मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केलं आहे. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत –

“आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यात वेगवान घडामोडी घडत असताना फडणवीस दिल्लीत दाखल; एकनाथ शिंदेंसोबत भेटीची शक्यता, चर्चांना उधाण

“कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

Viral Video: राजकारणात म्हणजे गटारात कधी उतरणार? संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल

“कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू,” असंही ते म्हणाले आहेत.

लवकरच मुंबईला जाणार – एकनाथ शिंदे

दरम्यान काही वेळ आधीच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गुवाहटीमधील हॉटेलबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे समर्थक गटाचे दावे फेटाळले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणणाऱ्यांनी नावं सांगावी, असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसंच आपण लवकरच मुंबईला जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, “दीपक केसरकर आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. ते माध्यमांना वेळोवेळी माहिती देतील. गुवाहटीमधील सर्व आमदार अगदी आनंदात आहेत. बाहेरून काही लोक गुवाहटीतील आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा करत आहेत. मात्र, त्यांनी कोणते आमदार संपर्कात आहेत ती नावं सांगावी. त्यानंतरच यावर स्पष्टता येईल. आम्ही लवकरच मुंबईला जाणार आहोत”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis maharashtra cm uddhav thackeray appeal to rebels mla eknath shinde sgy
First published on: 28-06-2022 at 15:25 IST