शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गुवाहाटीला गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत आणि ही जिवंत प्रेतं आता मुंबईत येतील, तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन एकच गदारोळ सुरु झाला होता. त्यातच आता संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं असून ते चर्चेत आहे.

“शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा, गुवाहाटीतील हॉटेलमधून…”; नारायण राणेंना आठवली ठाकरे सरकारने केलेली अटकेची कारवाई

संजय राऊत यांनी एक पोस्ट ट्विटरला शेअर केली आहे. यामध्ये लिहिण्यात आलं आहे की, “अगतिकता एक प्रकारचा मृत्यूच आहे आणि अगतिक लोक चालते फिरते मृतदेहच असतात”.

राऊत नेमकं काय म्हणाले होते?

रविवारी म्हणजेच २६ जून २०२२ रोजी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. त्यावर संध्याकाळी राऊत यांनी सारवासारव केली. आमदारांनी आत्मा विकल्याने जे उरले ते केवळ त्यांचे जिवंत शरीर मृतदेहासारखेच आहे. आता त्यांचे विधानभवनात विच्छेदन होईल, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचा खुलासा राऊत यांनी केला होता.