Maharashtra New Updates Today, 04 July 2023 : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आमदार-खासदारांशी संपर्क होत आहे. शिवाय आपले दावे कसे खरे हे सांगण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. असं असलं तरी स्वतः शरद पवार यांनी मात्र मैदानात उतरत लोकांमध्ये जाणे पसंत केलं आहे. यानंतर अजित पवार गटात मानले जाणारे अनेक आमदार-खासदार सतर्क होऊन आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणासह प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींच्या अपटेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Mumbai Maharashtra Updates : राष्ट्रवादीमधील बंडखोरीसह महाराष्ट्रातील राजकारणासह प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींच्या अपटेट्स एका क्लिकवर...

20:32 (IST) 4 Jul 2023
शरद पवारांना भेटून आल्यावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रियाम्हणाले, "मी त्यांना एक पत्र..."

आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवारांच्या गटात दिसणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका बदलत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच झालेल्या प्रकाराने अस्वस्थ होत खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचं जाहीर केलं. मंगळवारी (४ जुलै) अमोल कोल्हेंनी मुंबईत सिल्व्हर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली.

सविस्तर वाचा...

19:35 (IST) 4 Jul 2023
शरद पवारांबाबत वसंतदादांची बदल्याची भावना नव्हती – विशाल पाटील

सांगली : स्व. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्यात पुढाकार होता म्हणून शरद पवार यांच्याबाबत स्व. दादांनी कधीही बदल्याची भावना ठेवली नाही, यामुळे वारसदार म्हणून तीच भावना जोपासण्याची आम्हाला गरज नाही, असे मत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा..

19:12 (IST) 4 Jul 2023
लसूण महागला, दरात १०-१५ रुपयांनी वाढ; उत्पादन कमी मागणी जास्त

नवी मुंबई: एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वधारत आहेत.

सविस्तर वाचा...

19:10 (IST) 4 Jul 2023
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नागपुरात; उद्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात सहभागी होणार

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकाच विमानातून मंगळवारी नागपूर विमानतळावर सायंकाळी आगमन झाले. यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही आगमन झाले.

सविस्तर वाचा...

18:43 (IST) 4 Jul 2023
कळवा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय टळणार; प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता पदांची भरती प्रकिया सुरू

ठाणे: महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता अशी एकूण ७० पदे रिक्त आहेत.

सविस्तर वाचा...

18:35 (IST) 4 Jul 2023
नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर फाडले, शहर कार्यकारिणीची शरद पवारांना साथ

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाचे तीव्र पडसाद नागपूर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून आले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि बाबा गुजर यांच्या विरोधात “गद्दार, गद्दार” अशा घोषणा देत त्यांचे पोस्टर आज नागपुरात फाडण्यात आले. दरम्यान, शहर कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

सविस्तर वाचा...

18:20 (IST) 4 Jul 2023
पुणे नॉलेज क्लस्टरतर्फे विद्यार्थिनी, उद्योजक महिलांसाठी शिष्यवृत्ती; अर्जांसाठी २५ जुलै अंतिम मुदत

पुणे: विज्ञान-संशोधनाच्या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे ज्ञान समुहातर्फे (पुणे नॉलेज क्लस्टर) ‘वी ज्ञान’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी आणि महिलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

17:38 (IST) 4 Jul 2023
सातारा : किल्ले वर्धनगड येथील दर्गा परिसरातील अतिक्रमण हटविले

वाई : किल्ले वर्धनगड (ता कोरेगाव) येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या दर्गा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम आज पहाटे पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

वाचा सविस्तर...

17:29 (IST) 4 Jul 2023
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न, माजी नगरसेवकांकडून मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी

ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर निकटवर्तीय सोडून गेल्याने ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे एकाकी पडले असतानाच, आता मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून मोट बांधून आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 4 Jul 2023
पुणे: विद्यार्थ्याला स्टीलच्या छडीने मारहाण; खासगी शिकवणी चालक महिलेविरुद्ध गुन्हा

पुणे: विद्यार्थ्याला स्टीलच्या छडीने मारहाण केल्या प्रकरणी कोथरुड भागातील एका खासगी शिकवणी चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 4 Jul 2023
"राष्ट्रवादीच्या 'त्या' आमदाराने शरद पवारांना एकटं सोडू असं पत्र दिलं", जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, आम्ही शरद पवारांना सोडू हे पत्र जयंत पाटील यांच्या हातात देण्यात आलं होतं. जयंत पाटलांनी ते शरद पवारांना ते दिलंच नाही. त्यांना माहिती होतं की, हे पत्र पाहिल्यावर शरद पवारांना किती वाईट वाटेल. त्यातील काही आमदारांचं तेव्हा म्हणणं होतं की, शरद पवारांना सोडा, त्यांना एकट राहू द्या, त्यांचं संपलं आहे, आपण जाऊ. मी त्या आमदाराचं नावही सांगतो. त्या आमदाराचं नाव दिलीप बनकर आहे. आता सगळं खरं सांगण्याची वेळ आली आहे. तेव्हा जयंत पाटील माझ्यासमोर ढसाढसा रडले होते.

