तर तसं करावं लागतं. कायद्यात 'ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस' असं स्पष्ट म्हटलं आहे. पक्षाची घटना बंधनकारक आहे अशी जनतेची दिशाभूल केली जात आहे. देशाची घटनाच अंतिम आहे असे न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याला डावलून इतर कोणतीही घटना काम करू शकत नाही."

    "कायद्यात काही तरतूद असेल तर त्याला पक्षाची घटना डावलू शकत नाही. कारण पक्षाची घटना पक्ष ठरवतो. विधीमंडळात आपली लिखित घटना चालते. त्यापलिकडे कुणी जाऊ शकत नाही," असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

    13:19 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले नाही : दीपक केसरकर

    एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात खूप मोठा वाटा घ्यायला गेले असं नाही. ते महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा करण्यासाठी गेले आहेत. दोन्ही पक्ष मिळून जो निर्णय घेतील त्यात आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असू : दीपक केसरकर

    13:17 (IST) 30 Jun 2022
    संजय राऊत केंद्र व राज्यात वाद लावून देत आहेत : दीपक केसरकर

    आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे. : दीपक केसरकर

    13:09 (IST) 30 Jun 2022
    "...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो"; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

    राज ठाकरे म्हणाले, "एखादा माणूस ज्या दिवशी नशिबालाच स्वतःचं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो."

    https://twitter.com/RajThackeray/status/1542409873895620608

    13:04 (IST) 30 Jun 2022
    संजय राऊत स्वतः शिवसेनेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करतात : दीपक केसरकर

    दीपक केसरकर म्हणाले, "आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात."

    13:00 (IST) 30 Jun 2022
    एकनाथ शिंदे एकवचनी, त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता : दीपक केसरकर

    एकनाथ शिंदे एकवचनी आहेत, त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता, त्यामुळे हा शब्द फिरवणं शक्य नव्हतं, दीपक केसरकर यांची माहिती

    12:54 (IST) 30 Jun 2022
    अद्याप कोणत्याही मंत्र्याची नावं ठरलेली नाही : दीपक केसरकर

    भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलून निर्णय घेतील. अद्याप कोणत्याही मंत्र्याची नावं ठरलेली नाही. येथे असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत : दीपक केसरकर

    12:51 (IST) 30 Jun 2022
    उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याचा आम्हाला आनंद नाही : एकनाथ शिंदे

    बैठकीत आमदारांनी गटनेतेपदी माझी निवड केली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याचा आम्हाला आनंद नाही. ती परिस्थिती उद्भवली होती. आम्ही ५० आमदारांनी केवळ हिंदुत्व आणि मतदारसंघातील कामांसाठी ही भूमिका घेतली. उद्धव ठाकरे आजही आमचे नेते आहेत : एकनाथ शिंदे

    12:48 (IST) 30 Jun 2022
    उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर बंडखोर आमदारांनी सेलिब्रेशन केलं नाही : दीपक केसरकर

    दीपक केसरकर म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर सेलिब्रेशन सुरू असल्याचं बोललं जातंय, मात्र इथं कुणीही उत्सव साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. आमचा बंड आघाडीविरोधात होता. उद्धव ठाकरेंचं मन दुखावं हा हेतू नव्हता."

    12:40 (IST) 30 Jun 2022
    देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर भाजपाची बैठक सुरू

    देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर भाजपाची बैठक सुरू, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित

    12:33 (IST) 30 Jun 2022
    अडीच वर्षांत मविआ सरकारच्या कारभाराबद्दल जनतेमध्ये सर्वच स्तरांमध्ये रोष : चंद्रकांत पाटील

    चंद्रकांत पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर मविआ सरकार बरखास्त झालं. अडीच वर्षांत मविआ सरकारच्या कारभाराबद्दल जनतेमध्ये सर्वच स्तरांमध्ये रोष होता. त्यामुळे हे सरकार पायउतार झाल्यानं जो आनंद झाला, तो आमच्या महिला आमदारांनी मला भेटून व्यक्त केला."

    https://twitter.com/ChDadaPatil/status/1542401388696596480

    12:25 (IST) 30 Jun 2022
    बैठकीनंतर काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर

    बैठकीनंतर काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर, विरोधी बाकावर बसण्याची तयार असल्याचं वक्तव्य, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे यशस्वीपणे सरकार चालवल्याचंही केलं नमूद

    12:01 (IST) 30 Jun 2022
    भाजपाची सत्ता स्थापन होण्याची चिन्ह दिसताच खासदार उदयनराजे मुंबईकडे रवाना

    राज्यात भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्यानंतर खासदार उदयनराजे साताऱ्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. नव्या मंत्रीमंडळात वाटा असावा यासाठीच उदयनराजे भोसले मुंबईला गेल्याची सूत्रांची माहिती

    11:48 (IST) 30 Jun 2022
    "नेमके हेच घडले"; संजय राऊत यांच्या ट्वीटवर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले...

    आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या ट्वीटवर प्रत्युत्तर दिलंय. यात नितेश राणे यांनी 'रिटर्न गिफ्ट' असा खोचक टोला लगावला.

    https://twitter.com/NiteshNRane/status/1542385620999229443

    11:36 (IST) 30 Jun 2022
    पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व कौशल्यावर उपस्थित केला प्रश्न; म्हणाले “त्यांच्यात लढण्याची इच्छा नाही”

    उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनाना द्यायला हवा होता असं स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे. आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही असंही ते म्हणाले आहेत.

    “सुप्रीम कोर्टाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. ही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा नव्हती,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

    सविस्तर बातमी

    Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray Resign

    महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा, आईव्ह अपडेट

    शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी (२९ जून) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. या प्रत्येक वेगवान घडामोडीची लाईव्ह अपडेट...