Maharashtra Political Crisis Live : महाराष्ट्रात राजकीय संकट, वाचा प्रत्येक अपडेट... | Maharashtra political crisis live updates eknath shinde uddhav thackeray devendra fadnavis shivsena bjp mahavikas aghadi congress | Loksatta

Maharashtra Political Crisis : आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील; वाचा प्रत्येक अपडेट…

Maharashtra Political Crisis News Update : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे.

Maharashtra Political Crisis : आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील; वाचा प्रत्येक अपडेट…
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बड

Maharashtra Political Crisis, Eknath Shinde Live : महाराष्ट्रातील राजकीय संकट गंभीर होताना दिसत आहे. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि पक्ष प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तसेच वर्षा हा मुख्यमंत्री निवास सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिवसेनेत घडामोडींना वेग आलाय. एकनाथ शिंदे गटाकडून आज भाजपाला समर्थनाचं पत्र देण्यात येणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात त्याची प्रत्येक अपडेट देणारा हा लाईव्ह आढावा…

Live Updates

Maharashtra Political Crisis Live News Update : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. Read In English

23:33 (IST) 23 Jun 2022
“…असल्या धमक्यांना भीक घालत नाही”, एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांवर पलटवार

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी

22:14 (IST) 23 Jun 2022
आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची पक्षातील ताकद आणखी वाढताना दिसत आहे. आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेचे आमदार कृषी मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड आणि आमदार रवींद्र फाटक हे गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. याठिकाणी शिंदे गटातील नेत्यांकडून त्यांचं स्वागत झालं.

21:31 (IST) 23 Jun 2022
“आमच्याही मंत्र्यांना त्रास दिला होता”; नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवारांची तीव्र नाराजी, म्हणाले…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या आरोपाला दुजोरा देताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांनाही त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला. यावर आता स्वतः अजित पवार यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंत्र्यांना, आमदारांना त्रास दिल्याचे आरोप फेटाळून लावले. मित्र पक्षातील लोकांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा बैठकीत विषय मांडला असता तर तेव्हाच गैरसमज दूर केले असते, असंही नमूद केलं.

सविस्तर बातमी…

21:29 (IST) 23 Jun 2022
“अजित पवारांनी आमच्याही मंत्र्यांना त्रास दिला होता”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

एकीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांनी बंड केल्याने महाविकासआघाडी सरकार अस्थिर झालंय. दुसरीकडे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार त्रास देत असल्याचा आरोप केला. तीच बाब आमच्यासमोर देखील येत होती. अजित पवार यांनी आमच्या मंत्र्यांनाही त्रास दिला होता,” असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते गुरुवारी (२३ जून) एबीपी माझाशी बोलत होते.

सविस्तर बातमी…

20:46 (IST) 23 Jun 2022
तपास यंत्रणांच्या दबाबामुळे तिकडे गेले असा निष्कर्ष काढणं योग्य नाही- शरद पवार

ईडीच्या दबावामुळे ते तिकडे गेले, असा एकदम निष्कर्ष काढणं योग्य नाही. याबाबत माझ्याकडे खात्रीशीर माहिती नाहीये. पण ही गोष्ट खरी आहे, की त्यातील काही लोकांची वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्यामुळे त्यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव नाही, असं म्हणता येणार नाही. – शरद पवार

20:36 (IST) 23 Jun 2022
बंडखोर आमदारांना इथे यावेच लागेल- शरद पवार

बंडखोर आमदारांना इथे यावेच लागेल, राज्यपालांच्या समोर किंवा विधानसभेत तरी त्यांना यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला माहीत नाही की आसाम, गुजरातमधील भाजपाचे नेते इथे येऊन, त्यांना मार्गदर्शन करू शकतील- शरद पवार