- जितेंद्र आव्हाड (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

17:13 (IST) 4 Jul 2023
पक्षाचं कार्यलय कुणाचं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात राडा

नाशिकमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय कुणाचं यावरून शरद पवार समर्थक गट आणि अजित पवार समर्थक गटात राडा झाला. अजित पवारांच्या गटाने सकाळपासून कार्यालयात ठाण मांडून कार्यालयावर दावा केला. यानंतर शरद पवारांच्या गटाने कार्यालयासमोरच ठाण मांडून आंदोलन केलं. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

17:13 (IST) 4 Jul 2023
बुलढाणा: ‘समृद्धी’वरील ट्रॅव्हल्सच्या अपघाताचा तपास ‘एसडीपीओं’ कडे; प्रतिबंधासाठी पाच पोलीस ठाण्यांची समिती गठित

बुलढाणा: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या व २५ प्रवाशांचे बळी घेणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचा तपास खामगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:12 (IST) 4 Jul 2023
चंद्रपूर जिल्हा तथा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत, संयुक्त पत्रपरिषदेत निर्णय जाहीर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनुक्रमे राजेंद्र वैद्य व राजीव कक्कड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे पवार साहेबांना समर्थन असल्याचे संयुक्त पत्रपरिषद घेऊन जाहीर केले.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 4 Jul 2023
सावधान! ४० दिवसांत दुप्पट पैशांचे आमिष; बोरा बॅण्ड ऑनलाइन ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणुकीचे प्रलोभन, काय आहे प्रकरण?

भंडारा : काही दिवसांपासून बोरा बॅण्ड ही ऑनलाइन ट्रेडिंग साईट बंद झाली असून गुंतवणूकदारांचे पैसे विड्रॉल होत नसल्याने भंडारा शहारात बोरा बॅण्ड ऑनलाइन साईटचा प्रचार व प्रसार करून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून देण्याचे प्रलोभन देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.

सविस्तर वाचा..

16:32 (IST) 4 Jul 2023
मेळघाटात वनरक्षक भरतीसाठी सासू धावली सूनेच्या मदतीला

नागपूर : मेळघाटातील आदिवासींसाठी वनखात्याकडून गेल्या अनेक वर्षांनंतर वनरक्षकपदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इतक्या वर्षानंतर होणाऱ्या भरतीप्रक्रियेत आदिवासी तरुणाई कुठेही कमी पडू नये म्हणून या व्याघ्रप्रकल्प प्रशासनासोबतच दिशा फाउंडेशनने पुढाकार घेतला. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली आणि काय आश्चर्य, या कार्यशाळेत एक विवाहीत युवती आपल्या चिमुकल्याला घेऊन सहभागी झाली. या भरतीप्रक्रियेत आपली सून मागे पडू नये म्हणून मग सासूही तिच्या मदतीला धावली.

सविस्तर वाचा...

16:04 (IST) 4 Jul 2023
मुंबई : म्हाडाच्या ३८८ पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास अधांतरी! वर्ष उलटले तरी अंतिम धोरण लाल फितीत

मुंबई : दक्षिण मुंबईत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने म्हणजेच म्हाडाने पुनर्बाधणी केलेल्या, परंतु ३० वर्षे पूर्ण न झालेल्या विनाउपकरप्राप्त ३८८ इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद करण्यात येऊन वर्ष उलटले असले तरी याबाबत राज्य शासनाने अद्याप अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

सविस्तर वाचा...

