Maharashtra Political Crisis News in Marathi : राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी ३० जूनला द्धव ठाकरेंनी दिला ठरावासाठी विशेष अधिवेशन पाचारण केलं आहे. मात्र, राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गुवाहाटीहून गोव्यात दाखल झालेल्या एकनाथ शिंदेंना भेटायला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
विधिमंडळाचं ३० जून रोजी बोलावलेलं विशेष अधिवेशन संस्थगित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उशीरा (बुध.२९जून ) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
आम्ही गुलालही उधळलेला नाही, पेढेही वाटलेले नाही. आम्ही दु:ख व्यक्त केलंय. कारण आम्हाला आमच्या नेत्यापासून दूर केलं गेलं. उद्धव ठाकरेंनी नामांतराच्या मुद्द्यावर निर्णय घेतला नाही. पण आता दबावाखाली हे निर्णय घेतले. – दीपक केसरकर
झालं ते होऊन गेलं आहे. नव्याने सरकार स्थापन करायचं आहे. एकनाथ शिंदे सगळ्यांशी चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेतील आणि त्यानंतर इतर पक्षांशी ते चर्चा करतील. – दीपक केसरकर
आम्ही त्यांच्या विरोधात नाही. आम्हाला यातून आनंद होत नाही. हळूहळू आम्ही लांब जात गेलो. आम्ही शिवसैनिक लांबचे झालो आणि राष्ट्रवादीचे नेते जवळचे झाले. मुख्यमंत्रीपदावर इतकी कामं असतात. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून आमचा संपर्क कमी होत गेला. त्यातूनच ही परिस्थिती उद्भवली आहे. याला उद्धव ठाकरे जबाबदार नाही.- दीपक केसरकर
आमच्या दृष्टीने ही दु:खाची बाब आहे. मी म्हणालो होतो की लवकर निर्णय घ्या. पण ते ऐकलं नाही. शेवटी तेच घडलं. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे ताणलं गेलं. राऊतांकडून ज्या प्रकारची वक्तव्य केली गेली, त्यावरून सगळेच नाराज होते. कुणीच राऊतांशी बोलायला तयार नव्हतं. आमच्यातली दरी गेल्या काही दिवसांपासून वाढत गेली. आमच्या मुद्द्यांवर विचार झाला नाही. आमच्या मतदारसंघातून आम्ही पराभूत होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. – दीपक केसरकर
सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे. हा दिवस अचानक आला आहे. नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस टेन्शनमध्ये गेला असता. आता एक दिवस रिलॅक्स मिळाला आहे. बसून चर्चा करू आणि नंतर ठरवू.
शपथविधी कधी होईल, त्यावर निर्णय व्हायचा आहे. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, जर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आता भाजपा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी पद सोडत असल्याचं जाहीर करताच मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर एकच जल्लोष सुरु झाला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला. यावेळी भाजपा आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते. एबीपी माझाशी बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते स्वत: गाडी चालवत असून त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते नीलम गोऱ्हे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले आहेत.
#WATCH | Shiv Sena leaders Neelam Gorhe, Vinayak Raut and Milind Narvekar arrive at Raj Bhavan.
— ANI (@ANI) June 29, 2022
Uddhav Thackeray announced his resignation as the Chief Minister of Maharashtra earlier tonight. pic.twitter.com/KMlxbWxBcn
उद्या भाजपा सत्तास्थापनेचा दावा करणार असून येत्या १ तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारबरोबर फक्त राजकीय आणि सामाजिक संघर्ष नव्हता. वैयक्तिक संघर्षही होता. आमच्यावर खोट्या केसेस टाकणं, कुटुंबीयांवर हल्ले करणं या सगळ्या गोष्टींचा निकाल लागला आहे. अडीच वर्षांत महाराष्ट्राला कुठपर्यंत नेलं याची चर्चा होत नाही, पण बदल्याचं जे राजकारण केलं, त्याचा अंत आजच्या निमित्ताने झाला आहे. – नितेश राणे
उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघाले असून थोड्याच वेळात ते स्वत: राजभवनावर जाऊन राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द करतील.
आता मी आहे तो तुमचा आहे, तुमच्यासोबत आहे.
सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे. जातोही अनपेक्षितपणे. पण मी कुठेही जात नाहीये. मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेची नवीन वाटचाल करणार आहे. शिवसेना तीच आहे. शिवसेना आपल्यापासून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपण इथेच आहोत. मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतो आहे.
आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. मी शिवसैनिकांनाही सांगेन की उद्या अजिबात त्यांच्या मध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या. ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लखलाभ. मला तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कुणी हिरावून नाही घेऊ शकत.
हे लोकशाहीचं दुर्दैव आहे की इथे डोक्याचा वापर फक्त मोजण्याच होतो की कुणाकडे किती बहुमत आहे. माझ्या विरोधात किती आहेत, यात मला रस नाही. पण एक जरी माझा माणूस उभा राहिला तर ते मला लज्जास्पद आहे. मला बहुमताचा खेळच खेळायचा नाहीये. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्यांना शिवसेनेनं राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात पडत असेल तर ते पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे. त्याची फळं अशी भोगावी लागत असतील, तर त्यात त्यांचा काय दोष आहे. उद्या ते अभिमानानं सांगतील की बघा आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचलं की नाही..
मी सांगतो, उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमधे येऊ नये. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे पोलीस दल, इतर फोर्स, इतर देशातून सैन्य आणणार असतील, तर आणू द्या. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ.
तुमची नाराजी सूरतला किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षावर किंवा मातोश्रीवर येऊन सांगितलं असतं, तर बोललो असतो मी. काय आहे ते समोर येऊन बोला. आजही मी तुमच्याशी आदरानं बोलतो आहे. शिवसैनिकांनी तुम्हाला एकदा आपलं मानलं होतं. तुमच्याशी वाद-लढाया काय करायच्या?
जे दगा देणार असं म्हटलं जात होतं, ते सोबत राहिले. आजही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की आपल्या लोकांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला आक्षेप असेल तर आम्ही बाहेर पडतो. बाहेरून पाठिंबा देतो. पण त्यांना सांगा तुम्ही या. कालही मी आवाहन केलं होतं – उद्धव ठाकरे
आज न्यायदेवतेनं निकाल दिला आहे. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या तातडीने बहुमत चाचणी करण्याचा राज्यपालांनी आदेश दिला आहे, त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. राज्यपालांनाही धन्यवाद द्यायचं आहे की आपण लोकशाहीचा मान राखलात. काहींनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर २४ तासांच्या आत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. पण दीड वर्षापासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी तुमच्याकडे प्रलंबित आहे, तीही तातडीने अजूनही मंजूर केलीत, तर आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल.
मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली. मातोश्रीला सातत्याने लोक येत आहेत. साधी माणसं येत आहेत. काळजी करू नका म्हणत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं, ते हिंमतीनं सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. याच नात्याच्या जोरावर शिवसेना आजपर्यंत मजबूत उभी राहिली आहे.
मला शरद पवार आणि सोनिया गांधी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आदित्य, अनिल परब आणि सुभाष देसाई हे केवळ चार शिवसेनेचे मंत्री होते याचं दु:ख होतंय. नामांतराचे ठराव मांडले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एका शब्दाचाही विरोध केला नाही. – उद्धव ठाकरे
शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव ठेवलं होतं. ते नाव आपण आज दिलं आहे. उस्मानाबादला धाराशीव हे नाव दिलं आहे. वांद्रे वसाहतीतच सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंड मंजूर केला आहे.
सरकार म्हणून आपण काय केलं, तर सुरुवातीलाच छत्रपतींच्या रायगडाला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. पीकविमा योजनेचं बीड पॅटर्न करून घेतलंय – उद्धव ठाकरे
रात्री ९.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाच्या आमदारांनी जल्लोष केल्याचा व्हिडीओ भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या बहुमत चाचणी बाबत निर्णय आल्यानंतर भाजपा आमदारांनी भारत माता की जय चा जयजयकार केला pic.twitter.com/wBpmUBAepP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 29, 2022
काही आमदारांनी बाहेर जायचं आणि एखादा ग्रुप करायचा. त्यातून उपाध्यक्षांवर अविश्वास आणायचा आणि त्याच्या आधारावर सगळं ठरवायचं. ही कामाची पद्धत नाही. एक प्रकारे हा विधिमंडळाचा अवमान आहे. विधिमंडळाचं पावित्र्य यातून संपेल. संवैधानिक प्रक्रियेची यातून हत्या होणार आहे – नाना पटोले
उद्याच होणार बहुमत चाचणी!