20:27 (IST) 23 Jun 2022
आमदारांची व्यवस्था करणारी लोक माझ्या परिचयाचे- शरद पवार

सुरतला आणि आसामला आमदारांची व्यवस्था करणारे लोक अजित पवार यांच्या परिचयाचे असतील, असं मला वाटत नाही. पण माझ्या परिचयाचे आहेत. उदा- सुरतमध्ये भाजपाचे राज्याचे अध्यक्ष बंडखोर आमदारांना जाऊन भेटणं, याचा अर्थ काय घ्यायचा.- शरद पवार

20:18 (IST) 23 Jun 2022
गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हा लोकांना अधिक माहीत- शरद पवार

अजित पवारांनी महाराष्ट्रातील, मुंबईतील स्थिती पाहून त्यांनी विधान केलं असावं. अजित पवारांना इथली माहिती जरूर आहे, परंतु गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हा लोकांना अधिक माहीत आहे. – शरद पवार

20:11 (IST) 23 Jun 2022
अशी स्थिती यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली – शरद पवार

अशी स्थिती यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आहे. या परिस्थितीवर मात करून हे सरकार व्यवस्थित उभारेल. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे. हे संपूर्ण देशाला कळेल. – शरद पवार

20:08 (IST) 23 Jun 2022
अविश्वास ठराव घेतल्यानंतर लक्षात येईल की हे सरकार बहुमतात आहे. – शरद पवार

सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचं ठिकाण विधानसभा आहे. विधानसभेत अविश्वास ठराव घेतल्यानंतर लक्षात येईल की हे सरकार बहुमतात आहे. – शरद पवार

19:59 (IST) 23 Jun 2022
हा प्रयोग फसलाय म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान- शरद पवार

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्यानं उत्तम कामगिरी केली, हे सर्व पाहिल्यानंतर हा प्रयोग फसलाय म्हणणं, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद इथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीनं नेलं ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल – शरद पवार

19:45 (IST) 23 Jun 2022
“रात्री १२.३० वाजता भर पावसात चालत असताना मागे १५० पोलीस”; गुवाहाटीतून पळून आलेल्या आमदाराने सांगितला धक्कादायक घटनाक्रम

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी अंगावर काटा उभा राहील अशी आपल्या गुवाहाटी येथून सुटकेची 'आपबिती' सांगितली आहे. यात त्यांनी रात्री १२.३० वाजता रस्त्यावर चालायला सुरुवात केली तेव्हा मागे १५० पोलिसांचा ताफा असल्याचं सांगितलं. तसेच मला कोणताही आजार नसताना २०-२५ जणांना पकडून मला जबरदस्तीने इंजेक्शन दिल्याचा गंभीर आरोप केला. ते मुंबईत वर्षा निवासस्थानासमोर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.

सविस्तर बातमी…

19:44 (IST) 23 Jun 2022
“अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाही, कारण..”; शिंदे गटाच्या दाव्यावर विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी नवा गट स्थापन करण्याबाबत पाठिंबा असलेल्या आमदारांचं पत्र पाठवलं आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शिंदे गटाने पाठवलेल्या पत्रात काही अपक्ष आमदारांची नावंही आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांना तो अधिकार आहे की नाही हे तपासलं जाईल,” असं मत नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केलं. तसेच अपक्ष आमदारांची मतं गृहीत धरली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं. ते गुरुवारी (२३ जून) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी…

19:44 (IST) 23 Jun 2022
“शिंदे गटाच्या पत्रावरील आमदार देशमुखांच्या सहीवर प्रश्नचिन्ह, त्यामुळे…”; विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं विधान

राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर राजकीय संकट निर्माण झालं आहे. कोण शिवसेनेचा विधीमंडळातील गटनेता, कोण प्रतोद याविषयी ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यत्र नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी कायद्यानुसार पक्षाचा गटनेता निवडण्याचा अधिकार संबंधित पक्षाच्या प्रमुखाला असतो, असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून गटनेतेपदाबाबत होणाऱ्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