16:03 (IST) 4 Jul 2023
२५ प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली ‘ती’ बस पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे

नागपूर : समृद्धी महामार्गावर ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या ज्या बसने २५ जणांचा बळी घेतला, ती बस यवतमाळ जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे आहे. पूर्वी वाहतूक शाखेत कार्यरत या पोलीस अधिकाऱ्याने पत्नीच्या नावे बस खरेदी करून प्रवाशी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 4 Jul 2023
रेल्वे रुग्णालयात मृतदेह बघून नातेवाईकांनी घातला गोंधळ

नागपूर: उपचारासाठी आणलेल्या ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने सोमवारी रेल्वे रुग्णालयाच्या आवारात मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 4 Jul 2023
बंडखोरीनंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून 'हे' ८ निर्णय

शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदाची आस लावून अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराचा दावा करत होते. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी घेतला. या बंडानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने ८ महत्त्वाचे निर्णय घेतले.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 4 Jul 2023
विश्लेषण : स्वतंत्र विदर्भाला जनसमर्थन नाही, हे गडकरी यांचे म्हणणे योग्य आहे का?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देणारे नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ‘स्वतंत्र विदर्भाला जनसमर्थन नाही’ असे विधान केले. या आंदोलनाचा पूर्व इतिहास बघितला व वेगवेगळ्या समित्यांनी स्वतंत्र राज्याबाबत दिलेल्या अहवालाचा विचार केला तर गडकरी यांचे हे विधान संयुक्तिक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर भाजपची नेमकी भूमिका काय, हे सुद्धा या निमित्ताने तपासायला हवे.

सविस्तर वाचा...

15:11 (IST) 4 Jul 2023
समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त बसच्या फॉरेन्सिक अहवालात ‘हे’ आहे आगीचे कारण

नागपूर : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ प्रवाशांचा बळी गेला. घटनेचा मुंबईच्या फाॅरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास करून अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात आगीचे खरे कारण पुढे आले आहे.

सविस्तर वाचा...

14:23 (IST) 4 Jul 2023
बुलढाण्याच्या दोन सुपुत्रांचा कझाकस्तानमध्ये डंका; ‘Iron Man’ स्पर्धा केली पूर्ण

बुलढाणा: जगातील खडतर आणि आव्हानात्मक मानली जाणारी कझाकस्तानमधील आयर्नमॅन स्पर्धा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांनी पूर्ण केली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकली आहे.

सविस्तर वाचा...

14:05 (IST) 4 Jul 2023
पुणे: मेट्रोच्या कामामुळे संचेती चौकातील भुयारी मार्गामधील पावसाळी वाहिनी फुटली; वाहतुकीत बदल

पुणे: शिवाजीनगर भागातील संचेती चौकात असलेल्या भुयारी मार्गात पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्गातील वाहतूक दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा यावेळेत बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

वाचा सविस्तर...

13:57 (IST) 4 Jul 2023
मुंबई महानगपालिका रुग्णालयात बोगस डॉक्टर; डॉक्टर उपलब्ध करणारी संस्था काळ्यायादीत

मुंबई: मुलुंड येथील मुंबई महानगरपालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये बोगस डॉक्टर उपलब्ध करणाऱ्या जीवन ज्योति चॅरिटेबल ट्रस्टला दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले असून या संस्थेचे नाव काळ्यायादीत टाकण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 4 Jul 2023
पुणे महापालिकेत एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न धूसर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे शहरातील राजकीय गणिते बदलणार असून, आगामी महापालिका निवडणुका भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढविल्यास भाजपच्या वाट्याच्या कमी जागा मिळणार आहेत.

वाचा सविस्तर...

13:44 (IST) 4 Jul 2023
विवेकानंद सेवा मंडळातर्फे हरित डोंबिवलीचा संकल्प

डोंबिवली: येथील विवेकानंद सेवा मंडळातर्फे शहराच्या विविध भागात अडीचशे रोपांच्या लागवडीचा संकल्प केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवली शहर हिरवेगार करण्याचा मंडळाचा मानस आहे.

वाचा सविस्तर

13:26 (IST) 4 Jul 2023
धुळे: नऊ गाड्यांना धडक देत कंटेनर थेट हाॅटेलमध्ये; शिरपूर अपघातातील मृतांची संख्या १२ पर्यंत, ४० जखमी

धुळे: जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर (ता.शिरपूर) शिवारात मंगळवारी सकाळी भरधाव कंटेनर महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये शिरुन उलटला.

सविस्तर वाचा...

13:10 (IST) 4 Jul 2023
मोठी बातमी! ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर केली 'ही' मागणी

ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास उशीर केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

13:03 (IST) 4 Jul 2023
मालेगाव: मद्यपी पित्याच्या हत्येप्रकरणी तरुणास जन्मठेप

मालेगाव: आई व पत्नीस वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या त्रासास कंटाळून मद्यपी पित्याची हत्या केल्याप्रकरणी तालुक्यातील टेहरे येथील ज्ञानेश्वर बोरसे या तरुणास येथील न्यायालयाने जन्मठेप व दोन लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सविस्तर वाचा...

Sharad Pawar Ajit Pawar Chhagan Bhujbal

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)