No stay of floor test tomorrow : Bench pronounces order.#MaharashtraPolitcalCrisis #FloorTest #Governor #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
थोड्याच वेळात निकाल दिला जाणार
Lawyers are waiting for the bench to assemble.#MaharashtraPolitcalCrisis #FloorTest #Governor #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी खोचक ट्वीट केलं आहे.
सत्ता सुंदरी सोडून जातेय हे लक्षात येताच गेली अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेले दिसतेय…#संभाजीनगर
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022
आम्ही उद्या मुंबईला पोहोचणार आहोत. विश्वासदर्शक ठरावामध्ये आमचे सगळे आमदार सहभागी होणार आहेत. त्यानंतर पुढची कार्यवाही सर्व आमदारांसोबत चर्चा करून घेऊ. न्यायालयाच्या निकालाचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. त्या निकालानुसार पुढची कार्यवाही होईल. बहुमत चाचणी आम्ही १०० टक्के जिंकू.
सर्वोच्च न्यायालयात तिन्ही पक्षकारांचा युक्तिवाद संपला असून रात्री ९ वाजता निकाल येणार आहे.
Bench will pronouce the orders at 9 PM today.#MaharashtraPolitcalCrisis #Governor #FloorTest #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
या वादात समतोल साधायलाच हवा. एकतर बहुमत चाचणी आठवड्याभरासाठी पुढे ढकला किंवा अपात्रतेसंदर्भातील सुनावणी आधी घ्या – अभिषेक मनु सिंघवी
Singhvi : This is a question of balancing competing equities. Either defer the floor test for a week or prepone the other matter, that is the only way to balance.#MaharashtraPolitcalCrisis #Governor #FloorTest #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
ज्यांना असं वाटत असेल की फक्त विधानसभा अध्यक्षच राजकीय व्यक्ती असतात आणि राज्यपाल कधीच राजकीय वागू शकत नाहीत, तर त्यांना मी सांगेन जागे व्हा आणि आसपास बघा. भलत्याच जगात राहू नका. हे तेच राज्यपाल आहेत, ज्यांनी जवळपास वर्षभर राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या यादीवर निर्णय घेतला नाही – अभिषेक मनु सिंघवी
Singhvi : Those who believe that the Speaker is only political and #Governor can never be political, I tell them, wake up and smell the coffee, don't live in ivory towers.#MaharashtraPolitcalCrisis #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #FloorTest
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
विधानसभा उपाध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव कलम १७९ अंतर्गत फक्त सभागृह सुरू असतानाच मांडला जाऊ शकतो. शिवाय त्यांच्यावर कोणते आरोप असल्याशिवाय ही कारवाई केली जाऊ शकत नाही. बंडखोर आमदारांनी पाठवलेल्या पत्रात असे कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत – अभिषेक मनु सिंघवी
विधानसभा उपाध्यक्षांनीच बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी फक्त दोन दिवसांची वेळ दिली होती. आता तेच म्हणतायत की बहुमत चाचणीसाठी फक्त २४ तासांचाच अवधी का? – तुषार मेहता यांचा सवाल
SG : Dy Speaker gave two days notice. Now the same person is asking why 24 hours notice for floor test.#MaharashtraPolitcalCrisis #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #FloorTest #Governor
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
राज्यपालांच्या आदेशांना आव्हान देण्याचे निकष विरोधी पक्षकारांच्या याचिकेत पूर्ण होत नाहीत – तुषार मेहता
SG : The parameters for challenging #Governor's order are not met by the petitioners.#MaharashtraPolitcalCrisis #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi #FloorTest #Governor
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
अध्यक्ष काही सदस्यांना अपात्रतेची विनंती सादर करायला सांगू शकतात. जेणेकरून एक विधानसभा अध्यक्ष म्हणून मी माझे मतदार निवडू शकेन. शेवटी यातून मी हे ठरवत असतो की कोण मतदान करणार. पण एक विधानसभा अध्यक्ष कोण मतदान करणार आणि कोण नाही हे ठरवू शकत नाही – तुषार मेहता
SG : Speaker cannot decide his voters list. Speaker cannot decide his electoral college.#MaharashtraPolitcalCrisis #MahaVikasAghadi #FloorTest #Governor
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी शिंदे गटाकडे ३९ आमदार आहेत. त्यातल्या १६ जणांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. पण माझे अशील (शिंदे गट) शिवसेना सोडत नाहीयेत. खरंतर तेच शिवसेना आहेत. त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे. याशिवाय अपक्ष आमदारांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे उरलेले फक्त १४ आमदार आम्हाला विरोध करत आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी काहींना मुलासारखं, काहींना मित्रासारखं, काहींना भावासारखं सांभाळलं. पण काहीही न पटणारी कारणं देऊन ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. दगाबाजीचा नवा अध्याय लिहिला गेला. औरंगजेबानं जशी संभाजी महाराजांची हत्या करवली, तशीच हत्या या लोकांनी लोकशाहीची केली. औरंगजेब जसा या मातीत गाडला गेला, त्याच पद्धतीने हे सगळे स्वत:ला बंडखोर समजतात, त्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावा लागेल. हे तुम्ही खरंच राष्ट्रीय हेतूने केलं, की यामागे स्वार्थ होता वा अन्य काही होतं याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील.
उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं, ते हेलावून टाकणारं आहे. (माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यामुळे ही अवस्था झाली) अस्वस्थ करणारं आहे. त्यांच्यासारखा एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. अजूनही ते मुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी वेदना बोलून दाखवली. संजय राऊत जेव्हा हे बोलतात, तेव्हा जे गुवाहाटीला बसलेत, त्यांना भयंकर राग येतो. संजय राऊतांना आवरा असं ते म्हणतात. मी जे बोलतो, ते उद्धव ठाकरे वेगळ्या शब्दात म्हणाले. माझ्याच लोकांनी मला दगा दिला हे डोळ्यात पाणी आणणारं त्यांचं विधान आहे.
“जर मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापासून टाळाटाळ करत असतील, तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की सरकारकडे सभागृहाचं बहुमत नाही” – नीरज कौल यांनी कर्नाटकमधील बोम्मई सरकारसंदर्भातील निकालपत्रातील मुद्दा वाचून दाखवला.
"The Chief Minister's refusal to take the test could be construed to, prima facie, indicate that they do not enjoy the confidence of the Legislature" – Kaul quotes from Bommai decision.#FloorTest #SupremeCourt #Maharashtra
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
सध्याची परिस्थिती पाहाता तातडीने बहुमत चाचणी घेणं आवश्यक आहे. आणि राज्यपालांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात यासंदर्भातला निर्णय घेतला आहे – नीरज कौल
बहुमत चाचणीला जितका जास्त उशीर केला जाईल, तितकं राज्यघटनेचं नुकसान होईल. जर तुम्हाला घोडेबाजार होऊ द्यायचा नसेल, तर तो रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बहुमत चाचणी आहे. सरकार बहुमत चाचणीपासून का पळ काढतंय? – नीरज कौल
Kaul : The more you delay a floor test, the more damage and violence you do to the Constitution. If you want to prevent horse-trading, the best way to stop is floor test. Why are shying away from this?#FloorTest #SupremeCourt #Maharashtra
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
विधानसभा उपाध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अंतरिम आदेश काढलेले नाहीत. जर त्यांनी तसे आदेश काढले असते, तर आम्ही इथे ते आदेश स्थगित करण्यासाठी बाजू मांडत असतो – नीरज कौल
Kaul : If Speaker had passed that order, we would have persuaded your lordships to stay the order as per Rebia decision.#FloorTest #SupremeCourt #Maharashtra
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
राज्य सरकारला नेमकं कोण पाठिंबा देत आहे, हे जाणून घेण्यासाठी विधानसभेशिवाय दुसरी कोणती योग्य जागा असू शकेल का? – एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
Kaul : Can there be a better place in a democracy to determine who is supporting the govt than the floor of the house?#FloorTest #SupremeCourt #Maharashtra
— Live Law (@LiveLawIndia) June 29, 2022
सरकारमधील इतर दोन्ही पक्षांनी या काळात चांगलं सहकार्य लाभलं. पण माझ्या स्वत:च्याच पक्षातल्या काही लोकांनी सहकार्य केलं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बड
Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडींचे सर्व अपडेट्स!