सविस्तर बातमी…

19:13 (IST) 23 Jun 2022
आजपर्यंत शिवसेनेत बंड करणारे सहकारी परत निवडून आले नाहीत : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “आजपर्यंत शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झाला तेव्हा नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्यामागे गेले नाही. मी राजकारणात आल्यानंतर हे तिसरं बंड आहे. एक छगन भुजबळ यांनी केलेलं बंड, दुसरं नारायण राणे यांनी केलेलं बंड आणि तिसरं एकनाथ शिंदे यांचं बंड आहे. यावरून असं दिसतं की बंड करणारा प्रमुख नेता एकवेळ टिकतो, पण बंड करणारे इतर सहकारी नंतर निवडून देखील येत नाहीत अशापद्धतीने शिवसैनिक कष्ट घेतात.”

19:03 (IST) 23 Jun 2022
शिवसेना आमदारांच्या बंडामागे भाजपाचा हात दिसत नाही : अजित पवार

“शिवसेना आमदारांच्या बंडामागे भाजपाचा हात आहे असं दिसत नाही. आतापर्यंत भाजपाचा कोणताही मोठा चेहरा या आमदारांना भेटल्याचं समोर आलेलं नाही,” असं मत अजित पवार यांनी नमूद केलं.

18:57 (IST) 23 Jun 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा राहील. माझं दुपारी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंशी बोलणं झालं आहे. मी माध्यमांना विनंती करतो की आमची वेगळी भूमिका नाही. शिवसेनेत काय सुरू आहे ते वेगवेगळे नेते सांगत आहेत. काही आमदार परत आले आहेत. त्यांनी तिथं काय झालं ते सांगितलं आहे.”

18:55 (IST) 23 Jun 2022
मित्र पक्षातील काही लोक निधीबाबत आरोप करत आहेत : अजित पवार

“मित्र पक्षातील काही लोक निधीबाबत आरोप करत आहेत. मात्र, राज्यात प्रत्येक पक्षाला १/३ पालकमंत्रीपदं दिले. सर्वांना निधी दिला, कधीही दुजाभाव केला नाही. त्यामुळे त्यांनी तसा आरोप का केला हे माहिती नाही. त्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा आमच्या बैठकीत विषय मांडला असता तर तिथल्या तिथं गैरसमज दूर झाले असते. अशा काळात तिन्ही पक्षांनी आघाडी टिकेल आणि आत्ताची परिस्थिती हाताळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

16:16 (IST) 23 Jun 2022
“भाजपाकडून आमदारांचे हे हाल, तर सामान्य जनतेचं काय?”; नाना पटोलेंचा सवाल

नाना पटोले म्हणाले, “शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी सांगितलेला अनुभव धक्कादायक आहे! सत्तेसाठी भाजपा खालच्या पातळीवर जाऊन हवी तशी गुंडगिरी करत सुटले आहे! जिथे हे आमदारांची अशी अवस्था करतात तिथे सर्व सामान्य जनतेचे काय हाल करतील?”

15:51 (IST) 23 Jun 2022
अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, सत्तांतरासाठी राजकीय हालचालींना वेग, फडणवीसांच्या मुंबईतील बंगल्यावर पक्षप्रवेश

15:17 (IST) 23 Jun 2022
बंडखोर आमदार २४ तासात मुंबईत आले, तर मविआमधून बाहेर पडू : संजय राऊत

बंडखोरी करून गुवाहाटीत गेलेल्या शिवसेना आमदारांना २४ तासात ते परत मुंबईत आल्यास महाविकासआघाडीमधून बाहेर पडू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

15:15 (IST) 23 Jun 2022
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत फुट; शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचे शिंदेंना समर्थन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडण्याची शक्यता वर्तविली असतानाच, गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले. याशिवाय, ठाणे शहरभर शिंदे समर्थनाचे मोठे फलक लागले असून असेच काहीसे चित्र जिल्ह्याच्या इतर शहरांमध्ये आहे. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 23 Jun 2022
एकनाथ शिंदेंसोबत असणारे ३७ शिवसेना आमदार व ९ अपक्ष आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदेंसोबत असणारे ३७ शिवसेना आमदार व ९ अपक्ष आमदार कोण? शिंदे गटाकडून दिलेली संपूर्ण यादी वाचा…

१. एकनाथ शिंदे

२. अनिल बाबर

३. शंभूराजे देसाई

४. महेश शिंदे

५. शहाजी पाटील

६. महेंद्र थोरवे

७. भरतशेठ गोगावले

८. महेंद्र दळवी

९. प्रकाश अबिटकर

१० डॉ. बालाजी किणीकर

११. ज्ञानराज चौगुले

१२. प्रा. रमेश बोरनारे

१३. तानाजी सावंत

१४. संदीपान भुमरे

१५. अब्दुल सत्तार नबी

१६. प्रकाश सुर्वे

१७. बालाजी कल्याणकर

१८. संजय शिरसाठ

१९. प्रदीप जयस्वाल

२०. संजय रायमुलकर

२१. संजय गायकवाड

२२. विश्वनाथ भोईर

२३. शांताराम मोरे

२४. श्रीनिवास वनगा

२५. किशोरअप्पा पाटील

२६. सुहास कांदे

२७. चिमणआबा पाटील

२८. लता सोनावणे

२९. प्रताप सरनाईक

३०. यामिनी जाधव

३१. योगेश कदम

३२. गुलाबराव पाटील

३३. मंगेश कुडाळकर

३४. सदा सरवणकर

३५. दीपक केसरकर

३६. दादा भुसे

३७. संजय राठोड

अपक्ष आमदार

१. बच्चू कडू

२. राजकुमार पटेल

३. राजेंद्र यड्रावकर

४. चंद्रकांत पाटील

५. नरेंद्र भोंडेकर

६. किशोर जोरगेवार

७. मंजुळा गावित

८. विनोद अग्रवाल

९. गीता जैन

14:59 (IST) 23 Jun 2022
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार पण… – संजय राऊत

महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा सर्व आमदारांची असेल. तर त्यांनी आधी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे, ती त्यांनी अधिकृतपणे शिवसना प्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल. पण आधी मुंबईत यांची हिंमत दाखवावी.

14:28 (IST) 23 Jun 2022
संजय राऊत दोन आमदारांना घेऊन वर्षाबाहेर, म्हणाले २३ आमदार सोबत असतील

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना आमदार कैलास पाटील व नितीन देशमुख मुंबईत आले आहेत. यातील एक गुवाहाटीतून व एक सुरतमधून परत आलेत. शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या ताब्यातील २१ आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हा ते २१ आमदार आमच्यासोबत असतील. एकूण ते २१ आणि हे २ असे २३ आमदार शिवसेनेसोबत आहेत.”

14:05 (IST) 23 Jun 2022
गुवाहाटीत किती शिवसेना आणि अपक्ष आमदार उपस्थित? नव्या व्हिडीओने आकडेवारी समोर…

गुवाहाटीत किती शिवसेना आणि अपक्ष आमदार उपस्थित? नव्या व्हिडीओने आकडेवारी समोर, गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित

13:48 (IST) 23 Jun 2022
एकनाथ शिंदे यांना आमदारांचा वाढता पाठिंबा, दीपक केसरकरांसह काही आमदार गुवाहाटीत

गुवाहाटी : शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांना आमदारांचा वाढता पाठिंबा

13:46 (IST) 23 Jun 2022
भंडारा जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत : संजय रेहपाडे

भंडारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे म्हणाले, “मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात जो गोंधळ सुरू आहे तो क्षणिक आहे. राज्यातील शिवसैनिक हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहे.”

13:05 (IST) 23 Jun 2022

Photos : “शिवसेनेचे आमदार गेले असले तरी…”; मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडल्यानंतर शिवसैनिक भावूक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्री निवासस्थानावरून 'मातोश्री'वर मुक्काम हलवला. मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

12:37 (IST) 23 Jun 2022
Photos : ‘या’ एका गोष्टीमुळे शिवसेना नेतृत्वाला नोव्हेंबपासूनच होती एकनाथ शिंदेंवर शंका

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल मुख्यमंत्री किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अनभिज्ञ होते, अशी चर्चा सुरू झाली असली तरी ठाकरे यांना गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे यांच्या हालचालींची चाहूल लागली होती.

सविस्तर बातमी

12:31 (IST) 23 Jun 2022
“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो”; विधानसभा उपाध्यक्षांचं सूचक वक्तव्य

“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं,” अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली.

12:30 (IST) 23 Jun 2022
आमदार देशमुखांनी त्यांच्या स्वाक्षरीवर प्रश्न उपस्थित केले, मी त्याची खात्री करून घेणार : नरहरी झिरवळ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, “देशमुखांनी ते सुरतला होते असं सांगितलं, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. त्यांनी मी इंग्रजी सही करतो मात्र पत्रावरील सही मराठी आहे. त्यामुळे माझी स्वाक्षरी गृहीत धरू नये असं प्रश्नांकीत केलंय. मी ते तपासून घेईल आणि माझी खात्री झाली की विचार करेन.”

12:19 (IST) 23 Jun 2022
गटनेतेपदासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र स्विकारलं : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदाबाबत दिलेलं पत्र आम्ही स्विकारलं आहे. आता अजय चौधरी हे शिवसेनेचे गटनेते आहेत. बाकी काही आक्षेप असतील तर ते तपासावे लागतील.”

12:11 (IST) 23 Jun 2022
गुवाहाटीत तृणमूल काँग्रेसचं आंदोलन

महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला असताना तृणमूल काँग्रेसनेही आता यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसोबत थांबलेल्या गुवाहाटीमधील हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. राज्यात पूर आल्याने लोकांचा जीव जात असताना महाराष्ट्रातील लोकांचं आदरातिथ्य केलं जात असल्याने तृणमूलच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे.

11:49 (IST) 23 Jun 2022
“जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे…,” बंडखोर आमदारांवर संजय राऊतांचं मोठं विधान

Eknath Shinde Maharashtra Government : जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही असंही संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलता म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

11:48 (IST) 23 Jun 2022
फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपा नेत्यांची बैठक सुरु आहे. अभिमन्यू पवार, श्रीकांत भारतीय, आशिष शेलार, कालिदास कोळंबकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

11:47 (IST) 23 Jun 2022
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? दिपाली सय्यदला पडला प्रश्न

दीपाली सय्यद म्हणाल्या, “सन्माननीय एकनाथ शिंदे मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धव ठाकरे यांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू.”

11:25 (IST) 23 Jun 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील विभागांच्या सचिवांसमवेत बैठक घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२.३० वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयातील विभागांच्या सचिवांसमवेत बैठक घेणार

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे (संपादित छायाचित्र)

महाराष्ट्रातील राजकीय संकट गंभीर होताना दिसत आहे. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे.

Next Story
एकनाथ शिंदेंच्या गटासमोर भाजपाची अट? प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ ट्विटने खळबळ

संबंधित बातम्या

“यापुढे शिवरायांचा अपमान कुणी करूनच दाखवावा, काय होईल…”, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा!
संजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…
“शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी”, उदयनराजेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
शिंदे- फडणवीस सरकारला मोठा धक्का, महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामे रद्दच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
कृत्रिम नखं वापरताय?… इकडे लक्ष द्या
छेडछाडीला कंटाळून बारावीत शिकणाऱ्या युवतीची आत्महत्या; पाठलाग करणाऱ्या मुलांविरोधात गुन्हा दाखल
VIDEO : “तू तुझ्या औकातीत राहा, मला…”, ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी
सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी बनली ८० लाखाची मालकीन; मुलीच्या जन्मामुळे असं पालटलं महिलेचं नशीब
म्हैसाळ योजनेवरून भाजपाच्या माजी आमदाराचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “दुष्काळी जनतेची दिशाभूल…”